‘Ramnath Goenka Excellence in Journalism Awards-2020’ या पुरस्कारानं काल मला गौरवण्यात आलं. घरापासून ते ऑफिसपर्यंत, सगळ्या सामाजिक बंधनांना सामोरं जाऊन, त्यांना झुगारुन स्वतःला सिद्ध केलेल्या किंवा करू पाहणाऱ्या गावखेड्यातील महिलांना मी हा पुरस्कार अर्पण करतो.
#RNGAwards
नवी दिल्लीत काल रामनाथ गोएंका पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी भारताचे सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांच्या हस्ते मला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘महाराष्ट्रातल्या मसाला क्वीनचं कंबरडं कुणी मोडलं?’ हा रिपोर्ट आम्ही २०२० मध्ये केला होता.
यात मसाला क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कमलताई परदेशी यांचा मसाला व्यवसाय नोटबंदी, जीएसटी, प्लास्टिक बंदीसारख्या सरकारी धोरणांमुळे कसा संकटात आला हे दाखवण्यात आलं होतं.
याच रिपोर्टसाठी पुरस्काराच्या ‘Regional Languages’ या श्रेणीअंतर्गत रामनाथ गोएंका पुरस्कार मिळाला आहे.
कमलताई खऱ्या हिरो - पार्ट १
ताईंनी मसाला व्यवसायात शून्यापासून सुरुवात करत स्वत:चं साम्राज्य उभं केलं. पण मधल्या काळातील सरकारी धोरणांमुळे हे साम्राज्य खिळखिळं झालं.
वर्षाला ६०-७० लाखांचा टर्नओव्हर करणारा त्यांचा बिझनेस नोटबंदी, जीएसटी, प्लास्टिक बंदीनंतर केवळ ६ ते ७ लाख टर्नओव्हरवर आला. सरकारी धोरणांचा फटका बसलेल्या कमलताई प्रातिनिधिक उदाहरण होत्या. असे कित्येक उद्योग जे मोठ्या कष्टानं पुढे आले होते, ते या धोरणांमुळे मृतावस्थेत ढकलले गेले.
पण, कमलताईंसारख्या महिला मागे हटल्या नाहीत. का तर त्यांना त्यांच्यासोबत त्यांच्या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या २०० हून अधिक कुटुंबाचं पोट भरायचं होतं. गेल्या २ वर्षांत कमलताईंवरील कर्जाचं सावट आता कुठे दूर व्हायला लागलंय.
पुरस्कार मिळाल्यानंतर कमलताईंशी बोलणं झालं. ताई म्हणाल्या, “आईला आपलं मुल मोठं होतं, त्यापेक्षा मोठा दुसरा आनंद नसतो.”
“पैशापेक्षा कर्म महत्त्वाचे असतात. मातीत हात घातला, तरी त्या कर्मामुळं मातीचं सोनं होतं,” ताईंचं हे वाक्य मला मातीशी घट्ट राहायला प्रेरित करत राहिल.
पुरस्काराची विशेषता - पार्ट २
‘द इंडियन एक्सप्रेस’चे संस्थापक रामनाथ गोएंका यांच्या नावाने इंडियन एक्स्प्रेस समूहाकडून, २००६ सालापासून दरवर्षी रामनाथ गोएंका हा पुरस्कार देण्यात येतो.
निर्भयपणे, निर्भीडपणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना या पुरस्कारानं गौरवलं जातं. त्यामुळे भारतीय पत्रकारितेत या पुरस्काराला विशेष स्थान आहे.
२०१९ आणि २०२० वर्षांसाठीच्या बातम्यांसाठीचा रामनाथ गोएंका पुरस्कार सोहळा एकत्रीतपणे काल दिल्लीत पार पडला. यावेळी भारताचे सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सरन्यायाधीशपदी असलेल्या एका मराठी माणसाकडून हा पुरस्कार घेणं ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे.
बाकी, योग्य वेळी आणि योग्य माणसाकडून हा पुरस्कार मिळाल्याचं वर्णन तुमच्यापैकी अनेकांनी सोशल मीडियावर आणि माझ्याशी फोनवर बोलताना केलं आहेच.
हा पुरस्कार आपल्या सगळ्यांचा - पार्ट ३
ज्या शेतकरी, कष्टकरी माय-बापांचे प्रश्न मांडण्यासाठी पत्रकारितेचा प्रवास सुरू केला, त्यांच्या प्रश्नांचा, वास्तवाला धरून केलेल्या पत्रकारितेचा आज राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान होत आहे. ही मनाला सुखावणारी बाब आहे.
