वपुंचं पार्टनर पुस्तक....वपुंचं लिखाण जखमेवर फुंकर मारणारे शब्दांचं औषध.
व. पु. काळे लिखित पार्टनर पुस्तक म्हणजे अनुभवांची खाण. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक पार्टनर असतो हि गोष्ट त्या प्रत्येक पार्टनरची आहे. जो पार्टनर नेहेमी आपल्या सोबत असतो, आपल्याला घडवतो, शिकवतो,
जगायला लावतो, ज्या जगण्याला जो अर्थ देतो तो पार्टनर.
पुस्तकाचं नाव बघून आपल्या मनात जो पार्टनर चा अर्थ आलाय तो हा नाही, हा वेगळा आहे. इतरांपेक्षा वेगळा पण जास्त जवळचा. हा पार्टनर स्त्री- पुरुषमध्ये गुंतत नाही हा त्या पलीकडे पोहोचतो पुस्तकात एक कथा गुंपली.म्हणावी तर साधी सोपी.
ही कथा कथाकथनकारांच्या रूपानं आपल्या समोर येते.
नरक म्हणजे काय, तर आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणुस न जाणे म्हणजे नरक. अशी सुरुवात पहिल्या पानापासून ते वडिलांच्या एका पाहण्याने तू घर का सोडलं ते आता समजलं शेवटच्या पानापर्यंत आपल्याला गुंतवून ठेवते.
तशी तर ही एक साधी सोप्पी प्रेम आणि कौटूंबिक कहाणी आहे . यामध्ये वेगवेगळे पात्र आहेत श्री,किरण,अरविंद,श्री ची आई आणि पार्टनर आणि यामध्ये सर्वांत जास्त भाव खाऊन जातो तो श्री ला भेटलेला अनामिक असलेला हाच "पार्टनर"जो आपल्याला जगण्यातले पहलू सांगून व शिकवून जातो.
कथेतील W आणि M ही संकल्पना खूप आवडली. श्री जेव्हा त्याची पत्नी आणि आई यांच्यात सँडविच करत होते, तेव्हा जोडीदाराने त्याला जीवनातील या दोन अविभाज्य पात्रांमागील शास्त्र सुंदरपणे समजावून सांगितले.
एखाद्याच्या आयुष्यात खऱ्या मित्राची किंमत लेखकाने अप्रतिम पणे मांडली आहे.
खरा मित्र प्रेरक, निरुत्साही आणि जीवन वाचवणारा असू शकतो. पात्रांचे वर्णन आणि सादरीकरण सूक्ष्मपणे अचूक आहे.
शेवटी श्रीला त्याच्या आयुष्यात एका वेदनादायक प्रसंगाला सामोरे जावे लागले पण त्याचा जोडीदार त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. शेवटी वपुनीं जीवनाचा खरा चेहरा आणि तो किती
किती अप्रत्याशित असू शकतो याचे निर्दोष चित्रण केले आहे.
पुस्तकातील अनेक प्रसंग आपल्याला हसवतील काही प्रसंग आपल्याला रडवतील. यात अनेक असे प्रसंग आहेत जे आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात. यातील अनेक संवाद, वाक्ये आपल्या मनात दीर्घकाळ लक्षात राहतात.
पुस्तकातील सदैव स्मरणात राहणारी वाक्ये..
👉🏻डोळे आणि स्पर्श, शब्दांपेक्षा छान बोलतात.
👉🏻सौंदर्याची ओढ वाटणं ही जिवंतपणाची खून असते.
👉🏻पुरुषाचं लग्न झालं म्हणजे त्याला आई दुरावते आणि त्याला मूल झालं म्हणजे बायको दुरावते.
👉🏻माणूस गर्दीचा झाला म्हणजे हरवत नाही. एकटा राहिला की हरवतो.
👉🏻आमचा देव दगडाचा नाही, आम्ही दगडात देव पाहणारी माणसं आहोत.
👉🏻तुला मी हाक कशी मारू? पार्टनर ह्या नावानं. आपल्याला खरं तर नावच नसतं. बारशाला नाव ठवतात ते देहाचं.
👉🏻गणिताच्या उत्तरासारखी तुम्ही आयुष्याकडे अपेक्षा करता आणि जास्त दुःखी होता.आयुष्य काही गणिताचं कोड नाही लगेच सुटायला.
