पुरोगामी विचारांचा सामान्य मराठी घरातील एक सामाजिक कार्यकर्ता.
Feb 7 • 4 tweets • 1 min read
दमलेल्या काकाची कहाणी :
कोमेजून गेलेला एक माझा पक्ष,
पुतण्याकडे मी ठेवले नाही लक्ष.
मुलीच्या हातात मी दिले सर्वकाही,
संपले सगळे आता उरले नाही काही.
जाग येते आजकाल मला रात्रीत,
स्वप्नात माझ्या रोज येतो अजित.
सांगायची आहे रे लबाड पुतण्या तुला,
दमलेल्या काकाची ही कहाणी तुला.
(1/4)
आटपाट नगरात नेता एक राही,
काड्या करण्यात सगळा दिन जाई.
जातीवाद पसरवत राही दाहीदिशा,
मुखात वसे त्याच्या सदा आंफुशा.
जमलेच नाही चालणे सरळ,
दिवसभर तो ओकतो गरळ.
पट्ठे पकडून तो खोट्या बातम्या पेरी,
कोलंटीउड्या पाहून आम्हा येई घेरी,
राजकारणाचा याने केला खूळखुळा,
दमलेल्या काकाची.
(2/4)
Dec 30, 2023 • 6 tweets • 3 min read
महाराष्ट्रातील उद्योजक गुजरातला का जातो?
1. मुबलक पाणी उपलब्धता : गुजरातमधील कानाकोपऱ्यात पाणी पोचले आहे. कुठेही उद्योग टाकायचा आहे तर उद्योगाना पाण्यासाठी प्राधान्य मिळते. सिंचन प्रकल्पातील सर्व पंप चालू असल्याने कालव्यात बारमाही पाणी असते.
महाराष्ट्राची परिस्थिती काय?
(1/6) 2. कामगार कायदे आणि स्थानीक नेतृत्व : राजकीय पक्षांच्या युनियन आणि हफ्तेखोरी गुजरातमध्ये जवळपास नाहीच. एखादा प्रकल्प पूर्ण करणे ही स्थानिक नेत्यांची जबाबदारी असते आणि त्यात कसूर केली जात नाही. उद्योजकांना त्रास देणे जणू पापच समजले जाते.
महाराष्ट्रात परिस्थिती काय?
(2/6)
Dec 26, 2023 • 6 tweets • 3 min read
महाराष्ट्राची भाषा संस्कृती :
महाराष्ट्र हे मराठीबहुल राज्य असून 69% लोक मराठी भाषिक आहेत. सातारा,भंडारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील 90% जनता ही मराठी भाषिक असून नंदुरबार व धुळ्यात सर्वात कमी मराठी आहेत. मुंबईत केवळ 35% मराठी भाषिक आहेत. 8 करोड मराठी भाषिक आहेत.
(1/7)
महाराष्ट्रात दुसरी प्रमुख भाषा हिंदी असून 10% जनता हिंदी बोलते. 25% मुंबईकर आणि 20% पुणेकर हे हिंदी भाषिक आहेत. नागपूरमध्ये हिंदी भाषिकांचा मोठा प्रभाव आहे. मराठवाड्यात ही 8-10% जनता ही हिंदी भाषिक आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव कमी आहे. राज्यात 1 करोड हिंदी भाषिक आहेत.
(2/7)
Dec 23, 2023 • 5 tweets • 1 min read
तीन पैश्याचा तमाशा :
पद्मश्री राष्ट्रपतींनी दिले होते, मग ते मोदींना का परत करत आहेत?
मोदी सरकारकडून त्यांना अडीच कोटी रुपये मिळाले, ते परत का केले नाहीत?
त्याना करोडो रुपये रोख,जमीन, घर,नोकरीची देयके मिळाली आणि त्याच्या प्रशिक्षणावर इतका खर्च झाला, ते परत का नाही केले?
(1/5)
उपराष्ट्रपतींना अपमानित केल्यामुळे काँग्रेसने जाट समाजाचा पाठिंबा घालवला. त्यातुन मार्ग काढायला ही गँग काही महिन्यांपूर्वी संपलेल्या नाटकासह परत आली आहे.
हे लोक निष्पक्ष आणि चुरशीच्या निवडणुका हरले. ब्रिज भूषण हे WFI चे अध्यक्ष नाहीत, तरीही यांची नाटकं चालू का आहेत?
