बाळासाहेबांची शिवसेना कोणती हा विषय सुरू असताना सध्याची भाजपा अटलजींची भाजपा नाही हे सिद्ध झालं आहे. सत्तेला अन पदाला निर्लज्जपणे चिटकून राहण्यापेक्षा नैतिकतेला धरून राजीनामा देणारे अटलजी ज्या भाजपचे नेतृत्व करत होते ती भाजपा
आज सत्तेसाठी वाट्टेल ते काळे धंदे करत आहे हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून सिद्ध झालं.
देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी अन अहंकारामुळे आज महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची राष्ट्रीय पातळीवर नाचक्की होत आहे.
सुप्रीम कोर्टाने भाजपच्या काळ्या कारनाम्यावर ताशेरे ओढले तरीही निर्लज्जपणे सत्तेला चिटकून राहण्याचा निर्ढावलेपणा अटलजींच्या भाजपात नव्हता तो फडणवीस यांनी अमलात आणला. हा सगळा बाजार करून अजून एखादं वर्ष सत्ता हाती राहील, पण महाराष्ट्राने तुमचा कुटील, अनैतिक चेहरा पाहिला आहे.
आज वाजपेयी असते तर त्यांनी स्वतः स्थापन केलेली भाजपा बहिष्कृत केली असते. अवघ्या एका मताने सत्ता समोरून जाऊ दिली पण देशातील सर्वोच्च पदाचा त्याग करत असताना त्यांनी जराही अनैतिक मार्गांचा अवलंब केला नाही.
सुप्रीम कोर्ट म्हणतं की, जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता
तर सरकार परत आलं असतं. पण नैतिकतेची बुज राखत त्यांनी राजीनामा दिला म्हणून तर ते वेगळे ठरतात आणि कदाचित अटलजींनी घालून दिलेल्या आदर्शांवर चालतात हे सिद्ध होतं. नशिबाने मिळालेली खुर्ची तुमची कायमच्या मालकीची असत नाही,
त्या सत्तेला अन सत्तेच्या खुर्चीला त्याग करणं हे मोठेपणाचं लक्षण असतं. म्हणून तर 'मै ऐसी सत्ता को चिमटे से भी छुना पसंद नही करुंगा!' असं म्हणणाऱ्या अटलजींच्या भाजपचा आज देवेंद्रच्या भाजपाने पराभव केला! #MaharashtraPoliticalCrisis
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
आर्थिक संकट कधीच सांगून येत नसतं. अलीकडेच 2-3 जणांचे फोन आले होते त्यावरून एक गोष्ट फार आग्रहपूर्वक सांगावी लागते की गुंतवणूक कराच पण ती आपल्या गरजेनुसार करा! आर्थिक नियोजन काळाची गरज आहे. या जगात पैशाशिवाय काही होत नाही. मला आलेले तीनही फोन वेगवेगळ्या वर्गातील व्यक्तींचे होते.
1. एक गृहिणी आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्या Mutual Fund SIP करतात. त्यांचं कुटुंब सर्वसामान्य कुटुंबासारखंच एक आहे. नवरा-बायको दोघेही थोडंसं कमावतात. काळाची गरज ओळखून त्यांनी SIP केली होती. अलीकडेच सरांना काहीतरी आजार झाला अन तो बळावत गेला. बऱ्यापैकी खर्च झाला.
दुर्दैवाने हेल्थ इन्शुरन्स नव्हता. सर्व सेविंग संपली आणि शेवटी SIP ची रक्कमही काढून घ्यावी लागली.
2. दुसरा फोन होता एका मुलाचा! गेली सात वर्षे तो IT क्षेत्रात काम करतोय. काही महिन्यांपूर्वी त्याची नोकरी गेली.
🚩 राणे, राज वगैरे बंड झाल्यावर शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरेंकडे होती आणि एवढं डॅमेज होऊनही 2007 साली मुंबई महापालिकेत शिवसेनेला (सोबत भाजप लाही) विजय मिळवून दिली.
1/n
🚩 2012 साली आव्हानात्मक परिस्थिती असताना परत मुंबई महापालिकेत शिवसेनेला विजय मिळवून दिला. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला.
2/n
🚩शिवसेनाप्रमुख गेले! उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले. बाळासाहेब गेल्यानंतर मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा सगळेच शिवसेना संपवण्यासाठी आतुर होते. पण त्या परिस्थितीतही शिवसेनेला सांभाळलं.
3/n
तसं तर तुम्ही उद्धव ठाकरेंकडून सत्ता, त्यांची माणसं, पक्ष, चिन्ह हिरावून घेतलं. कुटुंबातील सदस्यांनाही विरोधात उभं केलं पण उद्धव ठाकरे अजूनही माणसात आहेत, माणुसकीत आहेत. कुठेही आदळआपट नाही की थयथयाट नाही.
