पुण्याला एक दिवसाचं काम होतं म्हणून सकाळी पहाटे निघालो . इकडून जाताना कॅब सारख्या बऱ्याच गाड्या असतात आणि बस पेक्षा लवकर पोहचवत असतात म्हणून तसा प्रत्येक वेळेस पुण्याला जायचं म्हटलं की कॅब नी निघायचं . सकाळी १०-१०.३० वाजेपर्यंत पुण्यात टच करतात . आजही आलो पुण्यातील सगळी
कामे उरकली . आज जरा काम जास्त असल्याकारणाने थोडा उशीर झाला . प्रत्येक वेळेस ३ वाजता माघारी फिरणार तिथं ६ वाजले ..थोडा थोडा म्हणता म्हणता बऱ्याच वेळ कश्यात गेला समजलं नाही . स्वारगेट ल आलो बस बघितली तर होती एक शेवटची ६.३० ल डायरेक्ट मला खानापुरला सोडेल अशी म्हणून मग
तिचं बस पकडली म्हटल चला डायरेक्ट घरी तर जातोय . मस्त हेडफोन लाऊन गाणी लावली आणि झोपून गेलो . कात्रज मद्ये एक कोणीतरी बाजूला येऊन बसल्याची चाहूल लागली झोप महत्वाची म्हणून मी लक्षच नाही दिलं . बसलं असेल कोणीतरी जाऊदे म्हटलं . थोड्या वेळानी कानावर आवाज पडला ...
"हॅलो आई मी बसले आता बस मद्ये . साडेनऊ वाजेपर्यंत पोहचेल . तिथे पोहचली की कॉल करते ." लेडीज आवाज खिडकीत टेकवलेलं डोकं सरळ करून मी बाजूला कोण बसलय बघितलं तर एक तरुणी . पहिल्यांदा विश्वास बसेना नक्की आहे का ? कारण पोरगी कधीच बस मद्ये आमच्या बाजूला बसली नाही आतापर्यंत बसमधे.
ही पहिलीच वेळ त्यात ती एकदम सुंदर आणि बघतच बसावी अशी तर नाहीच नाही . तिकडून तिची आई काय बोलली काय माहीत . " हो ग आई मी आता लहान आहे का ? करते ना तिथं पोहचल्यावर मामाला फोन . आणि हो एवढी नको काळजी करुस नांदायला नाही चालिये मी . " असं बोलून तिने थोड्या वेळानी कॉल कट केला.
झोप तर गेली होती माझी . एकतर ती बाजूला त्यात सुंदर आणि तिला टच वगैरे होऊ नये म्हणून मी जागा . गाणी चालूच होती. थोडसं पुढं आल्यावर कंडक्टर ने पुढे जाऊन लाईट बंद केली . मी आपलं खिडकीतून बाहेर बघत बघत तिरकस कधी तरी तिच्याकडे बघत होतो. मधेच तीने माझ्या डाव्या खांद्याला हाताने स्पर्श
केला . इशारा होता तो कारण मी हेडफोन घातल्याने ती बोलली मला ऐकू आलं नव्हत. मी हेडफोन काढले आणि म्हटलं काय? तर ती " ती खिडकी बंद करता का प्लीज ? थंड वाजतेय मला " मी " हो करतो " म्हणून खिडकी बंद केली आणि परत हेडफोन कानात घालून डोळे मिटले. परत थोड्या वेळानी एकदा तिने
इशारा केला . परत मी हेडफोन काढले आणि हा बोला ना म्हटलं ... " हा बोगदा खूप मोठा हाय ना " मी म्हटलं हो . गाडी कात्रजच्या बोगद्यात होती . तिने लगेच मी हेडफोन घालतोय हे बघून दुसरा प्रश्न केला " तुमचं नाव काय ?" मी नाव सांगीतलं " मयूर " ओपीचारीक्ता म्हणून मी पण विचारलं " पायल" तिने
सांगितलं . लगेच पुढे काय करता वगैरे बरेच ओपचारिक प्रश्न विचारून झाल्यावर थोडस शांत झाली ती. मी सुटकेचा श्वास सोडला. असं अनोळखी मुलीशी इतकं कधीच नाही बोललो आणि सुंदर तर नाहीच नाही . मनात भारी वाटत होतं पण वाटसरूच ती .. दो पल का साथ म्हणण्यासारखं. पुढें येऊन गाडी हॉटेल वर j
जेवणासाठी थांबली . मला असं कुठेही हॉटेल ल थांबल की मी फक्त तसा चहा घेतो . सगळे घाईघाईत उतरत होते म्हटल आपण. निवांत उतरू. तिने तोवर विचारलं काय चहा घेणार ना ? मी म्हटलं चला घेऊया . लगेच माझं बोलण तोडत ती " माझ्याकडुन आज तुम्हाला चहा" मी म्हटल अहो कशाला मी सांगतो चहा .
