Dhairyasheel Profile picture
सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानियेले नाही बहुमता ।। - जगतगुरु संत तुकाराम महाराज I think. Therefore I am.
Nov 11, 2023 10 tweets 2 min read
मंदिरांची आस्था अन् जातीवाद

स्वातंत्र्य मिळून सुद्धा महाराष्ट्रातील हरिजन किंवा अस्पृश्य म्हणवल्या गेलेल्या समाजाला महाराष्ट्रातल्या बहुतेक मंदिरात प्रवेश नव्हता. शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या पंढरपूरच्या वारीत सुद्धा सवर्णांच्या २३ दिंड्या फक्त पंढरपूर शहरात प्रवेश करू शकत. रोहिदास दिंडी, चोखामेळा दिंडी यांना सवर्ण दिंडीपासून वेगळं काढून पंढरपूरच्या बाहेर इंद्रायणीच्या काठावर थांबवलं जाई. समाजवादी विचारांच्या साने गुरुजींनी या विरुध्द महाराष्ट्रभर दौरे करत व्याखेने दिली. साने गुरुजींच्या प्रभावाने शेकडो गावांनी मंदिरं ही सर्वांना खुली केली पण
Mar 25, 2023 10 tweets 2 min read
ओबीसी समाजाचा अपमान ?

भाजपचा आमदार परिचारक हा सैनिक पत्नींच्या चारित्र्यावर लांछन लावतो तेंव्हा सैन्यात जाणाऱ्या ओबीसी, मराठा आणि दलितांचा अपमान होत नाही?

भाजपचा राज्यपाल जेंव्हा सावित्रीमाई अन् महात्मा फुलेंबद्दल अत्यंत हिणकस बोलतो तेंव्हा ओबीसी जनतेचा अपमान होत नाही? वि.दा.सावरकर जेंव्हा छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या कतृत्वाला योगायोग म्हणतो, छ्त्रपती संभाजी महाराजांना दारुडा अन् स्त्रीलंपट म्हणतो तेंव्हा या महाराष्ट्राचा अपमान होत नाही ?

तेल्या-तांबोळ्यांना संसदेत काय नांगर हाकायचा आहे का असं टिळकांनी म्हणल्याने ओबीसींचा अपमान होत नाही का ?
Mar 24, 2023 6 tweets 2 min read
एका शास्त्रीय संशोधनात वापरले गेलेला हा प्रश्न आहे. वेगवेगळ्या ठिकाणची माणसं ही कशा प्रकारे विचार करतात यावर केल्या गेलेल्या संशोधनात अमेरिकन आणि चिनी लोकांना हाच प्रश्न विचारला गेला. अमेरिकन लोकांनी माकड आणि पांडा सांगितलं तर चिनी लोकांनी माकड आणि केळ असं.
पण याचा अर्थ काय ? पाश्चात्य संस्कृती चे मूळ हे ग्रीकच्या इतिहासात आहे. ग्रीक लोकं हे अनेक व्यवसायात होते त्यामुळे त्यांच्या वागण्यात आणि विचारात परस्पर बंधनं नव्हती. स्वतंत्र असल्याने ध्येय केंद्रित विचार करतांना परस्पर संबंध हे कमी महत्त्वाचे ठरून वैयक्तिक वस्तु आणि लोकांवर अधिक लक्ष होतं.
Feb 18, 2023 4 tweets 1 min read
#शिवसेना संपल्याशिवाय वल्लभभाई पटेल आणि मोरारजी देसाईचं मुंबई तोडण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही हे त्यांना माहीत आहे.

१९६० मध्ये नवीन राज्य स्थापनेसाठी ५० कोटी मिळून सुध्दा यांना मुंबईच पाहिजे मग त्यासाठी आमदारांना ५०-५० कोटी द्यावे लागले तरी चालेल पण हे घाटी लोकं मुंबईत नको. या लोकांना शिवसेनेपासून तोडणं शक्य नाही म्हणून आधी शिवसेना तोडा आणि मग ठाकरे ब्रँड.
पण ठाकरे शिवसेनेपासून बाजूला करता येत नाही म्हणून बाळासाहेब हे नाव हवं. मग निवडले ते ९० च्या दशकानंतरचे सोईचे भगव्या कपड्यातले बाळासाहेब.

त्याआधीचे बाळासाहेब आणि प्रबोधनकार शिंदेंना झेपणार नाही.
Feb 5, 2023 11 tweets 3 min read
#Joshimath: A Policy Disaster
मी वाचेलेला एक महत्त्वाचा लेख सर्वांपर्यंत पोहोचवा म्हणून केलेला स्वैर अनुवाद आणि काही मुद्दे
#जोशीमठ चे भूस्खलन ही नैसर्गिक आपत्ती नसून धार्मिकतेच्या राक्षसाचा प्रकोप आहे. "चार धाम महामार्ग" प्रकल्पासाठी केलेली पर्यावरण नियमांची मुजोरी पायमल्ली आहे Hydropower प्रोजेक्टसाठी UPA काळात न्यायायलाने दिलेल्या निर्देशांना मोदी काळात सोयीस्कर रित्या कसं वापरलं गेलं याच हे उदाहरणं. डोंगरी भागात रस्त्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान हे थेट रस्त्याची रुंदी वर अवलंबून असते असा निष्कर्ष सर्वोच्य न्यायालयाने नेमलेल्या समितीने दिला होता.
Aug 16, 2022 6 tweets 2 min read
२००२ गुजरात दंगलीत #बिल्कीस_बानो सामूहिक बलात्कार आरोपात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले ११ आरोपी काल गुजरात सरकारने तुरुंगातून मुक्त केले.

विशेष म्हणजे त्याच दिवशी जेंव्हा प्रधानमंत्री मोदीने नारी (खरं तर स्त्री, महिला म्हणायला हवं) सन्मान करावा असं सार्वजनिक आवाहन केलं. २००२ गोध्रा रेल्वे जाळपोळीनंतर
उसळलेल्या हिंसाचारात गर्भवती असणाऱ्या बिल्कीस बानोवर सामूहिक बxत्कार झाला आणि तिच्या ३ वर्षाच्या मुलीला दगडावर आपटून तर इतर नातेवाईकांना जमावाने जीवे मारलं होतं.

गुजरातमध्ये राहून या केस मध्ये न्याय मिळू शकेल या साशंकतेतून पुढे ही केस
May 14, 2022 5 tweets 1 min read
शरद पवारांनी एक कविता का सांगितली भावे पासून ते चितळेपर्यंत सगळे शेनातले शेंगदाणे खवखवू लागले. ब्राम्हणी प्रवृत्तीला पोटशूळ उठावा असाच मर्मभेदी अर्थ आहे कवितेचा. यालाच विद्रोह म्हणतात. कंपू महासंघाला जातीवाद संपवायचा असेल तर ढसाळांच्या कवितांना चौकात फ्लेक्स वर लावलं पाहिजे. महात्मा फुलेंची पुस्तकं वाचाल तर लक्षात येईल की परिस्थिती मध्ये गेल्या १०० वर्षात सुद्धा फार फरक नाही. बहुजनांनी शिकावं म्हणून फुलेंना केलेलं काम या मंडळींना इतकं त्रासदायक वाटलं होतं की फुलेंना मारायला लोकं पाठवली. ते जमलं नाही म्हणून त्यांची ख्रिस्त धार्जिणे म्हणून बदनामी केली.
Apr 24, 2022 16 tweets 3 min read
सत्यनारायण कथा : अन्न सुरक्षा योजना

