एक यशस्वी ट्रेडर बनण्याचा प्रवास वाटतो तितका सोपा नाही, कारण त्यासाठी आपल्याला स्वतःला बदलावं लागेल आणि ही जगातील सर्वात अवघड गोष्टींपैकी एक गोष्ट आहे.
मी आजच्या थ्रेडमध्ये बोलणार आहे माणसाचं वर्तन आणि ट्रेडरच्या मानसिकतेबद्दल, त्याच्या प्रवासाबद्दल…
आपण माणूस म्हणून तयार होत असताना आपली एका विशिष्ट प्रकारे जडणघडण होत असते आणि शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी एका विशिष्ट मानसिकतेची गरज असते. मात्र आपल्यात आणि शेअर मार्केटमध्ये एक विशिष्ट अंतर असतं आणि ते मानसिकतेशीच संबंधित आहे. आपल्याला ते समजलं तर ते कमी करणं सोपं जाईल
आपण लहानाचे मोठे होत असताना आपलं मन असंख्य गोष्टी-घटना पाहते. पहिल्यांदा एखादी गोष्ट घडली तर त्यावर प्रतिक्रिया द्यायचं काम आपलं चेतन मन करतं, मात्र एखादी घटना वारंवार घडत असेल तर त्यावर प्रतिक्रिया द्यायचं काम मात्र आपलं अचेतन मन करायला सुरुवात करतं.
उदा. आपल्याला रोजच्या रस्त्यावरुन गाडी चालवताना फार विचार करावा लागत नाही. कुठं वळायचं?, कुठे स्पीड वाढवायचं?, कुठे कमी करायचा?, अशा सगळ्या गोष्टी अचेतन मन करतं आणि आपल्या नकळत हे सगळं घडत असतं. एवढं योग्य पद्धतीने की कधीकधी आपल्यालाही आश्चर्य वाटतं.
आपल्या जगण्यात अशाप्रकारे एक पठडीबाजपणा तयार झालेला असतो. कुठली गोष्ट घडली तर त्यावर कशाप्रकारे व्यक्त व्हायचं हे ठरलेलं असतं. कधीकधी हे अशा क्रमानं घडतं की आपल्यालाही कळत नाही की असं का घडलं. कारण सोपं असतं आपल्या मनानं ते आधीच ठरवलेलं असतं आणि आपण एखाद्या मशिन्ससारखं वागतो.
आपलं मन नेहमी निश्चितता शोधण्याचा प्रयत्न करतं कारण त्यामुळे आपल्याला चांगलं वाटतं तसेच सुरक्षित सुद्धा वाटतं.
जिथं जिथं निश्चितचा असते तिथं तिथं आपलं अचेतन(auto pilot mode) मन कार्यान्वित होतं. आपण आपल्या रोजच्या ठरलेल्या गोष्टी त्याच पद्धचीने करत राहतो.
शेअर मार्केटमध्ये आल्यानंतर मात्र घोळ होतो. नवीन ट्रेडर जेव्हा मार्केटमध्ये येतो तेव्हा तो त्याची वरील सवय घेऊनच येतो. तो निश्चितता शोधण्याचा, मार्केटचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करतो मात्र काही कारणांमुळे त्याला शेअर मार्केटमध्ये यश येत नाही, तो वारंवार अपयशी ठरतो.
हे तोपर्यंत चालत राहतं जोपर्यंत त्याला कळत नाही मार्केट अनिश्चित आहे, आपण किंमत प्रेडिक्ट करु शकत नाही.
मार्केट सर्वोच्च आहे आणि आपण त्याला प्रेडिक्ट करु शकत नाही हे ज्याला कळतं तो त्या ट्रेडरच्या आयुष्यातला खरा सुवर्णक्षण!
एकदा का आपण हे समजलो की आपण माणूस म्हणून कसे वागतो आणि मार्केटमध्ये तशा प्रकारचं वागणं घातक आहे, मग आपला शोध सुरु होतो तो मार्केटमध्ये कसं वागलं पाहिजे यासाठी…
इथूनच तुमचा ट्रेडर म्हणून खरा प्रवास सुरु होतो जो तुमच्यासाठी सर्वकाही बदलून टाकणारा असतो!
ट्रेडरच्या आयुष्यातील पहिली पायरी- तो काहीच नसतो. त्याला ट्रेडिंगबद्दल काहीच माहीत नसतं. एवढंच काय तर अनेकांना आपल्याला काय माहीत आहे हेसुद्धा माहीत नसतं. याच काळात तो ट्रेडिंगला सोपं समजण्याची चूक करतो आणि आपण कशाला महत्त्व दिलं पाहिजे याकडे सपशेल दुर्लक्ष करतो.
दुसरी पायरी- त्याला कळून चुकतं की ट्रेडिंग हा सोपा गेम नाही. तो हे कबूल करतो की मला काहीच माहीत नाही, मग तो ट्रेडिंगबद्द्लच्या विविध गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो. यूट्यूबवर व्हिडीओ पाहा, ब्लॅाग वाच, ट्विटरवर थ्रेड वाच, मेंटॅार शोध, पेड कोर्स कर… अशा गोष्टी तो करायला लागतो.
तो जसजसं ज्ञान मिळवायला लागतो तसतसं त्याला कळतं की आपल्याला एक सिस्टम हवीय जिला चांगली धार(edge) असेल, पण ती कशी तयार करायची हे त्याला ठावुक नसतं. तो एका सिस्टमवरुन दुसऱ्या… तिसऱ्या… अशा उड्या मारतो. जी त्याला हवे तसे रिझल्ट देईल,मात्र आतापर्यंत तो सायकोलॅाजीबद्दल अनभिज्ञ असतो
तिसरी पायरी-शेवटी त्याला कळतं की स्टॅटेजी स्ट्रॅटेजी करुन उपयोग नाही. आपल्याला स्वतःवर काम केलं पाहिजे. योग्य मानसिकता नसेल तर चांगली स्ट्रॅटेजी सुद्धा आपण व्यवस्थित चालवू शकत नाही. मग तो सायकोलॅाजीवर काम करायला सुरुवात करतो. प्रत्येक यशस्वी ट्रेडरच्या आयुष्यात हा प्रसंग येतोच.
चौथी पायरी- यामध्ये ट्रेडरकडे स्वतःची एक स्ट्रॅटेजी असते, तो त्यावर काम सुरु करतो. स्वतःवर काम करतो. ती स्ट्रॅटेजी समजून घेऊन स्वतःला त्यावर योग्य प्रकारे व्यक्त व्हायला शिकतो. थोडक्यात सिस्टमसोबत स्वतःला ट्यून करतो, अर्थात सायकोलॅाजीवर काम केल्यामुळेच हे शक्य होतं.
पाचवी पायरी- आता वरील सर्व प्रक्रिया त्याच्या अचेतन मनात पक्की झालेली असते. सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे रोजच्या रस्त्यावर कार चालवल्याप्रमाणे तो सिस्टम फॅालो करतो. त्याच्या वागण्यात हाव नसते ना भीती. तोट्याचं त्याला काही वाटत नाही, कारण त्याचा त्याच्या सिस्टमवर विश्वास असतो.
एक लक्षात घ्या मी सांगितलेलं वर सांगितलेल्या प्रकारेच घडेल असं नाही. ट्रेडिंग हा एक अनिश्चिततेचा गेम आहे आणि तुम्ही तुमच्या सायकोलॅाजीवर कशा प्रकारे काम करता यावरच तुमचं प्रॅाफिटेबल राहणं अवलंबून आहे.
शेवटी या खेळात तुम्ही तुमचे तारणहार आहात!
मी सांगत असलेली माहिती आवडत असेल तर मुख्य ट्विटला लाईक, रिट्विट करा…
ट्रेडिंग संबंधी माझ्या सर्व पोस्ट मिळवण्यासाठी पुढील टेलिग्राम चॅनेल जॅाईन करा- t.me/krishnavarpetr…
ट्रेडिंगमध्ये तुमचे मन तुमचा सर्वात चांगला मित्र बनू शकते किंवा तुमचा सर्वात भयंकर शत्रू…. तुम्ही जर तुमच्या मनाला व्यस्वस्थित ट्रेन केलं नाही तर तुमचं मन हा ट्रेडिंगमधला तुमचा सर्वात मोठा शत्रु असतो.
खालील पोलचा निकाल पाहून मला खूपच आश्चर्य वाटलं. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक नियम पाळू म्हणतायेत खरं, पण ते तेवढं सोप्पं आहे का?, तर निश्चितच नाही. नियम पाळू म्हणणं आणि ट्रेड घेतलेला असताना ते तंतोतंत पाळणं, यात जमीन-आस्मानचं अंतर आहे. तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो, ते नीट वाचा-… twitter.com/i/web/status/1…
एका दिवसात साडेपाच लाख रुपये गमावलेल्या मित्राची गोष्ट मी तुम्हाला मागे एका थ्रेडमधे सांगितली होती. तर त्याच ट्रेडर मित्राला त्यानंतर २ सोपे नियम दिले होते.
तुम्ही खालील गोष्ट फक्त काळजीपूर्वक वाचा-
…तर त्या मित्राला फक्त दोन नियम दिले होते-
पहिला नियम- कॅपिटलनुसार कुठल्याही वेळी बॅंकनिफ्टीमध्ये फक्त ७५ क्वांटिटी घ्यायची.
दुसरा नियम- दिवसाचा जास्तीत जास्त लॅास दहा हजार रुपयांपेक्षा जास्त नको.