" नाय नाय अगोदर मी विचारलं आहे मिच देणार चहा" ती मला थांबवत बोलली . थोडं नाय होय नाय होत शेवटी मी माझी तलवार म्यान केली. तशीही कोनत्या पुरुषाने स्त्री समोर आपली तलवार चालवली आहे ती मी चालवणार..म्हणा. चहा सोबत बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्या . आता अनोळखी ती ओळखीची झालेली. कराडला
इंजिनिअरिंग करत होती ती त्यात मेकॅनिकल. सगळचं अवडीच होतं माझ्यासाठी तिच्यासकट. पण प्रवासीच शेवटी. रात्रीच्या ८.३० वाजले असतील . गाडी परत निघाली ती बडबड करून थकली होती आतापर्यंत . इंजिनिअरिंग चे तिचे किस्से आणि माझा भूतकाळातील इंजिनिअरिंगचे किस्से याचं गप्पा आमच्या . आवडी निवडी
बऱ्यापैकी सगळं बोलून झालं. ती झोपी गेली. मी पण कानात हेडफोन टाकून गाणी ऐकत खिडकीला डोकं लाऊन झोपलो . थोड्या वेळानी गाडी थांबली अचानक म्हणून डोळे उघडले बाहेर बघतील तर कोणत स्टँड पण नाही आसपास कोणत घर नाही काय नाय. कायतरी बिघाड झाला आहे हे समजलं. लगेच माझ्या हे ही लक्षात आलं की
तिने डोकं माझ्या खांद्यावर आणि एक हात माझ्या हाताला विळखा घालून ती निवांत झोपली आहे. आता काय करावं माणसानं? काय झालयं हे बघायचं तर आहे खाली जाऊन पण ईकडे हिला कसं उठवायचे आणि तिची झोपमोड झाली तर ? कैचीत सापडलो. मी काही हालचाल न करता स्थब्ध राहिलो. थोड्या वेळानी तीच उठली अन् अचानक
"सॉरी सॉरी हा मला लक्षात नाही आलं " असं बोलून हात डोकं माझ्या पासून बाजूला घेऊन बोलली. मी असू द्या it's ok म्हणून गप्प झालो. तो स्पर्श तिचं माझ्या खांद्यावर डोकं टेकवन सगळ किती भारी वाटतं होतं हे आता शब्दात सांगणं ही अवघड झालंय. पण मस्त होती ती फिलिंग. गाडी पंक्चर झाली होती.
थोड्या वेळात पंक्चर निघाला आणि परत प्रवास सुरू . साताऱ्यातून बरीच पुढं आलेली गाडी कराड येणारच होतं पंधरा एक मिनिटात . परत निरोपाच बोलण सुरू झालं . " चला आलं एकदाशी कराड " ती बोलली . " अजुन बरच लांब आहे की " मी तिला थांबवत म्हटलं ." झालं की पंधरा मिनिटे ... रहीलित फक्त .."
