#शिवजयंती
शिवजन्माच्या आसपास ब्राम्हण सरदार मुरार जगदेवने पुण्याची लूट करत कसबापेठेत गाढवाचा नांगर फिरवून अपशकून केला.
पण याच ठिकाणी जिजामातेने पुन्हा पुणे वसवत शिवबाच्या बालमनावर अंधश्रध्देविरुद्ध पहिला संस्कार घडवला.
म्हणूनच पंचांगाशिवाय स्वकर्तृत्वावर शककर्ते छ्त्रपती घडले.
शिवरायांचे कार्य हे धर्म वाचवण्यासाठी होतं असं वाटत असेल तर प्रबोधनकारांनी म्हणल्याप्रमाणे स्वतःला न वाचवू शकणाऱ्या ३३ कोटी देवांची फलटणच बाद ठरली म्हणायची.
स्वराज्य निर्मिती ही पोध्यापुराणातून नाही तर तलवारीच्या पात्यातून बुद्धीच्या जोरावर झाली होती.
फुलेंनी शोधलेल्या समाधीवरची
फुलं लाथाळणाऱ्या वृत्ती तिथी-तारखेचा घोळ घालत संभ्रम निर्माण करतात.
सर्वधर्मीय राजांच्या अत्याचाराविरुद्ध स्वराज्य निर्माण करणाऱ्याला राजाला देवत्व देवून कर्तुत्व झाकाळण्याचा प्रयत्न करतात.
या दैदिप्यमान इतिहासाला भाकड कथा, आरत्या अन् मंदिरात बसवून देव्हाऱ्यात पोट भरणार कोण ?
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#शिवसेना संपल्याशिवाय वल्लभभाई पटेल आणि मोरारजी देसाईचं मुंबई तोडण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही हे त्यांना माहीत आहे.
१९६० मध्ये नवीन राज्य स्थापनेसाठी ५० कोटी मिळून सुध्दा यांना मुंबईच पाहिजे मग त्यासाठी आमदारांना ५०-५० कोटी द्यावे लागले तरी चालेल पण हे घाटी लोकं मुंबईत नको.
या लोकांना शिवसेनेपासून तोडणं शक्य नाही म्हणून आधी शिवसेना तोडा आणि मग ठाकरे ब्रँड.
पण ठाकरे शिवसेनेपासून बाजूला करता येत नाही म्हणून बाळासाहेब हे नाव हवं. मग निवडले ते ९० च्या दशकानंतरचे सोईचे भगव्या कपड्यातले बाळासाहेब.
त्याआधीचे बाळासाहेब आणि प्रबोधनकार शिंदेंना झेपणार नाही.
प्रबोधनकार आणि बाळासाहेब यांच्या सारखं लेखणीच्या लढाईत विजय आता शक्य नाही कारण लोकं आता "सामना" वाचून शांत बसतात आणि "व्हॉट्सॲप" वाचून पेटून उठतात.
तरीही बहुतेक मतदार हा सुज्ञ आहे वाटतं असेल तर EVM ही त्याहून सुज्ञ आहे हे पण तितकंच खरं.
#Joshimath: A Policy Disaster
मी वाचेलेला एक महत्त्वाचा लेख सर्वांपर्यंत पोहोचवा म्हणून केलेला स्वैर अनुवाद आणि काही मुद्दे #जोशीमठ चे भूस्खलन ही नैसर्गिक आपत्ती नसून धार्मिकतेच्या राक्षसाचा प्रकोप आहे. "चार धाम महामार्ग" प्रकल्पासाठी केलेली पर्यावरण नियमांची मुजोरी पायमल्ली आहे
Hydropower प्रोजेक्टसाठी UPA काळात न्यायायलाने दिलेल्या निर्देशांना मोदी काळात सोयीस्कर रित्या कसं वापरलं गेलं याच हे उदाहरणं. डोंगरी भागात रस्त्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान हे थेट रस्त्याची रुंदी वर अवलंबून असते असा निष्कर्ष सर्वोच्य न्यायालयाने नेमलेल्या समितीने दिला होता.
असं असतांना आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने २०१८ ला डोंगरी रस्त्यांसाठी केलेली नियमावलीच या चारधाम महामार्ग प्रकल्पासाठी डावलली. नियमावली प्रमाणे ५.५ मी रुंदी असावी पण १२ मी चे रस्ते बनवले गेले ज्यासाठी अनिर्बंध झाडांची कत्तल करत डोंगरांचा नैसर्गिक उतार सुद्धा बदलला गेला.
२००२ गुजरात दंगलीत #बिल्कीस_बानो सामूहिक बलात्कार आरोपात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले ११ आरोपी काल गुजरात सरकारने तुरुंगातून मुक्त केले.
विशेष म्हणजे त्याच दिवशी जेंव्हा प्रधानमंत्री मोदीने नारी (खरं तर स्त्री, महिला म्हणायला हवं) सन्मान करावा असं सार्वजनिक आवाहन केलं.
