अखंड एक पिढी तुझा खेळ बघत लहानाची थोर झाली.. एखाद्या खेळाशी भावना जुळण्याची ती त्या पिढीची पहिलीच वेळ.. तुझा खेळ पाहतानाचे 'नेल-बाईटिंगचे' अनेक प्रसंग आजही जशाच तसे आठवतात.. तत्कालीन जाहिरातीमधील पेप्सीसारखा थंडावा सापडणारी.. तुझी प्रत्येक नजाकत रसिकांची मनं शांत करत गेली..❤️
अजून मिसरुटही न फुटलेला 'सच्या' ते पोक्त 'मास्टर ब्लास्टर सचिन' या प्रवासाचे यथासांग सहप्रवासी होण्याचे भाग्य आमच्या पिढीने अनुभवले..तो बावनकशी अनुभव पारिजातकाच्या सड्याप्रमाणे सदैव आमच्या आयुष्यात सुगंधी पिंगा घालत राहील..पण त्या समृद्ध अनुभवाच्या भरजरी पदराला एक मात्र डाग आहे..
तो डाग म्हणजे..मूकसंमतीचा.
क्रिकेट माणसांनीच बनवलेला खेळ आहे.. माणूस म्हणून जे अवगुण असतात ते त्या खेळातही येणारच.. एक क्रिकेट रसिक म्हणून क्रिकेटच्या त्या अवगुणी वृत्तीविरोधात सचिनने काही बोलावं..ही एकमात्र आशा तेंव्हा अपूर्ण राहिली..तुझी ती मुकसंमती तेंव्हाही वेदनादायक होती.
तू तेंव्हाही काही बोलला नाहीस..आणि आजही काही बोलत नाहीस.. कुठं काय बोलावं हा जरी तुझा वैयक्तिक प्रश्न असला तरी तुझं आयुष्य हे फक्त तुझं नाही.. ते तुला देवत्व बहाल करणाऱ्या अगणित क्रिकेट रसिकांचंही आहे.. तुझ्यासोबत नर्व्हस नैन्टिच्या अनेक घटना पचवलेल्या या पिढीचंही ते आयुष्य आहे.
शेतकरी आंदोलनावेळी तू जे बोललास.. त्याबद्दल कडकडीत टीका करावीशी वाटली..कारण मी आजपर्यंत अनुभवलेला 'सचिन', मला अपेक्षित असलेला 'सचिन' हा तो 'सचिन' न्हवताच.. देवत्वाच्या अतिउच्च कळसावरून तू ज्याला हात लावशील ते ते सोनं म्हणून भरून पावू शकतं..अवकाश आहे तू फक्त 'चांगभलं' म्हणण्याचा.
सचिन हे 'प्रस्थ' खेळापूरतं मर्यादित नाही..तो शांत स्वभाव, तो कौशल्यपूर्ण बचाव, त्याहून कौशल्याची चढाई.. सचिन, तुझा हा सगळा लौकिक आता सार्वजनिक आयुष्यातही असाच बहरत राहो.
आमच्या पिढीच्या खेळ भावनांना तू मूर्त स्वरूप देत आलास.. आताही आमच्या भावनांचे सारथ्य तू करावं..एवढीच अपेक्षा.
दरवेळेस जसं तू आमच्या प्रत्येक भावनांना गोंजारत यथोचित सीमारेषा दाखवत आला आहेस.. तेच तुझ्या हातून अजूनही घडो.. त्यासाठी तुझ्या हातांना नैपुण्ययुक्त बळ मिळो..याच हाफ सेंच्युरीच्या काळजातून शुभेच्छा..❤️ #सचिन
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
तिन्हीसांजेची लगबग रस्त्यावर दिसत होती.. रस्ता फार काही वर्दळीचा न्हवता.. हार-फुलांची दोनचार दुकानं आणि शांत चहापानासाठी कौलारू एकदोन हॉटेलं.. अधूनमधून कुंपणाच्या आतील घरं..तुरळक एखादं किराणा मालाचं दुकानं..आणि रस्त्याच्या टोकाला छोटेखानी कसलं तरी मंदिर.. बस् संपला रस्ता.. #Love
परिसर तुलनेत शांत होता.. कुठंतरी लांब चंदन अगरबत्ती धुराची काडी हवेत सोडत होती..ती काडी संपता संपता सायलेंट सुगंध त्याच्यापर्यंत पोहचवत होती..त्या सुगंधाने दिवसभराची ओढाताण हलकी होत होती..दिवेलागणीला असतो तो आभाळातला भडक तांबूसपणा आता विझत आला होता..त्यातच थंडीची धांदल सुरू होती.
