ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष २०२२ चा #महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री श्री.शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिक्कामोर्तब केले.
२५ लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह,शाल आणि श्रीफळ असे #महाराष्ट्रभूषण पुरस्काराचे स्वरूप असून लवकरच एका दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
१४ मे १९४६ रोजी जन्म झालेले पद्मश्री डॉ.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी गेले ३० वर्ष निरुपण करत असून अंधश्रध्दा, बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या आणि आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. अलिकडच्या काळात संस्थेने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले. त्याशिवाय वृक्षसंवर्धन,तलाव व स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिराचे आयोजनही नियमितरीत्या करण्यात येते.
गणेशोत्सव व नवरात्रौत्सवनंतर निर्माल्यातून खतनिर्मिती करून एक पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी हे स्वच्छतादूत म्हणून ओळखले जातात. रायगड जिल्ह्यातील रेवदंडामध्ये आप्पासाहेबांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण झाले.
बालपणापासून त्यांना कीर्तन ,भजन, अध्यात्मिक वाचन याची आवड होती. याशिवाय त्यांना मैदानी खेळ व पोहणेही आवडायचे. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे.
या कार्याची सुरुवात त्यांचे वडील डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी ह्यांनी १९४३ सालापासून केली होती आणि आज तेच कार्य, तेवढ्याच जोमाने, तत्परतेने जगभर पोहोचविण्याचे कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
मुंबईत २७ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२३ या कालावधीत महाराष्ट्र विधिमंडळाचे #अर्थसंकल्पीयअधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात दि. ९ मार्च रोजी सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे घेण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, दूरदृश्यप्रणालीद्वारे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबई मेट्रो मार्ग ७ (टप्पा-२) आणि मार्ग २अ (टप्पा-२) चे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ जानेवारीला होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी गुंदवली स्थानक येथे भेट देऊन सुविधांची पाहणी केली.
#मेट्रो मार्ग ७ आणि मेट्रो मार्ग २ अ ची सेवा मुंबईकरांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्हि. आर. श्रीनिवास, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर आदी उपस्थित होते.
मेट्रो मार्ग ७, मेट्रो मार्ग २ अ चा ३५ कि.मी.चा टप्पा पूर्ण झाला आहे. यातील ३३ स्थानके लोकांच्या सेवेत दाखल होणार आहेत. अंधेरी, दहिसर, वर्सोवा या परिसरातील मुंबईकरांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होईल.रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होईल.त्यासाठी हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे-मुख्यमंत्री
मुख्यमंत्री @mieknathshinde हे शिष्टमंडळासमवेत डाव्होसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेत सहभागी होणार आहेत. जवळपास २० उद्योगांसमवेत सुमारे १ लाख ४० हजार कोटींचे करार होणार असून आजपर्यंत डाव्होस येथे इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच महाराष्ट्राचे सामंजस्य करार होत आहेत.
पायाभूत सुविधा व इतर महत्वाच्या क्षेत्रात महाराष्ट्राच्या प्रगतीविषयी जगभरातील मान्यवर, गुंतवणूकदार, तसेच उद्योगांच्या प्रमुखांशीही मुख्यमंत्री @mieknathshinde हे संवाद साधणार आहेत.
१६ आणि १७ जानेवारी असे दोन दिवस मुख्यमंत्री @mieknathshinde या परिषदेत उपस्थित राहतील. मुख्यमंत्र्यांसमवेत शिष्टमंडळात उद्योग मंत्री उदय सामंत तसेच वरिष्ठ अधिकारी असतील. ही परिषद २० जानेवारीपर्यंत चालणार आहे.
मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, एकात्मिक बालविकास सेवा आयुक्त रुबल अग्रवाल यांचेसह महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना-समितींचे पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या २० हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून लवकरच ही भरती सुरु करण्यात येईल. त्याशिवाय मानधनवाढीसह नवीन मोबाईल, विमा, अंगणवाड्यांसाठी वर्ग आदी विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल - मुख्यमंत्री
मुंबईतील वाहतूक कोंडीतून सामान्य मुंबईकरांची सुटका व्हावी यासाठी मुंबईसाठी एकात्मिक वाहतूक व्यवस्थापनाबाबत आज मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी आढावा घेतला.
मुंबईसाठी डबलडेकर टनेलचा पर्याय अवलंबण्यासाठी वरिष्ठ सनदी अधिकारी आणि एकात्मिक वाहतूक प्रणाली यंत्रणा तयार करणाऱ्या तंत्रज्ञांनी बैठक घ्यावी आणि त्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिले.
‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुंबईतील वाढती वाहतुक आणि त्यावरील उपाय, सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.मल्टी मॉडेल इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क टनेलच्या माध्यमातून साकारण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.यावेळी सादरीकरण करण्यात आले.
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या उपस्थितीत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या पॅकेज २ मधील सर्वात जास्त लांबीच्या (सुमारे १८० मीटर लांबीच्या आणि सुमारे २३०० मेट्रिक टन वजनाच्या) ऑर्थोोट्रॉपिक स्टिल डेकची उभारणी करण्यात आली.
मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, खासदार राहुल शेवाळे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त श्रीनिवासन, अतिरिक्त आयुक्त गोविंदराज आदी उपस्थित होते.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम ९० टक्के काम पूर्ण झाले असून यावर्षी नोव्हेंबरपासून हा सागरी मार्ग खुला करण्यात येईल. देशातील सर्वात लांबीचा हा सागरी मार्ग ओपन रोड टोलिंग यंत्रणा असलेला देशातील पहिला मार्ग असल्याचेही असे मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी सांगितले.