सुशिक्षित बेरोजगार Profile picture
जात:- भारतीय🔸 धर्म:- मानवता🔸
Aug 19, 2023 6 tweets 2 min read
गाड्या धुणारा मुलगा परवा म्हणाला,
"दादा silencer नवीनच टाकायचं की... "
मी म्हणलं," जे काम २५० रू मध्ये होतंय त्यासाठी ३००० का घालू?"
"तस नाही दादा... गाडीचा लूक जातो."
"अरे तुझं काम होतंय ह्याला महत्त्व आहे का शो ऑफ करण्याला?"
"बरोबर आहे म्हणा ते ही... मला पण घ्यायची आहे" १/n Image मी म्हणलं," नको घेऊ."
"का?"
"गरज काय आहे तुला? बुलेट ची?"
" असच अधून मधून चक्कर मारायची. रोज वापरायला Activa आहेच की."
"मग घ्यायचीच कशाला गरज नाही तर?"
"लै हौस आहे मला ह्या गाडीची."
"तुझं वय किती आहे आता?"
तो म्हणाला,"वीस"
"मी पण तुझ्याच वयात घेतली होती. तेंव्हा असाच शौक होता.२/n
Feb 22, 2023 15 tweets 3 min read
काश्मीर!
प्रत्येकाने आयुष्यात दोनदा तरी पाहिलं पाहिजे. एकदा जानेवारी आणि एकदा जुलै-ऑगस्ट मध्ये कारण दोन्ही वेळेस पूर्णपणे वेगळे चित्र पाहायला मिळेल.
तिकडे जाणार म्हणलं की सगळ्यांचा पहिला प्रश्न असतो सेफ आहे का? तर उत्तर आहे हो. पर्यटकांना तिथले लोक अगदी राजासारखे ट्रीट करतात.
१/n तिथल्या लोकांबद्दल नंतर कधी चर्चा. तूर्तास ट्रीप प्लॅनिंग आणि तिथल्या स्थळांबद्दल माहिती.
जायला बाय एअर श्रीनगर एअरपोर्ट आणि बाय ट्रेन जम्मुतावी. जम्मूहून बाय रोड पण जाता येईल. 250 किमी च्या आसपास रोड आहे पण वेळ किती लागेल सांगता येत नाही. जाम नेहमीचेच असतात कधी कधी १२ तास पण २/n
Feb 20, 2023 4 tweets 3 min read
Jan 5, 2023 4 tweets 1 min read
एका व्यक्तीने आयुष्याची २० वर्ष खर्च करून प्रचंड मेहनतीने समग्र मानवजातीचा इतिहास लिहिला.
एके रात्री त्याच्या घरामागे दोन टोळक्यात हाणामारी झाली अन् एकाचा खून झाला. तो तिथे पोहचला तेंव्हा तिथे बरीच गर्दी जमली होती. खून करणारे पळून गेले होते. ज्याचा खून झाला त्याचे साथीदार १/n आणि आजूबाजूचे इतर लोक तिथे होते. त्याने जमलेल्या सर्वांना घटनेचा तपशील विचारला. उपस्थित प्रत्येकाने घटना वेगवेगळ्या प्रकारे सांगितली.
जे साथीदार होते त्यांचं म्हणणं होतं, दरोडेखोरांच्या टोळीशी लढताना वीरमरण आले.
ज्यांना दुसऱ्या टोळीशी सहानुभूती होती ते म्हणाले, हा मेलेलाच २/n
Dec 30, 2022 4 tweets 1 min read
तसं कोणी कोणासाठी जगत नसतं...
पण ज्यांच्यामुळे जगण्याला अर्थ मिळतो त्याच लोकांसोबत वेळ घालवता येत नाही. इतभर पोट लै काही पाहायला लावतं. घरदार सोडून शेकडो,हजारो किलोमीटर दूर राहणारे सगळे लोक सणासुदीला घरच्यांचं तोंड पाहणार त्यात पण धावपळीत सगळं. कधी निवांत आईच्या मांडीवर डोकं १/४ ठेऊन झोपायला वेळ मिळत नाही. ना बापासोबत जेवण झाल्यावर गच्चीवर इकडच्या तिकडच्या गप्पा मारणं होतं... दोन दिवसाच्या सुट्ट्या क्षणात संपल्या सारख्या वाटतात. अन् पुन्हा आणली तशी बॅग उचलून माघारी निघायचं... कंठ दाटून आलेल्या माऊलीला हात करून...
आपण गेल्यावर दोन दिवस तिला घर मात्र अगदी
Nov 14, 2022 12 tweets 3 min read
"लिव्ह इन मध्ये असलेल्या GF चा खू*न करून तिच्या शरीराचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकले..." ही बातमी वाचली अन् एक प्रसंग आठवला.
आम्ही पोरं राहायचो त्या इमारतीत आमच्या वरच्या फ्लॅटमध्ये एक कपल लिव्ह इन मध्ये राहायचं. वीकेंड आला की रात्री उशिरापर्यंत पार्ट्या चालायच्या. त्यांचे १/n मित्र यायचे अन् बराच गोंधळ असायचा. आम्ही पण बॅचलर असल्याने कधी त्या गोष्टीचा आम्हाला त्रास वाटला नाही. पण एके दिवशी आवाज जरा जास्तच येत होता. जोरजोरात ओरडणे आणि आदळआपट सुरू होती. हे नेहमीचं नाही असं लक्षात आलं. आम्ही शांत बसून नेमकं काय सुरू आहे ह्याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न २/n
May 12, 2021 4 tweets 2 min read
मुकॉर्मायकॉसिस च्या Amphotericin B औषधाचे My Lan कंपनी चे Ambisome हे इंजेक्शन जर कंपनीने ठरवून दिलेल्या Authorised dealer कडून घेतले तर कंपनी दर ५ इंजेक्शन वर एक इंजेक्शन फ्री देते. त्यासाठी खालील कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. 👇
१) रुग्णाचे आधार कार्ड
२) डॉक्टरांचे कंपनीला उद्देशून विनंती पत्र.
३) इंजेक्शन चे बिल.
४) पेशंटचे हस्ताक्षर असलेले संमती पत्र.

इंजेक्शन खरेदी करण्याआधी 9686585060 ह्या व्हॉट्सॲप नंबर वर टेक्स्ट करून तुमच्या क्षेत्रातील अधिकृत विक्रेत्यांची सूची मागा. त्यानंतर तिथून खरेदी केल्यावर ह्याच व्हॉट्सॲप नंबर वर वरील सगळे कागदपत्रे
May 6, 2021 4 tweets 2 min read
माननीय मुख्यमंत्री महोदय,
सध्या कोरोना नंतर होणाऱ्या मुकॉर्मायकॉसिस ह्या बुरशी संसर्गाचे रुग्ण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. ह्या आजारावर शस्त्रक्रिया करून तो संसर्ग झालेला भाग काढणे आणि Liposomal Amphotericin -B, पोसॅकोनाझोल, इसावूकॉनाझोल ई. औषधांचा किमान २ आठवडे डोस देणे हा एकमेव पर्याय आहे. अन्यथा मृत्यू अटळ आहे! आधीच हे इंजेक्शन ८-९ हजार प्रति नग किमतीचे असून पण आता मागणी वाढल्यामुळे आऊट ऑफ स्टॉक गेले आहेत. एकवेळ रेमडीसिवर नसेल तर रुग्ण वाचू शकतो पण हे इंजेक्शन मिळाले नाही तर मृत्यू अटळ आहे. कृपया काळाबाजार होऊ नये ह्यासाठी त्वरित उपाय करावे.
Apr 26, 2021 22 tweets 4 min read
कोरोना आणि मुकॉर्मायकॉसिस:

बाबा अत्यावश्यक सेवेत नोकरीला असल्याने एक ना एक दिवस कोरोना घरी धडकेल अशी पूर्वतयारी आम्ही सर्वांनीच केलेली होती. त्यात बाबांना डायबिटीस. म्हणून तेवढी एक चिंता असायची. २ दिवस ताप आला आणि तिसऱ्या दिवशी टेस्ट केली. टेस्ट positive आली. लगेच CT स्कॅन १/n केला. सुदैवाने स्कोर ५ होता. त्यामुळे सगळे निवांत होतो. स्कोअर कमी असल्यामुळे घरीच इलाज करायचे ठरवले. त्याप्रमाणे एक डॉ. घरी येत होते. डायबिटीस आहे तर रिस्क नको घ्यायला म्हणून रेमडीसेवर घेऊयात असे डॉ. ने सुचवले. त्याप्रमाणे ६ इंजेक्शन चा कोर्स पूर्ण केला. ५-६ दिवस रोज अंडी, २/n
Apr 26, 2021 6 tweets 2 min read
कालपासून बऱ्याच जणांचे ट्विट पाहतोय, सरकार जरी लस मोफत देणार असेल तरी आम्ही विकत घेऊ शकतो म्हणून तेवढी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणार. ह्या कठीण परिस्थितीत सरकारला मदत करणे आपले कर्तव्य आहे.
