विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांच्यासह कुस्तीपटूंचं जंतरमंतवर सुरू असलेलं आंदोलन दिल्ली पोलिसांनी पूर्णपणे हटवलं आहे. गेले 36 दिवस हे आंदोलन सुरू होतं. आंदोलक कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 1/n
विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह आंदोलक कुस्तीपटू जंतर-मंतरहून नव्या संसदेच्या दिशेने जात असताना पोलीस आणि त्यांच्यात झटापट झाली. 2/n
नव्या संसदेसमोर 'महिला सन्मान महापंचायत' आयोजित करण्याचा आंदोलक कुस्तीपटूंचा प्रयत्न होता. 3/n
'सर्व कुस्तीपटू तसंच वृद्ध महिलांना अटक केल्यानंतर आता पोलिसांनी जंतर-मंतरवरील आमचे तंबू काढून टाकायला सुरुवात केली आहे. तंबूमध्ये असलेल्या आमच्या वस्तूही घेतल्या जात आहेत. ही काय गुंडशाही आहे?' असं ट्वीट साक्षी मलिकने केलं आहे. 4/n
'खेळाडूंचा आदर करतो. पण नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यात आम्ही कोणत्याही स्वरुपाचा अडथळा येऊ देणार नाही,' असं दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी सांगितलं. 5/n
नव्या संसदेबाहेर आंदोलक कुस्तीपटूंनी महिला सन्मान महापंचायतीचं आयोजन केलं होतं. यासाठी हरयाणा इथून मोठ्या प्रमाणावर समर्थक येण्याची शक्यता होती. मात्र नव्या संसदेच्या उद्घाटनच्या सुरक्षिततेचं कारण देत या सगळ्यांना सीमेवरच रोखण्यात आलं.
फोटो - Getty Images | 28 मे 2023
n/n
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh