जॉर्ज सोरोसचा लंगडे घोडे पे दाव...???
©सुमित शिर्के

शीर्षक थोडंफार हिंदीतून असलं तरीही मराठीतूनच लिहिणार आहे.. विषय आहे जॉर्ज सोरोसचा...
हंगेरीमध्ये जन्मलेला #GeorgeSoros सध्या अमेरिकेतील बिलेनिअर उद्योगपती. ह्याची थोडक्यात ओळख करून घेऊया...
०१/२०
अमेरिकेतील हा उद्योगपती खरंच खूप मोठे उद्योग करतो. समाजसेवेच्या नावाखाली अनेक देशात राजकीय हस्तक्षेप करणे त्यातून आपल्याला हवी ती सरकारे बसवणे हा ह्याचा प्रमुख धंदा..

ज्या देशात जन्माला आला त्या हंगेरीने विशेष कायदे करून ह्याला अटकाव केला आहे.
०२/२०
हांगेरीच्या संसदेने 2018 मध्ये "अँटी इमिंग्रंट स्टॉप सोरोस लॉ" हा कायदा संमत केला कारण स्वयंसेवी संस्थांच्या आडून सोरोसने हांगेरीत राजकीय हस्तक्षेप चालवला होता.

हांगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन ज्यांनी खूप तिखट शब्दांमध्ये #GorgeSoros चा समाचार घेतला होता.
०३/२०
आखाती देश, सिरीया, इराक मध्ये गृहयुद्ध भडकल्यावर तिथून युरोपमध्ये पद्धतशीरपणे निर्वासित घुसविण्याचे काम #Soros निगडित संस्था करत होत्या.

ज्या ज्या देशांनी ह्या निर्वासितांना शरण देण्यास नकार दिला त्या देशातील सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न झाले.
०४/२०
असे राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या #Soros निगडित संस्थांना चाप बसवण्यासाठीच हा कायदा केल्याचे ऑर्बन म्हणाले होते.

तसेच युक्रेन-रशिया युद्ध लांबविण्यासाठी सोरोस युक्रेनचे समर्थन करत असल्याचा थेट आरोपही हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन ह्यांनी केला होता.
०५/२०
2016 मध्ये अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प निवडून येऊ नयेत म्हणून जॉर्ज सोरोसने मोठी फिल्डिंग लावली होती. पण ट्रम्प निवडून आले त्यानंतर सोरोसला 1 बिलीयन डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागले होते.

त्यांनंतर 2020 पर्यंत अमेरिकेत ट्रम्प विरुद्ध सोरोस हा सामना सगळ्यांनी पाहिला.
०६/२०
अमेरिकेचा डेमोक्रेटीक पक्ष पूर्णपणे सोरोच्या खिशात आहे. त्यामुळे मी 2020 ची अमेरिकन राष्ट्रध्यक्ष निवडणूक ट्रम्प विरुद्ध बायडन अशी न पाहता ट्रम्प वि. सोरोस अशीच पाहतो.

ट्रम्पला हटावण्यासाठी जिथे जिथे पैसा ओतावा लागेल तिथे पाण्यासारखा पैसा ओतला गेला...
७/२०
जगभरात अनेक देशात आपल्या फेव्हरचे सरकार बसवण्यासाठी उग्र राजकीय आंदोलने आणि दंगली घडवून आणण्यासाठी सोरोसने पैसा पुरवला.

ट्रम्पच्या कार्यकाळात अमेरिकेत झालेले हिंसक ब्लॅक लाईव्ह मॅटर्स आंदोलन हे त्याचे उत्तम उदाहरण...
०८/२०
भारतातील कृषी कायद्याच्या विरोधात 26 जानेवारी 2021 रोजी झालेले दिल्लीतील हिंसक आंदोलन त्याचाच पुढील भाग असल्याचा दाट संशय आहे. कारण त्याचा घटनाक्रमही त्याच मोडस ऑपेरेंडीचा आहे.

