आज प्रत्यक्ष #स्वामी वाचताना एक वेगळाच अनुभव येत होता. माधवराव पेशवे, त्यांच्या पत्नी रमाबाई, गोपिकाबाई, आनंदीबाई, राघोबा, पार्वतीबाई, नारायणराव या अशा पेशवे घराण्यातील व्यक्तींना स्वतंत्र व्यक्ति म्हणुन चित्रित केले आहे. (2/12)
त्यातल्या त्यात राघोबादादांच्या व्यक्तिरेखेचे वर्णन अगदी नेमकेपणाने केले आहे.
शनिवारवाडा, पुणे, थेउर, कर्नाटक प्रांत, महाराष्ट्र, तसेच उत्तरेकडचे असे कितीतरी स्थळ चित्र डोळ्यासमोर फिरत होती आणि जे काही वाचत आहे ते प्रत्यक्ष आपल्या समोर घडत आहे असेच वाटत होते. (3/12)
वयाच्या १७ व्या वर्षी पेशवेपद माधवराव यांच्या अंगावर पडले आणि ते त्यांनी त्यांच्या कुवतीपेक्षा जास्त निभावले. पानिपतच्या लढाई नंतर संपूर्ण पेशवे कुटुंबियांना सांभाळून घेत कामकाज चालू ठेवले. #स्वामी ही एक ऐतिहासिक कादंबरी आहे. (4/12)
लेखकाने संवादाने प्रत्येक प्रसंग जिवंत असे उभे केले आहेत. लेखकाची भाषाशैली तसेच प्रसंगाचे वर्णन आपल्याला त्या काळात नक्कीच घेऊन जातो.
अतिशय कमी आयुष्य लाभलेल्या माधवराव पेशवे यांची कहाणी वेगळीच आहे. जास्तीत जास्त सक्रिय लढाया अधिक परगावी मोहिमा आणि कौटुंबिक कलह, (5/12)
त्यांचे यश आणि पती-पत्नीचे प्रेम, अशा विविधरंगी आणि विविधांगी अंगाने ही कादंबरी सरकत जाते.
कादंबरी वाचताना माधवरावांचे पात्र आपल्या समोर येते ते म्हणजे कडक शिस्त, दक्षता, कारभाराकडे लक्ष देणे, असे त्यांचे गुण प्रकट होतात. रघुनाथराव (राघोबा दादा) आणि निजाम, (6/12)
हैदर आणि इंग्रज यांसारख्या शक्तींशी लढताना त्यांची कर्तबगारी या कादंबरीत वाचायला मिळते.
माधवराव स्वतःच्या लोकांशी आणि परकीयांशी यशस्वीपणे लढत असताना हा तरुण पेशवा क्षयरोगाने ग्रस्त होतो आणि इथूनच त्याचा शेवटचा प्रवास सुरू होतो. पण तिथेही त्यांना जोडीदार सापडतो. होय, (7/12)
त्यांची पत्नी रमाबाई.
स्वामीकारांनी रेखाटलेला तो जीवन प्रसंग अक्षरशः आपल्या काळजाला चटका लावून जातो. पती-पत्नीच्या अविरत प्रेमाचा एक मतीगूंग करणारा अविष्कार, प्रेमाची एक वेगळी अनुभूती, निरागस प्रेम, (8/12)
कडवा चरित्रवान शिस्तप्रिय द्रष्टा प्रशासक आणि निष्ठावंत गणेश भक्त “श्रीमंत माधवराव पेशवे यांचे जीवनचरित्र म्हणजेच “#स्वामी “.
थोरले माधवराव पेशवे यांचे राजकीय जीवन, कर्तुत्व आणि त्यांचे वैयक्तिक जीवन यांचे अतिशय प्रभावी चित्रण या पुस्तकात आहे. (9/12)
हे पुस्तक वाचून थोरले माधवराव पेशव्यांच्या आयुष्याबद्दल माहिती मिळते. ज्या माणसाने मराठा साम्राज्य पानिपतच्या युद्धानंतर पुनरूज्जीवीत केले त्याची ही जीवनगाथा आहे. पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर मराठा साम्राज्य कसे होते व कसे फ्क्त ११ वर्षात पूर्ण प्रदेश परत जिंकला, (10/12)
हे ह्या कादंबरीतून कळते किंबहुना ज्या माणसा मुळे हे शक्य झाले त्याच्याबद्दल जास्त कळते. उत्तर भारतापेक्षा, दाक्षिणातल्या मोहिमांची जास्त माहिती मिळते. प्रत्येक मराठी माणसाने वाचावे असे हे पुस्तक आहे. (11/12)
सबंध कादंबरी ही ऐतिहासिक म्हणून वाचली जाते परंतु शेवटची पाने खूप भावनिक आहेत. रमाबाई आणि माधवराव यांचे नातेसंबंध हा या पुस्तकाचा उच्चांक आहे. हे पुस्तक वाचताना इतिहासाची कल्पना येण्यास मदत होते. (12/12)
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
सुधा मूर्ती ह्या फक्त ज्ञानाचं नव्हे तर अनुभवांचेही भंडार आहेत.
पुस्तकातील कथा #सुधामूर्ती यांच्या आयुष्यात घडलेल्या खऱ्या घटना आहेत. त्यांची पुस्तक ही अतिशय बोलकी असतात. कोणीतरी आपल्याला खरच गोष्टी सांगत आहे, असंच वाटतं. मुळात त्यांच्या गोष्टी ह्या कथा नसून, (2/11)
त्यांच्या आयुष्यातील अनुभव त्या गोष्टी स्वरुपात सांगतात.
या पुस्तकात त्यांनी स्वतःच्या विद्यार्थ्यांचे, आजी -आजोबांचे, स्वतःचे पती व इन्फोसिसचे फाउंडर आणि चेअरपर्सन नारायण मूर्ती, (3/11)
• पुस्तकाचा क्रमांक कमेंटमध्ये लिहून पुस्तकाची नोंदणी करणे
आवश्यक आहे
• पुस्तकासोबत दिलेली किंमत MRP असेल.
• पुस्तकांच्या मुबलक प्रती उपलब्ध असल्या तरी सर्वात आधी कमेंट करणाऱ्या व्यक्तीस प्राधान्य दिले जाईल.
• खरेदीप्रमाणे टपाल खर्च वेगळा आकारण्यात येईल.
• कंपनीचे अधिकृत फेसबुक पेज Pustakwala and Company आणि अधिकृत फेसबुक अकाऊंट
Pustakwala's या दोन्ही ठिकाणी यादी उपलब्ध असेल.
इतर पुस्तकांसाठी आमच्या संकेतस्थळाला भेट देत राहा: pustakwalas.com
अधिक माहितीसाठी संपर्क: 8624977029
फाजलखान ह्यांना मराठी अस्मितेने दिलेल्या लढ्याची परीक्षा आहे. घोडखिंडीला आपल्या रक्ताने पावन करून पावनखिंड करणाऱ्या मावळ्यांच्या अखंड जयघोषाची ही गाथा आहे.
लेखकांने आपल्या लेखन शैलीने कादंबरीत जीव ओतला आहे. कादंबरीतील पात्र, घटना आपल्या भोवती फिरत आहेत असंच जाणवत राहते. (2/14)
अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक गुणवैशिष्ट्ये दाखवून दिली आहेत. दूरदृष्टी, मावळ्यांबद्दल असणारा जिव्हाळा - आपुलकी, स्वराज्य निष्ठा, स्त्रियांप्रती आदरभाव असे महाराजांचे अनेक पैलू उलगडले आहेत. (3/14)