*स्वा. सावरकरांची दहशत ! कोणाला व किती वाटायची....*
दिल्लीचे पालम विमानतळ!
विमानप्रवास फार दुर्लभ वाटावा असा तो काळ!
विमानतळावर एक केंद्र सरकारचा टपाल खात्याचा मोठा अधिकारी आपल्या विमानाची वाट बघत होता.
भोपाळ येथील टपाल विभागाचा तो मुख्य अधिकारी होता.
त्याच्या शेजारीच एक माणूस येऊन बसला. हे वयोवृद्ध गृहस्थ होते. हा माणूस फार फार मोठा होता. इंग्लंडमधून रँग्लर ही पदवी त्याने गणितात मिळवली होती.
पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचे ते प्राचार्य होते, *भारताचे ऑस्ट्रेलियामधील आयुक्त* होते.
स्त्रियांच्या शिक्षणासाठी ज्यांनी आयुष्य खर्चले त्या *महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांचे भाऊ* होते. त्यांची मुलगी ही कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात त्या काळी काम करत होती.
ह्या माणसाने त्या अधिकाऱ्याला पाहीले आणि मराठीतून विचारले...
"तुम्ही श्री ***** ना ?"
त्या अधिकाऱ्याने सांगितले...
"हो".
"पण मी आपणास ओळखले नाही!"
त्या प्राचार्याने सांगितले...
*"तुम्ही जेव्हा ICS ची परीक्षा दिली तेव्हा मी तुमचा परीक्षक होतो इंग्लंडमध्ये "*
क्षणार्धात ओळख पटली.
प्राचार्यांनी विचारले...
*"ICS च्या लेखी परीक्षेत तुम्ही पहीले आला होतात, दुसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थी आणि तुम्ही ह्यात दीडशे गुणांचा फरक होता आणि तरीही इंग्रज सरकारने तुम्हाला अनुत्तीर्ण घोषित केले होते. बरोबर ?"*🤔
*ते अधिकारी उत्तरले "हो."*
"कारण माहीत आहे?", प्राचार्यांनी विचारले.
"नाही" ते अधिकारी उत्तरले.
"जाणून घ्यायचंय ?" प्राचार्य.
"हो", अधिकारी.
"सांगतो...", प्राचार्य.
त्या प्राचार्यांनी दिलेले उत्तर पुढीलप्रमाणे!
ह्या अधिकाऱ्याने ICS चा अर्ज भरतांना आपल्या गावाचे नाव दिले होते "रत्नागिरी" !
रत्नागिरी हे नाव वाचताच ब्रिटिशांनी आपल्या भारतातल्या गुप्तचर खात्याला तपासणी करण्याचा आदेश दिला .*
*त्या तपासात असे आढळून आले की हा अधिकारी माणूस, शाळकरी असतांना, वीर सावरकरांच्या सम्पर्कात आला होता.*
*सावरकर तेव्हा दररोज संध्याकाळी आजूबाजूच्या मुलांना गोष्टी सांगत असत.
तेव्हा हा मुलगा त्या गोष्टी ऐकण्यासाठी सावरकरांच्या घरी जात असे.*
*"आणि म्हणून लेखी परीक्षेत अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊनही आम्ही तुम्हाला नागरी सेवा परीक्षेसाठी अनुत्तीर्ण घोषित करून तुम्हाला भारतीय टपाल सेवेत प्रवेश दिला.... ह्या परीक्षेत मी तुमचा एक परीक्षक असल्याने
मला सर्व माहीत आहे."*
*सावरकरांशी कोणत्याही प्रकारे संबंध आलेला माणूस ब्रिटिशांना आपल्या नागरी सेवेत नको होता.*
*जी सावरकरांची परीक्षा ब्रिटिश सरकार करू शकले ती भारतीय सरकार मात्र कधीच करू शकले नाहीत.*
*हे प्राचार्य होते रँग्लर रघुनाथराव परांजपे ...*
*आणि हा विद्यार्थी होता श्रीराम भि.वेलणकर! संस्कृत भाषेचे तज्ञ!*
*आपली, भारताची पोस्टाची पिनकोड पद्धती ज्यांनी शोधून काढली ते....*🙏😊
शिक्षणासाठी अंगावरला डाग मोडायला दिला, आई म्हणाली तू हायेस तर डाग आहे...