त्यावर मी स्वतंत्र लेखमाला गेल्यावर्षीच लिहिली आहे...
०९/२०
गेल्या 7 वर्षांत भारतातील भीमा-कोरेगाव, हाथरस, दिल्ली दंगल, अमरावती-मालेगाव दंगल तसेच अजून ज्या काही हिंसक घटना घडलेल्या आहेत त्याच्या सगळ्या लिंक्स जॉर्ज सोरोस पर्यंत जाऊन पोहोचतात का? हा महत्वाचा प्रश्न आहे..

पण इथे लंगड्या घोड्याचा संबंध आला कुठून.?
१०/२०
सोरोस निगडित एक संस्था आहे, ओपन सोसायटी फाउंडेशन तिचे कारनामे नेटवर जाऊन सर्च करा...

नेहमी असं का होतं की ज्या ज्यावेळी गांधी फॅमिली देशाबाहेर जाऊन येते त्यानंतर देशात हिंसक घटना घडतात.?
११/२०
2013 मध्ये राहुल गांधी ओपन सोसायटी फाउंडेशनच्या कॉन्फरन्सला उपस्थिती लावतात त्यानंतर भारतात बाबा रामरहीमच्या अटकेनंतर हरियाणात हिंसक दंगल का घडते.?

त्यावेळी पंजाब राज्यातून हरियाणामध्ये गाड्याभरून दंगेखोर गेले होते का.?
१२/२०
डिसेंबर 2020 मध्ये लोकसभेत सोनिया गांधीना चक्कर येते. त्यानंतर भारतात उत्तम मेडिकल व्यवस्था असतानाही दोघे मायलेक अमेरिकेत का जातात.?

त्यानंतर अवघ्या महिन्याभरात 26 जानेवारी 2021 रोजी दिल्लीत दंगल का पेटते.?
१३/२०
अमेरिकेत जाऊन आल्यानंतर राहुल गांधी वर्ध्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात चिथावणीखोर वक्तव्य का करतात.?

त्यांनतरच महाराष्ट्रातील अमरावती-मालेगव-नांदेड मध्ये धार्मिक दंगल का भडकते.? तिकडे पंजाबमध्ये नियोजनबद्ध रीतीने पंतप्रधानांचा ताफा का अडवला जातो.?
१४/२०
राहूल गांधी, काँग्रेस आणि सोरोसच्या ओपन सोसायटी फाउंडेशनचे संबंध काय.?

ओपन सोसायटी फाउंडेशनचे VP सलील शेट्टी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला उपस्थिती लावतात. ये रिश्ता क्या केहलाता है.?
१५/२०
प्रत्येकवेळी अगदी प्रत्येकवेळी संसदेचे अधिवेशन सुरू होण्याआधी अमेरिकेत भारताला बदनाम करणारा एखादा रिपोर्ट येतो आणि त्यावरून काँग्रेस संसदेचे कामकाज चालू देत नाही..

ह्या "मिले सूर मेरा तुम्हारा" प्रकाराचा अर्थ काय समजायचा.?
१६/२०
सोरोसचा इतिहास आणि भारतातील घटनाक्रम पाहता भारतात सोरोससाठी काम करणारे लोकं आहेत का हा प्रश्न पडतो आणि त्यात काँग्रेसची पावलं आणखीन प्रश्न उपस्थित करतात...

काँग्रेस आणि सोरोसचे थेट संबंध आहेत का.?
१७/२०
काल ज्याप्रकारे सोरोसने भारतासंदर्भात जी काही विधानं केली आहेत त्यावरून तरी हेच स्पष्ट होतंय की त्याने भारतात राजकीय हस्तक्षेप सुरू केला आहे.

आणि गेल्या काही वर्षांतील घटनाक्रम जोडून पाहिला तर संशयाची सुई एकाच व्यक्तीकडे वळते...
१८/२०
असं ऐकीवात आहे की जॉर्ज सोरोसने भारतात सत्तांतर घडवून आणण्यासाठी 1 बिलीयन डॉलर्सची फंडिंग लावली आहे...

पण तो दोन घोडचुका करून बसलाय.
1. तो डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी ह्या दोघांना एकाच तराजूमध्ये तोलतोय.
दुसऱ्या चुकीचा एक संशय आहे तो असा....
१९/२०
2. सोरोसने भारतात लंगड्या घोड्यावर पैसे लावले आहेत का.?