मला तिला जाऊ नको म्हणून सांगायचं होतं पण तो अधिकार नव्हता. मन गुंतलं की अवघड होतं सावरणं. परत भयाण शांतता आली दोघात. कदाचित तिला ही काहीतरी बोलायचं होत आणि मलाही पण नेमकं काय? हेच समजत नव्हतं. आता अगदी चार दोन मिनिट राहिले होते स्टँड यायला. " चला मी येते भेटू परत .." म्हणून तिने
बॅग वगेरे काढून सगळं अवरून निघायची तेरी केली. " परत कशी भेट होईल आपली..." मी म्हटलं . " होईल ओ वरच्याच्या मनात असेल तर सगळं होतं..." असं कोड्यात बोलली ती . " तो घडवून देणारे आपली भेट ? " मी प्रश्नार्थक तिला विचारलं. " तो नाही पण आपण प्रयत्न केला ते नक्कीच भेट होईल " ती उत्तरीत
झाली. " आणि ते कसं शक्य आहे ?" मी बोलो . " कधी आलात कराडला तर या कॉलेज वर तिथे भेटून जाईल मी " ती बोलली आणि बस थांबली. लगबगीने ती उतरली. मी तिला बाय केलं तिनेही हाताने बाय करून निघून गेली. संपला सोबतच प्रवास..माझा चालूच होता फक्त शरीराचा मन तिथेच घुटमळत होतं सारखं सारखं.
विट्यातून गाडी पुढं आली अन् भावाला कॉल केला स्टँड वरती घ्यायला ये म्हणून . रात्रीच्या १ वाजल्या असतील. तशी गाडी १२ पर्यंत यायला हवी होती पण उशीर झालेलं घोटाळ्यामुळे. स्टँड वर उतरलो. तर अजून भाव आला नव्हता . मग बाकड्यावर जाऊन बसलो. तिथं चिट पाखरू नव्हतं. कॉल केला भावाला तर मधेच
त्याची गाडी पंक्चर झाली आहे थोडा वेळ लागेल म्हणून त्यानं सांगितलं . आता झाली बोंब. आलिया भोगासी ...असावे सादर... स्टँड वर कोणी नव्हतं. परत एक बस आली थांबली. त्यातून कोणीतरी उतरलं बघितलं तर कोणीतरी पोरगी . बस निघून गेली आणि ती पोरगी माझ्यकडेच येत होती . जरा जवळ आल्यावर स
ती ओळखीची वाटली . ओळखीची काय तिचं जी बस मद्ये भेटली होती.लेगच जाऊन मी विचारलं काय ओ तुम्ही कसे इकडे आलात. त्याच्यावर ती उतरली " तुम्हाला भेटायला ". "काय मस्करी करता गरीबाची " मी म्हटलं. " मस्करी नाही करत आहे मी खरच.. आलेय" ती बोलली ... "अहो पण इतक्या रात्रीच आणि काय गरज होती "
" माझं प्रेम आहे तुमच्यावर " ती बोलली . आता मला काय बोलावं ना काय माय समजेना. काय करायचं भाव आला आणि कोण ही विचारलं तर ? घरात काय सांगायच? हिला कुठे सोडू पण शकत नाही असं रात्रीच .ही कशाला आली असेल बया? माझं मिच स्वतःशी बोलू लागलो. काही एक सुचेना. " चल ना मला घेऊन घरी थंडी वाजते
रे...कुठे आहे आपलं घर ?" डायरेक्ट अरे तुरे ... लैच जवळीक साधत होती . मी म्हटलं " हे बघ असं नाही घरी जाता येणार तू कराड ल जा दुसरी बस आली की मी तुला परत येऊन भेटतो कराडमध्ये . " ती काय ऐकायला तयार नाही. चल मला घेऊन हा एकच सुर तिने लावला होतं . आता काय करायच सगळं अवघड होऊन बसलं होत
आता डोकं तापले होतं दोघांचं पण . मी तिला म्हटलं माझं आणि तुझं नातं काय? कश्यासाठी मी तुला घरी घेऊन जाऊ ? बऱ्याच वादानंतर ती रुसली आणि बाकड्यावर जाऊन बसली. काय करावं आता भाव येयील ..त्याला काय सांगायचं त्याला कायतरी समजवता येयील पण घरी काय सांगायच? हिला असं सोडू पण शकत नाही .
काही एक समजेना .भावाला कॉल केला रागातच त्याला म्हटलं कधी येतोय ..ती गाडी पेटव न्हून कुठतरी? हिथ जीव जायची येळ आली मेल्यावर ये ...! भाव काही न बोलता कॉल कट केला . तो पण विचार करत असेल याला काय झालं असं येड्यागत का बोलतय. हिच्याकडे आलो म्हटलं बया का मागे लागली आहेस जा ना.
ती आता विचित्र बोलू लागली होती. साथ जन्माच नातं हाय आपलं तू कसा घेऊन जात नाही बघतेच . तिचं अवतार पण बदलत होतं . " चल माझ्यासोबत राहू दे तुझा घरी "असं बोलून तिने हात धरला . विचित्र वागत होती ती .तिला विनवण्या करतच होतो मी . काही एक समजायला होत नव्हतं .मलाच संदिशी कानाखाली ठेऊन
दिली तिने . मी पण हात उगरणार तिच्यावर तर ...तिने रूपच बदललं होतं..भयानक इतकं की पार माझा गलफळाट झाला . मला पाणीही मागवेना. आता ती अनेक रूपं बदलत होती . विचित्र विचित्र आवाज आणि मार तर वेगळाच. एव्हाना मला सगळा प्रकार लक्षात आला होता ती कोणी नसुन हडळ होती ...आता सुटका नाही ..
परत मी मोबाईल काढून कॉल करायला लागलो... फटकन एक कानाखाली बसली..तिने मोबाईल घेतला आणि चिरडून टाकला .. पळायला लागलो तरी ती समोरच . भाव आला इतक्यात ..त्याने ही हा प्रकार बघितला आणि तो ही पुरता घाबरून गेला .. त्याने गाडी वर बसण्याचा इशारा केला ...तिने फटकन त्याला पण ठेऊन दिली
आता काय मेल्यात जमा . मी हिम्मत करून म्हटलं काय हवय बाई तुला ..ती " तू हवा आहेस ...तू चल माझ्याबरोबर" मी नाही म्हणून नकार दिला तसा तिने हात पकडुन ओढत न्यायला सुरुवात केली .. भावाने पण एक हात पकडला होता ...भावाला मी वाचव वाचव म्हणतच होतो ..ती चल म्हणून ओढतच होती
सोड सोड ..वाचव वाचव ... करत करत होतो मी ..जीव गेल्याची जाणीवच होत होती... सोड सोड ..मला सोड मला जाऊदे ...सोड ... सोड...आणि धडकण बीड वरून कोलांडी उडी घेतली परत... आजूबाजूला बघितलं कोण न्हाय की ती पण न्हाय... का असली स्वप्न पडत असतील भेंडी...! #स्वप्न #भयकथा
समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की त्या नात्याला आपण दूर करायचा प्रयत्न करतो. प्रत्येक नात्यात आपल्याला काहीतरी अपेक्षित असतेच पण जर ते अपेक्षित पूर्ण नाही झालं तर तर मग ते नातं संपलेलं असतं आपल्या साठी . यात चूक कोण ? समोरचा व्यक्ती की आपण की परिस्थिती? की वेळ ?
