#Joshimath: A Policy Disaster
मी वाचेलेला एक महत्त्वाचा लेख सर्वांपर्यंत पोहोचवा म्हणून केलेला स्वैर अनुवाद आणि काही मुद्दे #जोशीमठ चे भूस्खलन ही नैसर्गिक आपत्ती नसून धार्मिकतेच्या राक्षसाचा प्रकोप आहे. "चार धाम महामार्ग" प्रकल्पासाठी केलेली पर्यावरण नियमांची मुजोरी पायमल्ली आहे
Hydropower प्रोजेक्टसाठी UPA काळात न्यायायलाने दिलेल्या निर्देशांना मोदी काळात सोयीस्कर रित्या कसं वापरलं गेलं याच हे उदाहरणं. डोंगरी भागात रस्त्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान हे थेट रस्त्याची रुंदी वर अवलंबून असते असा निष्कर्ष सर्वोच्य न्यायालयाने नेमलेल्या समितीने दिला होता.
असं असतांना आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने २०१८ ला डोंगरी रस्त्यांसाठी केलेली नियमावलीच या चारधाम महामार्ग प्रकल्पासाठी डावलली. नियमावली प्रमाणे ५.५ मी रुंदी असावी पण १२ मी चे रस्ते बनवले गेले ज्यासाठी अनिर्बंध झाडांची कत्तल करत डोंगरांचा नैसर्गिक उतार सुद्धा बदलला गेला.
यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने स्वतःच्याच नियमावलीची पायमल्ली केली नाही तर २०१८ ची स्वतःची नियमावली सर्वोच्य न्यायालयाच्या समिती पासून लपवून ठेवली. १०० किमी पेक्षा अधिक अंतर असणाऱ्या रस्त्यासाठी Environmental Impact Assessment (EIA) आणि Environmental Management Plan (EMP)
आवश्यक असल्याने चारधाम महामार्ग प्रकल्प हा ५३ छोटया छोटया प्रकल्पात विभागत या नियमाला बगल देण्यात आली. त्यामुळे इतका मोठा प्रकल्प असूनही EIA आणि EMP बनवण्यात आला नाही. इतकचं नाही तर मार्च २०२० ते २०२२ दरम्यान १२३ पर्यावरण नियमांना शिथिल करण्यात आलं. यातले बहुतेक बदल हे सर्व
महत्त्वाच्या नियमांना बगल देण्यासाठी करण्यात आले. तिसरे कारण म्हणजे धार्मिक पर्यटनाच्या नावाखाली पारिस्थितिकदृष्ट्या संवेदनशील भागात पर्यटनाचा अनाठायी प्रचार. केदारनाथ सारख्या ठिकाणी रेल्वे, रोपवे आणि मोठे रस्ते बनवून धार्मिक पर्यटन वाढवण्यात येत आहे.
२०१९ ला निवडणुकी दरम्यान मोदीने वेळ घालवलेल्या गुहे सारख्या आणखी ३ गुहा तयार करण्याचं काम सुरू आहे. प्रधानमंत्री कार्यालय स्वतः अशा मोठ्या प्रकल्पात लक्ष घालून Ease of Doing Businessच्या नावाखाली पर्यावरणाशी खेळ खेळत आहे.
जावडेकर पर्यावरण मंत्री असल्यापासून नियमामध्ये होत असलेल्या बदलाचे परिणाम हळूहळू पुढे येतील पण तोपर्यंत प्रचंड पैसा, मनुष्यबळ आणि वेळ खर्च झालेला असेल. जावडेकरांच्या काळात भारत हा जागतिक Environment Performance Index मध्ये १८० देशांमध्ये भारत १४१ वरून १७७ वर फेकला गेला.
२०१७ च्या CAG रिपोर्ट मध्ये सुद्धा पर्यावरण मंजुरी आणि निरीक्षणामध्ये कमतरता आणि विस्कळीतपणा असल्याचं नमूद केलं होतं. केंद्र सरकारने पर्यावरण नियमांना बगल देतानाच Land Acquisition Act, 2013, Wildlife Protection Act, 1972, National Forest Policy, 2018, Indian Forest Act, 1927,
Coastal Regulation Zone 2018 यामध्ये बदल केले आहेत. मोठ्या प्रकल्पात अनिवार्य असणारी Public Consultation Process ला शिथिलता देण्यात आली आहे. Land Conflict Watch नुसार ६६५ प्रोजेक्ट्स असे आहेत ज्यामध्ये २४ लाख हेक्टर जमीन आणि ७३ लाख बाधित होऊ शकतात. मार्च २०१७ मध्ये केंद्रीय
पर्यावरण मंत्रालयाच्या नोटिफिकेशननुसार बहुतेक सर्व मोठ्या प्रकल्पांना ते पूर्ण झाल्यानंतर सुद्धा पर्यावरण मंजुरीसाठी नोंदणी करता येईल. म्हणजे सरकारने पर्यावरण हा विषयच ऐच्छिक केलेला आहे.