२००२ गोध्रा रेल्वे जाळपोळीनंतर
उसळलेल्या हिंसाचारात गर्भवती असणाऱ्या बिल्कीस बानोवर सामूहिक बxत्कार झाला आणि तिच्या ३ वर्षाच्या मुलीला दगडावर आपटून तर इतर नातेवाईकांना जमावाने जीवे मारलं होतं.
गुजरातमध्ये राहून या केस मध्ये न्याय मिळू शकेल या साशंकतेतून पुढे ही केस
मुंबई उच्च न्यायालयात वर्ग करण्यात आली. ओळख पटू नये म्हणून पोलिसांनी सर्व मृतदेह हे डोकं वेगळं करून पुरले असे ताशेरे ही ओढले गेले.
या केसचा ऐतिहासिक निर्णय देणाऱ्या जस्टिस तहीलरामाणी यांच्या नावाची खूप चर्चा झाली होती. याच जस्टिस तहीलरमाणी पुढे मद्रास उच्च न्यायालयाच्या
शरद पवारांनी एक कविता का सांगितली भावे पासून ते चितळेपर्यंत सगळे शेनातले शेंगदाणे खवखवू लागले. ब्राम्हणी प्रवृत्तीला पोटशूळ उठावा असाच मर्मभेदी अर्थ आहे कवितेचा. यालाच विद्रोह म्हणतात. कंपू महासंघाला जातीवाद संपवायचा असेल तर ढसाळांच्या कवितांना चौकात फ्लेक्स वर लावलं पाहिजे.
महात्मा फुलेंची पुस्तकं वाचाल तर लक्षात येईल की परिस्थिती मध्ये गेल्या १०० वर्षात सुद्धा फार फरक नाही. बहुजनांनी शिकावं म्हणून फुलेंना केलेलं काम या मंडळींना इतकं त्रासदायक वाटलं होतं की फुलेंना मारायला लोकं पाठवली. ते जमलं नाही म्हणून त्यांची ख्रिस्त धार्जिणे म्हणून बदनामी केली.
छ्त्रपती राजर्षी शाहू महाराजांनी याच वर्चस्वाला कायदेशीर आणि सामाजिक हादरे दिले. तत्कालीन मीडिया हाताशी असणाऱ्या "शेणाचा गोळा खाऊन पवित्र झालेले ब्रम्हमान्य व्यक्तीने अत्यंत हिणकस टीका केली होती. आजही मुद्दाम त्यांचा उल्लेख हा "कार्यकर्ता" म्हणून करतांना तीच मळमळ दिसते.
साधारणतः घराघरांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी केली जाणारी ही पूजा. नवीन कार्याची सुरुवात, गृहप्रवेश, चांगला दिवस काहीही कारण असो ही पूजा अनेक जण करतात.
पण का ? तर तसं शास्त्रात सांगितलं आहे. कोणी सांगितलं? अनेकांनी.
त्यांना कोणी सांगितलं ? भटजीने.
नारदाने पृथ्वीवरच्या लोकांच्या त्रासातून मुक्ती कशी मिळावी या प्रश्नावर विष्णूने हे व्रत सागितले असं स्कंद पुराणात ही लिहिल्याचं भटजी सांगतात.
मग आपण शांत कारण पुराणात लिहिलयं म्हणलं की आपण ते शोधत नाही हे भटजीला माहीत असतं.
त्यात एका साधुवाण्याची कथा सांगितली जाते, कोण हा वाणी?
साधू वाणी या कथेतलं पात्र आहे जो आणि त्याची पत्नी, मुलगी आणि जावई हे सर्व सुखी असतात.
देवपूजा दुर्लक्षिल्याने त्यांची संपत्ती चोरी होऊन त्यांना अटकही होते.
पण नंतर एका ब्राम्हणाच्या घरी ही पूजा बघून पुन्हा ती सुरू केल्याने त्यांचे सर्व दुखः दूर होतात.
साधारणतः कोणत्याही गावात एसटी स्थानकासमोर निळ्या कोटात असणारा ज्यांचा पुतळा कायम हातात पुस्तकं घेतल्यामुळे लक्षात येतो ते #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर नक्की कोण? मग यांना राजकारणी, समाजसेवक, अर्थतज्ज्ञ, कामगार कैवारी, कायदेपंडित की लेखक.. काय म्हणून बघावं आपण ?
गांधी विरुद्द आंबेडकर वाद असेल किंवा आंबेडकर जिन्ना राजकीय मैत्री. या सगळ्यात मुरलेला राजकारणी आहे. फक्त समाजसेवक म्हणून छोट्या साच्यात बसवणं शक्य नाही आणि फक्त दलीत नेता म्हणावा तर इतर क्षेत्रात सर्व भारतीयांसाठी केलेलं प्रचंड काम दुर्लक्षित करता येणार नाही.
हिंदू धर्माची चिकिस्ता ते रुपयाचं मूल्य इतक्या वेगवेगळ्या विषयांवर केलेलं अप्रतिम लिखाण हे डॉ आंबेडकरांची पुढच्या पिढीला दिलेली परिवर्तनाची शिदोरी आहे. जमेल तितकी घ्यावी. आंबेडकरांच्या तसबिरीपेक्षा त्यांची पुस्तकं वाटावी इतकी त्यात वैचारिक धगधग आहे.