नगराच्या मध्यवर्तीत असूनही हा तळ मनाला भुरळ पडणारा होता..वाहतूक अगदी शिस्तीत जात होती.. मंदिराकडे जाणारी माणसं दुर्मिळ असणाऱ्या शांत चेहऱ्याने लगेच ओळखू येत होती.
फुलांच्या दुकानात 'मेरे दिल में आज क्या है.. तू कहे तो मैं बता दूँ।' वाजणारं गाणं फुलांना अजूनच खुलवत होतं..
दिवसाच्या पहिल्या प्रहराची सुरवात..रात्री बाराला गडगडाटी पाऊस पडून गेला होता..घरी सगळे साखर म्हणावी अशा झोपेत..रातकिड्यांची किरकिर शांत वातावरणाची शांतता भयाण रातीत परावर्तित करत होती.. मधूनच एखादं कुत्रं रडायचं..पण ते कोणीतरी तोंड दाबून धरल्यागत लगेच शांत पण व्हायचं. #Annabelle
मला जाग आली तेंव्हा घरात सगळे आपापल्या रूममध्ये झोपले होते..फॅनची घरघर सोडता कसलाच आवाज न्हवता..अजून थोडा वेळ आहे, पडावं..या हिशोबाने मी कलंडलो..इतक्यात लहान मुलांच्या सायकलचं ते इंग्लिश संगीत वाजायला सुरवात झाली..पहिल्यांदा मला बाहेरून आवाज येतोय वाटलं..पण ते फक्त पाचच मिनिट.
कारण आवाजाची दिशा ही आपल्याच घरातून होती..आणि इतक्या उशीर आमच्या घरात एकसारखं ते संगीत वाजायची ही पहिलीच वेळ..आणि एवढं घाबरायचीही ही पहिलीच वेळ.. अगदी The Conjuring, Annabelle एका दणक्यात आठवावी इतकी.
काय करावं कळत न्हवतं..आणि खोलीचं दार उघडलं आणि काही दिसलंच तर करायचं काय?
उघड्या माळावर कुसळं उगवून वाळून जायची..ती खायला जनावरं सुद्धा नसायची..नजर जाईल तिथवर चिटपाखरूही न्हवतं..उघडे डोंगर-माळ ज्यांच्या मालकीचे..ते ही काही करू शकत नव्हते..अशात त्यावर नजर पडली एका बड्या पवनचक्की कंपनीची..आणि एका रातीत लोकांना पैशे ठेवायला नव्या ट्रंका घ्याव्या लागल्या.
जमिनीचे सौदे ठरतील तसं एका एका घराचे वासे फिरू लागले.. लाकडी तुळई जळणात गेल्या..त्या जागी RCC पिलर आले.. सायकलची चैन पडायची त्याच जागेवर धूळ आत येऊ नये म्हणून चारचाकी काचा वर करू लागल्या.. ३ डोकी घरात असूनही दारात ४-४ दुचाकी आणि २-२ चारचाक्या सर्रास दिसू लागल्या.
मळलेल्या कॉलर गेल्या..व्हाइट कॉलर आता ड्रायक्लीन होऊन येऊ लागल्या..पाण्याच्या घोटासाठी वाट बघणारे.. आता बार मालकाला खिशात ठेऊ लागले..सो कॉल्ड बरकतीने गाव सारा फुलून उठला..भावंडात हिश्श्यावरून धराधरीही झाली..हा सगळा गोंधळ चांगला दशकभर सुरू राहिला..खर्चापेक्षा जमा जास्त होती.