प्रफुल्ल सरांनी लिखित पुस्तक "गोष्ट पैशापाण्याची" वाचली अतिशय छान पुस्तक, सरांनी खूप साध्या सोप्या व सरळ भाषेत हे पुस्तक लिहिले आहे. सम्पूर्ण पुस्तक शिकण्यासारखं आहे.
श्रीमंतीच्या दिखाऊपणा पेक्षा साधेपणाने राहून वेळोवेळी केलेली योग्य आर्थिक गुंतवणूक कधीही चांगली.
आपल्या मुलांचं भविष्य घडवायचे असेल तर त्यांना योग्य संस्कार व शिक्षण हवेच वेळ निघून जाण्या अगोदरच त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक बचत आतापासूनच करायला हवी.. माणसाची किंमत त्याच्या कामाने असते ना की उंची, रंग रूपाने. म्हणून आपले कर्तव्य पहिलं नंतर सगळ्या गोष्टी.
पैसा आज आहे तर उद्या नाही पण चांगली संगत व ज्ञान नेहमी आपल्याला प्रगतीवर नेते क्षणिक सुखापेक्षा अनंत काळ टिकणारे ज्ञान कधीही श्रेष्ठ. जेव्हा आपल्या आपल्याकडे पैसा येतो तेव्हा तो जातो कुठं याचं भान नसलं की अधोगती निश्चित समजायची पैसा येण्यापूर्वीच त्याची योग्य योजना आखायला हवी.
१० रुपयांत पुस्तकं देऊन, उदरनिर्वाह चालवणाऱ्या 'वाचनवेड्याची' वाचा कहानी....
“वाचन हे आपल्या मेंदूला आवश्यक असणारं खाद्य आहे” असं विज्ञानात सांगितलं आहे. वाचनात इतकं सामर्थ्य आहे की, त्यामुळे तुमची अशांत वृत्ती ही क्षणात शांत होत असते.
राकेश जो की, कोणतंही पुस्तक फक्त १० रुपयांत भाड्याने देतो आणि लोक ते पुन्हा आणू देतील असा त्यांच्यावर विश्वास सुद्धा ठेवतो.
नाव, नंबर लिहून घेण्यासाठी कोणतंही रजिस्टर नाही, कोणतं कम्प्युटर नाही, सॉफ्टवेअर नाही.
राकेशने हा व्यवसाय सुरू
करण्याचं आणि कोरोनाच्या कठीण परिस्थितीत सुद्धा तू सुरू ठेवण्याचं एकमेव कारण म्हणजे त्याला स्वतःला वाचनाचं असलेलं प्रचंड वेड.
.
कोणत्याही नवीन व्यक्तीला पुस्तक देतांना तो एकच कळकळीची विनंती करतो की, “तुमचं पुस्तक वाचणं झाल्यावर कृपया करून ते पुस्तक वापस आणून द्या.”
वाचनाचे 5 मार्ग तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत आणि वाचनाची रोजची सवय कशी करावी.
वाचन केल्याने मेंदूतील संबंध मजबूत होतात, स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारते आणि तुम्हाला दीर्घायुष्यात मदतही होऊ शकते.
वाचन तणाव पातळी देखील कमी करू शकते आणि वय-संबंधित संज्ञानात्मक घट टाळू शकते.
अधिक वाचण्यासाठी, दररोज एखादे पुस्तक उचलण्यासाठी वेळ बाजूला ठेवा,मग ते तुमच्या प्रवासादरम्यान असो किंवा झोपण्यापूर्वी.
1. वाचनामुळे तुमच्या मेंदूतील संबंध मजबूत होतात : वाचनामुळे मेंदूच्या वेगवेगळ्या भागांमध्ये नवीन कनेक्शन सुलभ होते.2013 च्या एका लहानशा अभ्यासात असे आढळून आले
आहे की कादंबरी वाचल्याने मेंदूच्या त्या भागांमध्ये संवाद वाढला जो भाषा प्रक्रियेवर नियंत्रण ठेवतो. याने द्विपक्षीय सोमाटोसेन्सरी कॉर्टेक्स, मेंदूचा भाग जो संवेदी माहितीवर प्रक्रिया करतो त्यामध्ये दीर्घकालीन बदल देखील घडवले.