की अजून कोणी तिसरा ? काही एक समजत नाही .कधी कधी समोरचा व्यक्ती पाहिजे तितके प्रयत्न करूनही आपल्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकत म्हणून वाईट होतो आपल्यासाठी. अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की नातं तोडून टाकणारे आपण कधी हा विचार करतो का की त्याच्याही आपल्याकडून काहीतरी
अपेक्षा असतील . त्या अपेक्षा आपण पूर्ण केलाय का ? आपण स्वतःला न्यायाधीशाच्या भूमिकेत ठेऊन समोरच्याला गुन्हेगार म्हणून घोषित केलेलं असतं. कधी त्याची ही बाजू समजून घेतली तर नातं टिकेल. पण ते हवय कोणाला अपेक्षा पूर्ण न करू शकणारं नातं. कोणतही नातं तुटत असताना किंवा
मी, इस्ल्या(विशाल), ,आणि सोन्या विट्याहून सिनेमा बघून येत होतो . रात्रीचे साधारण ११.४५ वाजले असतील सिनेमा संपला आणि निघालो . तिघेच असल्याने एकच बाईक घेऊन गेलो होतो . इस्ल्याला लागल्या होत्या भुका " सोन्या गाडी थांबव आय*व्यां....पोटात कावळ वर्डायला लागल्यात " मधी बसलेला
इसल्या सोण्याला म्हणत होता. तोवर मी त्याला थांबवत " सोन्या गाडी थांबवू नको ह्याच्यात लै किडे हायती... घरातन ज्यून यी म्हटलं व्हतं तसच आलंय... ढाब्यावर खायची हौस हाय आयघालायला " . " शाप्या गाडी डुलत्या ऱ... हवा तर कमी न्हाय ना झाली ... " सोन्या मला थांबत म्हणाला ...
गाडी थांबली उतरलो आणि बघितल तर मागचं टायर पंक्चर...! " आता कशी आयघालायची ...झाली की पंचायत" ईसल्या डोक्याला हात लावून म्हंटला. " तामखडी पर्यंत ढकलत न्हावी लागल" सोन्या म्हंटला . " आलिया भोगासी असावे सादर .. ढकला आता काय" मी नाराज होत बोललो .. मस्त गप्पा मारत गाडी ढकलत चाललो होतो
बोधकथा : - नाव नंतर तुम्हीच वाचून ठरवा.
हरी नावाचा एक इसम गावात राहत होता. तशी त्याची परिस्थिती पहिल्यांदा खूप हलाखीची म्हंजे आज काम केलं तरच जेवण नाहीतर उपाशी. पूर्वजांकडून पदरी फक्त कष्ट करण्याची धमक मिळाली बाकी काहीच नाही . बाहेरचे सावकार लोकांनी सगळी जमीन वगैरे लुटली होती
हा खूप कष्टाळू होता हरी. त्याने कष्ट केले त्या सावकारांच्या तावडीतून जमीन पण घेतली माघारी. जमीन घेतली पण आता त्यास लागणारा बैल जोड, नांगर अवजारे बी बियाणे याचं काय ? याने हळू हळू सुरुवात केली . बैल वगेरे एक एक गोष्टी जमवल्या . याला बराच काळ लोटला . घर बांधलं. शेती वाडी उभा
केली. मुलं वगैरे सर्व काही व्यवस्थित होतं. अपार कष्ट केलं हयात कष्टात काढली. आता शरीर थकलं कारभार गेला मुलाच्या हाती. मुलाला सगळं आयत सापडलं होतं. त्याला काय माहीत हा सगळं डोलारा कसा उभा राहिला आहे ते . त्याला वाटायचं बापाची तर गम्मत आहे ऐशपेश सगळं. बाप आपल्याला
आमची 90 मधली पिढी म्हणजे कच्च्या रस्त्याला आणि हायवे ला जोडणारा डांबरी रस्ता . धड कच्चा नाही की हायवे पण . आमचं बालपण ,तरुणपण यात बरंच अंतर आणि गफलत ही आहे . म्हणजे ती कशी तर ब्लॅक अँड व्हाइट टी व्ही पासून सुरू झालेला प्रवास LED, LCD पर्यंत आलाय ...
