नुकतेच ऑस्कर पुरस्कार जाहीर झालेत, दाक्षिणात्य चित्रपट RRR ह्यातील "नाटु नाटु" गाण्यांस ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला..
एक्केचाळीस दिवसांचे शबरीमला अयप्पा उपवास सुरु असल्यामुळे पारंपरिक काळ्या वेषभूषेत साऊथ इंडियन सुपरस्टार रामचरण तेजा कला क्षेत्रातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ऑस्कर
अवॉर्ड समारंभासाठी अनवाणी पोहचला..!
आपल्या वागणुकीतून संस्कृती तर पाळतातच, पण आपल्या लोकांप्रति सहानुभूतीपूर्वक वागवणूक देणारे फक्त हे दाक्षिणात्य कालावंतच..! म्हणूनच तेथे देवीदेवतांप्रमाणे केला जाणारा यांचा अभिषेक, पूजा आरती, आणि कधी कोणी कलावंत
काळाच्या पडद्याआड गेल्यास राष्ट्रीय दुखवट्या पेक्षा जास्त नुकसान मानून सुतक पाळणाऱ्या जनसमुदयाचे ह्यांना मिळणारे आपुलकीचे प्रेम ते उगाचच नव्हे..
कुठे हे भारतीय संस्कृती प्राणांतिक पद्धतीने जगणारे आणि जागवणारे हे दाक्षिणात्य कलावंत आणि कुठे ते आधुनिकतेच्या नावाखाली विचार,
कला ,अभिनय ,पटकथा , नृत्य ,संगीत या प्रत्येकातून फक्त आणि फक्त अश्लीलता आणि व्यभिचाराची गरळ ओकून समस्त तरुणाईला सांस्कृतिक दृष्ट्या देशोधडीला लावणारे 'बॉलीवूड'कर...!!
Ram Charan Jr NTR #RRRMovie#OscarAwards2023
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
लाखो जीव घेणार्या क्रूर *हिटलरने* शेवटी आत्महत्या केली !........
सुंदर विचार देणारे *साने गुरुजी* आत्मघात करुन घेतात.
मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे *स्वामी विज्ञानानंद* मंत्रालयावरुन उडी मारुन जीव देतात.
आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण केलेले व कित्येकांना आधार देणारे *भैय्युजी महाराज* आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात.
पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करुनही *सुशांत सिंग राजपुतनं* नैराश्यातून आत्महत्या केली.
-आणि आता सहा आठ महिन्यांपूर्वी नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या *शीतल (आमटे) करजगी* आपलं जीवन संपवतात.
म्हातारीचा चौदावा झाला आणि पोरानं घराला मोठा टाळा लावून म्हाताऱ्याला एस.टीत घालून कायमचा शहराकडे आणला. पण उभं आयुष्य रानामाळात गेल्यानं त्याच मन काही इथे रमत नाही. तो खुर्चीत बसून गरगर फिरणाऱ्या पंख्याकडं नुसता एकटक बघत राहतो. जगून झालेल्या आयुष्यावर विचार करत...
सकाळी पाच वाजता उठून अंथरुणात बसून राहतो. आतील नळाला पाण्याचा आवाज आला की बादलीभर थंड पाणी रापलेल्या देहावर मारून घेतो. तसा तो सहा पासूनच चहाची वाट पाहत बाहेरच्या हॉल मधे टांगलेल्या घड्याळाकडे बघत बसून असतो, आतल्या बेडरुमचा दरवाचा उघडण्याची वाट बघत...
कित्येक वेळा तो हलणाऱ्या मानेने आत डोकावूनही बघतो. मग एके काळी भल्या पहाटे बाहेरच्या चुलीवर म्हातारीने चहासाठी ठेवलेलं जर्मनचं पातेलं त्याच्या डोळ्यासमोर दिसू लागतं... दहा वाजता सुनेनं कपातून दिलेला चहा थरथरत्या हाताने घश्यात ओतून तो धोतर सावरत जिन्याच्या पायऱ्या उतरुन सोसायटीच्य
मागच्या रविवारी जो पहिला भाग पोस्ट केला होता त्याला तुम्ही जो उदंड प्रतिसाद दिलात त्या बद्दल धन्यवाद सगळ्यांचे.
त्या रात्री जे काय घडत होते ते शब्दात लिहिताना पुन्हा तीच भीती आणि तोच रोमांच मी अनुभवलं. अक्षरशः अंगावर पुन्हा काटा उभा राहिला.
त्या रात्री आम्ही कसे बसे आमच्या रूम वर येऊन पोहोचलो आणि बेड वर आडवेच झालो. अंगात अजिबात त्राण नव्हता कपडे बदलायचे किंवा हातपाय धुवायचे. लाईट पण नव्हती आणि बाहेर विजेचा आणि वाऱ्याची तांडव सुरूच होत.
मला तशी या पाऊस आणि वादळाची सवय माझ्या लहानपणापासून होती पण ही भुताटकी तर पहिल्यांदीच अनुभवत होतो. माझ्या बरोबरचे दोघ तर शहरातले होते.. त्यांना कशाचीच सवय नव्हती... कोणीही कोणाशीही बोलायच्या मनस्थि्तित नव्हते..
हा थ्रेड लिहण्यामागे उद्देश एवढाच आहे कि मला आलेले काही भुताटकी चे अनुभव वाचून तुमचं मनोरंजन व्हावं.
कोकणाची बदनामी करण्याचा माझा उद्धेश नाही.. तरी कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर् क्षमस्व 🙏
सप्टेंबर ची अखेर सुरु होती.. मान्सून परत चालला होता त्या मुळे कोकणात संध्याकाळी गडगडाट, विजेचा लकलकाट, भन्नाट वारा आणि आडवा तिडवा मुसळधार पाऊस हे आठवडभर रोजच चाललं होत.
वारा आणि विजेचा लकलकाट असेल तर mseb वाले line बंद करायचे आणि जो पर्यंत वातावरण शांत होत नाही तो पर्यंत विजेशिवाय राहावं लागात होत.
दुपारी 2 पासून मी आणि माझे 2 सहकारी फॅक्टरी ऑफिस मध्ये काम करत बसलो होतो.
Paranormal Experience!!
नमस्कार 
आज मी मला जो एक paranormal experience आला तो लिहितोय. खरं तर खूप लोकांनी मला वेड्यात काढलं आणि काही लोकांनी विश्वास पण ठेवला या माझ्या Experience वर. इकडेही खूप लोक वेड्यातच काढतील पण तरीही मी लिहिणार आहे.
Paranormal म्हणजे अशी एक घटना किंवा गोष्टी जी अलौकिक आहे..
The things which are beyond the scope of normal scientific understanding.
2014 चा उन्हाळा होता. एप्रिल महिना सुरु झाला होता आणि तिकडे फॅक्टरी वर आंबा कँनिंग चा सिझन सुरु होणार होता.
2014 मध्ये मी तसा कच्चा लिंबू होतो, सगळे व्यवहार बाबा बघायचे आणि मी फक्त पडेल ती काम करायचो.
एप्रिल च्या 3-4 तारखेला मला सकाळी देवगड वरून बाबांचा कॉल आला, म्हणाले उद्या सकाळ पर्यंत काही करून फॅक्टरी वर पोहोच, माणसं कमी पडत आहेत इकडे कामाला.