२०२२ पर्यंत शेतकर्यांच ऊत्पन्न दुप्पट करु त्यांनी सांगितलं आणि आम्हीही विश्वास ठेवला हो,पण होत असलेलं ऊत्पन्नही तुम्ही काढुन घेतलं हो,आज हा व्हिडिओ बघुन डोळ्यात पाणीच आलं,६५ वर्ष वय झालयं शेतीचा हिशोब बसत नाही हे वाक्य अगदी मनाला लागलं,आज शेतकर्यावर ईच्छामरण मागायची वेळ आलीय,
याला जबाबदार कोण? सरकार सांगतय निर्यात चालुय मग भाव का वाढत नाही? परवा असाच एक नाशिकमधला व्हिडिओ बघितला जीथं शेतकरी मेथी फुकट विकत होता,मोठ्या मनानं त्याने वाटलीही असेल फुकट पण घेणार्यांना लाजा वाटु नये? त्याच मनही तुम्हाला शिव्या देत असेल घ्या फुकट्यांनो विकत घेऊन खायची
तुमची लायकी राहिलेली नाही,एक आमच्याच तालुक्यातील असलेल्या ताईचा व्हिडीओ बघितला जी मोदी-शिंदेंना शिव्या देत होती,चार-चार पोरी आहेत लग्न कशी करायची होती,तीच्या प्रश्नाच ऊत्तर कोण,कसं देणार? धार्मिक तुष्टिकरण करुन तुम्ही मत मिळवालही हो पण देशातल्या सर्वात मोठ्या व्होट बँक असलेल्या
शेतकर्यांच काय? आणि मुळात राज्यकर्ते निवडताना आम्हाला आमच्या जातीचा,धर्माचा,पंथाचा लागतो,मग ते शेतकर्यांच्या भल्यासाठी का काम करतील? हि अशी परिस्थिती असल्यावर आम्ही पण किती दिवस शेती करणार? याच मातीत जन्माला आलोय ईथचं घाम गाळतोय आणि ईथच माती होणार आमची!😥 #शेतकरी#म#मराठी
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
म्हातारीचा चौदावा झाला आणि पोरानं घराला मोठा टाळा लावून म्हाताऱ्याला एस.टीत घालून कायमचा शहराकडे आणला. पण उभं आयुष्य रानामाळात गेल्यानं त्याच मन काही इथे रमत नाही. तो खुर्चीत बसून गरगर फिरणाऱ्या पंख्याकडं नुसता एकटक बघत राहतो. जगून झालेल्या आयुष्यावर विचार करत... सकाळी पाच वाजता
उठून अंथरुणात बसून राहतो. आतील नळाला पाण्याचा आवाज आला की बादलीभर थंड पाणी रापलेल्या देहावर मारून घेतो. तसा तो सहा पासूनच चहाची वाट पाहत बाहेरच्या हॉल मधे टांगलेल्या घड्याळाकडे बघत बसून असतो, आतल्या बेडरुमचा दरवाचा उघडण्याची वाट बघत...कित्येक वेळा तो हलणाऱ्या मानेने आत डोकावूनही
बघतो. मग एके काळी भल्या पहाटे बाहेरच्या चुलीवर म्हातारीने चहासाठी ठेवलेलं जर्मनचं पातेलं त्याच्या डोळ्यासमोर दिसू लागतं... दहा वाजता सुनेनं कपातून दिलेला चहा थरथरत्या हाताने घश्यात ओतून तो धोतर सावरत जिन्याच्या पायऱ्या उतरुन सोसायटीच्या गार्डन मध्ये थकलेल्या शरीलाला नेवून बसवतो.
पण यामध्ये 'सरस्वति देवी नाराज न होवो' हा पापभिरुपणा पण असायचा.
अभ्यासाचं टेन्शन आम्ही पेन्सिलीचं मागचं टोक चावून झेललं होतं
पुस्तकामध्ये झाडाची पानं आणि
मोरपिस ठेवून आम्ही हुशार होऊ शकतो असा आमचा दृढ विश्वास होता.
कापडाच्या पिशवीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मितीकौशल्य होतं
दरवर्षी जेव्हा नव्या इयेत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणे हा आमच्या जीवनातला एक वार्षिक उत्सव असायचा.
आई वडिलांना आमच्या शिक्षणाची फारशी फिकीर नव्हती आणि ना हि आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजा होते. वर्षानुवर्षं आमच्या आईवडिलांची पावलं कधी आमच्या शाळेकडे वळत नव्हती.
एका मित्राला सायकलच्या पुढच्या दांड्यावर व दुसऱ्याला मागच्या carrier वर बसवून आम्ही रस्तोरस्ती किती फिरलो हे आता
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त तीनच गोष्टी सांगितल्या जातात....!
1.अफजलखानाचा कोथळा
2.शाईस्तेखानाची बोटे
3.आग्राहून सुटका
पण मला भावलेले छत्रपती शिवाजी महाराज अनेक अंगाने समजून घ्यावे वाटतात....!
1.आपल्या आईला सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज "सामाजिक क्रांती"
करणारे होते...!
2.रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे "लोकपालक" राजे होते...!
3.सर्व प्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे "उत्तम प्रशासक" होते...!
4.विनाकारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाड लावून
जगवण्याची शिक्षा देणारे "पर्यावरण रक्षक" होते...!
5.समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती तो विरोध पत्करून आरमार उभे केले व आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मा पेक्षा देश मोठा हा संदेश देणारे "स्व-धर्मचिकित्सक" होते ...! 6. मुहूर्त न पाहता, अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्या
छत्रपती शिवरायांबद्दल अनेकांना माहिती नसलेल्या गोष्टी :
१)जगभरात शिवाजी महाराज जयंती
केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. अनेक विद्वान, तत्त्वज्ञ, इतिहासकार शिवाजी महाराजांवर अभ्यास करण्यासाठी भारतात येतात. १९ फेब्रुवारी
रोजी सुमारे ११४ पेक्षा जास्त विविध देशांमध्ये शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते.
२)शिवाजी महाराजांचे 'ते' सात घोडे
शिवाजी महाराजांकडे अनेक जातीवंत घोडे होते. शिवाजी महाराज घोड्यांचा वापर निर्णायक प्रसंगी करत असत. शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमांमध्ये घोड्यांचा वापर
नेमकेपणाने केला. शिवाजी महाराजांकडे मोती, विश्वास, तुरंगी, इंद्रायणी, गाजर, रणभीर, कृष्णा असे सात घोडे होते. कृष्णा या पांढऱ्या घोड्यावर शिवाजी महाराज राज्याभिषेकानंतर बसले होते. सुरतवर चढाई, आग्र्याहून सुटका अशा मोहिमा मासल्यादाखल देता येतील.
!! स्वराज्याची शिवकालीन जकात वसुली पद्धत व जकातीचे दर तसेच जकात जकात व अर्थव्यवस्था. !!
शिवकाळातील स्वराज्याच्या अर्थ व्यवस्थेचा अभ्यास करताना प्रामुख्याने जकात वसुली, कर वसुली, पेठेचा कारभार, गावचा कारभार यांचा अभ्यास करावा लागतो. स्वराज्यात जास्त करुन माल तयार होत नसे.
तो माल आयात होत असे बंदरावरांवरुन. त्या मुळे बंदरे ताब्यात असणे गरजेचे असायचे. जकात हि दोन प्रकारे वसुल केली जायची. एक बंदरावरील कर वेगळा तो कर हा प्रत्येक व्यापाऱ्यास द्यावा लागे. त्या नंतर माल वाहतूक करत असताना घाट उतरल्यावर जकात वसुल केली जायची. शिवकाळामध्ये कारवार, गोबे,
बेंगुर्ले, मालवण, राजापूर, जैतापूर, खारेपाटण, रत्नागिरी, चिपळूण, हर्णे, दाभोळ, महाड, दंडा-राजपुरी, नागाव, नागोठाणे, चेऊल, पेण, पनवेल, अष्टमी, कारंजा, मुंबई, कल्याण, भिवंडी, वसई, ठाणे इत्यादी लहान मोठी बंदरे प्रसिद्ध होती. यातील बहुतांशी बंदरे स्वराज्यात होती तर गोवे, मुंबई, करंजा
तलाठ्याला वाटतं फेरफार साठी शेतकर्याने 30-40 हजार रूपये द्यावे कारण पाच एकर जमीन हाय ना. काय मरतो का शेतकरी एवढ्यानं..
बँक मॅनेजर ला वाटते शेतकर्याने लाखाच्या कर्जाला किमान १०हजार रूपये दलाला कडे जमा करावे. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....
सोसायटी चेअरमनला वाटतं मीच शेतकऱ्यांला कर्ज
वाटप करतो तेव्हा मी लाखामागं १५-२० हजार काढुन घेतलं तर काय झालं. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....
दुधडेअरी चेअरमनला वाटतं दुधाचा पगार आपणच करतो मग लिटरमागं चार रुपये ढापलं तर काय झालं. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....
दुधसंघाला वाटतं शेतकऱ्यांपेक्षा आपली मेहनत जास्त कारण बाळाला आत जाऊन
टँकर धुवा लागतो ना... मग करा दुधाची फॅट कमी, काढा लिटरमागं ५ रुपये भाव कमी. मरतो का शेतकरी एवढ्यानं......
म्हणजे झाला दुधसंघ करोडोपती आणि लागला पठारावरच्या ईलेक्शन जिंकु.
व्याजानं पैसं देणारा सगळं सोनं-नाणं तर हडप करतोच आणि शेतीलाही गिर्हाईक शोधतो एवढ्यावरच त्याचं भागत नाही तर