सातत्याने आम्ही विदर्भ, मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे म्हणायचो, त्यावेळी कनेक्टिव्हिटी हा महत्वाचा मुद्दा होता. नागपूर ते मुंबई जोडणारा सुपर एक्सप्रेस वे तयार व्हायला हवा हे माझ्या डोक्यात २० वर्षांपासून होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी समृद्धी महामार्गासाठी पुढाकार घेतला.
नागपूर ते मुंबई हा फक्त एक रस्ता नाही. जेएनपीटी बंदर राज्यातील २४ जिल्ह्यांना जोडण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राचं आर्थिक कॉरिडॉर तयार करण्यासाठी आम्ही हा रस्ता तयार केला.
येत्या तीन वर्षात मुंबई बदलली असेल. मेट्रोतून १७ लाख नागरिक प्रवास करतील. आम्ही ३६० किमीच्या मेट्रो जाळ्याची संकल्पना तयार केली. प्रदुषणमुक्त आणि कुठूनही कुठे अशा ५९ मिनिटातील प्रवासाचा पर्याय आम्ही तयार करत आहोत. @Dev_Fadnavis
संपूर्ण पश्चिम किनारपट्टी सी लिंकद्वारे जोडणार. एमटीएचएलच्या माध्यमातून मुंबईला रिंग रूटचे नेटवर्क मिळणार. मुंबईतील वाहतूक कोंडीची ठिकाणे आम्ही शोधून काढलेली आहेत. मुंबईत ट्विन टनेल तयार करणार @Dev_Fadnavis#SakalNews#SakalSanman#SakalSanman2023#सकाळसन्मान
आपल्या सरकारने १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार केले. दावोस दौऱ्यात खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मोठमोठे उद्योग महाराष्ट्रात येतील. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील पाठीशी उभे आहेत. - @mieknathshinde
अडीच वर्षांपूर्वी शिवसेना भाजप युतीचे सरकार स्थापन होईल, अशी अपेक्षा होती. पण ते बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार स्थापन झाले नाही हाच मोठा धक्का होता. त्यामुळेच आम्ही धक्कातंत्रातून सावरण्यासाठी सरकार स्थापन केले. - @mieknathshinde