एखादा माणूस माझ्या मनातून उतरला की, मी आयुष्यभर त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नाही.. ह्या अश्या स्वतःच्या ग्रेट स्वभावाचा काही लोकांना प्रचंड गर्व असतो, म्हणूनच हा मेसेज मला सगळ्यांबरोबर शेअर करावासा वाटला..
कधी तरी निवांत बसून आयुष्यात येऊन गेलेल्या आणि दुरावलेल्या
नात्यांचा डोळसपणे अभ्यास केला की, लक्षात येतं की, असे अनेकजण ज्यांनी "आपल्याला दुखावलं" म्हणून आपल्या आयुष्यातून आपण त्यांना
वजा केलं होतं ते अनेकदा समर्थनीय नव्हतंच !
भावना दुखावल्या, असं म्हणत आपण आपल्या अहंकाराला विनाकारण जोपासत बसलो..
आणि सोन्यासारखी माणसं आपल्या प्रतिक्षेला कंटाळून आपापल्या मार्गे निघूनही गेली.
त्यांची एखादी कृती, चूक हा जणूकाही जन्म-मरणाचा प्रश्न बनवून ती हकनाक आपल्या अहंकाराची बळी कधी झाली, हे कळलंच नाही.
आपण जसे जसे परिपक्व होत जातो तसं तसं लक्षात येतं की,
भावना आणि अहंकार ह्यांच्यात असलेली सूक्ष्म रेषा योग्य वेळी जाणून वागायला हवं होतं.
त्या माणसांनी आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या होत्या. स्वतःच्या चुकासुद्धा आठवून निदान स्वतःशी तरी मान्य करायला हव्या होत्या...
भावना क्षमाशील असते तर अहंकार मात्र एक घाव दोन तुकडे करून मोकळा होतो..
भावना दुखावली,असं आपण म्हणतो
तेव्हा खूप वेळा भावना नाही तर अहंकार दुखावलेला असतो !
अगदी एखादी आनंदाची बातमी जरी कुणी आपल्याला उशिरा दिली, तर
त्या गोष्टीचं दुःख आणि राग म्हणून त्यांचं अभिनंदनही आपण केलेलं नसतं आणि हे अनेकदा घडतं.
जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नसतं, तर त्या जगण्यालाही स्वतःचं असं वेगळं रूप आणि अस्तित्व असतं.
कुणाचंच कुणावाचून काही अडत नाही, पण आयुष्यात आलेली चांगली माणसं जेव्हा गैरसमजुतींमुळे दुरावतात.
तेव्हा मात्र जर ती माणसं आपल्या आयुष्यात राहिली असती तर जगणं अजून सुंदर आणि अर्थपूर्ण झालं असतं, असं मात्र नक्कीच वाटून जातं.
क्षणभंगुर आयुष्याचे लाड करताना
आपल्या जगण्याचा दर्जा आपण राखायला हवा, आणि ह्यासाठीच ते जगणं सुसंस्कृत आणि अर्थपूर्ण बनवणाऱ्या चांगल्या माणसांची ओळख
आणि जोपासना करणं आणि अहंकारामुळे त्यांना न गमावणे हे जाणीवपूर्वक आपण करावं असं मनापासून वाटतं..
बऱ्याचदा तर समोरच्या व्यक्तिच्या वागण्याचा आपण आपल्या मतानुसार अर्थ काढतो, तसा विचारही समोरच्याचा नसतो, तो सहज आपलं म्हणून वागत असतो..
परंतु आपण चुकीचा अर्थ काढून समोरच्याला आयुष्यातून सहज काढून टाकतो, अन आपला अहंकार आपल्याला या गोष्टीची जाणीवही होऊ देत नाही.
म्हणून...
कुणाची कितीही मोठी चूक असली तरी ती आयुष्यापेक्षा व नात्यापेक्षा मोठी नाहीच...!
...👏👏👏👏👏
✍️ कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवू देत नाही. ही सवय आपली मानसिक शांती भंग करते. तुम्ही कधी कधी जास्त स्पष्ट बोलता. त्यामुळे लोक तुमच्या पासून दुरावतात.
पण त्यांना तुमच्या बोलण्याचा अर्थ कळेपर्यंत त्याची वेळ निघून गेलेली असते.
आयुष्यात दोनच गोष्टी पाहीजे. कुटूंबाच प्रेम आणि काही प्रेमळ व्यक्तींची साथ.
आधाराची अपेक्षा नकळत माणसाला अपंग बनवून जाते. अंथरुणावर रात्री झोपताना उद्याची चिंता भासली की, समजून जायचं आयुष्य जबाबदारीच्या पायऱ्या चढत आहे. धडा तर लहान मुलांकडून घेतला पाहिजे. की,
जे आपलाच मार खाऊन, परत आपल्यालाच बिलगतात.
नाती जपत चला. कारण, आज माणूस एवढा, एकटा पडत चालला की, कुणी फोटो काढणारा पण नाही. सेल्फी काढावी लागते. ज्याला लोक फॅशन समजतात. प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात काही ना काही उद्देशानेच येत असतो. कोणी आपल्याला केवळ अजमावून जाते.
सुई दोरा वापरण्याचा एक नियम पुर्वी पाळला जायचा, अजूनही अनेक घरात असेल. नियम असा असतो की, समजा एखाद्याने दोऱ्याने काही शिवलं आणि ओवलेला दोरा संपला तर त्याने परत सुईत दोरा ओवून गाठ मारुन तो नीट रिळाला गुंडाळून ठेवायचा.
दुसऱ्याला सुईला दोरा लावलेला मिळतो, त्याचं काम झालं की त्यानं परत तेच करायचं.
पुर्वीच्या काळी पाण्याचे बंब असायचे. एकत्र कुटुंब असायचं. गरम पाण्याच्या बाबतीतही हा नियम असायचा की जो बंबातून पाणी घेईल त्यानं अंघोळीला जाण्यापुर्वी दुसऱ्यासाठी बंबात पाणी भरायचं.
दुसऱ्यानं तिसऱ्यासाठी, जेणेकरुन वेळ आणि इंधन बचत व्हायचीच पण गैरसोयही टाळता यायची.
सुबत्ता वाढत गेली तसतशी एकमेकांवर अवलंबून जगण्याची जीवन शैलीही बदलत गेली. आता दुसऱ्याचा विचार करण्याची वेळ वारंवार येत नाही, पण याचा अर्थ तो करायचाच नाही असं मात्र नाही.
एका व्यापाऱ्याला बाजारात एक भव्य उंट विकत घ्यायचा होता.
आणि एक उंट निवडल्यानंतर त्या उंटाची किंमत ठरवण्यासाठी उंट विक्रेता व व्यापारी यांच्यात बोलणी सुरू झाली .
व्यापारी आणि उंट विक्रेत्यामध्ये करार झाला आणि शेवटी त्या व्यापाऱ्याने उंट विकत घेऊन घरी नेला !
घरी पोहोचल्यावर व्यापाऱ्याने आपल्या नोकराला उंटाचा काजवा (खोगीर) काढण्यासाठी बोलावले ..!
काजवेच्या खाली सेवकास एक लहान मखमली पिशवी सापडली ज्यामुळे उघडकीस आले की ते
मौल्यवान हिरे व रत्नांनी परिपूर्ण आहेत ..!
सेवक ओरडला, "मालक , तुम्ही एक उंट विकत घेतला, परंतु त्या बरोबर काय? विनामूल्य आले आहे. ते पहा!"
व्यापारी देखील आश्चर्यचकित झाला, त्याने आपल्या नोकरांच्या हातात हिरे पाहिले. ते सूर्यप्रकाशामध्ये आणखी चमकत होते आणि चमकत होते.
सद्गुरू आणि शिष्य यांचं नातं आई मुलासारखं किंवा त्याच्यापेक्षाही अधिक जवळीकीचं असतं कारण आई -मुलगा हा संबंध एका जन्माचा असतो तर सद्गुरू जन्मोजन्मी आपली काळजी घेतात. दुसरं म्हणजे आईच्या प्रेमाला थोडीशी स्वार्थाची झालर असते ,
सद्गुरूंच्या जवळ त्याचा लवलेशही नसतो.
पुढचं असं मनात येतं की , " आपले सद्गुरू कोण आणि ते आपल्याला कधी भेटतील ?
यावर श्रीमहाराज उत्तर देतात , " तुम्ही साधना सुरु करा. सद्गुरू कुठंही असुदेत ! ते तुम्हाला निश्चित भेटतील. जसं गुळाची ढेप कुठं ठेवलीये ते मुगळ्यांना सांगायला नको."
त्यामुळं निश्चिन्त मनानं साधना म्हणजेच नामस्मरण करणं हाच सद्गुरू भेटीची राजमार्ग आहे."
साधना करत असताना सद्गुरू आपल्यासाठी काय करतील ? या प्रश्नाचं उत्तर असं ,
" शिष्याला नामाची गोडी लावणं हेच सद्गुरुंच काम असतं ! एकदा का शिष्याला नामाची गोडी लागली की सद्गुरू आपोआप
"शांतता ही का महत्त्वाची असते..?आज काल आपण पाहतो, काही माणसे लहान - लहान गोष्टींवर खुप चिडचिड करत असतात. त्याचा जीवनात आलेल्या संकटांवर त्यांना मात करता येते नाही .
त्यामुळे ती माणसे स्वतःचा राग दुसऱ्यावर काढत असतात. पण, असल्याने काही होणार आहे का नाही ना..?तुम्ही जर स्वतःचा राग दुसऱ्यावर काढत असाल,तर तुम्ही दुसऱ्याचे मन दुखवत आहात. हे विसरून चालणार नाही.
विना कारण दुसर्याचे मन दुख उन स्वतःचे कधीच चांगले होत नाही .
जो माणूस स्वतःचा सुखा पेक्षा दुसर्यांचा सुखाचा विचार करतो. तोच जीवनात एक व्यक्ती म्हणून जगु शकतो .
ज्या माणसाच्या जीवनात दररोज अनेक संकटे येतात तरी पण जो माणूस नेहमी चांगल्या मार्गाने चालत असतो . तोच जीवनात संकटांवर मात करून पुढे जाऊ शकतो . पण , जो माणूस नेहमी दुसर्याच
सात कोड्यांना बालोपासनेच्या वेळेस आईंने मुलांना दिलेली उत्तरे
१. या जगात सगळ्यात टोकदार वस्तू कोणती..??
मुले म्हणाली , तलवार...
आईंने सांगितले.. जीभ..
कारण या जिभेमुळे माणूस सहजपणे दुसऱ्याचा अपमान करतो, दुसऱ्याला दुखावतो, दुसऱ्याच्या भावनांना धक्का पोचवतो.
२. या जगात आपल्यापासून सगळ्यात दूर काय आहे..??
एकजण म्हणाला, सूर्य, चंद्र, आकाशगंगा...
आई म्हणाल्या... भूतकाळ.
माणूस कितीही श्रीमंत असला तरी तो भूतकाळात जाऊ शकत नाही.त्यामुळे आपण आजच्या दिवसाचा आणि आपल्या आयुष्यात येणाऱ्या पुढील सगळ्या दिवसांचा चांगला उपयोग केला पाहिजे.
३. या जगातील सगळयात मोठी गोष्ट कोणती..???
दुसऱ्याने सांगितले की, पृथ्वी, पर्वत, सूर्य.
आई म्हणाल्या, जगातील सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे.. हाव
लोक दुःखी होतात, त्यामागील कारण त्यांच्या मनातील न संपणारी हाव. ही हाव पूर्ण करण्यासाठी त्यांची कुठल्याही थराला जाण्याची तयारी