"अमृत काळामधील हा पहिला अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प मागील अर्थसंकल्पात रचलेल्या पायावर आणि भारत@ 100 साठी रचलेल्या ब्ल्यू प्रिंटवर वाटचाल करेल अशी आशा करुया.आम्ही एका समृद्ध आणि सर्वसमावेशक भारताचा संकल्प करतो, ज्याद्वारे विकासाची फळं सर्वांपर्यंत पोहोचावीत"-केंद्रीय अर्थमंत्री
भारताकडे तळपता तारा म्हणून जग पाहत आहे, महामारी आणि युद्ध यामुळे जागतिक स्तरावरचे मोठ्या प्रमाणात मंदावलेले अर्थचक्र अशा परिस्थितीतही चालू वर्षी आपला विकास दर 7 % राहील असे अनुमान आहे, सर्व महत्वाच्या अर्थव्यवस्थामध्ये हा दर सर्वोच्च आहे.
आमच्या आर्थिक अजेंड्यामधे यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे 1) नागरिकांसाठी संधीची उपलब्धता 2) विकासाला मोठी चालना आणि रोजगार निर्मिती 3) मॅक्रोइकॉनमिक स्थैर्य अधिक बळकट करणे
"योजनेत आर्थिक सहाय्य, कार्यक्षम हरीत तंत्रज्ञानाची उपलब्धता, प्रगत कौशल्य प्रशिक्षण, सामाजिक सुरक्षितता, आधुनिक डिजिटल तंत्र, उत्पादनाची जाहिरात, बाजारपेठेची उपलब्धता या घटकांचा समावेश असेल; दुर्बल घटकातील लोकांना त्याचा खूप फायदा होईल." - केंद्रीय अर्थमंत्री
1. सर्वसमावेशक विकास
2. शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे
3. पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक
4. क्षमतेला वाव
5. हरीत (पर्यावरण आणि पर्यावरणपूरक) विकास
6. युवा शक्ती
7. आर्थिक क्षेत्र
सर्व अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना एक वर्ष मोफत अन्नधान्य पुरवण्यासाठी, पी एम गरीब कल्याण अन्न योजनेचा संपूर्ण 2 लाख कोटी रुपयांचा खर्च केंद्र सरकार उचलत आहे - केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman
मच्छिमार,मच्छी विक्रेते आणि सूक्ष्म आणि लघु उद्योजकांच्या सक्षमीकरणा साठी, मूल्य साखळीची क्षमता सुधारण्यासाठी आणि बाजारपेठेचा विस्तार करण्यासाठी,पी एम मत्स्य संपदा योजनेची नवी उप योजना आणणार, यासाठी 6000 कोटी रुपयांची गुंतवणूक नियोजित - केंद्रीय अर्थमंत्री
खुले स्रोत, खुले मापदंड,आंतर क्रियाशील सार्वजनिक मालमत्ता म्हणून शेतीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा तयार केल्या जातील
सर्वसमावेशक शेतकरी-केंद्रीत उपाययोजना सक्षम होतील आणि कृषी निविष्ठा, बाजारविषयक माहिती,कृषी उद्योग आणि नवंउद्योगांसाठी(स्टार्टअप्समध्ये) पाठबळ उपलब्ध हैईल.
पुढील तीन वर्षांत केंद्रसरकार, 3.5 लाख आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या 740 एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी 38,800 शिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची भर्ती करेल: अर्थमंत्री @nsitharamanoffc
2047 पर्यंत सिकलसेल अनिमियाचे उच्चाटन करण्यासाठी अभियान सुरू करणार, या अंतर्गत बाधित आदिवासी भागात 0-40 वयोगटातल्या 7 कोटी लोकांची सार्वत्रिक तपासणी आणि समुपदेशन करण्यात येणार - अर्थमंत्री @nsitharamanoffc
कर्नाटकातील दुष्काळप्रवण भागातील अप्पा भद्रा प्रकल्पाला, 5,300 कोटी रुपयांची केंद्रीय मदत दिली जाणार. शाश्वत सूक्ष्म सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी टाक्या भरण्यासाठी ही मदत असेल. - केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman
#Railways साठी 2.40 लाख कोटी भांडवली खर्चाची तरतूद, आतापर्यंतची सर्वोच्च तरतूद असून 2013-14 या वित्तीय वर्षातल्या खर्चाच्या नऊ पट आहे - केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman
भांडवली गुंतवणूकसाठीची तरतूद सलग तिसर्या वर्षी 33% ने वाढवून रु. 10 लाख कोटी. ही जीडिपीच्या 3.3% असेल, 2019-20 मध्ये केलेल्या तरतुदीच्या जवळपास 3 पट असेल, अर्थमंत्री@nsitharaman यांची घोषणा
दर्जेदार पुस्तकांच्या उपलब्धतेसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी स्थापनेचा सरकारचा प्रस्ताव
पंचायत आणि प्रभाग स्तरावर ग्रंथालये उभारण्यासाठी आणि राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी संसाधनांचा उपयोग करण्यासाठी पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन दिले जाणार
राज्यांना त्यांच्या 'एक जिल्हा एक उत्पादन', जी आय उत्पादने आणि इतर हस्तकला उत्पादनांच्या जाहिरात आणि विक्रीसाठी आणि इतर सर्व राज्यांमध्ये अशा उत्पादनांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी, राज्यांच्या राजधानीत युनिटी मॉल स्थापन करण्यास प्रोत्साहन दिलं जाईल.
बंदरे, कोळसा, पोलाद, खते आणि अन्नधान्य क्षेत्रांमध्ये, सुरुवात आणि शेवट यांच्या मधील टप्प्याला जोडण्यासाठी 100 महत्त्वपूर्ण वाहतूक पायाभूत सुविधा प्रकल्प, 75000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह प्राधान्यानं हाती घेतले जातील. यात 15000 कोटी रुपये खाजगी गुंतवणुकीतून उभारले जातील.
व्यवसाय करणं सोपं होण्यासाठी, अनुमती मिळवण्यासाठीच्या प्रक्रियेच्या 39,000 पेक्षा जास्त अनिवार्यता कमी केल्या आहेत आणि 3,400 हून अधिक कायदेशीर तरतुदी शिथिल केल्या आहेत
(1/2)
42 केंद्रीय कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि आपल्या अर्थव्यवस्थेच्या क्षमतेला पूर्ण वाव देण्यासाठी जनविश्वास विधेयक सादर करण्यात आलं आहे. - केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman
(2/2)
5G सेवांमध्ये वापरण्यात येणारी ऍप विकसित करण्यासाठी अभियांत्रिकी संस्थांमध्ये 100 प्रयोगशाळा उभारण्यात येणार
नव्या संधींचा, व्यापार मॉडेल आणि रोजगार संधींचा लाभ घेण्याच्या दृष्टीने या प्रयोगशाळेत स्मार्ट क्लास रूम,प्रीसिजन फार्मिंग आणि वाहतूक व्यवस्था यासारख्या ऍपचा समावेश राहील
पंतप्रधानांनी पर्यावरणसंवर्धनासाठी एक जीवनशैली सुचवली आहे. पंचामृत- 2070 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या दिशेनं भारताची खंबीर वाटचाल सुरु आहे.
हरित (पर्यावरण आणि पर्यावरणपूरक,) वाढीवर लक्ष केंद्रीत करण्याचा आमचा भर, हा अर्थसंकल्प स्पष्ट करतो
ज्या व्यापारी आस्थापनाना पर्मनंट अकाऊंट नंबर आवश्यक आहे त्यांच्यासाठी विशिष्ट सरकारी एजन्सीमध्ये सर्व डिजिटल प्रणालीसाठी सामायिक ओळख देणारा म्हणून PAN राहील, यामुळे व्यवसाय सुलभता येईल - केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman
मेक एआय इन इंडिया आणि मेक एआय वर्क फॉर इंडियाची संकल्पना साकार करण्यासाठी, प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ते करता 3 सर्वोत्कृष्टता केंद्रांची स्थापना केली जाईल. यात संशोधन आणि उपयोजनं विकसित करण्यासाठी, आघाडीच्या उद्योगांना भागीदार बनवलं जाईल.
