गुजरात मध्ये रीफायनरी आहे आणि तिथेच बाजूला लागून असणार्या आंब्याच्या बागेतून रिलायन्स आंब्याची निर्यात करणारा सर्वात मोठा निर्यात दार आहे...
किती हास्यास्पद आहे हे....
१ गुजरातची लोक आंब्यासाठी आम्हाला संपर्क करतात किंवा ते कोकणातीलच आंबे घेतात. कोकणच्या आंब्याला GI मार्क मिळालेला आहे. जो ईतर कोणत्याही भागातल्या आंब्याला लागू होत नाही.
बर आंब्यातही प्रकार आहे तो रिलायन्स निर्यात करत असलेला आंबा आणि त्याची क्वालिटी एकदा जाहीर करा रिफायनरी समर्थकांनो.
२ गुजरातला किनारे आहेतच तरी पर्यटनासाठी महाराष्ट्र गोव्याचे किनारे का निवडले जातात?
३ गुजरातच्या किनार्यावरुन समुद्रात सोडले जाणारे केमिकल युक्त पाणी दुषित नसल्यास ते रिफायनरी समर्थक पिणार का?
४ रिफायनरी जर प्रदुषण करणार नसेल तर ती red कॆटॅगरी मध्ये मोडते कशी?
५ कोकणच्या भौगोलिक परिस्थिती कोणत्याही मोठ्या उद्योग, प्रकल्प आणि मोठ्या जलसाठ्यासाठी योग्य नाही असे शात्रज्ञ सांगतात तेही योग्य निरिक्षण आणि वैज्ञानिक कारणासह. तरी राजकारण्याकडून हजारो लोकांना बेघर आणि आयुष्यातून उठवून काय साध्य होणार आहे?
आज जरी पैसे घेवून paid सपोर्ट करणारे अाता श्रीमंत होतील पण भावी पिढी तुमच्या नावाने पिंड देखिल ठेवणार नाही हे लक्षात घ्या. एका २५ कलमांच्या बागेतील आंबा जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे १०जणांच्या हाताला काम देतो.
हा फक्त आंब्याचा विषय बाकी काजू, कोकम,फणस, नारळ , याबद्दल आणि त्यावरील चालणार्या प्रकिया करणार्या पर्यावरणपूरक उद्योगांनी अख्खा कोकण आर्थिक समृद्ध होवू शकतो.
बाकी काल, आज आणि उदया फक्त चाकरी करा आणि आम्ही तुम्हाला नोकरी, चाकरी देवू हीच आमिषे नेत्यांनी दिलीत
पण एकही नेता कार्यकर्ता नोकरीच्या मागे न लागता मोठा बिजनेसमन( व्यवसायिक ), उद्योजक म्हणूनच पहायला मिळतो. यांच्याकडून का नाही सांगितल जात व्यवसायीक बना म्हणून? आमिष आणि सत्य यामध्ये फरक शोधा म्हणजे म्हणजे जगणे सोपे होईल.
बाकी यापुढेही रिफायनरी किंवा रेड कॅटेगरीला विरोधाला विरोध म्हणून नाही तर विरोधात का आहोत हे कारणासह कायम मांडत राहीनच...
बाकी सिंधुदुर्गातील बाजूचा रेडी गाव उध्वस्त होताना मुग गिळून शांत बसणारे आजगाव गावातील लोक आनंदी जिवन जगत होते पण आजगाव गावाच नाव खनिज उत्खनन पट्ट्यात
उत्खनन पट्ट्यात आल्यावर विरोध करायला जागे झाले. हीच परिस्थिती कोकण महाराष्ट्रासह प्रत्येक गावात आहे. उपभोगाची वाळवी आहे ही जी एक गाव पोखरून झाल्यावर दुसर्या गावावर घाला घालणारच हे ध्यानात घ्या. कोकणातील प्रत्येक गाव उध्वस्त होण्याच्या धोक्याच्या छायेखाली आहे.
सौंदर्य हाच खर्या अर्थाने शाप ठरतोय आणि त्याला आम्ही शांत बसणारी जनता कारणीभूत आहोत.
लक्षात ठेवा संघर्ष हा जिवंत पणाचे लक्षण आहे कारण पाणी कितीही गरम असलं तरी प्रेताला चटका लागत नसतो.
नितिन गोलतकर, झाराप. #एकच_जिद्द_रिफायनरी_रद्द#SayNoToRefinery #No_To_Barsu_Refinery
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
१९९९ साली मराठीत 'अल्फा मराठी' वाहिनी सुरू झाली आणि त्यानंतर मराठी मालिकांची श्रुंखला सुरू झाली.आता 'अल्फा मराठी' वाहिनीचे नाव "झी मराठी" आहे.तत्पूर्वी मराठी मनोरंजन क्षेत्राला कुठे स्थान नव्हते व तशीच अवस्था इतर भाषेंची होती. हळूहळू मराठी मनोरंजन म्हणजे झी मराठी असे समीकरणच झाले
मराठी मालिका प्रत्येक घराघरात आवर्जून पाहण्यात येऊ लागल्या.
जशी जशी सुरुवात होत गेली कुठे तरी खटकू लागले, कारण फक्त एका विशिष्ट वर्गाच्या लोकांची मक्तेदारी मराठी मालिका क्षेत्रात आहे हे जाणवू लागले तसेच मराठी चित्रपट क्षेत्रात हि तशीच अवस्था.
एखाद्या क्षेत्रात प्रत्येक समुहाच प्रतिनिधित्व नसेल तर ते क्षेत्र आपले नाही अशी भावना जागृत होते.
आज हॉलिवूडमध्ये पण प्रत्येक समुहाच्या प्रतिनिधित्वाबद्दल समाजमाध्यवांवर बोलण्यात येत आहे.
अफ्रिकन, रेड ईंडियन, आशियन व लॅटिन मुख्य भुमिकेत जसे अभिनेत्री व अभिनेता म्हणून चित्रपट व