#उष्माघात म्हणजे शरीराचे तापमान जास्त वेळ १००-१०१ फॅरेनाईट किंवा त्याहून अधिक स्थिर राहणे. सामान्य पणे दुपारी शरीराचे तापमान ९७.५ ते ९८ फॅ. असते. #उष्माघातामध्ये हे तापमान १०१ फॅ. पेक्षा जास्त होणे व हे जीवघेणे ठरते. उष्ण कोरडी त्वचा हे उष्माघाताचे लगेच ओळखून येणारे लक्षण.
१/६
#उष्माघाताची लक्षणे खालील प्रमाणे
*हृदयाची धडधड वाढणे
*दिर्घ श्वास घ्यावा लागणे, व श्वासाची गती वाढणे
*रक्तदाब (Blood pressure) वाढणे किंवा कमी होणे
*घाम येणे थांबणे
*चिडचिड होणे, बेशुद्धी (ग्लानी) किंवा भ्रम वाढणे
*चंचलता येणे किंवा कमी होणे
*डोकेदुखी
*मळमळ (ऊलट्या)
२/६
प्रथमोपचार...
व्यक्तिला उन्हापासून दुर थंडाव्याच्या किंवा सावलीच्या ठिकाणी आणावे.
व्यक्तिला खाली झोपवून त्याचे हातपाय सरळ करावे.
कपडे सैल करावे किंवा काढून टाकावे.
३/६
व्यक्तिला थंड पाणी, फळांचा रस, सरबत पाजा.
गरम शरीर थंड पाणी मारुन किंवा थंड ओल्या कपड्याने अंग पुसुन किंवा पंख्याखाली ठेवुन थंड करावे.
#उष्माघात होऊ नये म्हणून काय काळजी.
कडक उन्हातून एकदम AC असलेल्या थंड रूम मध्ये जाऊ नये, किंवा AC थंड रूममधून अचानक कडक उन्हात जाऊ नये.
४/६
उन्हातून आल्यावर लगेच खूप प्रमाणात व खूप थंड पाणी पिऊ नका,
शरीराला रूम तापमानात आल्यानंतर थोड्याथोड्या अंतराने भरपूर पाणी प्या.
उन्हात जाणे अगदी गरजेचे असल्यास टोपी, छत्री, सनकोट याचा वापर करा. व थोड्या अंतराने पाणी पीत रहा.
भडक रंगाचे व तंग कपडे वापरू नका. सैलसर कपडे वापरा.
५/६
लहान मुले, म्हातारी माणसे, मासिक पाळी चालू असलेल्या स्त्रिया, प्रेग्नेंट स्त्रिया, डायबिटीस ब्लड प्रेशर असलेले व्यक्ती यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
लक्षात ठेवा.. #उष्माघात जीवघेणा ठरू शकतो..
काळजी घ्या. उन्हात जाणे टाळा, भरपूर पाणी प्या. #उष्माघात #मराठी#नाशिक#रिम#म
६/६
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh