माय मराठी तुझिया पायी तनमनधन मी चाहियले, तुझिया नामी, तुझिया धामी अखंड रंगुनि राहिले.

कष्टामधली तुझीच गोडी चाखायाची मज आई, मला आवडे तुझा विसावा, तुझीच निर्भर अंगाई.

तुझे झरे अन् तुझी पाखरे, वास तुझा जनलोक तुझा, हवाहवासा मला वाटतो राग तुझा, संतोष तुझा.
माय मराठी | तुझिया अंकी लोळण घेते, बागडते, तसेच अलगत तब आभाळी भरारणे मज आवडते.

तुझे चालणे, तुझे बोलणे, दाखव मजला रीत तुझी, जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी.

तुझियासाठी गुंफित बसते मोहनमाला शब्दांची, अर्थ साजरा, गंध लाजरा, नवलपरी पण रंगांची.
माय मराठी! तुझियासाठी वात होउनी जळते मी, क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी.

- संजीवनी मराठे
मराठी भाषा गौरव दिनाच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा ♥️

#मराठीभाषागौरवदिन
#मी #मराठीभाषादिन

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with वीर शहानवाज शेख

वीर शहानवाज शेख Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Shahnawazpeaks

Feb 28
दि.२८ फेब्रुवारी १९२८ रोजी चंद्रशेखर वेंकटरमण ( C.V.Raman) या भारतीय शास्रज्ञाने प्रकाशाचे विवरण व त्याचा परिणाम याचा शोध लावला.या शोधाबद्दल त्यांना १९३० मध्ये आल्फेड नोबेल ( डायनामाईटचा बादशहा,स्विडन) पुरस्कार मिळाला.त्यांचा शोध ' रामण इफेक्ट' म्हणून प्रसिद्ध आहे. Image
त्यांच्या कार्याची आठवण व प्रेरणा म्हणून भारतात २८ फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन म्हणून पाळला जातो.भारतातील काही विज्ञान विश्वरत्ने यांनी, भारतास जगातील वैज्ञानिक देशांच्या प्रगतिपुस्तकाच्या पंक्तीत नेऊन ठेवले आहे.१) डॉ हरगोविंद खुराणा२) डॉ सुब्रमन्यम चंद्रशेखर३) डॉ भाभा४)
विक्रम साराभाई५) डॉ जगदिशचंद्र बोस६) डॉ ए.पी.जे अब्दूल कलाम७) डॉ जयंत नारळीकर वरील विश्वरत्नांना भारताचे ७ वैज्ञानिक आश्चर्य म्हटले तरी चालेल ! वरील वैज्ञानिकांनी मानसिक विकासाला मनोविज्ञान व वैचारीक विकासासाठी, विचारांना वैज्ञानिक दृष्टीकोन हवा
Read 8 tweets
Feb 27
आज जागतिक मराठी भाषा दिवस आहे. २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो. त्यानिमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी नाटककार व कादंबरीकार.
त्यांनी कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन केले.
ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मायबोली मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो.
शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.
Read 16 tweets
Feb 19
#शिव_शंभो_मीम_सिरीज
कविता क्रेडिट: गुरु ठाकूर
Read 13 tweets
Feb 16
सामाजिक भावना हा विकासशील मानवी जीवनाचा आत्मा आहे. ही भावना नेहमी तीन प्रकारांनी प्रकट होते- शब्दांनी, अधूंनी, आणि कृतींनी. काव्य हे या भावनेचे पहिले सुंदर स्वरूप. पण काव्यातील शब्द कितीही सुंदर असले तरी शेवटी ते वाऱ्यावरच विरून जातात. अश्रू हे या भावनेचे दुसरे रमणीय रूप
पण माणसाच्या क्षुब्ध हृदयसागरातून बाहेर येणारे हे मोती शेवटी मातीमोलच ठरतात! डोळ्यांतल्या पाण्याने मनुष्य स्वतःच्या हृदयातली आगसुद्धा शांत करू शकत नाही. मग जगातला वणवा तो काय विझविणार? सभोवतालचे दुःख पाहून व्याकुळ झालेले माणसाचे मन हलके करण्यापलीकडे शब्द
आणि अश्रू यांच्यात सामर्थ्य असत नाही.

या भावनेचे तिसरे स्वरूप स्वरूपच मानवी प्रगतीला उपकारक होऊ शकते. या स्वरूपात ती तोंडाने किंवा डोळ्यांनी बोलत नाही. ती नेहमी हातानेच बोलते. स्वतःचे रक्त शिंपून ती इतरांचे जीवन फुलविते.
Read 4 tweets
Feb 16
किराणा दुकानात काड्याची पेटी घ्यायला गेलो होतो. गोड्या तेलासाठी भलीमोठी रांग होती.

माणसे मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होती.

दुकानदार डोळयांत तेल घालून थेंबाथेंबाचा दाम दसपटीने वसूल करत होता. तेवढ्यांत त्या रांगेतल्या एका फाटक्या परकरपोलक्यांतल्या पोरीचा नंबर लागला.
तिने दुकानदाराकडे मातीची पणती ठेवली.

दुकानदार "तेलाचं भांडं कुठाय?" म्हणून खेकसला.

ती म्हणाली, "येवढं पणतीभर द्या. "

"अग, दिवाळीला अवकाश आहे! पणत्या कसल्या लावतेस?" पोरगी गांगरली.

पण दारिद्रय धिटाई शिकवते. लगेच सावरुन म्हणाली, "दिवाळी कसली? खायला त्याल द्या..."
"ह्या पणतीत?" दुकानदार म्हणाला. मुलीने हातातले दहा पैशाचे नाणे टेबलावर ठेवले. "यवड्या पैशात किती बसतं ते द्या"

"अग, दहा पैशाचं तेल द्यायला माप कुठलं आणू?" "पण आमच्याकडे धाच पैशे हाइत." तीने आणखी पाच पैशांची सोय केली. पोरीची पणती तरीही पुरती भरली नव्हती.
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(