बंड्याच्या बाबांना भेटायला त्यांचे सहकारी नॉटीराव येडझवे आले.
नॉटीराव: काय झालं?
बाबा :बंड्या नापास झाला.
नॉटीराव:कोणी केलं?
बाबा :मास्तराने.
नॉटीराव:आय विल शो हिम हिज लायकी. असल्या च्यू लोकांना शाळेत स्थान नाही. ऑनरेकॉर्ड बोलतोय मी.
बाबा:नॉटीराव थोडं शांत रहा.
(1/4)
नॉटीराव:मी शाळेत जात नाही. मला कशाची भीती नाही. मैं नंगा आदमी हूँ. मैं नापास आदमी हूँ.
बाबा:तुम्ही मास्तरांना काय सांगणार?
नॉटीराव:मास्तरांना काय कळतंय? मी थेट शिपायाशी सेटिंग लावणार. हे आपल्याविरोधात रचलेले कारस्थान आहे. एका शाळकरी तरुणाला सिस्टीम घाबरली. हा आपला विजय आहे.
(2/4)
बाबा:बंड्या पास कसा होणार?
नॉटीराव:मुसाफिर बन के हमे चलते रहना हैं, मंझिल मिले ना मिले सफर का लूत्फ उठाना हैं.
बाबा:याचा अर्थ?
नॉटीराव:मला नाही माहित.बिनअर्थाच्या शायरी करणे माझा शौक आहे.
बाबा:आम्ही शैक्षणिक बोर्डाला अर्ज केलेला.
नॉटीराव:शैक्षणिक बोर्ड नाही चोरबोर्ड आहे.
(3/4)
मी पर्रीकर सरांना याची देही याची डोळा एकदाच पाहिले . जानेवारी २०१९ मध्ये अटल सेतूच्या तिसऱ्या लेनच्या उदघाटनाला . शरीर खंगले होते पण डोळ्यात अजूनही राष्ट्रसेवेची आस होती.
त्या त्यागमूर्तीची आठवण आली कि कंटाळा आला म्हणून वर्क फ्रॉम होम मागणाऱ्या स्वतःची भयंकर लाज वाटते.
(१/४)
IIT केलेला माणूस स्वतःला राष्ट्रसेवेत झोकून देतो व गोव्यासारख्या पर्यटनावर अवलंबून असलेल्या राज्याला एक्स्पोर्ट हब बनवतो . लोक गोव्यात पैसे कमवायला येऊ लागले यापेक्षा यशाची मोठी पावती कोणती ?
जितके चांगले मुख्यमंत्री होते तितकेच किंबहुना त्याहून उत्तम संरक्षणमंत्री होते.
(२/४)
संरक्षण उपकरणे भारतात बनवायच्या त्यांच्या हट्टाचा आज आपण लाभ घेत आहोत . इतर देशांवर अवलंबून न राहता भारतीय लघु, मध्यम व मोठ्या उद्योजकांना डिफेन्स इकोसिस्टिमचा भाग बनवत त्यांनी भारताला संरक्षणात आत्मनिर्भर केले . LOC वर सैन्याला फ्री हॅन्ड देण्याची प्रथा त्यांनीच सुरु केली.
(३/४)
वडापावची रेसिपी चोरली म्हणून नाथाजींचा कारखाना बंद करावा अशी मागणी कोमटरावाने केली . यावर चर्चा करायला पंच बसले .
पंच : कोमटराव तुमचे म्हणणे आहे कि नाथजींनी तुमची फॅमिली रेसिपी चोरून स्वतःचा वडापावचा कारखाना उघडला.
कोमटराव:हो आणि यात पंकजने ५० खोके इन्व्हेस्ट केले.
(१/५)
पंच:नाथाजी,तुमचं काय म्हणणं?
नाथाजी: मी हिंदुरावांसोबत ३० वर्ष होतो.त्यांचे हेडशेफ धर्मेंद्रजी माझे गुरु .त्यांनी हि रेसिपी शिकवली .हि कोमटरावांना सुद्धा माहिती नाही.
