Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे Profile picture
#गावाकडचीगोष्ट | Journalist @bbcnewsmarathi | BBC's Best on-site Impact Award 2018 | Ramnath Goenka Award 2020 | Red Ink Award 2021 | Laadli Award 2023.
Jun 29, 2024 16 tweets 3 min read
बिना लग्नाच्या पोरांची फौज तयार होतेय, त्यांच्या घुसमटीचं उद्रेकात रुपांतर होऊ नये यासाठी...
“आता वेळ आलीय की पोरांनी जात-पात वगैरे सगळं सोडून दिलं पाहिजे. पोरं जर का जात-पात, समाज पाहून लग्न करणार असतील तर त्यांची लग्नं कधीच होणार नाहीत.” (1/n) Image आज सकाळी जेवणादरम्यान पाहुण्यांनी उच्चारलेले हे शब्द. ग्रामीण भागातल्या तरुणांविषयी आम्ही बोलत होतो.
पाहुण्यांच्या गावात ४० ते ५० पोरं बिनालग्नाचे असल्याचे आणि ते नुसतेच हिंडत असल्याचे ते सांगत होते. (2/n)
Jun 27, 2024 10 tweets 2 min read
हवामान अंदाज हे एक मोठं मार्केट आहे, त्यावर विश्वास ठेवण्याआधी ‘हे’ वाचा...
आता एका पाहुण्यांशी बोलत होतो. पेरणी करुन खूप दिवस झाले, पण पाऊस पडला नाही. त्यामुळे ४ एकरवर दुसऱ्यांदा पेरणी करावी लागल्याचं ते सांगत होते. (1/n) Image “पावसाचे अंदाज काही खरे नसतात, हे शेतकऱ्यांना पटलंय. पण मग विश्वास ठेवायचा तरी कुणावर आणि कशाच्या भरवश्यावर?,” असा त्यांचा पुढचा प्रश्न होता. त्यांच्या या प्रश्नामुळे शेती कव्हर करणारा पत्रकार म्हणून तुम्हाला काही गोष्टी सांगणं माझं कर्तव्य आहे. (2/n)
Mar 23, 2023 24 tweets 5 min read
‘Ramnath Goenka Excellence in Journalism Awards-2020’ या पुरस्कारानं काल मला गौरवण्यात आलं. घरापासून ते ऑफिसपर्यंत, सगळ्या सामाजिक बंधनांना सामोरं जाऊन, त्यांना झुगारुन स्वतःला सिद्ध केलेल्या किंवा करू पाहणाऱ्या गावखेड्यातील महिलांना मी हा पुरस्कार अर्पण करतो.
#RNGAwards नवी दिल्लीत काल रामनाथ गोएंका पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी भारताचे सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांच्या हस्ते मला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘महाराष्ट्रातल्या मसाला क्वीनचं कंबरडं कुणी मोडलं?’ हा रिपोर्ट आम्ही २०२० मध्ये केला होता.