सगळी विश्लेषण आणि अग्रलेख वाचले. कौटुंबिक नजरेतून कालच्या घटनेकडे क्वचितच मांडणी झालेली दिसली. पुरोगामी वगैरे कितीही मांडणी झाली तरी पवार - एकत्र मराठा कुटुंब आहे. अत्यंत प्रभावशाली अशा या कुटुंबातील काही सदस्य राजकारणातही सक्रिय आहेत. १/४ #SharadPawar#MaharashtraPolitics
इथे कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांवर केवळ राजकीय नाही तर आर्थिक अवलंबित्वही आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्यामुळे आणि येणाऱ्या काळातल्या राजकारणामुळे या सगळ्यांवर थेट परिणाम होणार आहे. पण तरीही या नजरेतून कालच्या घटनेकडे कोणीही फारसं बघत नाहीये. २/४ #Pawar#NCP
या संपूर्ण प्रक्रियेत अजित पवारांना व्हिलन बनवणं सोपं आहे. अर्थात त्यांचा फटकळपणा हे त्याचं प्रमुख कारण असलं तरी अजित पुढे येऊ नयेत (डोईजड होऊ नयेत) म्हणून काम करणारे अनेक आहेत. त्यातल्या त्यात सुळे म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ असेही वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण.... ३/४
इथेही ' कुटुंब ' याच नजरेतून सर्व घडामोडी बघायला लागतील.