20 व्या शतकातील एक प्रमुख कवी, माडगूळकर यांनी चित्रपट आणि रेडिओ माध्यमांमध्ये मोठे योगदान दिले, ज्याचे उदाहरण म्हणजे लोकप्रिय संगीत कार्यक्रम गीत रामायण.
गजानन दिगंबर माडगूळकर, त्यांच्या उत्कृष्ट रचना गीतरामायणासाठी ‘आधुनिक काळातील वाल्मिकी’ म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांच्या वाचक
आणि प्रशंसकांमध्ये ‘गदिमा’ म्हणून ओळखले जात होते.त्यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेटेफळ या गावी १ ऑक्टोबर १९१९ रोजी झाला आणि तेथेच त्यांचे शिक्षण झाले. आटपाडी हे १६ व्या शतकात विजापूरच्या आदिल शाही
राज्याचा (१४८९ ते १६८६) भाग होते आणि काहीवेळा आटपाडी-महाल म्हणून ओळखले जात असे. आज हे शहर त्याच्याशी संबंधित असलेल्या तीन साहित्यिकांसाठी ओळखले जाते: माडगूळकर, त्यांचे धाकटे बंधू व्यंकटेश आणि आंबेडकरवादी लेखक शंकरराव खरात मोठे झाल्यावर, माडगूळकरांवर त्यांच्या आईच्या संगीतावरील
क्रिप्टोकरन्सीला आभासी चलन किंवा डिजिटल चलन देखील म्हटले जाते. कारण ही क्रिप्टोकरन्सी फक्त ऑनलाईन उपलब्ध आहे. म्हणजेच या क्रिप्टोकरन्सीचा आपण दुसऱ्या चालना प्रमाणे म्हणजेच भारताच्या रुपयाप्रमाणे, अमेरिकेच्या डॉलरप्रमाणे तसेच युरोपच्या युरो सारखे
व्यवहारासाठी शारीरिकदृष्ट्या वापर नाही करू शकत.
क्रिप्टोकरन्सी ही एक इलेक्ट्रॉनिक प्रणाली आहे जिचा वापर आपण इंटरनेटच्या माध्यमातून नेहमीच्या साधारण चलनाऐवजी वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी करू शकतो.
सोप्या शब्दात मांडायचे झाले तर क्रिप्टोकरन्सी ही एक डिजिटल मालमत्ता आहे.
ज्याच्यावर सेंट्रल बँक किंवा कोणत्याही इतर आर्थिक संस्थांचे कोणतेच नियंत्रण नसते.
क्रिप्टोकरन्सी कायदेशीर आहे की बेकायदेशीर हे आपण याचा वापर कोणत्या देशात करत आहोत त्यावर अवलंबून असते. म्हणजेच अनेक देशांत याला कायदेशीर परवानगी मिळालेली आहे.अनेक देशांत यावर बंदी घालण्यात आली आहे.
पांडव लेणी :
नाशिकच्या पांडव लेणीही प्रसिध्द आहेत. नाशिक नवीन बसस्थानकापासुन ५ व महामार्ग बसस्थानकापासुन ४ कि.मी. अंतरावर एका मोठ्या टेकडीवर या लेण्या आहेत. ही लेणी मात्र प्राचीन आहेत. सुमारे २५०० वर्षापूर्वींची. येथे जो पाली भाषेतील शिलालेख आहे त्यावरुन ही लेणी २०००
वर्षांपूर्वीचीच असल्याचे निश्चित समजले जाते. एकूण २४ लेणी आहेत. काही लेण्या व त्यातील मूर्त्या चांगल्या स्वरुपात तर काही खंडीत स्वरुपात शिल्लक आहेत. बुध्दस्तुप, भिक्षूंची निवासस्थाने, बुध्दबोधिसविता, जैन तीर्थकर ऋषभदेवजी, वीर मणिभद्रजी, माता अंबिकादेवी यांच्या मूर्त्या,
पाच पांडवसदृशमूर्त्या, भीमाची गदा,कौरव मूर्त्या, इंद्रसभा, देवादिकांच्या मूर्त्या या सर्व लेण्यात आहेत. मूर्त्यांची शिल्पकता वाखाणण्यासारखी आहे.
रामकुंड :
रामकुंड हे नाशिक येथे गोदावरी नदीपात्रात असून मध्यवर्ती बसस्थानकापासून दोन कि.मी. अंतरावर आहे.