आपल्या सरकारने १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार केले. दावोस दौऱ्यात खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मोठमोठे उद्योग महाराष्ट्रात येतील. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील पाठीशी उभे आहेत. - @mieknathshinde
अडीच वर्षांपूर्वी शिवसेना भाजप युतीचे सरकार स्थापन होईल, अशी अपेक्षा होती. पण ते बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार स्थापन झाले नाही हाच मोठा धक्का होता. त्यामुळेच आम्ही धक्कातंत्रातून सावरण्यासाठी सरकार स्थापन केले. - @mieknathshinde
मेट्रोच्या निमित्ताने आपण जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. आठवड्याभरात दहा लाख लोकांनी प्रवास केला. मेट्रोची कामे अहोरात्र सुरू असून त्यामुळे मुंबईकरांचा वेळ वाचावा असा आमचा प्रयत्न असणार आहे. - @mieknathshinde
समृद्धी हायवे हा फक्त हायवे नाही, तर हा हायवे एक गेमचेंजर प्रकल्प आहे. समृद्धीच्या कामात आव्हाने होती, खूप विरोधही होता. भूसंपादनाच्या वेळी लोकांना विश्वास वाटावा म्हणून मी साक्षीदार म्हणून सही केली. - @mieknathshinde
जेव्हा लोक सकाळ, संध्याकाळ भेटतात ती माझी ऊर्जा असते. जेव्हा आपण थोडे बाजूला जातो, तेव्हा आठवते की लोकांमधूनच ऊर्जा मिळत असते. स्ट्रेस कमी करायला हा छोटासा विरंगुळा असतो. - @mieknathshinde
सातत्याने आम्ही विदर्भ, मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे म्हणायचो, त्यावेळी कनेक्टिव्हिटी हा महत्वाचा मुद्दा होता. नागपूर ते मुंबई जोडणारा सुपर एक्सप्रेस वे तयार व्हायला हवा हे माझ्या डोक्यात २० वर्षांपासून होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी समृद्धी महामार्गासाठी पुढाकार घेतला.
नागपूर ते मुंबई हा फक्त एक रस्ता नाही. जेएनपीटी बंदर राज्यातील २४ जिल्ह्यांना जोडण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राचं आर्थिक कॉरिडॉर तयार करण्यासाठी आम्ही हा रस्ता तयार केला.