काश्मीर!
प्रत्येकाने आयुष्यात दोनदा तरी पाहिलं पाहिजे. एकदा जानेवारी आणि एकदा जुलै-ऑगस्ट मध्ये कारण दोन्ही वेळेस पूर्णपणे वेगळे चित्र पाहायला मिळेल.
तिकडे जाणार म्हणलं की सगळ्यांचा पहिला प्रश्न असतो सेफ आहे का? तर उत्तर आहे हो. पर्यटकांना तिथले लोक अगदी राजासारखे ट्रीट करतात.
१/n
तिथल्या लोकांबद्दल नंतर कधी चर्चा. तूर्तास ट्रीप प्लॅनिंग आणि तिथल्या स्थळांबद्दल माहिती.
जायला बाय एअर श्रीनगर एअरपोर्ट आणि बाय ट्रेन जम्मुतावी. जम्मूहून बाय रोड पण जाता येईल. 250 किमी च्या आसपास रोड आहे पण वेळ किती लागेल सांगता येत नाही. जाम नेहमीचेच असतात कधी कधी १२ तास पण २/n
जाम लागतात. त्यामुळे साधारण ७-९ तास नॉर्मल टाईम आहे. प्रायव्हेट टॅक्सी १३-१४०० रुपये घेतात त्यात ८-९ जण कोंबून नेतात त्यापेक्षा एसटी ने ५५० नॉन एसी आणि ९०० AC. नॉन एसी बसेस छान कंफर्टेबल आहेत आपल्या शिवशाही सारख्या. जम्मू हून जाताना आणि श्रीनगर हून येताना पण बस फक्त सकाळी ३/n
एका व्यक्तीने आयुष्याची २० वर्ष खर्च करून प्रचंड मेहनतीने समग्र मानवजातीचा इतिहास लिहिला.
एके रात्री त्याच्या घरामागे दोन टोळक्यात हाणामारी झाली अन् एकाचा खून झाला. तो तिथे पोहचला तेंव्हा तिथे बरीच गर्दी जमली होती. खून करणारे पळून गेले होते. ज्याचा खून झाला त्याचे साथीदार १/n
आणि आजूबाजूचे इतर लोक तिथे होते. त्याने जमलेल्या सर्वांना घटनेचा तपशील विचारला. उपस्थित प्रत्येकाने घटना वेगवेगळ्या प्रकारे सांगितली.
जे साथीदार होते त्यांचं म्हणणं होतं, दरोडेखोरांच्या टोळीशी लढताना वीरमरण आले.
ज्यांना दुसऱ्या टोळीशी सहानुभूती होती ते म्हणाले, हा मेलेलाच २/n
दरोडेखोर आहे.
पोलिसांनी सांगितलं, हाणामारी झालीच नाही. नशेत आत्महत्या केलेली आहे.
एक तर म्हणाला, वाहनासोबत अपघात झाला!
हे सगळं ऐकून तो इतिहासकार भांबावून गेला.
घरी गेला आणि त्याने आजवर लिहिलेला सगळा इतिहास फाडून टाकला! अन् खिन्न मनाने स्वतःला म्हणाला, "माझ्या घराच्या
३/n
तसं कोणी कोणासाठी जगत नसतं...
पण ज्यांच्यामुळे जगण्याला अर्थ मिळतो त्याच लोकांसोबत वेळ घालवता येत नाही. इतभर पोट लै काही पाहायला लावतं. घरदार सोडून शेकडो,हजारो किलोमीटर दूर राहणारे सगळे लोक सणासुदीला घरच्यांचं तोंड पाहणार त्यात पण धावपळीत सगळं. कधी निवांत आईच्या मांडीवर डोकं १/४
ठेऊन झोपायला वेळ मिळत नाही. ना बापासोबत जेवण झाल्यावर गच्चीवर इकडच्या तिकडच्या गप्पा मारणं होतं... दोन दिवसाच्या सुट्ट्या क्षणात संपल्या सारख्या वाटतात. अन् पुन्हा आणली तशी बॅग उचलून माघारी निघायचं... कंठ दाटून आलेल्या माऊलीला हात करून...
आपण गेल्यावर दोन दिवस तिला घर मात्र अगदी
स्मशान असल्यागत वाटतं...
अन आपण इकडे प्रत्येक भेटीत माय बापाच्या शरीरावर दिसू लागलेल्या वृद्धापकाळाच्या अधिकाधिक ठळक होत असलेल्या छटा पाहून अस्वस्थ होत राहायचं... एखादी रात्र कोणासाठी करतोय? का करतोय? वगैरे प्रश्न स्वतःला विचारायचे अन् डोळ्यातून एखादा थेंब सगळे प्रश्न तसेच
"लिव्ह इन मध्ये असलेल्या GF चा खू*न करून तिच्या शरीराचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकले..." ही बातमी वाचली अन् एक प्रसंग आठवला.