सध्या ज्यांचे उत्पन्न 5 लाख रुपये आहे त्यांना कोणताही प्राप्ती कर भरावा लागणार नाही आणि नव्या कर पद्धतीत रीबेटची मर्यादा 7 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचे मी प्रस्तावित करते - केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman
स्लॅब(कररचनेचे टप्पे)ची संख्या पाचपर्यंत कमी करून आणि कर सवलतीची मर्यादा 3 लाखांपर्यंत वाढवून या व्यवस्थेतील कर रचना बदलण्याचा माझा प्रस्ताव आहे - केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman
रजा रोखीकरणावरील (लिव्ह एनकॅशमेंट)कर सवलतीसाठी 3लाख रुपयांची मर्यादा वाढवून 25लाख रुपये करण्यात आली
आम्ही नवीन आयकर प्रणाली देखील डीफॉल्ट कर प्रणाली (कुठल्याही प्रक्रियेची सुरुवात करताच लागू होणारी)बनवत आहोत,तथापि,नागरिकांना जुन्या कर प्रणालीचे फायदे मिळवण्याचा पर्याय कायम राहील
वनीकरणातील भारताच्या यशावर आधारीत, किनाऱ्यालगतचे अधिवास आणि ठोस उत्पन्नासाठी तिवर संवर्धनाची मॅन्ग्रोव्ह इनिशिएटिव्ह (MISHTI) ही योजना मनरेगा आणि इतर स्त्रोतांच्या माध्यमातून शक्य असेल तिथे किनारपट्टीवर खारफुटीच्या लागवडीसाठी हाती घेतली जाईल.
अमृत धरोहर योजना पुढील 3 वर्षात राबविण्यात येणार आहे, यात पाणथळ क्षेत्रांचा इष्टतम वापर, जैवविविधता, कर्ब संचय, पर्यावरणीय पर्यटनाच्या संधी आणि स्थानिक समुदायांना उत्पन्न वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल - केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman
पंतप्रधान कौशल्य विकास योजना 4.0 पुढील 3 वर्षात लाखो तरुणांना व्यवसाय कुशल बनण्यासाठी सुरू करण्यात येणार आहे -नोकरी सुरु असताना प्रशिक्षण, उद्योग भागीदारी,उद्योग संलग्न अभ्यासक्रम यावर भर देणे आवश्यक आहे,कोडिंग, रोबोटिक्स सारख्या नवीन युगातील अभ्यासक्रमांचा समावेश होणं आवश्यक आहे
पॅन इंडिया नॅशनल अॅप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम या प्रशिक्षणार्थींसाठीच्या योजने अंतर्गत थेट लाभ हस्तांतरण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार. यातून 3 वर्षात 47 लाख तरुणांना विद्या वेतन मिळणार. - केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman
#Budget2023चा ज्या चार मुद्दयांवर भर आहे ते आहेत महिलांचे सक्षमीकरण, बचतगटांकडे अधिक लक्ष पुरवणे, पर्यटन आणि युवा वर्गाचे प्रशिक्षण आणि आपल्या कलाकुसरीने भारताच्या सॉफ्ट पॉवरची निर्मिती करणाऱ्या विश्वकर्मांचे सक्षमीकरण यावर भर आणि चौथा हरित वृद्धी - अर्थमंत्री @nsitharaman
आम्ही भविष्यवेधी फिनटेक क्षेत्राकडे पाहत आहोत, लोकांना औद्योगिक क्रांती 4.0च्या माध्यमातून प्रशिक्षित केलं जाईल, आम्ही जीवनाच्या विविध क्षेत्रात डिजिटल अर्थव्यवस्था सामावण्याचा प्रयत्न करत आहोत.- अर्थमंत्री @nsitharaman
.@TexComIndia in collaboration with @UNEP is launching a programme on
“Enhancing Sustainability & Circularity in Textiles”, to promote sustainable practices
and minimise the negative environmental impacts of the Indian textile industry
LIVE now at
🧵
Dignitaries at ceremonial lamp-lighting for launch of prog on
“Enhancing Sustainability & Circularity in Textiles”
Ms. Rossitza Krueger, Prog Head, Sustainable Cotton Project, GIZ, was also present at the ceremonial lamp lighting
Addl. CEO, GeM SPV Shri Ajit B. Chavan joined the programme and addressed online, and CGM, @NABARDOnline Shri Devashis Padhi also addressed in the inaugural session
"We are coming up with policies to connect the private film sector to the farms of Maharashtra to promote tourism. The government of Maharashtra trying to be proactive to provide visual locations to the producers."
- Dr. Avinash Dhakne, MD MFSCDC
India has every location to shoot however, every location doesn't have basic amenities which add to the cost of production. Government incentives and rebate have been very helpful for small producers to film in unexplored places of India. - Arfi Lamba, Producer
मुंबई येथील रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयात ‘भरडधान्य 2023- पुनरुत्थान व निरंतरतेचा आंतरशास्त्रीय दृष्टिकोन’ ही दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.
#InternationalYearOfMillets निमित्त मुंबईत आयोजित ‘भरडधान्य 2023- पुनरुत्थान व निरंतरतेचा आंतरशास्त्रीय दृष्टिकोन’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री @ChDadaPatil यांच्या हस्ते झाले.