असो, मुंबई शहराचा प्राणवायू दूषित होण्याचे परिणाम पुढे दिसतीलच.
तोपर्यंत अनुलोम विलोन करा.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
२००२ गुजरात दंगलीत #बिल्कीस_बानो सामूहिक बलात्कार आरोपात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले ११ आरोपी काल गुजरात सरकारने तुरुंगातून मुक्त केले.
विशेष म्हणजे त्याच दिवशी जेंव्हा प्रधानमंत्री मोदीने नारी (खरं तर स्त्री, महिला म्हणायला हवं) सन्मान करावा असं सार्वजनिक आवाहन केलं.
२००२ गोध्रा रेल्वे जाळपोळीनंतर
उसळलेल्या हिंसाचारात गर्भवती असणाऱ्या बिल्कीस बानोवर सामूहिक बxत्कार झाला आणि तिच्या ३ वर्षाच्या मुलीला दगडावर आपटून तर इतर नातेवाईकांना जमावाने जीवे मारलं होतं.
गुजरातमध्ये राहून या केस मध्ये न्याय मिळू शकेल या साशंकतेतून पुढे ही केस
मुंबई उच्च न्यायालयात वर्ग करण्यात आली. ओळख पटू नये म्हणून पोलिसांनी सर्व मृतदेह हे डोकं वेगळं करून पुरले असे ताशेरे ही ओढले गेले.
या केसचा ऐतिहासिक निर्णय देणाऱ्या जस्टिस तहीलरामाणी यांच्या नावाची खूप चर्चा झाली होती. याच जस्टिस तहीलरमाणी पुढे मद्रास उच्च न्यायालयाच्या
शरद पवारांनी एक कविता का सांगितली भावे पासून ते चितळेपर्यंत सगळे शेनातले शेंगदाणे खवखवू लागले. ब्राम्हणी प्रवृत्तीला पोटशूळ उठावा असाच मर्मभेदी अर्थ आहे कवितेचा. यालाच विद्रोह म्हणतात. कंपू महासंघाला जातीवाद संपवायचा असेल तर ढसाळांच्या कवितांना चौकात फ्लेक्स वर लावलं पाहिजे.
महात्मा फुलेंची पुस्तकं वाचाल तर लक्षात येईल की परिस्थिती मध्ये गेल्या १०० वर्षात सुद्धा फार फरक नाही. बहुजनांनी शिकावं म्हणून फुलेंना केलेलं काम या मंडळींना इतकं त्रासदायक वाटलं होतं की फुलेंना मारायला लोकं पाठवली. ते जमलं नाही म्हणून त्यांची ख्रिस्त धार्जिणे म्हणून बदनामी केली.
छ्त्रपती राजर्षी शाहू महाराजांनी याच वर्चस्वाला कायदेशीर आणि सामाजिक हादरे दिले. तत्कालीन मीडिया हाताशी असणाऱ्या "शेणाचा गोळा खाऊन पवित्र झालेले ब्रम्हमान्य व्यक्तीने अत्यंत हिणकस टीका केली होती. आजही मुद्दाम त्यांचा उल्लेख हा "कार्यकर्ता" म्हणून करतांना तीच मळमळ दिसते.
साधारणतः घराघरांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी केली जाणारी ही पूजा. नवीन कार्याची सुरुवात, गृहप्रवेश, चांगला दिवस काहीही कारण असो ही पूजा अनेक जण करतात.
पण का ? तर तसं शास्त्रात सांगितलं आहे. कोणी सांगितलं? अनेकांनी.
त्यांना कोणी सांगितलं ? भटजीने.
नारदाने पृथ्वीवरच्या लोकांच्या त्रासातून मुक्ती कशी मिळावी या प्रश्नावर विष्णूने हे व्रत सागितले असं स्कंद पुराणात ही लिहिल्याचं भटजी सांगतात.
मग आपण शांत कारण पुराणात लिहिलयं म्हणलं की आपण ते शोधत नाही हे भटजीला माहीत असतं.
त्यात एका साधुवाण्याची कथा सांगितली जाते, कोण हा वाणी?
