गरुड पक्षी ज्याला आपण गरुड किंवा शाहीनसुद्धा म्हणतो.
ज्या वयात इतर पक्ष्यांची पिल्ल आवाज करायला शिकतात त्या वयात मादी गरुड तिची पिल्ल पंजामध्ये पकडते आणि उंच उडते.
इतर कुणालाही पक्ष्यांच्या जगात असे कठोर आणि घट्ट प्रशिक्षण नसते.
मादी गरुड तिच्या पिल्लाला सुमारे 12 कि.मी. वरपर्यंत नेते.
जेवढ्या वर विमान उडत असते एवढ्या वर जाण्यास मादी गरुड ७/८ मिनट घेते.
येथून त्या चिमुरड्या पिल्लाची कठोर परीक्षा सुरू होते.
त्याला येथे सांगितले जाते आपण कशासाठी जन्माला आलो आहोत?
आपले जग काय आहे? आपली उंची किती आहे?
आणि नंतर मादी गरुड आपल्या पंजातून त्या पिल्लाला खाली सोडते.
वरुन खाली पडत असताना 2 कि.मी. अंतरानंतर खाली येताना, त्या पिल्लाला कळतच नाही की त्याच्या बरोबर काय घडतं आहे.
अंदाजे 7 किमी च्या अंतरानंतर पिल्लाचे पंख हळू हळु उघडण्यास सुरुवात होते.
सुमारे 9 किमी अंतरावर त्यांचे पंख आगमनानंतर पूर्णपणे उघडले जातात.
जीवनाचा हा पहिला टप्पा असतो जेव्हा पिल्लू आपले पंख फडफडू लागतो.
आता ते पिल्लू जमिनीपासून फक्त सुमारे 3000 मीटर अंतरावर आहे, परंतु अद्याप त्याने पूर्णपणे उड्डाण करणे शिकलेले नाही.
आता तो पृथ्वीच्या अगदी जवळ येतो आहे
आता त्याचे अंतर पृथ्वीपासून फक्त 700/800 मीटर अंतरावर आहे.
परंतु त्याचे पंख अद्याप इतके मजबूत झाले नाहीत की, तो उडू शकेल.
पृथ्वीपासून सुमारे /०० मीटर अंतरावर, त्याला आता असे वाटले आहे की, कदाचित हा त्याच्या जीवनाचा शेवटचा प्रवास आहे.
मग अचानक एक पंजा त्याला पकडतो
हा पंजा त्याच्या आईचा आहे, जी त्याच्या उजवीकडे उडत असते.
आणि उडण शिकल्याशिवाय त्याचे प्रशिक्षण सतत चालू राहते.
हे प्रशिक्षण कमांडोसारखे आहे, तेव्हा जाऊन जगाला 'गरुड'(बाज) मिळतो. आणि तो गरुड नंतर आपल्यापेक्षा दहापट जास्त वजन असलेल्या प्राण्याचीसुद्धा शिकार करतो.
हिंदीमध्ये एक म्हण आहे ... "बाज के बच्चे मुंडेरो पर नहीं उड़ते ..."
नक्कीच, आपल्या मुलांना आपल्याशी जवळीक ठेवा, जगाच्या समस्या त्यांच्या समस्यांसमोर आणा त्यांना लढायला शिकवा.
त्यांना गरज नसतानाही संघर्ष करण्यास शिकवा.
आजच्या वर्तमान सुविधा आणि आई-वडिलांनी केलेल्या लाडकाची सवय
यामुळे आपल्या मुलांना "ब्रॉयलर कोंबडी" सारखे बनविले आहे.
ज्यांचे पाय मजबूत आहेत परंतु चालु शकत नाही. पंख वजनदार आहेत पण उडू शकत नाही.
कुंडीत असणार रोपट आणि जमिनीवरील रोपट ह्यात खूप फरक असतो.
पालकांनो, आपल्या मुलांना नरम नाही कठोर बनवा.
शस्त्रे आणि धर्मशास्त्र दोन्ही शिक्षा द्या, हेच आपले प्रथम कर्तव्य आहे.
एअर कंडीशनर मध्ये बसायला तेव्हाच द्या जेव्हा तो उष्णतेमध्ये राहू शकेल.
वाहनाची चावी तेव्हाच द्या जेव्हा तो कित्येक किलोमीटर चालताना कंटाळणार नाही.
मारुती हे नाव सगळयाना माहीत आहे पण मारुती नावाचा अर्थ खूप महान आणि गहन विषय आहे.
मा- म्हणजे मारुत.
मारुत - पवन किंवा वारा. महर्षी कश्यप यांचे 49 पुत्र जे अत्यंत बलवान होते. त्रिखंडात वारा आणि हवा पोहोचविण्याचे काम हे त्यांचेच.
त्या 49 मारुतांची शक्ती एकट्या अंजनी पुत्रा मध्ये सामावलेली आहे.
दुसऱ्या बाजूने
मा- म्हणजे माधव, देव विष्णू.
रु - म्हणजे रुद्र. देव शिवशंकर
ती मध्ये
त - सत तत मधील त म्हणजे देव ब्रह्मदेव.
आता ती च्या वेलांटी बद्दल
ती मधली त + इ =ती
इ = गौरी+सरस्वती+लक्ष्मी= "शक्ती" त्यातील ती
त्रिदेव आणि त्रिदेवी , 49 मारुत , अष्ट दिगपाल सहित प्रभू श्री रामाच्या पाच अवतारांची शक्ती, महान शिवभक्त माता अंजना आणि महा बलशाली राजा केसरी यांची शक्ती, सर्व ऋषी महर्षींचा आशीर्वाद. असा सर्वाचा समावेश असलेली महान शक्ती म्हणजे मारुती.
हे सर्व शास्त्राच्या आधारे आहे.
एक राजाला चार राण्या होत्या.
पहिली राणी इतकी सुंदर होती, कि तो तिला प्रेमाने बघतच रहायचा.
❕दुसरी राणी इतकी सुंदर होती की, तिला तो सतत जवळ घेऊन बसायचा!
❕तिसरी राणी इतकी सुंदर होती कि, तिला कायम बरोबर घेऊन फिरायचा .
❕पण चौथ्या राणीकडे तो कधीच लक्ष द्यायचा नाही !!!
❕राजा म्हातारा झाला, तो मरणासन्न अवस्थेत असताना त्याने पहिल्या राणीला बोलावले आणि म्हणाला,
"मी तुला एवढे प्रेम दिले, तू माझ्याबरोबर येशील का?"
❕राणी म्हणाली "नाही, मी तुम्हाला इथेच सोडून देणार आहे."
❕राजाला दुखः झाले. मग त्याने दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला राणी म्हणाली,
"मी तुमच्याबरोबर स्मशानापर्यंत येईन. त्यापुढे नाही.
❕राजाला अपार दुखः झालं, त्याने आशेने तिसऱ्या राणीला विचारले,
"तू तरी माझ्याबरोबर येशील का नाही ?
१) आपण सर्व हिंदू आहोत !
२) आपला वर्षारंभ शालिवाहन शक प्रमाणे आहे !
३) आपण तिथी प्रमाण मानतो !
४) तिथी हे कालक्रमण सत्य माप आहे !
५) तिथी अनादी काळ दर्शवते !
६) सृष्टी ही प्रवाहरूप अनादी आहे !
७) कालक्रमण हे ब्रह्मदेवा पासून आहे !
८) सध्या ब्रह्मदेव ५३ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत !
९) ५२ वर्षे, १३ घटका, ४२ पळ, ३ अक्षरं हे त्याचं वय आहे !
१०) आता आपण वराह कल्पात आहोत !
११) या कल्पातील ७ व्या मन्वंतरात आहोत !
१२) ७ व्या मन्वंतरातील २८ व्या युगात आहोत !
१३) २८ व्या युगातील कलियुगात आहोत !
१४) कलियुगाच्या तिसऱ्या शालिवाहन शकात आहोत !
१५) शालिवाहनाच्या १९४४ व्या वर्षात आहोत !
१६) शके १९४४ वर्ष दि. २१.०३.२०२२ ला संपणार आहे !
१७) गुढीपाडव्याला शके १९४५ वर्ष चालू होणार आहे !
१८) कालक्रमण हे सृष्टी उत्पत्ती माप आहे .
१९) हे माप इंग्रजांना माहित नव्हतं !
लग्न पूर्ण ठरेपर्यंत
स्पर्शाचा गंधही नव्हता..
नुकत्याच ठरलेल्या लग्नाला
स्पर्श मंद मंद स्पर्शत होता ..
जातायेता वाऱ्याने उडलेला पदर
गुदगुल्या करायचा ..
चहाच्या कपाची देवाणघेवाण
हळूच बोट धरायचा .
रस्त्याने चालताना समोरून येणारी गाडी
खांदा धरायला भाग पाडायची
ती रुतलेली बोट
काळजापर्यंत भिडायची ..
हॉटेलमधे समोरासमोर बसल्यावर
नजरेला नजर स्पर्श करायची ..
टेबलाखाली लपलेली पावलही
अडसर दूर करुन पावलाला बिलगायची ..
मोगऱ्याच्या गजऱ्याचा सुगंध
केसांनाही स्पर्शुन जायचा ..
मानेवर ओघळलेल्या फुलाला नव्हे मानेला
हात लावण्याचा मोह व्हायचा ..
वाऱ्याने उडलेल पान
हळूच गालावर पडायच ..
पान सुकलेल असल तरी
त्या दोघांच प्रेम हिरवागार व्हायच ..
तरल कोमल अशा भावनांनाच
स्पर्शाच भान होत ..
कळतनकळत एकरूप होण्याच
अनावर स्वप्न होत.
हळूहळू जोपासलेल्या या नात्याला
एकमेकांच्या संमतीची साथ होती.
संध्येतील भगवान विष्णूंच्या केशव नावाच्या (२४ पैकी एक) शिल्पाचा परिचय
१) केशवाय नम
कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना, आचमन करतात. विष्णूंची केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः पहिली तीन नांवे घेताना, डाव्या हातातील पळीने उजव्या हातात पाणी घेऊन,
प्राशन केले जाते व गोविंदाय नमः च्या वेळी ताम्हनात सोडले जाते.नंतर बाकीची २० नांवे म्हणताना हात जोडुन नमस्कार स्थितीत ठेवले जाते याला आचमन करणे म्हणतात. आचमनाने शरीर शुध्द होते.
यातील पहिले नांव ॐ केशवाय नमः असे आहे.
विष्णू सहस्रनामातील २३ वे व ६४८ वे नांव केशव आहे.
भगवत् गीतेत दुस-या, तिस-या व दहाव्या अध्यायात अर्जुनाने श्रीकृष्णांचा, केशव म्हणुन उल्लेख केल्याचा पहायला मिळतो.
आकाशात् पतितं तोयम् ,
यथा गच्छती सागरम् ।
सर्व देव नमस्कार :
केशवं प्रतिगच्छति ॥
एखादा माणूस माझ्या मनातून उतरला की, मी आयुष्यभर त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नाही.. ह्या अश्या स्वतःच्या ग्रेट स्वभावाचा काही लोकांना प्रचंड गर्व असतो, म्हणूनच हा मेसेज मला सगळ्यांबरोबर शेअर करावासा वाटला..
कधी तरी निवांत बसून आयुष्यात येऊन गेलेल्या आणि दुरावलेल्या
नात्यांचा डोळसपणे अभ्यास केला की, लक्षात येतं की, असे अनेकजण ज्यांनी "आपल्याला दुखावलं" म्हणून आपल्या आयुष्यातून आपण त्यांना
वजा केलं होतं ते अनेकदा समर्थनीय नव्हतंच !
भावना दुखावल्या, असं म्हणत आपण आपल्या अहंकाराला विनाकारण जोपासत बसलो..
आणि सोन्यासारखी माणसं आपल्या प्रतिक्षेला कंटाळून आपापल्या मार्गे निघूनही गेली.
त्यांची एखादी कृती, चूक हा जणूकाही जन्म-मरणाचा प्रश्न बनवून ती हकनाक आपल्या अहंकाराची बळी कधी झाली, हे कळलंच नाही.
आपण जसे जसे परिपक्व होत जातो तसं तसं लक्षात येतं की,