हे वाचून वाटलं किती जागरूक नागरिक आहोत आपण. किती चिंता आहे आपल्याला आपल्या देशाची, राज्याची. पण राज्याची स्थिती एवढी बिकट असताना फक्त नागरिकांनी मदतीसाठी प्रयत्न करायचे असतात का? ज्यांच्या हातात राज्याचा कारभार आहे त्यांचे वर्तन कसे आहे? ते काटकसरीने खर्च करत आहेत का? असे किती आमदार, मंत्री आहेत जे स्वताची कार, घर नाही घेऊ शकत? किमान आर्थिक तंगीच्या
Apr 14, 2021 5 tweets 1 min read
ज्यांना डायबिटीस आहे किंवा ज्यांच्या घरात कोणाला डायबिटीस आहे अशा सर्वांना एक कळकळीची विनंती, कोरोनाला हलक्यात घेऊ नका. डायबिटीस असलेल्या व्यक्तीला कोरोना झाला तर त्वरित आणि योग्य उपचाराने तो कमी होतो. त्यानंतर पोस्ट कोविड काही आजार मात्र होण्याची दाट शक्यता आहे. Image त्यापैकी म्युकरमायकोसिस हे फंगल इन्फेक्शन अतिशय घातक आहे. कोरोना झालेल्या डायबेटिक व्यक्तीला जर चेहऱ्यावर सूज आली असेल तर एका दिवसाचा ही वेळ न घालवता त्वरित उपचार सुरू करा. हे इन्फेक्शन सुरुवातीला डोळ्यांच्या खाली, नाकात होतं आणि तिथून मग जलद गतीने प्रसार होतो. ह्यात दृष्टी जाणे
Apr 13, 2021 4 tweets 1 min read
" माझे सोन्यासारखे बाबा गेले रे..."
मित्राच्या तोंडून हे शब्द ऐकून आलेला राग कोणावर काढू? स्वतःला दोष देऊ की मी त्याची काहीच मदत करू शकलो नाही? का विनामास्क फिरणाऱ्या लोकांना ज्यांच्यामुळे कोरोना पसरतो आहे? का आजवरच्या सर्व सत्ताधाऱ्यांना ज्यांनी पुरेशा वैद्यकीय सुविधा उभारल्या नाहीत? का नागरिकांना ज्यांनी कधी दवाखाना, वैद्यकीय संशोधन केंद्रे ह्यासाठी कधी आंदोलने केलीच नाही? आपल्या जातीच्या महापुरुषांचा पुतळा उभारावा म्हणून प्रत्येक जातीने आंदोलने केली. पण एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे म्हणून कधी कोणी आंदोलन केले नाही. त्या फ्रान्स च्या
Apr 12, 2021 4 tweets 1 min read
सारखेच कंटेंट असलेले एकच औषध वेगवेगळ्या कंपन्या बनवतात. मग कंपनी बदलली की त्या औषधाची किंमत बदलते. काही कंपन्यांचे औषध 100रू ला असेल तर तेच औषध एखादी कंपनी 1000 रू ला विकते. मग डॉक्टरांनी आपल्या कंपनीचे औषध प्रिस्क्रीप्शन वर लिहून द्यावे यासाठी ह्या कंपन्या डॉक्टरांना विविध भेटवस्तू, फॉरेन ट्रीप, ई. प्रलोभने देत असतात. एवढेच काय मागे ह्या गिफ्टच्या बदल्यात शरीरसुखासाठी मुलींची मागणी करणाऱ्या एका डॉक्टरला बेड्या ठोकल्या पोलिसांनी! अशी एकदम व्यवस्थित सामन्यांची पिळवणूक सुरू असते.
काही देशांमध्ये डॉक्टरने प्रिस्क्रिप्शन वर औषधाच्या कंपनीचे नाव