Shital Pawar Profile picture
Executive Editor, @SakalMediaNews | Engineer | Social Development Researcher | Media Strategist
May 3, 2023 4 tweets 2 min read
सगळी विश्लेषण आणि अग्रलेख वाचले. कौटुंबिक नजरेतून कालच्या घटनेकडे क्वचितच मांडणी झालेली दिसली. पुरोगामी वगैरे कितीही मांडणी झाली तरी पवार - एकत्र मराठा कुटुंब आहे. अत्यंत प्रभावशाली अशा या कुटुंबातील काही सदस्य राजकारणातही सक्रिय आहेत. १/४
#SharadPawar #MaharashtraPolitics Image इथे कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांवर केवळ राजकीय नाही तर आर्थिक अवलंबित्वही आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्यामुळे आणि येणाऱ्या काळातल्या राजकारणामुळे या सगळ्यांवर थेट परिणाम होणार आहे. पण तरीही या नजरेतून कालच्या घटनेकडे कोणीही फारसं बघत नाहीये. २/४
#Pawar #NCP