स्वप्निल🇮🇳🚩 Profile picture
| शिवराय असे शक्तिदाता🚩 | फुले | शाहू | आंबेडकर💙 | | स्थापना-१६~०७~२०२२ | जय भगवान बाबा | #शेतकरी🌱 | एक एका साह्य करूं,अवघे धरू सुपंथ..!
Mar 25, 2023 4 tweets 2 min read
कोण आहे श्रीकृष्ण ?

पहिला अपशब्द ऐकल्यानंतर शिरच्छेद करण्याची शक्ती असताना सुद्धा नव्यान्नव अपशब्द ऐकण्याचा संयम आहे ! सुदर्शन चक्रासारखे शस्त्र असताना सुद्धा हातात मुरली आहे ! द्वारका नगरी सारखं वैभव असताना देखील सुदामा सारखा मित्र आहे ! शेषनागाच्या मृत्यू रुपी मुखावर उभे असताना देखील नृत्य होत आहे ! प्रचंड सामर्थ्य असताना देखील युद्धात सारथी बनून सारथ्य करत आहे ! तो श्रीकृष्ण आहे.

श्रीकृष्ण व्यक्ती नाही, विचार आहे. जन्मानंतर लगेच जन्मदात्यांना सोडावं लागलं ! पालनकर्त्यांनाही सोडावं लागलं ! मित्रमंडळींना सोडावं लागलं ! जिच्यावर प्रचंड प्रेम केलं
Mar 23, 2023 6 tweets 2 min read
पंजाबातील लोकांच्या जागृतीमुळे आपल्याला भगतसिंहांबद्दल त्रोटक तरी माहिती असते.
परंतू "राजगुरू"मराठी असूनही आपल्याला त्यांची माहिती चार वाक्यांपलीकडे सांगता येणार नाही.
ही काय दर्जाची उपेक्षा म्हणायची......?
या महायोद्ध्याला तर चित्रपटातही विनोदी पात्र बनून Image राहाणेच नशिबी आले.
मूळचा खेड (राजगुरुनगर) येथील असलेला हा तरुण स्वकर्तृत्वाने काशीस संस्कृतचा पंडित बनला होता.
ते इतके निष्णात होते की, संस्कृतमधून सहज संभाषण करीत असत.
कुस्तीत त्यांचा हात धरणारा कुणीच नव्हता.
नेमबाजीत ते शब्दवेधी होते, एवढेच नव्हे तर उताणे झोपून
Mar 7, 2023 8 tweets 3 min read
म्हातारीचा चौदावा झाला आणि पोरानं घराला मोठा टाळा लावून म्हाताऱ्याला एस.टीत घालून कायमचा शहराकडे आणला. पण उभं आयुष्य रानामाळात गेल्यानं त्याच मन काही इथे रमत नाही. तो खुर्चीत बसून गरगर फिरणाऱ्या पंख्याकडं नुसता एकटक बघत राहतो. जगून झालेल्या आयुष्यावर विचार करत... सकाळी पाच वाजता उठून अंथरुणात बसून राहतो. आतील नळाला पाण्याचा आवाज आला की बादलीभर थंड पाणी रापलेल्या देहावर मारून घेतो. तसा तो सहा पासूनच चहाची वाट पाहत बाहेरच्या हॉल मधे टांगलेल्या घड्याळाकडे बघत बसून असतो, आतल्या बेडरुमचा दरवाचा उघडण्याची वाट बघत...कित्येक वेळा तो हलणाऱ्या मानेने आत डोकावूनही
Mar 5, 2023 4 tweets 2 min read
२०२२ पर्यंत शेतकर्यांच ऊत्पन्न दुप्पट करु त्यांनी सांगितलं आणि आम्हीही विश्वास ठेवला हो,पण होत असलेलं ऊत्पन्नही तुम्ही काढुन घेतलं हो,आज हा व्हिडिओ बघुन डोळ्यात पाणीच आलं,६५ वर्ष वय झालयं शेतीचा हिशोब बसत नाही हे वाक्य अगदी मनाला लागलं,आज शेतकर्यावर ईच्छामरण मागायची वेळ आलीय, याला जबाबदार कोण? सरकार सांगतय निर्यात चालुय मग भाव का वाढत नाही? परवा असाच एक नाशिकमधला व्हिडिओ बघितला जीथं शेतकरी मेथी फुकट विकत होता,मोठ्या मनानं त्याने वाटलीही असेल फुकट पण घेणार्यांना लाजा वाटु नये? त्याच मनही तुम्हाला शिव्या देत असेल घ्या फुकट्यांनो विकत घेऊन खायची
Feb 21, 2023 8 tweets 3 min read
ते दिवस....!

पाचव्या इयत्तेपर्यंत पाटीवरची पेन्सिल जिभेने चाटत *कॅल्शियमची* कमतरता भरून काढायची आमची जन्मजात सवय होती.

पण यामध्ये 'सरस्वति देवी नाराज न होवो' हा पापभिरुपणा पण असायचा.
अभ्यासाचं टेन्शन आम्ही पेन्सिलीचं मागचं टोक चावून झेललं होतं

पुस्तकामध्ये झाडाची पानं आणि मोरपिस ठेवून आम्ही हुशार होऊ शकतो असा आमचा दृढ विश्वास होता.

