आजच्याच दिवशी म्हणजे ४ मे १९५५ रोजी भारतात बौद्ध धम्माचा अधिकाधिक प्रसार करण्याच्या व भारत बौद्धमय करण्याच्या उद्देशाने परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी #द_बुद्धिस्ट_सोसायटी_ऑफ_इंडिया या संघटनेची स्थापणा केली. या संस्थेचे उद्देश पुढीलप्रमाणे होते.
१. भारतात बौद्ध
धम्माच्या प्रसारासाठी चालना देणे, प्रोत्साहन देणे.
२. बौद्ध पुजापाठ करण्यासाठी विहारांची स्थापणा करणे.
३. धार्मिक (धम्मविषयक) व शास्त्रीय शिक्षण देण्यासाठी शाळा व महाविद्यालयाची स्थापणा करणे.
४. अनाथालये, दवाखाने व मदत केंद्रे स्थापण करणे.
५. धम्मप्रसाराच्या उद्देशाने
कार्यकर्त्यांच्या तयारीसाठी धम्मविषयक चर्चासत्रांचे आयोजन करणे.
६. सर्व धर्माच्या तुलनात्मक अभ्यासाला चालना देणे.
७. सर्वसामान्य लोकांना धम्म चांगल्या प्रकारे समजण्यासाठी बौद्ध साहित्याचे प्रकाशन व पत्रके, प्रचारसाहित्य इ. चे प्रकाशन व वाटप करणे.
८. जर आवश्यक असेल तर नवीन
धर्मगुरू (बौद्ध भिक्षू) तयार करणे.
९. साहित्य प्रकाशित करण्यासाठी स्वतःची प्रिंटिंग प्रेस स्थापण करणे.
१०. भारतातील बौद्धांनी समान कृती कार्यक्रम ठरविण्यासाठी मेळावे, परिषदा इ. चे आयोजन करणे.
वरील प्रमाणे द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ची उद्दिष्टे आहेत/होती.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापण केलेल्या या द बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया ची कार्यकारिणी पुढील प्रमाणे होती.
१. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर - अध्यक्ष
२. डाॅ. माधव जी. मालवणकर
३. सी.एस.पिलाई
४. भालचंद्र .के. कबीर
५. भगवंत सयाजी गायकवाड
६. एस. डी. गायकवाड
७. काशिराम विश्राम सवादकर
संपूर्ण भारत बौद्धमय करण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न होते व त्यांना हा धम्म सर्वसमावेशक असा हवा होता म्हणून तर त्यांनी या कार्यकारिणीत डाॅ. मालवणकर, भालचंद्र के. कबीर यांच्यासारख्या ब्राह्मणांना सुद्धा संघटनेच्या कार्यकारिणीत स्थान दिले होते. दुर्देवाने बाबासाहेबांनी धम्मदिक्षा
घेतल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात त्यांचे महापरिनिर्वाण झाले आणि या संघटनेची जी उद्दिष्टे त्यांनी त्यांच्या अनुयायांसमोर ठेवली होती ती तशीच अर्धवट राहून गेली.
३ एप्रिल १९२७ रोजी #बहिष्कृत_भारत चा प्रथम अंक प्रकाशित झाला. हेच एकमेव असे वर्तमानपत्र (पाक्षिक) होते, ज्याचे अखेरपर्यंत संपादक स्वतः डाॅ.बाबासाहेब आंबेडकर राहिले, ज्यातील संपूर्ण अग्रलेख/लेख त्यांनी स्वतः लिहिले.
दि.३ एप्रिल १९२७ रोजी “बहिष्कृत भारत” नावाचे नवे पाक्षिक सुरू करण्यात आले. काय समर्पक नाव उचललं बाबासाहेबानी बघा. बहिष्कृत, कोण तर आम्ही. अन कुठे तर भारतात. दोन वेगळे शब्द दोघांचे अर्थही वेगळे. या आधीचा पाक्षिक "मूकनायक". शब्दांची अशी अचुक निवड करायचे की सगळा सार त्यातुन ओझरत असे
भारतातील बहिष्कृतांची व्यथा सांगणारा हा जोडीदार आता बाबासाहेबांच्या साथीला उभा झाला होता. याच्या माध्यमातुन आता भारत देश गदागदा हलवुन सोडायचा होता. सर्वत्र होणा-या टिकेचा परामर्श घेणारा पहिला लेख झळकला.
“जो पर्यंत आम्ही हिंदु आहोत तो पर्यंत देवळात जाणे हा आमचा हक्क आहे. देवाचे
छत्रपती संभाजी महाराजांचा युद्धभूमीवरिल पराक्रम इथल्या पुरोहितशाहीने दडवून ठेवला तसच त्यांचे साहित्याच्या क्षेत्रातील योगदान सुद्धा दडवून ठेवण्याचे काम यांनी केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी युद्धभूमीवर जशी तलवार चालवली तसंच साहित्याच्या
क्षेत्रात सुद्धा वयाच्या १४व्या वर्षा पासून लेखणी चालविण्याचे काम केले आहे. संभाजी राजेंना पणजोबा मालोजीराजें पासून जसा तलवारीच्या पराक्रमाचा वारसा प्राप्त झाला तसाच भोसले कुळातून लेखणीचा वारसा प्राप्त झाला होता. शंभूराजेच्या साहित्याच्या क्षेत्रातील कार्याचा उल्लेख संत तुकाराम
महाराजांच्या शब्दात करावयाचा झाल्यास तो असा.
"आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे, यत्न करू, शब्दची अमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका, तुका म्हणे पहा, शब्दची हा देव, शब्दची गौरव, पूजा करू". संत तुकाराम महाराज व भोसले कुळाकडून छत्रपती संभाजी महाराजांना लेखणी व
फुले, शाहू, आंबेडकर यांचा महाराष्ट्र पुरोगामी आहे का??
आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, शहरामध्ये किंवा राज्यामध्ये आपण रोजच जातीवर आधारीत किंवा जातीमुळे झालेला गोर-गरिबांवर अन्याय पहात असतो. ह्या सगळ्याला जबाबदार आहे तो फक्त आणी फक्त सवर्ण समाज जो वर्ण व्यवस्थेला मानणारा आहे.
या निमित्ताने होत असलेल्या वादातून राज्यात ब्राह्मण विरुद्ध बहुजन किंवा इतर अशी विभागणी पुन्हा केली जाऊ लागली आहे. ब्राह्मणविरोधक म्हणजे पुरोगामी असा विचार रुजतो आहे. फुले-शाहू-आंबेडकर या महापुरुषांना हे पुरोगामित्व अपेक्षित होते का?या महापुरुषांची नावे घेणाऱ्या आजच्या
पुरोगाम्यांचा वर्तनव्यवहार, त्यांचे विचार-आचार खरोखरच पुरोगामी या संज्ञेस पात्र आहेत काय?
महाराष्ट्राला पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी असा वैचारिक वाद नवा नाही. जे सनातनी विचारांचे आहेत, ते प्रतिगामी आणि जे प्रगत विचारांचे आहेत ते पुरोगामी अशी या वादाची किंवा संघर्षांची सरळ वैचारिक
डॉ बाबासाहेब आंबेडकर - सामाजिक क्रांती, परिवर्तनाची नांदी.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचे चक्र भारतात गतिमान केले. त्यानिमित्त तीन प्रमुख संज्ञांचा विचार करणे आपल्याला क्रमप्राप्त आहे. 'समाज', 'क्रांती' आणि 'परिवर्तन'....
समाज ही संज्ञा लॅटिन भाषेतील 'सोशियस' म्हणजे
सहचर, सवंगडी यामधून घेतलेली आहे. समाज हा शब्द उच्चारला तरी त्याचा अर्थबोध होतो. स म्हणजे सर्व; संपूर्ण, मा म्हणजे मानव; माणूस, ज म्हणजे जमात; जाती आणि म्हणून 'समाज' म्हणजे सर्व मानव जमात होय. वेगळ्य़ा शब्दांत संपूर्ण मानव जातिसमूहाचे रूप 'समाज'. 'व्हॉइस ऑफ अमेरिका' या केंद्रावर
भाषण देताना डॉ. आंबेडकर म्हणाले होते, समाज म्हणजे परस्परपूरक अशा मानवाचा संघ होय. ते सर्व परस्परांच्या उपयोगी पडणे, हे कर्तव्य मानतात व त्याचप्रमाणो वागतात, अशा एकात्म लोकांचा संघ म्हणजे समाज. क्रांती म्हणजे आमूलाग्र बदल, परिवर्तन, चक्राकार फिरणे होय. क्रांतिकारक बदल म्हणजेच
१४ एप्रिल या सोनेरी दिवसाचे समाजाच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. देशातील कोट्यवधी दीनदुबळ्यांसाठी तसेच देशासाठी हा दिवस फार आनंददायी आहे. या दिवशी दिवसभर मोठ्या उत्साहाने खेड्यापाड्यांपासून ते दिल्लीपर्यंत, अगदी
जगभर म्हणलं तरी चालेल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. डॉ. आंबेडकरांनी उच्च शिक्षणासाठी म्हणजे एम.ए. पदवीसाठी २५ जुलै १९१३ रोजी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश केला. प्रो. सेलिग्मन यांच्या मार्गदर्शनाखाली जून १९१५ मध्ये एम.ए.ची पदवी संपादन केली.
ऑक्टोबर १९१६ मध्ये इंग्लंडमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स येथे एम.एस.सी. इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश केला. प्रो. कॅनन आणि सेडनी वेब यांच्या मार्गदर्शनाखाली १९२० मध्ये पदवी संपादन केली. पुढे १९२२-२३ मध्ये युनिव्हर्सिटी इन बॉन जर्मनीमध्ये डी.एस.सी. पदवीचा अभ्यास