साधारणतः घराघरांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी केली जाणारी ही पूजा. नवीन कार्याची सुरुवात, गृहप्रवेश, चांगला दिवस काहीही कारण असो ही पूजा अनेक जण करतात.
पण का ? तर तसं शास्त्रात सांगितलं आहे. कोणी सांगितलं? अनेकांनी.
त्यांना कोणी सांगितलं ? भटजीने. नारदाने पृथ्वीवरच्या लोकांच्या त्रासातून मुक्ती कशी मिळावी या प्रश्नावर विष्णूने हे व्रत सागितले असं स्कंद पुराणात ही लिहिल्याचं भटजी सांगतात.
मग आपण शांत कारण पुराणात लिहिलयं म्हणलं की आपण ते शोधत नाही हे भटजीला माहीत असतं.
त्यात एका साधुवाण्याची कथा सांगितली जाते, कोण हा वाणी?
Apr 14, 2022 5 tweets 2 min read
साधारणतः कोणत्याही गावात एसटी स्थानकासमोर निळ्या कोटात असणारा ज्यांचा पुतळा कायम हातात पुस्तकं घेतल्यामुळे लक्षात येतो ते #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर नक्की कोण? मग यांना राजकारणी, समाजसेवक, अर्थतज्ज्ञ, कामगार कैवारी, कायदेपंडित की लेखक.. काय म्हणून बघावं आपण ? गांधी विरुद्द आंबेडकर वाद असेल किंवा आंबेडकर जिन्ना राजकीय मैत्री. या सगळ्यात मुरलेला राजकारणी आहे. फक्त समाजसेवक म्हणून छोट्या साच्यात बसवणं शक्य नाही आणि फक्त दलीत नेता म्हणावा तर इतर क्षेत्रात सर्व भारतीयांसाठी केलेलं प्रचंड काम दुर्लक्षित करता येणार नाही.
Feb 22, 2022 11 tweets 5 min read
ज्यांना पं. नेहरूंनी #मिर_ए_कांरवां म्हणून संबोधलं आणि गांधींनी त्यांना प्लुटो,अरिस्टोटल आणि पायथागोरस या तिघांच्या योग्यतेचा माणूस म्हणलं असे जे स्वतंत्र भारताचे #पहिले_शिक्षण_मंत्री
#MaulanaAbulKalamAzad यांची आज पुण्यतिथी. १८५७ च्या बंडामध्ये यश न मिळालेल्यामुळे मौलाना अबुल कलाम यांचे वडील सौदी अरेबिया मध्ये जाऊन स्थायिक झाल्यानंतर तिथेच अबुल कलाम यांचा जन्म झाला. पुढे हे कुटुंब कलकत्त्यात येऊन स्थायिक झाले आणि अबुल कलम यांचं शिक्षण पारंपरिक धार्मिक पद्धतीने सुरू झालं.
Feb 16, 2022 10 tweets 2 min read
#नरेंद्र_दाभोलकर यांनी एकदा भाषणात #बुवाबाजी वर सगितलेला किस्सा.

"एकदा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांशी बोलण्याचा योग आला. ते म्हणाले, ‘‘दाभोलकर, ते बाकीचं सगळं ठीक आहे हो! कायदा वगैरे करायला पाहिजे, ते आम्हाला सगळं पटतं; पण बुवा आणि बाबा यांच्याकडे लक्षावधी लोक जातात. आम्ही शेवटी राजकारणी आहोत. ज्यांच्याकडे लोक जातात, त्यांच्याकडे आम्हाला जावं लागतं. तुमच्याकडे याचं काही उत्तर आहे का?’’ त्यांना वाटलं, त्यांनी मला निरुत्तर करणारा प्रश्न विचारला आहे. मी म्हणालो ‘‘हो, माझ्याकडे याचं उत्तर आहे.’’ त्यांना जरा आश्चर्य वाटलं. ते म्हणाले,
Feb 13, 2022 11 tweets 3 min read
#भक्तीसाठी_बळी
सध्या सगळ्यांना देशभक्ती मध्ये तोलून ठरवलं जातं की कोण देशभक्त आणि कोणाला पाकिस्तानचा विसा द्यायचा. अशी ही देशभक्ती म्हणजे सरकारवरच एकतर्फी प्रेम ज्याच्यात तरुण पोरं स्वत:ला हीरो समजून एक पाय घासत #श्रीवल्ली म्हणल्यासारखं घसा ताणून #श्रीराम म्हणत आहेत. मुलांना लहानपणीच ट्युशन लावणारे, अभ्यासासाठी वेगळी रूम बांधणारे, कॉम्प्युटर्स घेऊन देणारे, पैसे भरून मुलांना चांगल्या कॉलेजला पाठवणारे, नौकरीसाठी सोनं मोडून पैसे देणारे, खोटी प्रमाणपत्र तयार करणारे, सरकारी नौकरीवाला जावई शोधणारे लोकं नौकऱ्या नाही तरी पण ढिम्म?
Dec 28, 2020 15 tweets 3 min read
#भारतीय_राष्ट्रीय_कांग्रेस स्वातंत्र्योत्तर काळात भारतात लोकशाही किती टिकेल याबाबत डॉ आंबेडकर साशंक होते. अर्थात ही साशंकता ही त्यांनीच तयार केलेल्या संविधनावर नव्हती तर इथल्या समाजव्यवस्थेचा त्यांचा अभ्यास सांगत होता. धार्मिक,जातीय आधारावर विखुरलेला समाज हा हजारो वर्षांच्या गुलामीच्या जोखडाला बांधलेला होता.आपले काही अधिकार आहेत हे समजण्यासाठी पुरेसं शिक्षण बहुतेकांना नव्हतं. भाषा, प्रांतात विखुरलेल्या ह्या भारत देशात मागच्या ६० वर्षात लोकशाही फक्त टिकली नाहीच तर जगाला संविधानाच्या आधारावर यशस्वी ठरलेल्या लोकशाहीचा परिपाठ घालून दिला ते काँग्रेस या