रशिया-युक्रेन कुस्ती फक्त ५६" किंवा इंधन महागाई एवढ्यापुरती मर्यादित नाही..युक्रेन पट्टीचा गहूनिर्यातदार देश आहे..सूर्यफूल,सोयाबीन इ. तेल ही तो पिकवतो.. सांगायचा मुद्दा आहे..युक्रेन युद्ध धांदलीत अडकल्याने.. आंतरराष्ट्रीय बाजारात त्या जिन्नसांचा तुटवडा आहे..❤️ #farm
आपल्याकडे आत्तापासूनच खाद्यतेल महागाई जाणवत आहे ती त्यामुळेच..खाद्यतेलाच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण नाही..त्यास पर्याय नाही..पण, गव्हाचे तसे नाही.. सद्यस्थितीत भारत गव्हाचे चार दाणे बाळगून आहे.. शिवाय यंदाचे रब्बी उत्पादन ही येईल..तेंव्हा केंद्राने निर्यातबंदी न करता हा योग साधावा.
शेतकऱ्यांना चार पै ज्यादाचे मिळतील त्याने.. पण, केंद्राची शेतकऱ्यांप्रति असलेली भावना यापूर्वी कांदा आणि साखर निर्यातबंदीत दिसलीच आहे..अन्नसुरक्षा या सदराखाली शेतकऱ्यांचा जीव घेऊनच स्वस्त धान्य दुकानांची शृंखला चालवण्याची परंपरा यंदा तरी खंडित व्हायला हवी.
सांज रातीला पडक्या वाड्याच्या पल्याड भिंतीला निवाळसंग तलावाची छबी नाकासमोर ठेवत ती बसलेली असायची..तलावावरचा धुंद वाऱ्याचा झोत..अदबशीर होऊन तिच्या मोकळ्या केसांना बटेसहित कुरवाळायचा.. त्याला यायला नेहमीचा उशीर असायचा यावर तिची लालबुंद नाकाची धार शीतल वातावरणात चमकून उठायची. #म
आज त्याने त्या लेकुरवाळ्या आठवणींसहित तिथल्या दगडी सोपानावर चार गरका घेतल्या...प्रत्येक गरकेसरशी आठवणी आपला विळखा अजूनच तंग करत्या झाल्या.. त्यातून सैलावण्यासाठी त्याला अजून चार गरका घ्याव्या लागल्या.
पुढं होऊन तलावात पाय सोडून बसताना चपळ चंचल मासे धावताना दिसले..
आयुष्यातले क्षण असेच चपळ असतात..आत्ता हा क्षण माझ्या कवेत आहे म्हणेपर्यंत तो निघून गेलेला असतो.. त्या एवढ्याशा क्षणाला..क्षणाच्या आत..त्या आपुलकीच्या घटकेसहित काळजात साठवून ठेवावं लागतं..परत परत तो क्षण काळजाच्या तळात जाऊन अनुभवण्यासाठी.
डाव्याअंगाला वयोवृद्ध वड पानगळ सोसत उभाय..
१६च्या नोव्हेंबरात नोटबंदी झाली तेंव्हा काळजात एक जखम घर करून होती..नोटबंदीने त्या जखमेवरची खपली काढली..ती जखम म्हणजे त्याच ऑगस्टमध्ये वि.ग. कानिटकर या ऐतिहासिक लेखकाचं निवर्तनं.
जागतिक इतिहास त्याचं आकलन आत्ता गुगल दुनियेत क्षुल्लक..पण कानिटकर जगले तो काळ अखंड सर्व्हर डाऊनचा. #म
यंदा वाचलेलं पुस्तक 'नाझी-भस्मासुराचा उदयास्त' वि. ग. कानिटकर या कसलेल्या लेखकाचं हे पुस्तक.
हिटलर आणि त्याची नाझी संघटना दोघेही कोणत्या परिस्थितीत बळ धरते झाले.. एखादा अख्खा देशच्या देश कशा पद्धतीने सामूहिक भावनेच्या अंकित जातो..ती भावना कशा पद्धतीने नर्चर केली जाते.
हे सगळं टिपून घेण्यात लेखक निर्विवाद यशस्वी झाला आहे.
जसं दुसऱ्या महायुद्धाची बीजं पहिल्याच्या अंतात होती तसं जर्मन जनतेच्या सामूहिक अपमानित भावनेची मूळही पहिल्या महायुद्धाच्या शेवटात होती. हिटलर सारखा हे युद्ध रणांगणाच्या थेट मैदानातून अनुभवलेला माणूस सुडाने पेटने साहजिकच.