#शिवकाळ 🚩
१) औरंगजेबाच्या पदरी असलेला भीमसेन सक्सेना हा औरंगजेबबरोबर दक्षिणच्या स्वारीत होता. त्याने शिवाजी महाराजांनी मोगलांबरोबर दिलेल्या लढाया पाहिल्या होत्या. शिवाजी महाराजांच्या मृत्यूची नोंद आपल्या लिखाणात (दिलकुशात) केल्यावर महाराजांचे गुणवर्णन तो खालीलप्रमाणे करतो.
२) शिवाजी हा एक सत्पुरुष होता. शिपाईगडी म्हणून तो अद्वितीय होता. तो राजनीतीनिपुण होता. एकनिष्ठ सैनिकांना तो जीव की प्राण करी. प्रत्येक मोहिमेत तो आपल्या एकनिष्ठ सेवकांचा सल्ला घेई. पण त्याला जी मसलत योग्य वाटे आणि जी योजना पटे ती तो अमलात आणी.
३) तो ती प्रत्यक्ष अमलात येईपर्यंत कुणालाही तिची वार्तासुद्धा लागत नसे. शिवाजी हा अतिशय धूर्त आणि चतुर होता. त्या कला त्याला पूर्णपणे अवगत होत्या. शिवाजी आपले सैन्य चहूकडे पसरवून धामधूम उडवीत असे. शिवाजीपाशी चाळीस हजार घोडे होते. मोहिमेतून मालमत्ता हाती येई ती सरकारांत दाखल करावी
४) शिवाजीने आपले गुप्तहेर नेमले होते. सैनिकांपैकी कुणी माल लपवून ठेविला आहे याची माहिती त्याला आपल्या हेरांकडून लागे आणि मग सैनिकांना तो माल सरकारांत दाखल करावा लागे.
नुक्शा ( तारिख ) - ए - दिलकुशा -
भीमसेन सक्सेना चे आत्मचरित्र ( काळ- १६५६ ते १७०९ )
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#Thread
श्री.छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांसमोर मांडण्यासाठी अनेक इतिहासकारांनी जो त्याग केला त्याबद्दल आपण सर्वजण त्यांचे ऋणी आहोत ! या सर्व थोर इतिहासाकारांनी, श्री.छत्रपति शिवाजी महाराजांबद्दल काढलेले उद्गार या थ्रेड मधून आपण पाहू
१) राजेंनी निर्माण केलेल्या राज्याचे नाव ‘हिंदवी स्वराज्य’ असे होते. ते ‘हिंदू स्वराज्य’ नव्हते. हिंदवी याचा अर्थ हिंदुस्थानी. हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंद भूमीवरील लोकांचे राज्य. भूमिपुत्रांचे राज्य. असा व्यापक अर्थ या राज्याच्या स्थापनेमागे दडलेला आहे.
- डॉ जयसिंगराव पवार
२) मोगलांच्या अफाट सामर्थ्यापुढे महाराजांचे सामर्थ्य ते काय! पण आपल्या असामान्य बुद्धिचातुर्याने‚ मुत्सद्देगिरीने व रणनीतीने महाराजांनी मोगलांच्या फौजांना अनेकदा खडे चारले. ‘माझ्या देशाचे संरक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे’‚ अशी घोषणा दिली
संत श्री तुकोबा १६५० च्या सुमारास देवाघरी गेल्यावर त्यांच्या कुटूंबाची छत्रपती शिवाजी महाराजांनी काळजी घेतली असावी; पण तसे उल्लेख उपलब्ध नाहीत; मात्र छत्रपती शंभुराजेंनी तुकोबांचे पुत्र माहादोबा गोसावी यांचे आदर-काळजी व सोय केल्याचे पत्र उपलब्ध आहे ! खाली देतोय आपल्यासाठी 👇
१९ ऑगस्ट‚ १६८०
‘ माहादोबा गोसावीस वर्शासनाची मोईन’
तुकाराम महाराजांचे पुत्र महादोबा गोसावी यांसी संभाजी महाराजांनी वर्षासनाची नेमणूक करून दिल्याचे पुणे प्रांताच्या सुभेदारास आज्ञापत्र−
श्री प्रति स्वस्तिश्री राज्याभिशेक शके ७ रौद्र संवछर भाद्रपद शुद्ध पंचमी गुरुवार क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शंभु छत्रपति याणी राजश्री विनायेक उमाजी देशाधिकारी प्रांत पुणे यांसी आज्ञा केली यैसीजे-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वोच्च गुणांपैकी एक गुण म्हणजे - राजेंची अमोघ गोड वाणी' महाराजांची बोली, अन त्या बोलीमधील चातुर्य, याबद्दल ऐतिहासिक दस्ताऐवजामधील वर्णने फार कमी आहेत तरीही उपलब्ध साधने काय सांगतात हे आपण बघू 👇
