रोजच्या जीवनातील कुठल्याही प्रहरी रामरक्षा म्हंटली तरी प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते.
जी स्पंदने रामरक्षेतून जागृत होतात,
ती दाखविण्यासाठी कुठलाही चश्मा किंवा भिंग उपलब्ध नाही,परंतु "स्वानुभव"ह्या एकमेव साधनातून याची प्रचिती येते.
१/५
घरात एकटे आहात,रामरक्षा म्हणा,कुणी आजारी आहे, त्याच्या बाजूला बसून रामरक्षा म्हणा,प्रवासात आहात,रामरक्षा म्हणा, रस्त्यावरुन एकटे जात आहात,रामरक्षा म्हणा, पहिल्यांदाच प्रेजेंटेशन देणार आहात,रामरक्षा म्हणा,
नविन देशात अनोळखी लोकांच्यात आहात,
रामरक्षा म्हणा...!
२/५
आत्तसज्जधनुषा विषुस्पृशा वक्षया शुगनिषङ्ग सङिगनौ ।रक्षणाय मम रामलक्ष्मणा वग्रत:पथि सदैव गच्छताम् ॥ हा श्र्लोक म्हणताना अंगावर उभा राहणारा काटा अनुभवण्यासारखा असतो
कुठल्याही संकटात असाल, फारच निगेटिव वाटतंय, आपल्या आवडत्या व्यक्तिशी भांडण झालंय,
खूप वाईट वाटतंय,रडायला येतंय,
३/५
एकटं वाटतंय,
रामरक्षा म्हणा.
कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन तुम्हाला कधीच येणार नाही. आत्महत्येचे विचार मनाला शिवणारही नाहीत..
आस्तिक असाल,नास्तिक असाल तरीही रामरक्षा म्हणा. देवावर नसेल विश्वास पण रामरक्षेवर ठेवा.
मोबाईल वर ऐकत असाल तरीही तोंडाने म्हणा.
४/५
चारचौघात असाल तरीही मध्यमेतून म्हणा.
रामरक्षा असा एक रामबाण उपाय आहे,
जो तुमचे बारा कधीच वाजू देणार नाही.
पटत नसेल तर आजपासून अनुभव घ्यायला सुरुवात करा
५/५
सौ-फेसबुक
🚩🚩श्रीराम जय राम जय जय राम🚩🚩
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
"धर्मो रक्षति रक्षितः"
लव्ह जिहाद विरुद्ध लढायचे असेल तर आपल्या मुलींच्या मनात धर्माभिमान जागा झाला पाहिजे.
अन्य धर्मांतरवादी संप्रदाय त्यांचे रानटी स्वरूप आणि आपला हिंदू धर्म यातील फरक आपल्या मुलींना माहिती असलाच पाहिजे.
साध्या सोप्या उपासना पद्धती आत्मसात करून आणि त्याचे नित्य पालन करून या नरराक्षसांशी लढण्याची विजीगिषु वृत्ती प्रत्येक हिंदू तरुणीमध्ये निर्माण व्हावी म्हणून ही छोटी पुस्तिका उद्गार तर्फे आम्ही प्रकाशित केली आहे. या पुस्तिकेतील उपासना शक्ती तत्व जागृत करणारी आहे.
|| धर्मो रक्षति रक्षितः ||
फक्त २५ रुपये मूल्य असलेल्या या पुस्तिकेत हिंदू धर्माची मुख्य तत्वे सांगितली आहेत
आदि शंकराचार्य प्रणित देव पंचायतन पूजा पद्धती विस्तृत सांगितली आहेत आणि आपल्या घरातही पंचायतन पूजन प्रारंभ करा.
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांना अनावृत्त पत्र"
महोदय,
माझ्यासारख्या तुच्छ व्यक्तीने आपल्याला पत्र लिहावे ही माझी पात्रता नाही हे मी आधीच नमूद करतो आहे, कारण आपण एका राष्ट्रीय पक्षाचे निवडून आलेले लोकसेवक आहात आणि मी एक सामान्य मानव आहे.
आजवर आपण वारंवार वादग्रस्त वक्तव्य करत आला आहात आणि माझ्यासारखे लोक आपले निखळ अज्ञान आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करत आले आहेत. परंतु आपले कोणीही खंडण केले नाही म्हणजे आपण बोलतो तो प्रत्येक शब्द हा प्रमाण आहे असा आपला भ्रम झाला आहे, आपला हा गैरसमज दूर करणे यासाठी हा पत्रप्रपंच.