साधू वाणी या कथेतलं पात्र आहे जो आणि त्याची पत्नी, मुलगी आणि जावई हे सर्व सुखी असतात.
देवपूजा दुर्लक्षिल्याने त्यांची संपत्ती चोरी होऊन त्यांना अटकही होते.
पण नंतर एका ब्राम्हणाच्या घरी ही पूजा बघून पुन्हा ती सुरू केल्याने त्यांचे सर्व दुखः दूर होतात.
साधारणतः कोणत्याही गावात एसटी स्थानकासमोर निळ्या कोटात असणारा ज्यांचा पुतळा कायम हातात पुस्तकं घेतल्यामुळे लक्षात येतो ते #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर नक्की कोण? मग यांना राजकारणी, समाजसेवक, अर्थतज्ज्ञ, कामगार कैवारी, कायदेपंडित की लेखक.. काय म्हणून बघावं आपण ?
गांधी विरुद्द आंबेडकर वाद असेल किंवा आंबेडकर जिन्ना राजकीय मैत्री. या सगळ्यात मुरलेला राजकारणी आहे. फक्त समाजसेवक म्हणून छोट्या साच्यात बसवणं शक्य नाही आणि फक्त दलीत नेता म्हणावा तर इतर क्षेत्रात सर्व भारतीयांसाठी केलेलं प्रचंड काम दुर्लक्षित करता येणार नाही.
हिंदू धर्माची चिकिस्ता ते रुपयाचं मूल्य इतक्या वेगवेगळ्या विषयांवर केलेलं अप्रतिम लिखाण हे डॉ आंबेडकरांची पुढच्या पिढीला दिलेली परिवर्तनाची शिदोरी आहे. जमेल तितकी घ्यावी. आंबेडकरांच्या तसबिरीपेक्षा त्यांची पुस्तकं वाटावी इतकी त्यात वैचारिक धगधग आहे.
ज्यांना पं. नेहरूंनी #मिर_ए_कांरवां म्हणून संबोधलं आणि गांधींनी त्यांना प्लुटो,अरिस्टोटल आणि पायथागोरस या तिघांच्या योग्यतेचा माणूस म्हणलं असे जे स्वतंत्र भारताचे #पहिले_शिक्षण_मंत्री #MaulanaAbulKalamAzad यांची आज पुण्यतिथी.
१८५७ च्या बंडामध्ये यश न मिळालेल्यामुळे मौलाना अबुल कलाम यांचे वडील सौदी अरेबिया मध्ये जाऊन स्थायिक झाल्यानंतर तिथेच अबुल कलाम यांचा जन्म झाला. पुढे हे कुटुंब कलकत्त्यात येऊन स्थायिक झाले आणि अबुल कलम यांचं शिक्षण पारंपरिक धार्मिक पद्धतीने सुरू झालं.
लहान असताना स्वतःची लायब्ररी चालवणारे आझाद, आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या मुलांची शिकवणी घेत. लहानपणीच मुलांची डिबेटिंग सोसायटी स्थापन करून वेगवेगळ्या विषयातल्या आणि वेगळ्या विचारांचा प्रभाव पडल्याने त्यांचा ओढा हा भारतीय स्वातंत्र्य आणि हिंदू मुस्लिम ऐक्याकडे होता.
"एकदा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांशी बोलण्याचा योग आला. ते म्हणाले, ‘‘दाभोलकर, ते बाकीचं सगळं ठीक आहे हो! कायदा वगैरे करायला पाहिजे, ते आम्हाला सगळं पटतं; पण बुवा आणि बाबा यांच्याकडे लक्षावधी लोक जातात.
आम्ही शेवटी राजकारणी आहोत. ज्यांच्याकडे लोक जातात, त्यांच्याकडे आम्हाला जावं लागतं. तुमच्याकडे याचं काही उत्तर आहे का?’’ त्यांना वाटलं, त्यांनी मला निरुत्तर करणारा प्रश्न विचारला आहे. मी म्हणालो ‘‘हो, माझ्याकडे याचं उत्तर आहे.’’ त्यांना जरा आश्चर्य वाटलं. ते म्हणाले,
‘‘काय उत्तर आहे तुमच्याकडे?’’ मी म्हणालो, ‘‘याचं उत्तर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडेच कसं आहे, हे तुम्हाला समजावून सांगणं.’’ मग तर त्यांना काही कळलंच नाही. ते म्हणाले, ‘‘आमच्याकडे काय उत्तर आहे? आम्ही काय तुमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते आहोत काय!’’.