पंच: कोमटराव, तुम्हाला येते का हि रेसिपी?
कोमटराव: नाही.पण वडिलोपार्जित असल्याने त्यावर माझाच हक्क आहे.
(२/५)
पंच:एका रेसिपीवर कुटुंबाने हक्क सांगणे धोकादायक आहे. याने इतर लोकांचे उद्योग करायचे स्वातंत्र्य धोक्यात येते .
कोमटराव:माझेच कामगार पळवून नाथजींनी कारखाना सुरु केला. याबद्दल पण विचारा.
नाथाजी:कोमटरावांनी गायछाप व चपटीसोबत केलेला कॉम्बो पटला नाही म्हणून आम्ही वेगळे झालो.
(३/५)
बंड्याला पास करण्याकरिता बाबा आणि शिक्षणतज्ञ बोर्डाकडे गेले. बोर्डाने यावर चर्चा करायचा निर्णय घेतला. चेयरमन सर्व बाजू ऐकू लागले.
बाबा:माझ्या बंड्याला नापास करणाऱ्या या मास्तराना तंबी द्या आणि बंड्याला पास करा.
तज्ञ:हो.अशी तरतूद आहे.
चेयरमन:मास्तर तुम्हाला काय म्हणायचंय?
(1/6)
मास्तर:साहेब,बंड्या घरातच बसून राहायचा. शाळेत चुकून कधीतरी यायचा .एका ही प्रश्नाचे उत्तर धड देत नसे.बोर्डाने दिलेल्या सिलॅब्सनुसार परीक्षा घेतली गेली. बंड्या गैरहजर राहिल्यामुळे त्याला नापास जाहीर करण्यात आले.
चेयरमन:हे खरे आहे का?
तज्ञ: शाळेत गैरहजर राहण्याची तरतूद आहे.
(2/4)
चेयरमन:पण परीक्षेला गैरहजर राहण्याची नाहीये.
बाबा:मास्तराने अवघड प्रश्न विचारून बंड्याचा मानसिक छळ केला ज्यामुळे परीक्षेला येण्यापासून परावृत्त झाला.
चेयरमन:अवघड प्रश्न विचारणे योग्य नाही.इतर मुलांना परीक्षेला बोलावताना मास्तराने बंड्याला सुद्धा प्रोत्साहन द्यायला हवे होते.
(3/6)
बंड्या वारंवार परीक्षेत नापास होत असे. वर्गातील बाकीची मुले पुढे जात असताना बंड्या मात्र एका इयत्तेत अडकून होता.
त्याचे पालक शिक्षणतज्ञाना भेटायला गेले. त्यांना घेऊन ते मास्तरांना जाब विचारायला पोचले.
शिक्षणतज्ञांची परीक्षा घेऊन बंड्याला पास करायचा त्यांनी प्रस्ताव दिला.
(1/3)
मास्तर:मुंबईचे नाव बॉंबे कसे पडले?
तज्ञ : जेव्हा साहेबांचे सरकार येत असे तेव्हा मुंबईत बॉम्ब फुटत असत. त्यामुळे बॉंबे असे नाव पडले.
मास्तर: वर्गातील 56 पैकी 40 मुलं दुसऱ्या वर्गात गेली तर उरली किती?
तज्ञ: 2/3 मुले निघून गेल्याने पहिल्या वर्गाची मान्यता रद्द होते.
(2/3)
मास्तर: तुमच्याकडे 230 रुपये जमा झाले आणि त्यातले 181 रुपये खर्च झाले तर तुम्हाला काय मिळालं?
तज्ञ : गाजर हलवा.
मास्तर: पाण्यात न विरघळणारे धातू हे नायट्रिक ऍसिडमध्ये का विरघळतात?
तज्ञ: नायट्रिक ऍसिडमध्ये खोके मिळतात जे पाण्यात नसतात.त्यामुळे धातू पाण्याशी गद्दारी करतात.
(3/4)