मी पत्तागोबी बोलते. माझे मालक श्री अरुण अंबादास इंगोले धारकल्याण ता. जि. जालना. (महा) .मो. 97653 36806. यांनी मला शेतात लागवड करण्यासाठी चिखली येथून आणले. एक एकर जमिन लावन्यासाठी त्यांनी 260000 रुपयांचे रोपे लावली. एक एकर ठिबक साठी त्यांनी 18000 हजार रुपयांचे ठिबक केलं.(७/१)
आणि माझी प्रत चांगली राहावी म्हणून एक एकरला तीन ट्रॉल्या 18000 रुपयांच शेणखत टाकलं.तीन वेळेस डीएपी अमोनियम सल्फेट असं 7000 रुपयांचे रसायन खते टाकले. तीन वेळेस खुरपणी केली त्यासाठी त्यांनी जवळपास 6000 हजार रुपये खर्च केले. पाच वेळेस चांगल्या प्रतीचा औषधी माझ्यावर फवारले (७/२)
त्यासाठी त्यांना 5000 हजार रुपये लागले. आणि माझ्या मालकाबरोबर भारतीय शेतकऱ्यांची प्रगती व्हावी शेतकऱ्यांना दिवसा शेतात काम करता यावे म्हणून शासनाने रात्री साडेअकरा वाजता लाईन दिली तर ते मला दर तिसऱ्या दिवशी रात्री साडेअकरा वाजता पाणी द्यायचे. (७/३)
आणि अशा पद्धतीने जवळपास तीन महिन्यांमध्ये मी मार्केटला भारतीय ग्राहकांच्या खाण्यासाठी तयार झाले. मग मला त्यांनी काढण्यासाठी सुरुवात केली. माझी पहिली ट्रीप काढली तेव्हा एक पिकप भरून काढण्याचा खर्च त्यांना पन्नीसहसह 2000 रुपये लागला.(७/४)
आणि माझे मालक मला जालना अंबड परतूर मंठा, छत्रपती संभाजी नगर अशा ठिकाणी घेऊन गेले. एक ट्रिप नेण्यासाठी त्यांना 2500 रुपये खर्च होऊ लागला. ग्राहकांच्या सेवेसाठी मी एक पन्नी म्हणजे 20 किलोचे कॅरेट कधी 20 रुपये कधी 30 रुपये अशी विकू लागले. एक वेळेस तर त्यांनी मला औरंगाबादला नेलं. ७/५
छत्रपती संभाजीनगर प्रिय ग्राहकांसाठी मी फुकट मार्केटमध्ये 2 दिवस बसले. 2 दिवसात एक कैरट सुद्धा कुनी मला विकत घेतले नाही. शेवटी मी छत्रपती संभाजी नगर मार्केट मधे सडून गेले. त्या एका ट्रिपचा त्यांचा खर्च 5000 रुपये एवढा झाला. जालन्यातही मी फक्त गायी आणि शेळ्यांच्याच उपयोगी पडले.७/६
अशा पद्धतीने माझा एक एकरचा खर्च साधारण 80000 हजार रुपये झाला. आणि मला विकून माझ्या मालकाच्या पदरात केवळ 5000 हजार रुपये पडले. अशी माझी जन्म कहाणी मी सर्व भारता वासीयांना सांगू इच्छिते. धन्यवाद ७/७ @UdhavThackeray @AUThackeray @kingsmanT11 @Rumani221 @rajeshtope11