(2/5)
Dec 16, 2023 • 6 tweets • 2 min read
विरक्तस्य तृणं गेहं ,निःस्पृहस्य तृणं जगत :
१९८० च्या दशकात जन्माला आलेल्या बरेच जणांना हा चेहरा ओळखीचा असेल. आफ्रिकेची ओळख करून देणाऱ्या 'Gods must be crazy' चित्रपटातील हे पात्र . हि व्यक्ती बुशमन जमातीची होती . त्याचे नाव काओ टेके (आफ्रिकन उच्चार देवनागरीत शक्य नाही).
(१/६)
चित्रपटाचा दिग्दर्शक आफ्रिकेत फिरत असताना त्याची ओळख काओशी झाली . थोडे बहूत इंग्लिश बोलणाऱ्या काओला चित्रपटात काम मिळाले . त्याला ३०० डॉलर मोबदला आणि १२ शेळ्या देण्यात आल्या . या चित्रपटाने जगभरात २०० मिलियन (२० करोड) डॉलरचे कलेक्शन केले. काओ ला यातून काहीही मिळाले नाही.
(२/६)
Sep 15, 2023 • 7 tweets • 2 min read
जागतिक लोकशाहीला धोका - नरेंद्र मोदी :
एक काळ होता जेव्हा भारतात प्रगल्भ लोकशाही होती. आपल्या कर्तृत्वाने पंतप्रधान बनलेले नेहरू, विरोधकांना सन्मान देणाऱ्या इंदिराजी, तळागळातुन वर आलेले राजीव गांधी,सर्वांगीण विचार करून निर्णय घेणारे मनमोहन सिंग या सारखे नेते आता उरले नाही.
(1/7)
पण मोदींच्या काळात हे लयाला गेले. त्यांनी एककल्ली निर्णय घेत देशाच्या विकासाची घडी बिघडवत जागतिक पातळीवर भारताची मान शरमेने झुकायला लावली आहे. देशातील जनता त्रस्त झाली असून मोदींना पर्याय शोधत आहे पण कित्येक लोकांना अजूनही मोदींविषयी सहानुभूती वाटते. त्यांच्यासाठी हा थ्रेड.
(2/7)
Sep 7, 2023 • 7 tweets • 2 min read
मोदी आणि भारतात वाढलेली बेरोजगारी :
मोदींच्या काही चुकीच्या निर्णयामुळे भारतात प्रचंड बेरोजगारी वाढली आहे यात शंकाच नाही. गेल्या 9 वर्षात देशातील कित्येक होतकरू लोकांना मोदींच्या धोरणामुळे काम मिळणे बंद झाले आहे. याचे विश्लेषण खालीलप्रमाणे.
मोदी भक्तांनी वाचू नये.
(1/7) 1. भारतात उघड्यावर शौच करणे सामान्य होते. सफाई कर्मचाऱ्यांना काम मिळत असे. मोदींनी घराघरात शौचालये बांधल्यामुळे या लोकांचा रोजगार गेला आहे.
2. हायवे दुरुस्ती आणि खड्डे भरण्याच्या कामातून दर वर्षी तरुणांना उत्पन्न मिळत असे. गती शक्ती योजनेमुळे या तरुणांचा रोजगार गेला आहे.
(2/7)
Aug 20, 2023 • 6 tweets • 2 min read
मोदीद्वेषाची कावीळ :
भारतात डाव्या विचारसरणीच्या लोकांचे सध्याचे विचार वाचले तर हसायलाच येते. मोदींचा विरोध हा एककलमी कार्यक्रम राबवत आहेत. जगात मोदींविषयी सन्मान वाढला कि यांचे पित्त खवळते. मोदींनी एखादी गोष्ट केली तर त्यावर विरोधकांची प्रतिक्रिया predictable झाली आहे.
(1/6)
मोदी दक्षिण भारत दौऱ्यावर गेले कि विरोधक उत्तर भारतातील शेतकऱ्यांचे व्हिडीओ फिरवतात.
मोदी उत्तर प्रदेशला गेले तर तामिळनाडूकडे दुर्लक्ष होत असल्याचे रडगाणे सुरु होते.
मोदींनी गरिबांसाठी सबसिडी किंवा अंत्योदय योजना काढली तर अर्थव्यवस्थेवर पडणाऱ्या बोजावर पॅनल डिस्कशन होते.
(2/6)
Aug 19, 2023 • 7 tweets • 2 min read
अनिश आणि सुमन दोघे ही प्रचंड हुशार. MBA होताच आपल्या मित्राच्या स्टार्टअपमध्ये लागलेला अनिश 3 वर्षातच पार्टनर व CEO बनला. NIMHANS मधुन MD झालेली सुमन झपाट्याने प्रगती करत Neurology ची HOD झाली. दोघे mutuals तर्फे भेटले आणि 27व्या वर्षी लग्नाच्या बेडीत अडकले.
(1/7)
दोघांनी फ्लॅट बुक केला आणि संसाराला सुरुवात झाली. दोघांनी करियरवर फोकस करायचे ठरवले. अनिश देशभर आपला उद्योग वाढवत होता आणि सुमन इंटरनॅशनल कॉन्फरन्स ला बोलत होती.अनिशच्या podcast ला लाखो views होते आणि सुमनच्या 'Brain Doctor' पेजचे लेख व्हाट्सअप वर फिरत होते. पण एक खंत होती.
(2/7)
Aug 18, 2023 • 9 tweets • 2 min read
अमेठीचा पेचप्रसंग:
अमेठी हा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 1999 ते 2009 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंतचा अमेठीचा इतिहास पाहिला तर गांधी कुटुंबीयांनी निवडणुकांवर कसे वर्चस्व गाजवले हे लक्षात येईल. विरुद्ध उमेदवारांची अनामत रक्कम ही जपणे अवघड होते.
(1/9)
लोकसभा निवडणूक १९९९
INC - सोनिया गांधी ४१८९६० (६७.१२%)
भाजपा - संजय सिंह 118948 (19.06%)
बसपा - पारस नाथ मौर्य ३३६५८ (९.४३%)
लोकसभा निवडणूक 2004
INC - राहुल गांधी 390179 (66.12%)
बसपा - चंद्र प्रकाश मिश्रा ९९३२६ (१६.८५%)
भाजपा - राम विलास वेदांती ५५४३८ (९.४०%)
(2/9)
Jul 5, 2023 • 7 tweets • 2 min read
अजितदादांची दूरदृष्टी :
अजितदादांनी बरेच मुद्दे मांडले जे सर्वांनी ऐकलेच असतील . त्यातले मला आवडलेले आणि पटलेले काही मुद्दे मी मांडत आहे . दादा कर्तबगार आहेतच पण त्यांना दूरदृष्टी सुद्धा आहे हे सुद्धा भाषणातून स्पष्ट झाले . ज्यांनी भाषण ऐकले नसेल त्यांच्यासाठी हा सारांश.
(१/७)
शरद पवार हे महाराष्ट्रातले सर्वात मोठे नेते आहेत . पण त्यांचा पक्ष कधीच राज्यातला सर्वात मोठा पक्ष बनू शकला नाही . २००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली होती . पण साहेबांनी केवळ २-३ अतिरिक्त खाती घेऊन मुख्यमंत्रीपद सोडले . हि खंत मला कायम राहील .
(२/७)
Jun 1, 2023 • 6 tweets • 2 min read
महागाई व उत्पन्न :
धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध्ये मोहन शेठ यांच्याकडून मिळालेले बहुमूल्य ज्ञान.
मोहन शेठ हुशार उद्योजक . ५ वर्षात ३री सूतगिरणी चालू करणे हे साधे काम नाही . मितभाषी आणि राजकारणापासून दूर राहणारे मोहन शेठ वेळ आली कि शालजोडीतून हाणायला मागे पुढे पाहत नाहीत .
(१/६)
काम आवरल्यावर हॉटेलमधील खोलीत मी , मोहन शेठ आणि त्यांचे मॅनेजर शिर्के यांचा स्कॉचचा कार्यक्रम सुरु झाला . स्कॉचसोबत खायला काय मागवावे म्हणून शिर्केंनी मेनू कार्ड उचलले व त्यातल्या किमती पाहून म्हणाले , " आजकाल महागाई फार वाढली आहे." . हे ऐकून मोहन शेठ हसू लागले .
(२/६)
May 31, 2023 • 6 tweets • 1 min read
राहुल गांधींची तडफड आणि वर्चस्ववाद :
गेले एक वर्ष आपण सर्वांनी राहुल गांधींना सैरभैर वक्तव्य करताना ऐकलं असेल. काहीजणांना ती पटली ही असतील पण मला एका भारतीयाने परदेशी जाऊन भारतावर टीका करणे खटकले.