लेखाचा शेवट एका वाक्याने करतो...
"जब भी कभी कोई आवाज मेरे खिलाफ जोर से आती है, तो समझ लेना मोदीने चाबी टाइट कर दी है..."
२०/२०

©सुमित शिर्के

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with 🇮🇳Sumiet Shirke🇮🇳

🇮🇳Sumiet Shirke🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @SumietsinhS

Feb 17
काय तर म्हणे, हिंमत असेल तर निवडणुका घ्या....

विधानसभेत बहुमत चाचणी घेऊन हिंमत दाखवायची सुवर्णसंधी असताना त्याकडे पाठ दाखवून पळ कोणी काढला..???
1/4
काय तर म्हणे, हिंमत असेल तर निवडणुका घ्या....

स्वतःच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील जवळपास 15 महानगरपालिकांची मुदत संपलेली असताना त्यांच्या निवडणुका कोणी टाळल्या.???
2/4
काय तर म्हणे, हिंमत असेल तर निवडणुका घ्या...

मग पंढरपूर, देगलूर, कोल्हापूर आणि अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूका बिनविरोध व्हाव्यात म्हणून विनवण्या कोण करत होतं..?
3/4
Read 4 tweets
Dec 14, 2021
आंधळे हिंदुत्ववादी

काही दिवसांपूर्वी मी लक्ष्यवेध2020 ह्या युट्यूब चॅनलवर यती नरसिंहानंद वरून सावध करणारा व्हिडिओ केला होता. त्यावेळी काही हिंदुत्ववादी लोकांनी माझ्यावर यथेच्छ टीका. अगदी चॅनेलचे ओनर आबा सरांनाही सोडलं नाही. अशा कमेंस्ट्स वाचून आधी तर हसायलाच यात होतं. पण.. १/२५
२ दिवसांपूर्वी मोदींनी वाराणसीमध्ये काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं उद्घाटन केलं आणि त्यात मोदींचे भाषण ऐकून विचारला चालना मिळाली.

यती नरसिंहानंद हिंदुत्ववाद्यांसाठी खड्डा खणतोय ह्या मतावर मी आजही ठाम आहे... २/२५
बहुतांश मुस्लिम कधीही भाजपाला मत देणार नाहीत हे जितकं सत्य आहे तितकंच धार्मिक भावना दुखावल्या गेल्या की मुस्लिम मतं विभागली न जाता एकगठ्ठा कुठल्याही एकाच विरोधी पक्षाला जातात.

उदा. प. बंगालमध्ये ओवैसीला मुस्लिम मतं न जाता एकगठ्ठा भाजपाविरोधात तृणमूलला मिळाली. ३/२५
Read 25 tweets
Nov 24, 2021
भारतात जॉर्ज फ्लोईडचा शोध सुरू आहे पण सापडत नाहीए भाग - ५
©सुमित शिर्के

पाच महिन्यांपूर्वी ह्या विषयावर 4 भाग लिहून थांबलो होतो पण कृषी कायदे मागे घेण्याचा केंद्र सरकारने एक निर्णय घेतला आणि आता हा 5वा भाग लिहावा लागतोय. १/२५
१९ तारखेला सकाळी 9 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करत 3 कृषी सुधारणा कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर एकच गदारोळ उठला.

ह्या निर्णयामुळे मोदी विरोधक जितके शेफारले त्यापेक्षा जास्त मोदी समर्थक किंवा ज्यांना मोदीभक्त म्हणतात ते बिथरले २/२५
ह्या नंतर मी थोडे इकडे तिकडे सर्च करायला सुरुवात केली. तेव्हा एक गोष्ट समजली की २९ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये संसदभवनावर ट्रॅक्टर रॅली निघणार आहे.