/1
अजून सुरूच आहे तो कुठपर्यंत ते काय ठाव नाही. आमच्या या पिढीने जे काही सख्या डोळ्यांनी जग बदलताना बघितलं ते मला नाही वाटत असे कोणती पिढी बघू शकेल कदाचित नाहीच .
आमच्या आधीच्या पिढीने सतत एकसंध जीवन बघितलं .आताची पिढीही पण तसेच काहीसे जीवन बघत आहे. /2
आमची ही अशी पिढी आहे ज्या पिढीने मोबाईल नव्हता ,परत की बोर्ड मोबाइल ,त्यांनंतर अँड्रॉइड हा बद्दल अगदी जवळून बघितला .आणि अनुभवला सुद्धा .
पिढ्या बदलत गेल्या तसे शहर,गाव,घरांची रचना सगळंच काही बदलत गेलं. बदल ही काळजी गरजच असते त्यात काय चुकीचं म्हणा. /3
आजही मी माझी काळोखातील प्रतिमा तशीच राखून ठेवली आहे . जी प्रतिमा आहे आपल्या नात्याची ...माफकर.. होती ..!
तुझ्या माझ्या नात्यातील काळोखात ती मूर्ती जरी हरवली असली तरी काळोख आजही तसाच आहे . सतावतो मला नेहमी सांज वेळी एक आगळीच हुरहूर लागून राहते मनाला तुझ्या आठवणींची .. /1
जगाला वर्तमानातील मी माहीत आहे ,माझ्या अवतीभवती असलेला उजेड माहीत आहे , माझी सावली , माझा संघर्ष ,माझं यश अपयश माहीत आहे पण जगाला हा जो ' माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यातील काळोख माहीत नाही जो फक्त तुला माहीत होता.. आहे . आपलं नातं जगासमोर कधीच आलं नाही ../2
आलं नाही म्हणण्यापेक्षा आपण ते येऊ दिलं नाही .गुप्त होती ती नात्याची गोष्ट आपल्यात आता तर ती फक्त माझ्यासाठीच राहिली .
तू निघून गेलीस तुला एक उजेडाचा कवडसा दिसला तिकडे आणि जाऊन मिसळलीस ही जगाच्या उजेडात ...माझं काय ? कधी केलास विचार ? /3
घरात बसुन बसून कंटाळा आला म्हणून सायंकाळी सहज फेरफटका मारायला म्हणून गावच्या पश्चिमेला असणाऱ्या डोंगरात गेलो . तसा लवकरच निघालो होतो घरून आपलं कडूस पडायच्या आत घरी पोहचावं या बेताने. गावं सोडलं आणि आता पुढे पुढे जात असताना मधेच कुठेतरी पाखरांचा आवाज .
डोंगरातून घरी परतत असणारी जनावरे आणि त्यांच्या पाठी त्यांचे मालक . कोणी ओळखीचं भेटलं की तेवढंच दोन मिनिट थांबून पुढे जायचं . जाता जाता आमच्या गावच म्हादबा अण्णा भेटलं . त्यांच्या म्हशी घेऊन परत येत होते . मी बोलायच्या आधीच ते बोले " ये पोऱ्या कुठं वर त्वांड करून निघालास"
मी आपलं आदराने बोलो "कुठ न्हाय अण्णा आलू जरा डोंगरात जाऊन" . अण्णा पुढे होऊन " अर खुळा बिळा हाईस का? ह्या वक्ताला कुठ जातूयास डोंगरात " . मी चेष्टेने " मग कवा जायचं अण्णा" . अण्णा " लका तुम्ही शिकलेली गाबडी कंधी ऐकाचाल तवा खरं, अर् सुकाळीच्या दिवसभर काय झोपला हूतास का ?"