आम्ही पोरं राहायचो त्या इमारतीत आमच्या वरच्या फ्लॅटमध्ये एक कपल लिव्ह इन मध्ये राहायचं. वीकेंड आला की रात्री उशिरापर्यंत पार्ट्या चालायच्या. त्यांचे १/n
मित्र यायचे अन् बराच गोंधळ असायचा. आम्ही पण बॅचलर असल्याने कधी त्या गोष्टीचा आम्हाला त्रास वाटला नाही. पण एके दिवशी आवाज जरा जास्तच येत होता. जोरजोरात ओरडणे आणि आदळआपट सुरू होती. हे नेहमीचं नाही असं लक्षात आलं. आम्ही शांत बसून नेमकं काय सुरू आहे ह्याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न २/n
करत होतो. एव्हाना रात्रीचे १-१:३० वाजले होते. त्यांची पार्टी झाली होती आणि कसल्या तरी मुद्द्यावरून वाद झालेला होता. तो मुलगा तिच्यावर संशय घेऊन तिला अर्वाच्य भाषेत शिव्या देत होता. अधूनअधून जोरात काहीतरी आदळल्याचा आवाज अन् त्यामागोमाग त्या मुलीचा वेदनेने विव्हळणारा आवाज येत ३/n
मुकॉर्मायकॉसिस च्या Amphotericin B औषधाचे My Lan कंपनी चे Ambisome हे इंजेक्शन जर कंपनीने ठरवून दिलेल्या Authorised dealer कडून घेतले तर कंपनी दर ५ इंजेक्शन वर एक इंजेक्शन फ्री देते. त्यासाठी खालील कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. 👇
१) रुग्णाचे आधार कार्ड
२) डॉक्टरांचे कंपनीला
उद्देशून विनंती पत्र.
३) इंजेक्शन चे बिल.
४) पेशंटचे हस्ताक्षर असलेले संमती पत्र.
इंजेक्शन खरेदी करण्याआधी 9686585060 ह्या व्हॉट्सॲप नंबर वर टेक्स्ट करून तुमच्या क्षेत्रातील अधिकृत विक्रेत्यांची सूची मागा. त्यानंतर तिथून खरेदी केल्यावर ह्याच व्हॉट्सॲप नंबर वर वरील सगळे कागदपत्रे
पाठवा. मग कंपनी तुम्हाला कॉल करेल किंवा व्हॉट्सॲप वर संपर्क साधेल. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कंपनी तुम्ही दिलेल्या पत्त्यावर फ्री इंजेक्शन पाठवते. साधारण ७-८ दिवसात इंजेक्शन हातात पडतात. पाठपुरावा केला तर हा कालावधी कमी होतो.
समजा एखाद्याला ४८ इंजेक्शनची गरज आहे तर त्यांनी फक्त ४०
माननीय मुख्यमंत्री महोदय,
सध्या कोरोना नंतर होणाऱ्या मुकॉर्मायकॉसिस ह्या बुरशी संसर्गाचे रुग्ण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. ह्या आजारावर शस्त्रक्रिया करून तो संसर्ग झालेला भाग काढणे आणि Liposomal Amphotericin -B, पोसॅकोनाझोल, इसावूकॉनाझोल ई. औषधांचा किमान २ आठवडे डोस देणे हा
एकमेव पर्याय आहे. अन्यथा मृत्यू अटळ आहे! आधीच हे इंजेक्शन ८-९ हजार प्रति नग किमतीचे असून पण आता मागणी वाढल्यामुळे आऊट ऑफ स्टॉक गेले आहेत. एकवेळ रेमडीसिवर नसेल तर रुग्ण वाचू शकतो पण हे इंजेक्शन मिळाले नाही तर मृत्यू अटळ आहे. कृपया काळाबाजार होऊ नये ह्यासाठी त्वरित उपाय करावे.
अन्यथा दररोज ५-६ इंजेक्शन चढ्याभावाने विकत घेणे कोणालाच शक्य होणार नाही आणि लोकांना प्राण गमवावे लागतील. शिवाय औषधनिर्मात्या कंपन्यांकडे कच्चा मालाचा तुटवडा आहे असे कारण दिले जात आहे. ह्याबद्दल लक्ष घालून पुरवठा सुरळीत केला तर हजारों लोकांचे प्राण वाचतील. 🙏