समकालीन छत्रपती शिवाजी महाराजांचे चरीत्र लिहणारे परमानंद आपल्या शिवभारत संस्कृत काव्यग्रंथात सांगतात, "राजेंची वाणी अतीशय छान आणि गोड होती" याच सविस्तर वर्णन आपल्याला समकालीन कृष्णाजी अनंत विरचित सभासद बखर, आग्रा भेटी दरम्यान राजपूत बातमीदारानी टिपलेली काही वर्णने यात मिळेल
सभासद बखरीत - सभासद सांगतात -
"मातब्बर चहु जागचे मराठे यासी आप्तपणा करावा, पत्रे लिहावी; त्यास आणवून भेट घ्यावी; आपण त्याजकडे जाऊन आम्हास अनुकूल व्हा असे बोलावे; असे करण्यात ज्यानी महाराजांचे बोलणे परम आदराचे व पराक्रमाचे ऐकावे त्यास वेध लागून वाटावे की, हे परमथोर आहेत;
१) माणसांची माणुसकी त्यांच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याने होत असते. ज्या राष्ट्राला स्वातंत्र्य नाही, परकीयांच्या राजसत्तेखाली जे जगत असते, त्या राष्ट्रांतल्या माणसांना `ह्यूमेन कॅटल’ माणशी गुरेढोरे हीच संज्ञा यथायोग्य शोभते. 👇
२) राजेंच्या हृदयांत राष्ट्रधर्माच्या या तीव्र भेदाची विद्युल्लता चमकेपर्यंत, सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत, महाराष्ट्रातला हिंदू म्हणजे ह्यूमन कॅटल बनलेला होता. तोंड असून मुका, कान असून बहिरा, डोळे असून आंधळा आणि माणूस असून परकीय मुसलमानी सत्तेच्या पखाली वाहणारा बैल होऊन राहिला
३) होता. गुलामगिरीचा पेंड कडबा खाऊन खाऊन हा बैलसुद्धा इतका मस्तवाल बनला होता, की इस्लामी मानपानाच्या नक्षीदार झुली घुंगुरमाळांनी नटलेल्या त्याच्या अनेक पुढारी नंदीबैलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रीय प्रबोधन – कार्यांत शेकडो वेळा शिंगे खुपण्यास कमी केले नाही.
14 जानेवारी 1761 रोजी पेशव्यांचा अब्दाली कडून दारुण पराभव झाला.अब्दालीचे सैन्य पेशव्यांच्या सैन्याच्या तुलनेत अत्यंत कमी असताना देखील पेशव्यांचे एक लाख सैन्य मारले गेले, हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत दुःखद दिवस आहे.
महाराष्ट्राची एक पिढी गारद झाली. पण हा दारुण पराभव का झाला, याची कारणे काय आहेत? त्याचा परामर्श घेणे इतिहास, वर्तमान आणि भविष्यकाळाच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. कारण इतिहास हा इतिहासात रमण्यासाठी नसतो, तर इतिहासातून बोध घेऊन
वर्तमानकाळावरती मात करून भविष्यकाळात यशस्वी होण्यासाठी इतिहास असतो. पेशव्याच्या सैन्याचे नेतृत्व सदाशिवभाऊ आणि विश्वास पेशवे करत होते, त्यांच्या सैन्यात मराठा (कुणबी, माळी, धनगर, कायस्थ, रामोशी मातंग, महार, आग्री इत्यादी होते. मराठा हा शब्द जातीवाचक नसून समूहवाचक आहे.)
#राजमाता म्हटलं की ज्यांची तेजस्वी प्रतिमा डोळ्यासमोर येते त्या म्हणजे- जिजाऊ माँसाहेब.
जिजाऊंची जडणघडण ही एका घरंदाज कुळात झाली, पुढे त्याच तोलामोलाच्या घराण्यात त्यांचा विवाह झाला. धैर्य -शौर्याचा, साहसाचा वारसा त्यांच्या माहेराकडून मिळाला.
जाधव घराणे हे त्यावेळी राजे किताबाने गौरवलेलं सन्मानप्राप्त घराणं होत. पुढे राजे किताब असलेल्या भोसले घराण्याच्या सुनबाई झाल्या. व इथून खरी त्यांच्या कार्याची कर्तुत्वाची, ओळख सगळ्या जगाला होते.! इथूनच मध्ययुगीन भारतातील सुवर्णकाळाचा अध्याय सुरू झाला अस म्हणण्यास हरकत नाही.
जिजाऊ व शहाजी राजेंचा विवाह झाल्यावर, समकालीन कवी - परमानंद यांनी आपल्या शिवभारत ग्रंथात जिजाऊ बद्दल जे लिहल आहे ते नक्की बघण्याजोगत आहे.!
परमानंद म्हणतो - "जेव्हा 'विनयशील' जिजाऊ, भोसले घरात येतात तेव्हा, शहाजीराजे व जिजाऊ या जोडीला जणू लक्ष्मीनारायणाची शोभा येतेय."