सहा महिन्यांच्या प्रेमानंतर ती सोडून गेली की जीव सोडून रडणारे पोरं पण उद्धव ठाकरेंवर टीका करतात, पण सगळं काही गमावूनही हा माणूस कणखरपणे उभा आहे. कारण आत्मविश्वास! लोकांच्या मनात आपल्यासाठी खरं प्रेम आहे याची त्यांना शाश्वती आहे.
काहीही खोटा प्रचार झाला तरी आपलं काम आणि निष्ठेच्या आधारे लोकभावना दुरावणार नाही हा तो आत्मविश्वास! याउलट शेठचं आहे. एक साधी डॉक्युमेंटरी सुद्धा त्यांना विरोधात जाताना सहन झाली नाही. डॉक्युमेंटरी लागलीच बॅन केली अन त्या संस्थेवर धाडी टाकल्या.
रावण, कौरव, कंस असोत किंवा हिंदू पुराणांतील इतर खलनायक, त्यांना शेवटपर्यंत स्वतःच्या शक्तीचा अमर्याद अहंकार होता. त्या सर्वांना शेवटच्या श्वासापर्यंत एक घमेंड होता की मला कोणीच हरवू शकत नाही. पण आज त्यांचं नामोनिशाण नाही की त्यांचे कोणी समर्थक नाहीत.
पण ती वृत्ती अजूनही या भूतलावर आहे. ती कधी हिटलरच्या स्वरूपात असेल किंवा अन्य कोणी... या सर्वामध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे अगदी अंतिम लढाईपर्यंत या खलनायक वृत्तीचं पारडं जड असतं आणि शेवटच्या एका क्षणी त्यांचा अहंकार तुटतो... आणि सत्याचा विजय होतो!!!
बॅटमॅनच्या द डार्क नाईट राइसेस मध्ये गोथम शहरात अराजकता माजते आणि कैद्यांनाच न्यायालयात न्यायदात्याच्या भूमिकेत बसवलं जातं. हे खूप प्रतिकात्मक आहे. त्यातून इतकंच सांगायचं आहे की ज्यावेळी व्यवस्था बरबाद होते तेंव्हा न्यायालयेही भ्रष्ट होतात आणि चोरच न्यायाधीश बनतात.
आमचा एक मित्र होता ज्याचं एका मुलीवर खूप प्रेम होतं. तो सुरुवातीला तिच्या घरासमोर जाऊन राडा करायचा. बऱ्याचदा मुलीच्या वडिलांना तिचा हात मागितला. पण कर्तृत्व म्हणून त्याचं असं काहीच नव्हतं. त्याचं म्हणणं असं असायचं की आधी माझं लग्न लावून द्या मग मी तिला सुखी ठेवेन.
👇
पण कामधंदा काही नाही की जबाबदारीची जाणीव नाही. पण दिसायला एक नंबर होता. चौकात उभा राहिला की मुली त्याच्याकडे बघायला गर्दी करायच्या. पण फक्त चांगलं दिसतो या एका निकषावर मुलीचे वडील मुळीच ऐकणार नव्हते. मग त्याने सगळीकडून फिल्डिंग लावली पण फायदा झाला नाही.
👇
गल्लीतल्या जेष्ठ व्यक्तीकडूनही मार्गदर्शन घेतलं पण काही जमलं नाही. मग देवा नावाच्या त्याच्या मित्राने त्याला सांगितलं की हे राडे वगैरे बंद कर अन अगदी जंटलमेंटल बन. तू तिला पत्र, प्रेमपत्र लिहायला सुरू कर. मग त्याने एक चांगला लेखक पकडून छान पत्र वगैरे लिहायला सुरुवात केली.
👇
कोऱ्या कागदावर पेनाने शब्द लिहीत असताना मी रिक्त होत जातो. निवडक शब्दांचं हे बंड म्हणजे माझं व्यक्त होणं असतं. अडतीस पावलांवर असलेलं तुझं घर अन कैक प्रकाशवर्षे दूर वाटू लागतं. मी घराबाहेर पडतो, खूप धीर एकवटून बरंका; धडधडत असलेलं काळीज, जड पडलेले पाय अन कापणाऱ्या हातांनी...
केलेला तो प्रवास दिव्यत्वाची जाणीव करून देतो. मनातील वादळे, मेंदूतील गणिते सारं काही तुच्छ वाटू लागतं. तितक्यात वाऱ्याची एक झुळूक येते. माझ्या थरथरत्या हातातील पत्र उडून जातं. उंच उंच. मी बघतच राहतो! मला वाटतं ते तुझ्या बाल्कनीत जाऊन थेट तुला मिळेल, पण ते दुसरीकडे कुठेतरी जातं...
मी ते पत्र पुन्हा शोधत नाही. त्या पत्रासोबत विश्वासही कुठेतरी हरवलेला असतो. सांजसमयी मावळतीकडे पसरलेल्या लाल आभाळासारखं खिन्न झालेल्या माझ्या आयुष्याकडे बघत मला त्यातील सौंदर्य सापडतं. अंधार होण्यापूर्वीही सौंदर्य असतंच. पाखरांच्या आवाजाने भानावर येताच...