माझ्यासारखे अनेक जण आज गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी, त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून झटत आहेत. मला जाहीर झालेला हा पुरस्कार त्या सगळ्यांचा आहे.
तळागाळात, गावखेड्यात इमानइतबारे काम करणाऱ्या, प्रसंगी जीवावर उदार होऊन सत्य बाहेर काढणाऱ्या निर्भीड अशा पत्रकारांचा हा पुरस्कार आहे. सोशल मीडिया हे माध्यम वापरुन शेतकरी, कष्टकरी वर्गाचे प्रश्न जिवंत ठेवणाऱ्या शेतकरी मुला-मुलींचा, कष्टकरी कार्यकर्त्यांचा हा पुरस्कार आहे.
ते हात ज्यांच्यामुळे असे रिपोर्ट घडतात - पार्ट ४
ज्या रिपोर्टसाठी हा पुरस्कार मिळालाय, तो रिपोर्ट आमचा सहकारी नितीन नगरकर यानं शूट केला होता, तर @rahulransubhe यानं एडिट केला होता. या दोघांचा मी मनापासून आभारी आहे. @prajaktadhulap यांनी मार्गदर्शन केलं, त्यामुळे त्यांचे खूप आभार.
आमच्या बीबीसी मराठीच्या टीमने तो मेहनत करून तुमच्यापर्यंत पोहचवला, त्यामुळे मी माझ्या टीमचेही मनापासून आभार मानतो.
माझे तत्कालीन संपादक @DikshitAshish यांनी माझ्यावर विश्वास ठेवत, मला स्वतंत्रपणे काम करू दिलं, यामुळे मी त्यांचा खूप जास्त ऋणी आहे.
अनेकदा बातमीनंतर मला आलेल्या धमक्या, सोशल मीडियावरील ट्रोलिंग पाहून आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, हे त्यांनी ठामपणे सांगितलं.
माझ्यातला पत्रकार जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी केलं.
बीबीसीच्या भारतीय भाषांच्या प्रमुख @rupa_jha या मला ग्रामीण भागातील लोकांचे प्रश्न मांडण्यास नेहमी प्रोत्साहन देत राहतात, मार्गदर्शन करत राहतात, यामुळे मी त्यांचा खूप आभारी आहे.
शेती-मातीचे प्रश्न जिवंत ठेवण्यासाठी माझे आताचे संपादक @Vinayakgaikwad मला त्यासाठीचं स्वातंत्र्य देत आहेत, त्यासाठीचं काम करण्याची मुभा देत आहेत, त्यामुळे मी त्यांचेही खूप आभार मानतो.
माझा मित्र रितेश पोपळघटनं ग्राऊंडवर जे सहकार्य केलं, त्यामुळेच हा रिपोर्ट शक्य झाला, त्यामुळे त्याचेही खूप खूप आभार.
आपली माणसं, हीच ताकद - पार्ट ५
पुरस्कार स्वीकारताना माझ्या अंगात तुम्हाला जो ड्रेस दिसतोय, तो माझ्या मोठ्या भावानं ‘गावाकडची गोष्ट’ बीबीसी न्यूज अवॉर्डसाठी शॉर्टलिस्ट झाल्यानंतर माझ्यासाठी घेतला होता. तो ड्रेस रामनाथ गोएंका पुरस्कार सोहळ्यावेळी घालता आला, याचा वेगळाच आनंद आहे.
माझे शेतकरी माय-बाप, भाऊ आणि बहीण, माझी बायको हेच माझ्यासाठी झेप घेण्याची प्रेरणा आहेत. त्यांच्या पाठींब्याशिवाय काहीही शक्य नाही.
जबाबदारीत वाढ - पार्ट ६
सध्या राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गहू, द्राक्ष, कांदा पिकांचं मोठं नुकसान झालंय.
यादरम्यान मिळालेला हा पुरस्कार माझ्या जबाबदारीत वाढ करणारा आहे.
शेती मातीचे प्रश्न अधिक प्रकर्षाने मांडण्यास, व्यापक पद्धतीनं मांडण्यास मला प्रवृत्त करणारा आहे. माझ्या कामाला लाभणारं तुमचं प्रेम, आशीर्वाद असेच कायम राहू द्या. मी कायम तुमच्या ऋणात राहिल. चांगलं काम करत राहिल.
@bbcnewsmarathi @IndianExpress

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे

Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(