१) राहुल गांधी म्हणजे कोण ? जेव्हा तुम्हाला कुणी अस विचारेल तेव्हा त्याला हे सांगा.!
― आपल्या विचारावर, तत्वावर, निर्णयांवर ठाम राहणारा माणूस. कितीही संकट, अपयश आली तरी हार मानली नाही. झुकला नाही, अनेक जवळच्यानीं साथ सोडली.
( पुढे वाचा. )👇
२) कुटूंबाची व स्वतःची घाणेरडी बदनामी केली तरीही डगमगला नाही. सोशल मीडियाद्वारे त्यांचं भ्रामक व खोटं चित्र तयार केलं.
ज्यात राहुल म्हणजे मोठ्या घरचा अय्याश पोरगा, जो कधी माणसात गेला नाही, ज्याला लोकनेतृत्व कळत नाही. आणि इतर व्यक्तीगत आरोप, चरित्रावर किळसवाणी चिखलफेक, 👇
३) असे सर्व हल्ले परतवुन 'राहुल राजीव गांधी' धीरोदात्त महानायकाप्रमाणे पाय रोवून उभा आहे, तेही रणभेरी वातावरणात न घाबरता.
ताणतणाव समोर असताना, पार्टी खोल दरीत असताना सुद्धा हा माणूस संयमी मुद्रेत, आपल्या मुखावर हलकंस स्मितहास्य करतो. ते बेजबाबदार किंवा अजाण म्हणून नाही.👇
४) राहुल गांधीना ठाऊक आहे, संकटांची रात्र भीषण अंधाराची आहे. पण काही काळ लोटला की सूर्य आपल्या प्रकाश'रथाला पुढे सरसावत यशोकिरणांची चौफेर उधळण करतो.
हा ठाम विश्वास त्याना कधी अंतर्मनातुन सैरभैर होऊ देत नाही. शेवटी आशावाद आणि उमेदच माणसाला जगण्याची अमोघ शक्ती देतात. 👇
५) राहुलजींना आपल्या राजकीय जीवनात आव्हानं भरपूर आहेत, तशा संधीही भरपूर आहेत, अन वेळोवेळी राहुल त्याच सोन करीत आहेत.
पण घोड कुठं अडत ? ते त्याना साथ देणाऱ्या लोकांच्या विश्वासघातामुळे, कारण
जी लालची लोक सत्ता असताना, सत्तेची, मंत्रीपदाची शेखी मिरवत होते. 👇
६) तीच लोक सत्ता पलटणार, अशी चिन्हे दिसू लागताच क्षणात पलटली. काही बाहेर गेली, काहींनी आत राहून काँग्रेसच्या बुरजाला स्फोटके लावली, काहींना दमदाटी करून उचलल, काहींना लक्ष्मीदर्शनाच्या लालसेने.
अशा परिस्थितीत लोक भराभरा निघू जात होती, काँग्रेस कार्यालयात दिसणारी गर्दी ओसरली. 👇
७) आता ती सत्ताद्वारासमोर बांधलेल्या रांजणात इमानेइतबारे पाणी भरत आहेत.
अशा सर्व अनुचित, अनपेक्षित, वातावरणात राहुल गांधी हे शांतपणे वावरत आहेत.
पार्टीला मजबूत करण्याच्या दृष्टीने नाना तर्हेचे यत्न करीत आहेत, ते केवळ पंतप्रधानदाच्या अभिलाषेसाठी नव्हे, त्यामागे उघड जनहित आहे. 👇
९) आधी आजीची आणि नंतर वडिलांची निर्घृण हत्या झाल्यानंतर, राहुल तेव्हा खचले नाही, आणि आताही खचण्याचा प्रश्नच नाही, कारण त्यांचा पिंड हा देशासाठी लढण्याचा, जगण्या-मरण्याचा आहे, त्यांचे पणजोबा देशासाठी तुरुंगात गेले होते, अन त्यांची आजी इंग्रजाविरोधात आंदोलन करत होत्या.
१०) त्यामुळे, जगावरचा सूर्य मावळत नाही अशां ब्रिटिशांना घाबरले नाही, आणि ह्या काल परवा आलेल्या मनुवादी संघी लोकांना काय घाबरणार..!
भाजपची नेते घमेंड मारत सांगतात, आमच्या लेखी राहुल कस्पटासमान आहे, जर किंमतच देत नसाल तर, मग रोज पत्रकार परिषद घेऊन राहुल नावाचं भजन कशाला.? 👇
११) त्यांची भीती स्पष्ट आहे, एकटा राहुल अफाट बहुमताच्या सत्तेला घाम फोडतो.
राहुलजीनी, देशावर येणाऱ्या प्रत्येक संकटाविषयी सरकारला सूचना केली. पण त्यानी आपल्या अहंकारापोटी त्या सुचनाना केराची टोपली दाखवली अन कोरोना, नोटबंदी, GST, किसान कायदे यात झालेला सत्यानाश समोर आहेच..👇
१२) ज्या नेत्याला देशाच्या विकासाची, राष्ट्रीय एकात्मतेचि, अखंडतेचि ज्याला चिंता आहे, असा उच्चशिक्षित, सुसंस्कृत, व्यक्ती जर पंतप्रधान झाला तर भारताच भविष्य नक्कीच लख्ख चमकणाऱ्या हिऱ्याप्रमाणे असेल.
#Thread
आजच्या शिवसेना राज्यव्यापी पदाधिकारी कार्यक्रमात सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे भाषण -
आपल्या घरात येवून फोडाफोडी करताहेत म्हणून त्यांना अफजल खानाची फाैज २०१४ मध्ये म्हटलो होतो. सत्तेची मस्ती हा फुगा आहे. मस्ती दाखवायची असेल तर मणीपुरमध्ये जावून दाखवा. 👇
विश्वगुरू मोदी विकत घेतलेल्या लोकांसमोर ज्ञान पाजाळता. रशिया युक्रेनचे युद्ध थांबवल्याच्या भाकड कथा सांगण्यापेक्षा एकदा मणीपुरमध्ये जावून दाखवा.
अयोद्ध्यावर शाईफेक झाली. यापुढे महिला भगिनींवर हात उठले तर यापुढे जागेवर ठेवू नका. हे गद्दार विचारांचे वारसदार नाही.
हे काही पहिले आव्हान नाही. आणिबाणी आजही आठवते. जनतापक्षाची लाठ आली होती. आठ दहा असले तरी चालतील पण निष्ठावान आहे. गद्दारांच्या फाैजेचे नेतृत्व करण्यापेक्षा मुठभर निष्ठावानांचे नेतृत्व कधीही चांगले.
#Thread
आदिपूरुष सिनेमा बद्दल अनेक लोकांच्या टिप्पणी पाहिल्या. दिग्दर्शक, कथाकार, याना जरा सुद्धा भान नाही का ते कोणावर चित्रपट बनवत आहेत.! राम-सीता, लक्ष्मण, हनुमान ही भारतीय समाजाची आराध्य दैवत आहेत. अतिशय सुमार संवाद, VFX दळभद्री, कलाकार छपरी,
यापेक्षा ती जुनी रामायण लाख भारी
जुन्या रामायण मालिकेत अरुण गोविल यांनी 'प्रभु रामांची जी भुमिका केली ती अजरामर आहे.!
मात्र आजकालच्या चित्रपटात देवाच्या आणि महापुरुषांच्या भूमिकेसाठी जे पात्र निवडले जातात, त्यांचे चेहरे-हावभाव आणि सुमार अभिनय गुण पाहून ते अभिनेते, या थोर भुमीकांच्या अतीशय विरोधात वाटतात. 👇
अरुण गोविल यांनी साकारलेला राम पाहून जनतेला प्रभु राम म्हटलं की हेच राम डोळ्यासमोर प्रकट होतात. हे सर्व त्या भूमिकेसाठी केलेले प्रयत्न नाही तर भगिरथी तपश्चर्याच म्हणावी लागेल, त्या कलेची साधना -आणि आराधना करण्यात अरुणजीना पूर्णपणे यश आले.अन त्यानेच ते आज अजरामर अभिनेते आहेत. 👇
देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र भाजपचे तब्बल 105 आमदार निवडून आणले.! भाजपसाठी एवढं करूनही भाजपने 40 आमदार वाल्या फुटीर नेत्याला मुख्यमंत्रीपद दिल, आणि फडणवीसांना काय दिल.? तर उपमुख्यमंत्री पदावर बोळवण करून डोक्यावर 5- 6 मोठंमोठ्या मंत्रिपदाचा जड असा कार्यभार दिला.
2014 नंतर प्रगटलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदी विराजमान झाले, अमी फडणवीस साहेबानी मुख्यमंत्री झाल्या झाल्या, आपल्याच पक्षातील नेत्यांचं दमन करण्यास सुरुवात केली, मग ते पंकजाताई मुंडे, एकनाथ खडसे, तावडे, बावनकुळे, अशा जुन्या जाणत्या नेत्याना पद्धतशीरपणे डावलल गेलं.!
देवेंद्र फडणवीसानी आपल्याला डोईजड होतील असे नेते बाजूला सारून, 2014 नंतर स्वतःची एक वेगळीच टीम बनवली.! त्यांचे समर्थक तिला टीम देवेंद्र म्हणतात.
( भाजपात भाजप व्यतिरिक्त अशा कोणत्याही व्यक्तिगत नावाच्या टीम नसतात, तिथे केवळ भाजप आणि भाजपच असत, हे बहुधा ते विसरले असावे. )
मी पाहिलेले मुंडे साहेब -
गोपीनाथ मुंडे सारखा लोकनेता होणे शक्य नाही. बीडमध्ये अथवा महाराष्ट्रात काही वाईट घडल की तातडीने तिथ हजर राहायचे, प्रस्थापित नसल्याने त्यांच्या मनात गोरगरिब कष्टकरी, शेतकरी, मध्यमवर्गीया बद्दल एक जन्मजात जिव्हाळा होता. आणि तो त्यानी आयुष्यभर जपला.!
👇
दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, आदी नैसर्गिक आपत्तीवेळी मुंडे साहेब, तात्काळ त्या ठिकाणी धाव घ्यायचे
साहेबांच भाषण म्हणजे विरोधकाना अक्षरशः घाम फुटायचा, माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जरी विरोधी पक्षनेते म्हणून त्यानी जो गोंधळ घालायचे तसा गोंधळ मुंडे साहेबांनी कधीही केला नाही
त्यांच्या भाषणांत आक्रस्ताळेपणा नव्हता. उत्स्फूर्त आणि आक्रमक भाषण करायचे. आजचे नेते ( भाजपचे तर अजिबात नाही ) भाषण करताना, जास्त करून स्वतःच्या मनातील सांगतात,( मन की बात ) पण मुंडे साहेब लोकांच्या मनातलं बोलायचे. म्हणून ते लोकांच्या मनात आजही आदराच्या स्थानरुपी आहेत.
#Thread - महाराष्ट्र गाथा-
या नामाचा प्रथम उल्लेख इसवी सन १८०- १८१ मध्ये येतो. त्यावेळचा शक घराण्याचा राजा श्रीधरवर्माचा सेनापती सत्यनाग याने धारातीर्थी पडलेल्या सैनिकांसाठी मध्यप्रदेशातील "एरण" या ठिकाणी दगडी खांब बांधला त्यात स्वतःला तो "माहाराष्ट्रक" असे म्हणतो.! 👇
पूर्वी महाराष्ट्राच्या भागाला माहिषक म्हणत असावे, पण तो प्रदेश आताचा संपूर्ण महाराष्ट्र राज्य नव्हता तर आताच्या आंध्रप्रदेश मधील पश्चिम गोदावरी जिल्हाच्या जवळ असलेला मोठा प्रदेश असावा असे भारतीय प्राच्यविद्या तज्ञ डॉ वा वि मिराशी म्हणतात. शक राजा याच्या नाण्यावर माहिष म्हटले आहे.
रामायणात सुग्रीवाने सीतेला शोधण्यासाठी वानराना आज्ञा केली की तुम्ही विदर्भ, ऋषिक ( खानदेश) व माहिषक कडे जा.! माहिषक चा उल्लेख महाभारतात सुद्धा येतो भीष्मपर्वात द्रविड केरळ सह याला दक्षिण जनपदात मोडले आहे. कर्णपर्वात द्राविडी व कलिंगी लोकांप्रमाणे माहिषक लोकाना अधार्मिक म्हटलंय.