अर्थात ह्या रॅलीची औपचारिक घोषणा कृषी कायदे मागे घेतल्यानंतर केली असली तरी त्याची तयारी खुप आधीपासूनच सुरू होती👇 ३/२५
Read 26 tweets
Jun 21, 2021
भारतात जॉर्ज फ्लोइडचा शोध सुरू आहे पण सापडत नाहीये... भाग - ३
©सुमित शिर्के

२०२० च्या सुरवातीला कोरोनाने संपुर्ण जगाला विळख्यात घेतलं. त्याचा लोकसंख्येच्या दृष्टीने २ ऱ्या नंबरवर असणाऱ्या भारताला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. १/२५
अगदी सुरुवातीच्या काळात अमेरिकेतील काही so called तज्ञ आणि माध्यम (अर्थात लिब्राडू) भारतात एका आठवडयाला १० लाख रुग्ण सापडतील अशी शक्यता वर्तवत होते.

ह्यासाठी अनेक रिसर्च वगैरे फालतू कारण देत असले तरी त्यांना भारताची भली मोठी बाजारपेठ खुणावत होती.. २/२५
कोरोनाकाळाच्या आधी भारतात मास्क असो वा पीपीई किट काहीच बनत नव्हते. आज पीपीई किटच्या बाबतीत भारत आत्मनिर्भर आहे. इथपर्यंत ठीक होत...

पण मोदीने पुढे येऊन लस आणि व्हेंटिलेटरसारख्या गोष्टी भारतातच बनवायला सुरूवात केली आणि तिथेच लिब्राडूच्या खिशाला कात्री लागली. ३/२५
Read 29 tweets
Jun 19, 2021
भारतात जॉर्ज फ्लोइडचा शोध सुरू आहे पण सापडत नाहीये. भाग-२
©सुमित शिर्के.

२६ जानेवारीच्या हिंसाचारानंतर तथाकथित शेतकरी आंदोलनाचा जोर ओसरला. संपूर्ण देशातून आधी जो पाठींबा होता तो आता मिळेनासा झाला. लिब्राडू आणि लुटीयन्स लॉबीमध्ये भयंकर निराशा पसरली... १/२२
पुढे ५ राज्यांच्या निवडणुका लागल्या. त्यातील प. बंगालची निवडणूक गाजली. भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. निकालानंतर हिंसाचाराला सुरुवात झाली. अनेक भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. इतरवेळेस रडणारे लिब्राडु ह्यावर मात्र शांत होते. ते मोदीशाच्या निर्णयाची वाट पाहत होते.. २/२२
केंद्रीय गृहमंत्रालयाने प. बंगालच्या राज्यपालांकडे ह्या संपूर्ण हिंसाचाराचे तपशील मागितले. लिब्राडुंसाठी ही खेळी अनपेक्षित होती. त्यांची अपेक्षा होती की भाजपचा कोणी तरी नेता पुढे येईल आणि काही बरळेल आम्हाला आयती संधी मिळेल. पण भाजपच्या वरच्या गोटात त्यामानाने शांतता होती.. ३/२२
Read 24 tweets
Jun 17, 2021
भारतात जॉर्ज फ्लोइडचा शोध सुरू आहे पण सापडत नाहीये... भाग - १
©सुमित शिर्के

अनेकांशी बोलताना ज्यावेळी हे वाक्य वापरलं तेव्हा समजलं की त्यांना जॉर्ज फ्लोइडच माहीत नाहीये. कोण आहे जॉर्ज फ्लोइड.? अरे तो तर मेलाय ना.? मग भारतात कसा येईल.? नको नको ते प्रश्न... १/१८
जॉर्ज फ्लोइडची थोडक्यात ओळख करून घेऊयात.
गेल्यावर्षी अमेरिकेतपोलिसांच्या कारवाईत एका कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लोइड नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचे इतर तपशील गुगलवर मिळतीलच. पण त्याचे परीणाम स्वरूप अमेरिकेत ब्लॅक लाईव्ह मॅटर्स नावाचे आंदोलन तीव्र झाले... २/१८
पुढे या ब्लॅक लाईव्ह मॅटर्स आंदोलनाचे स्वरूप हिंसक झाले आणि त्या आंदोलनाचा तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्याविरोधात "पद्धतशीरपणे" वापर करून घेतला गेला. आधीच कोरोनाचा कहर आणि त्यात हे हिंसक आंदोलनचा वापर करून ट्रम्पविरोधात वातावरण निर्मिती करण्यात आली. ३/१८
Read 21 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(