सध्या आपण सनातन धर्म या संकल्पनेला मनसोक्त शिव्या घालत आहात आणि सनातन धर्म अवैज्ञानिक आहे व बरेच काही बोलत आहात म्हणून आपल्याला अत्यल्प व अत्यंत प्राथमिक अश्या गोष्टी सांगतो
मुद्दा क्रमांक एक
धर्म या संकल्पनेचा विस्तार होताना तो सत्य धर्म-सत्य सनातन धर्म-सत्य सनातन वैदिक धर्म-
" दत्तमहाराज एखाद्याची एवढी कठोर परीक्षा का घेतात ?"
आपल्या आयुष्यात जे सुख-दुःखं आपण भोगतो त्याचा दाता कोणीही नसतो.कुठलीही वस्तू-कुठलीही व्यक्ती-कुठलंही वित्त आपल्याला कधीही सुख देत नाही वा दुःखं देत नाही."सुखस्य दुःखस्य न कोपि दाता । परो ददातिती कुबुद्धी रेषा "
१/६
ह्या न्यायानं सुख देणारा पण कोणीही नव्हे तसाच दुःखं देणारा पण कोणीही नव्हे.
" जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूंचि शोधोनी पाहे, मना त्वांची रे पर्व संचित केले,तया सारिखे भोगणे प्राप्त झाले."
ह्या श्री समर्थ उक्ती नुसार आपणच आपल्या अनंत जन्माच्या पूर्व कर्मानुसार
२/६
तयार झालेलं प्रारब्ध भोगत असतो.प्रारब्ध हे केवळ भोगूनच संपवावं लागतं!!
आपण जर दत्तगुरूंची उपासना करत असाल तर दत्तगुरूं आपली खडतर परीक्षा घेत आहेत असा विचारही अजिबात करू नका.उलट निर्माण झालेल्या प्रारब्धाच्या तडाख्यातून आपल्या भक्तांला कसं बाहेर काढायचं हे महाराज ठरवत असतात
३/६
"आत्मनिर्भर भारताचा युरोपला एक दणका"
आता अशा बातम्या वरचेवर वाचण्याची
सवय आपण लावून घेतली पाहिजे,💪
तर झाले आहे असे ,
युक्रेन युद्धानंतर G7 आणि युरोपियन देशांनी रशियन तेल खरेदीवर cap घातला. म्हणजे ६० डॉलरच्या खाली तेलाचे भाव असले पाहिजेत असे बंधन घातले.
तेल आपण रशियाकडून घेतो. त्यामुळे यात हे देश ढवळाढवळ करू शकत नाहीत. परंतु तेल वाहतूक करणारी जहाजे आणि ही वाहतूक करताना काढण्याचा विमा हे सर्व युरोपियन कंपन्यांच्या हातात होते. विमा न काढल्यास ही जहाजे इस्तंबूलमधून जाऊ देण्यास तुर्कस्थान तयार नव्हता.
या जहाजांना इस्तंबूल येथून जावे लागते. रशियाने आपली जहाजे देऊन हा पेच सोडविण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला रशियन कंपन्यांनी यासाठी विमाकवचही पुरविले. हे विमाकवच पुरविण्यासाठी वेळप्रसंगी पैसे देण्याची गरज भासल्यास विमा कंपन्यांच्या गंगाजळीत (Backup arrangement) पुरेसे डॉलर्स असणे
"भारतीय रुपयाची जागतिक ताकद"
हॉवर्ड पेक्षा हार्ड वर्क वाल्या चहा वाल्याने केली जादू
१३ जुलै २०२२रोजी आपल्या भारत देशाने रुपयाला अंतरराष्ट्रीय विनिमय चलन म्हणून जाहीर करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला
व ९ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत आपला भारतीय रुपया जागतिक चलन बनला आहे.
आपले UPI तंत्रज्ञान १८ देशांमध्ये स्वीकारले गेले असून १२ देशांनी याबाबत MOU (समझोता करार) केले आहे.
लवकरच यूएस डॉलरला बाजूला सारून ३० देश भारतासोबत भारतीय रुपयांमध्ये चलनाची देवाणघेवाण करतील.!!!
3४ देशांनी आधीच INR(भारतीय रुपया) मध्ये व्यापार करण्यास सहमती दर्शविली आहे.
अत्यंत अविश्वसनीय वाटेल अशी घटना म्हणजे आजपर्यंत इटली आणि जर्मनीसह इतर ६४ देशांनी रुपयाच्या चलनात अंतरराष्ट्रीय व्यापारात रस दाखवला आहे.
हा वेग आणि ट्रेण्ड असाच कायम राहिला तर लवकरच भारतीय रुपया यूएस डॉलरला अंतरराष्ट्रीय चलन म्हणून मागे टाकेलं.