कापडाच्या पिशवीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मितीकौशल्य होतं
दरवर्षी जेव्हा नव्या इयेत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणे हा आमच्या जीवनातला एक वार्षिक उत्सव असायचा.
Feb 9, 2023 6 tweets 3 min read
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त तीनच गोष्टी सांगितल्या जातात....!
1.अफजलखानाचा कोथळा
2.शाईस्तेखानाची बोटे
3.आग्राहून सुटका
पण मला भावलेले छत्रपती शिवाजी महाराज अनेक अंगाने समजून घ्यावे वाटतात....!
1.आपल्या आईला सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज "सामाजिक क्रांती" करणारे होते...!
2.रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे "लोकपालक" राजे होते...!
3.सर्व प्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे "उत्तम प्रशासक" होते...!
4.विनाकारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाड लावून
Feb 8, 2023 7 tweets 2 min read
छत्रपती शिवरायांबद्दल अनेकांना माहिती नसलेल्या गोष्टी :
१)जगभरात शिवाजी महाराज जयंती

केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. अनेक विद्वान, तत्त्वज्ञ, इतिहासकार शिवाजी महाराजांवर अभ्यास करण्यासाठी भारतात येतात. १९ फेब्रुवारी रोजी सुमारे ११४ पेक्षा जास्त विविध देशांमध्ये शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते.

२)शिवाजी महाराजांचे 'ते' सात घोडे

शिवाजी महाराजांकडे अनेक जातीवंत घोडे होते. शिवाजी महाराज घोड्यांचा वापर निर्णायक प्रसंगी करत असत. शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमांमध्ये घोड्यांचा वापर
Feb 7, 2023 11 tweets 3 min read
!! स्वराज्याची शिवकालीन जकात वसुली पद्धत व जकातीचे दर तसेच जकात जकात व अर्थव्यवस्था. !!

शिवकाळातील स्वराज्याच्या अर्थ व्यवस्थेचा अभ्यास करताना प्रामुख्याने जकात वसुली, कर वसुली, पेठेचा कारभार, गावचा कारभार यांचा अभ्यास करावा लागतो. स्वराज्यात जास्त करुन माल तयार होत नसे. Image तो माल आयात होत असे बंदरावरांवरुन. त्या मुळे बंदरे ताब्यात असणे गरजेचे असायचे. जकात हि दोन प्रकारे वसुल केली जायची. एक बंदरावरील कर वेगळा तो कर हा प्रत्येक व्यापाऱ्यास द्यावा लागे. त्या नंतर माल वाहतूक करत असताना घाट उतरल्यावर जकात वसुल केली जायची. शिवकाळामध्ये कारवार, गोबे,
Jan 21, 2023 9 tweets 3 min read
तलाठ्याला वाटतं फेरफार साठी शेतकर्याने 30-40 हजार रूपये द्यावे कारण पाच एकर जमीन हाय ना. काय मरतो का शेतकरी एवढ्यानं..
बँक मॅनेजर ला वाटते शेतकर्‍याने लाखाच्या कर्जाला किमान १०हजार रूपये दलाला कडे जमा करावे. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....
सोसायटी चेअरमनला वाटतं मीच शेतकऱ्यांला कर्ज वाटप करतो तेव्हा मी लाखामागं १५-२० हजार काढुन घेतलं तर काय झालं. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....
दुधडेअरी चेअरमनला वाटतं दुधाचा पगार आपणच करतो मग लिटरमागं चार रुपये ढापलं तर काय झालं. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....
दुधसंघाला वाटतं शेतकऱ्यांपेक्षा आपली मेहनत जास्त कारण बाळाला आत जाऊन
Dec 25, 2022 8 tweets 3 min read
तुमच्या अंत्यसंस्कारानंतर सहसा काय होते हे तुम्हाला माहीत आहे का?

काही तासांत रडण्याचा आवाज पूर्णपणे बंद होईल.

नातेवाईकांसाठी हॉटेलमधून जेवण मागवण्यात कुटुंब गुंतून जाईल.

नातवंडे धावत-खेळत राहतील.

झोपायला जाण्यापूर्वी काही पुरुष तुमच्याबद्दल काही अपमानजनक टिप्पणी करतील! एक नातेवाईक तुमच्या मुलीशी फोनवर बोलेल की तो आणीबाणीच्या कारणास्तव वैयक्तिकरित्या येऊ शकत नाही.

दुसऱ्या दिवशी रात्रीच्या जेवणात काही नातेवाईक कमी होतील, तर काहीजण भाजीत पुरेसे मीठ नसल्याची तक्रार करतील.

जमाव हळूहळू पांगू लागेल..

येत्या काही दिवसात
तुम्ही मेला आहात हे माहीत
Dec 24, 2022 5 tweets 2 min read
गावाकडे अजुनी साधेच एक घर आहे माझे
तिथेही आता रात्र झाली असेल
मात्र अद्यापही तिथला अंधार फितूर झाला नसेल

ओसरीवरच्या गप्पा जारी असतील
पारावरची लगबग मंदावली असेल

खेळत असतील फुफाट्यात पोरं गल्लीबोळातली
माळवदावरती बसुनी असतील आठवणींचे उदास पक्षी
देवळाच्या पायऱ्यांपाशी असतील काही जख्ख वृद्धा
तर काही वाहत असतील सरपणाची, माळव्याची ओझी

स्वयंपाकघरातल्या कालवणांचा गंध पसरला असेल वाऱ्यावर
निजली असेल गोठ्यातली गाय वासराला चाटून झाल्यावर
बारीक आवाजात सुरु असतील गप्पा बायकांच्या
विषय तोच असला तरी जिवंतपणा असेल बोलण्यात त्यांच्या

जीर्ण दगडी वाडे काही झुकले