पण राहुल गांधीं अशी वक्तव्य का करत आहेत यावर विचार व्हायलाच हवा.
(1/6)
याचे मूळ वर्चस्ववादात आहे. जगात आपण सर्वात महत्वाची व्यक्ती आहोत व दुनिया आपल्याभोवती केंद्रित हवी यातून 'मला पहा आणि फुले वहा' असा attitude निर्माण होतो. इतरांना मोठं होताना पाहून वर्चस्ववाद्यांना जळफळाट होतो व ईर्षा निर्माण होते ज्याचे रूपांतर पाय खेचण्यात होते.
(2/6)
May 31, 2023 • 7 tweets • 2 min read
काल हिमंता बिस्वा सर्मा यांचा "आप कि अदालत" मधला इंटरव्यू ऐकला आणि त्यात त्यांनी मांडलेल्या काही मुद्द्यानी मला खरंच विचार करायला लावला . आपण इंटरव्यू ऐकला नसेल तर नक्की ऐका . ज्यांना मुद्दे संक्षिप्तपणे वाचायचे असतील त्यांनी खालचा थ्रेड वाचा .
(१/७)
१. मी काँग्रेस सोडली कारण त्यातले दरबारी राजकारण मला सलत होते . गांधी परिवारकेंद्रित पक्ष आपली मूल्य विसरून केवळ एका घराण्याचे हित जपण्यात मश्गुल आहेत . जर घराणेशाहीतून जगन रेड्डी व नवीन पटनायक मिळणार असतील तर त्याचे स्वागत आहे . पण राहुल गांधी मिळाला तर तो प्रॉब्लेम आहे .
(२/७)
Apr 27, 2023 • 6 tweets • 1 min read
कोकणस्थ विजीगि्षू उद्योजक :
रत्नागिरीतील मिरजोळे MIDC त भारतातील सर्वात मोठा Frozen Seafood उद्योग आहे. एकेकाळी वर्षाला 10000 मेट्रिक टन उत्पादन करत असणारा या उद्योगाला किंमत हा एकमेव अडसर होता. तो दूर करत हे उद्योजक वर्षाला 50000 टनाला कसे पोचले याची ही कथा.
(1/6)
रत्नागिरीतील प्लांट अद्यावत होता आणि मालाचा दर्जा ही सर्वोत्तम. पण युनिलिव्हर सोबत मार्केटमध्ये किमतीवर स्पर्धा करणे अवघड जात होते. याचे कारण युनिलिव्हरच्या वेरावळ येथील प्लांटमधील low input cost. रत्नागिरीत काहीही केले तरी आपण वेरावळच्या रेटला नाही पोचणार हे माहित होते.
(2/6)
Apr 26, 2023 • 5 tweets • 1 min read
IT पार्क आणि उद्योग :
कोकणात IT पार्क का येत नाही? उद्योगाची किंचित ही माहिती असणारा व्यक्ती इतका निर्बुद्ध प्रश्न विचारणार नाही. पण सगळ्यांना ते ज्ञान असेल असे नाही. त्यांच्यासाठी हा थ्रेड.
IT कंपनी इतर कंपन्यांना सेवा आणि सुविधा देतात. इतर उद्योग त्यांचे ग्राहक असतात.
(1/5)
सरकारी ऑफिस असो, बँक असो किंवा मोठे उद्योग. हे सर्व IT क्षेत्राचे ग्राहक आहेत.
आपण दुकान उघडताना अशाच जागी उघडतो जिथे आपले ग्राहक असतील. जिथे ग्राहक नाही तिथे कोणी दुकान उघडत नाही.
मुंबईत बँकिंग व फायनान्स संघटना आहेत, नवी मुंबईत सरकारी ऑफिस आहेत,पुण्यात वाहनउद्योग आहे.
(2/5)
Apr 22, 2023 • 6 tweets • 1 min read
समाजद्वेष आणि सोशल मीडिया :
ही कथा लातूरमध्ये राहणाऱ्या संजय सावंतची.
12वी पर्यंत मुंबईत असलेला संजय कॉलेजसाठी लातूरला आला व त्याला काहीजण भेटले . त्यांनी त्याला काही गोष्टी दाखवल्या आणि मोदीजी आपल्या देशाच्या विरोधात आहेत हे त्याच्या मनावर बिंबवण्याचा पूर्ण प्रयत्न केला.
(1/6)
त्याला "एक करोड भाजपा विरोधकांचा ग्रुप" जॉईन करायला सांगितले.
त्याने ग्रुप जॉईन केला तसा त्याला इतर भाजपाविरोधी पेज दिसायला सुरुवात झाली.
समृद्धी महामार्ग पाहलेल्या संजयला सेल्फी विथ खड्डा हा ट्रेंड दिसू लागला. देशात बनणारे एक्सप्रेसवे ग्रुपवर कधी दाखवले गेलेच नाही.
(2/6)
Apr 20, 2023 • 5 tweets • 2 min read
शेतकऱ्यांच्या आत्महत्या या केवळ राजकीय मुद्दा न बनवता त्यांच्या कुटुंबाना आधार देण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकार करत आहे.
पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबाना सहाय्य देत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळत आहे.काही कथा खालीलप्रमाणे.
(1/5)
कलावतीताई सावंडकर गेले तीन वर्ष सोयाबीन, कापूस, कडधान्य यांची जैविक पद्धतीने शेती करत आहेत. 2021 मध्ये त्यांनी हळदीची शेती ही सुरु केली व त्यांच्या जैविक हळदीला 6000 प्रति क्विंटल भाव ही मिळत आहे. त्यांच्यासोबत जुळलेल्या 180 हुन अधिक महिला आता शेतीतून घर चालवत आहेत.
(2/5)
Mar 25, 2023 • 5 tweets • 2 min read
जगातील सर्वात महत्वाचा पक्ष :
आज पश्चिमात्य जगतातील प्रत्येक पेपर भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात मग्न आहे. पण ही टीका एककल्ली असून भाजपाची एक बाजू मुद्दाम लपवली जात आहे. ती सुद्धा जगासमोर मांडणे गरजेचे आहे. भाजपा आज जगातील सर्वात महत्वाचा राजकीय पक्ष आहे.
(1/5)
आज आशिया-पॅसीफिकच्या राजकारणाचे भविष्य भारताच्या हातात आहे व येणाऱ्या काळात भारताचे भविष्य भाजपच्या हातात असेल. 9 वर्ष भारताला प्रगतीच्या दिशेने नेल्याने जनतेचा भाजपावरील विश्वास वाढतच जात आहे. हिंदुत्व,मुक्त बाजार,सामूहिक विकास असे विविध विचार एकत्र राबवणारा हा पक्ष आहे.
(2/5)
Mar 25, 2023 • 4 tweets • 1 min read
जेव्हा इंजिनियर झालो तेव्हा एका मोठ्या MNC कडून ऑफर आली होती. इंग्लंड मधील ही कंपनी भारतीय मार्केटसाठी खास प्रॉडक्ट डेव्हलप करणार होती व त्या टीममध्ये product development engineer म्हणून काम करायची संधी होती.परंतु आई वडिलांना सोडून जाणे शक्य नसल्याने तो पर्याय सोडावा लागला.
(1/4)
त्यानंतर एक दशक भारतातील विविध कंपनीमध्ये अनुभव घेतला आणि 2016 मध्ये मला एक ईमेल आला.
इंग्लंडमधील तीच कंपनी मेक इन इंडिया अंतर्गत आपला प्लांट भारतात टाकणार होती व त्याकरिता त्यांना अनुभवी लोकांची गरज होती. फारसा विचार न करता apply केले आणि तिसऱ्या महिन्यात कामाला ही लागलो.
(2/4)
Mar 24, 2023 • 4 tweets • 1 min read
तज्ञ : काय झालं सोनाक्का ?
सोनाक्का: आमच्या पप्पूला शाळेतून काढून टाकलं .
तज्ञ : कारण काय होतं काढायचं? शाळेत परत घ्यायला काही तरतूद आहे का ते पाहता येईल .
पप्पू: मास्तर म्हणाले कि मी वर्गात शिवीगाळ करतो आणि शाळेचे नियम तोडतो. सगळे घाबरले आहेत मला.
(१/४)
तज्ञ : तू शिवीगाळ केली हे सिद्ध झालंय का ?
पप्पू : त्याचा व्हिडीओ हि व्हायरल झाला .
तज्ञ : व्हिडीओ व्हायरल झाल्यावर मॉर्फ जाहीर करायला तरतूद आहे का ते पाहावे लागेल .
पप्पू: अक्ख्या शाळेने ऐकलं मला शिवीगाळ करताना .
तज्ञ : अशा वेळी माफी मागून कारवाई टाळायची तरतूद आहे.
(२/४)