“संतोषच्या शिक्षणासाठी अंगावरला डाग मोडायला दिला मी. झुंबर आणि कानातली फुलं दिली. त्यानं मला म्हटलं की, अक्का मला शाळाच शिकायची नाही. म्हटलं, का रं बाळा? तर तो म्हटला, तू अंगावरला डाग मोडायलीस. अरं म्हटलं,
अरं म्हटलं, तू हायेस तर डाग आहे. मला बाकी काही नको.”
एवढं बोलल्यानंतर सरुबाईंच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं. सरुबाई या त्या महिलांचं प्रतिनिधित्व करतात, ज्या शेतशिवारात, घरादारात अखंड राबत आमच्यासारख्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वत:च्या आवडीनिवडींना तिलांजली देतात.
का तर आपण जे भोगलं, ते पोरांच्या नशीबी येऊ नये म्हणून. याचं त्यांना कुणीही, कुठेही क्रेडिट देत नाही. पण, त्यांचा संघर्ष कायम सुरू असतो.
एमपीएससीनं नुकत्याच जाहीर केलेल्या निकालात सरुबाई आणि अजिनाथ खाडे या ऊसतोड मजुरांचा मुलगा संतोष खाडे राज्यातून सर्वसाधारण यादीत 16 व्या,
पुणेरी बापाचे मुलास खरमरीत समज देणारे पत्र !!.🧐
हे पत्र वाचून पुणेकरांच्या प्रेमात पडणारंच.
असे लेखन फक्त आणि फक्त पुणेकरणाच येते.
प्रिय राजूस,( प्रिय हे मायना लिहायची पद्धत आहे आणि आम्ही ती पाळतो )
चिरंजीव आज गेले कित्येक दिवस आपणास पर्वती वर पहात आहे,
ते सुद्धा आपल्याच मागल्या गल्लीतील कन्येबरोबर....!!!
हि असली थेरे करायच्या आधी आपण दिडक्या कमवण्यासाठी काही केलेत तर बरे होईल...!!
हल्ली आपण खोकत असता, खोकला थंड पेयाचा दिसत नाही, आपले शिक्षण आता पुरे झाले, कारण ते करण्याच्या नावाखाली आपण वैशाली किंवा रुपाली येथे उभे राहुन
फाप्या मारता असे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे!!
हल्ली खाण्याच्या पण कुरबुरी असतात,जेवण जात नाही, त्यावरून आपल्याला इराणी रोग जडलाय कि काय अशी दाट शंका येऊ लागली आहे.
गणपती उत्सवात आपण ढोल बडवताना आढळलात, पण ढोल बडवून पोटाची खळगी भरत नाहीत तेच केल्यास जीवनाची हलगी वाजेल...!!
एका मित्राने स्वयंपाक घरात जाऊन आईला मी नापास झाल्याचे सांगितले, तशी तातडीने आई बाहेर आली. माझ्या डोळ्यांतील पाणी पाहून समजावू लागली. तसं मला अधिकच रडू येऊ लागले. तशी ती बाबांच्या खोलीत गेली. त्यांना बोलवायला.*_
कुणा तरी कलाकाराचे गाणे ऐकत बसले होते ते.भोवती १०-१२ माणसे होती.
आईने त्यांना आत बोलावले, तसे बाबा म्हणाले," अग थांब फार चांगली चीज बांधलीय यानं जरा ऐकून येतो."
त्यांनी लवकर यावे म्हणून आई दबलेल्या आवाजात म्हणाली, " अहो, अरु नापास झालाय."
ते म्हणाले, " मग होईल पुढच्या वर्षी पास !"
तेव्हा आई काकुळतीने म्हणाली, " तो रडतोय "
तेव्हा बाबा उठले व माझ्या खोलीत आले. मी म्हणालो," या पुढे मी इंजिनीरिंगचा अभ्यास सोडून देतो व गाणेही. गाण्यामुळे शिक्षण नीट होत नाही व शिक्षणामुळे म्हणावं तसं गाणे जमत नाही. तेव्हा मी नोकरी करेन.
त्यांनी ओळखलं की निराश झाल्यामुळे मी तसं म्हणत आहे. तसं करेल सुद्धा.ते म्हणाले,
जुनी शहाणी माणसं !!....
१. दूध तापविणे ते तूप कढवे पर्यंत आज्जी धेनु ऋण मंत्र म्हणत असे. धेनु (गाय)मुळे माझा संसार आरोग्यदायी आहे असे म्हणायची.
२. कितीही श्रीमंती असली तरी शक्य असेल तर घेवडा वेल लावावा सांगत असे. असे का ह्याचे उत्तरही तयार, म्हणायची, 'श्रीमंती देवापुढे कधीच नसते
दत्तगुरु जेवण्यास येतात, घरची घेवडा भाजी गुरुवारी करावी. घेवडा कथा वाचावी, कमी असते ते वाढते.'
३.वाळवण घालताना आज्जी सूर्यमंत्र म्हणायची, काळजी घे म्हणायची माझ्या संसाराची.
४.रोज एकदा घरच्या झाडांना कुरवाळून यायची, कोरफडीचे पण लाड करायची, आम्हाला नवल वाटायचे, तर म्हणायची,
स्वतः शुष्क दिसते वरून पण अंगी खूप गुण आहेत. एखाद्याला फक्त वरअंगी, रूपावर तपासू नये.'
५.मुंग्यांना साखर ठेवायची, म्हणत असे मी दिलेल्या मार्गावरूनच जा गं बायांनो, सुखात राहा, माझ्या लेकरांना चावू नका.
६तुळशीला दिवा लावायची, चिलटे, किडे नष्ट होऊन घरात येत नाहीत.
रात्रीच पारिजात का फुलते, बहरते, त्यामागे एक अतिशय गोड प्रेमकथा आहे.
या कथेनुसार, राजकुमारी पारिजातक सूर्याच्या... होय भगवान सुर्य देवाच्या प्रेमात पडली. सूर्यदेवाला त्याच्या वैभवाची आणि शक्तीची पुर्णपणे जाणीव होती. तरीही एका अटीवर तिच्याशी त्याने लग्न करण्याचे वचन दिले.
अट अशी होती की, काहीही झाले तरी तिने त्याच्याकडे कधीही पहायचे नाही. अट विचित्रच होती खरी...पण प्रेमात रममाण झालेल्या परीजातने याचा कधी विचारच केला नाही.
त्यांनी शरद ऋतूमध्ये लग्न केले आणि बघता बघता उन्हाळ्यापर्यंतचा काळ कसा भरकन निघून गेला.
उन्हाळा येताच सुर्यदेवाची शक्ती पूर्वीपेक्षा अफाट वाढली.... इतकी, की पारिजात त्याच्या एका कटाक्षात भस्म होऊन जाईल. अशाच एका दुपारच्या वेळी सूर्य पारिजातच्या दारात खाली उतरला आणि पारिजात भान हरपून त्याच्याकडे पाहातच राहिली. वचनभंगामुळे तो प्रचंड क्रोधीत झाला
बरेचदा तुमच्या आजूबाजूला अशी माणसं असतात ज्यांना कधीच कुठल्याच गोष्टीमध्ये चांगलं, सकारात्मक असं काहीही दिसत नसतं, किंवा आपण असं म्हणूया कि त्यांनी आपली नजर फक्त आणि फक्त सगळ्या गोष्टींमध्ये चूक काढण्यासाठीच तयार केलेली असते.
बरं त्यांना काय चुकीचे आहे हे विचारल्यानंतर logically तस फारसं काही सांगता येतं नाही किंवा त्या चुकीच्या गोष्टी ऐवजी नक्की काय करायला हवं ह्याचही उत्तर त्यांच्याकडे नसते आणि जरी असलं तरी त्या उत्तर हे त्यांच्या विचारसरणीप्रमाणेच नकारात्मक असतं.
ही अशी माणसं एनर्जी ड्रेनर असतात.
अशी माणसं आपल्या आसपास असतील तर त्याचा सगळ्यात पहिला परिणाम आपल्यावर होतो आपण करत असलेल्या कामावर होतो.
अश्यावेळी एकच करायाचं, आपल्या कोणत्याही गोष्टीबाबत ह्यांच्याशी बोलायच नाही. ह्यांच्यापर्यंत आपली कोणतीही गोष्ट, आपले कोणतेही प्लॅन जाणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची.