आली लहर, केला कहर!
काल बातम्यात एक ज्वेलरी संघटनेचा प्रतिनिधी म्हणत होता की, आमच्याशी चर्चा केली असती तर आम्ही आयात कमी करण्याचे मार्गही दाखवले असते आणि लहान व्यापाऱ्यांवर आणि कारागिरांवर परिणामही झाला नसता. आता या येड्याला कोणी सांगायचे की ते दिवस कधीच गेले. आता “आली लहर,
केला कहर” असे धोरण आहे. उदाहरणे वाटेल तितकी आहेत. पण दोन मोठी…
नोटबंदी करण्याआधी खूप तयारी करावी लागते असे समजले जाई. पण २०१६ मध्ये अचानक रात्री आठ वाजत जाहीर झाले की “अभी से आपके नोट महज कागज के टुकडे है!” देशात अभूतपूर्व गोंधळ उडाला. याचीही सरकारी पातळीवर मजा घेतली
जात होती. जेव्हा हे प्रकरण गंभीर झाले तेव्हा मग ते “बीच चौराहे पे…” वगैरे इमोशनल बोलून वेळ मारून नेण्यात आली. नियोजन इतके शून्य होते की, नवीन चलनात आणलेली दोन हजाराची नोट एटीएम मधून बाहेरच येत नव्हती, कारण तशी व्यवस्थाच नव्हती. खरे तर लहान मूल्याच्या (५००/१०००) च्या नोटा
लोकप्रिय आणि सिलेक्टेड 😂 कसे ते बघा.
बीजेपार्टीने सुवेंदू अधिकारी चे लाच घेतानाचे स्टिंग ऑपरेशन चे व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया पेज वर रिलीज केले होते.
आता गुपचूप डिलीट केले मुख्यमंत्री ना 😂
निवडणूक आयोगाने ज्या मनोज अगरवाल ला बंगाल निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक आयुक्त बनवले होते.
काम तडीस नेल्यावर त्याला बंगाल चा चीफ (की चीप?) सेक्रेटरी बनवतायत 😂
* निवडणूक आयोगाच्या स्पेशल निरीक्षक म्हणून काम केलेल्या गुप्ता ला बंगाल मुख्यमंत्री चा मुख्य सल्लागार बनवले 😂
*कर्नाटक मधल्या श्रींगेरी मतदार संघात काँग्रेस चे राजेगौडा फक्त २०१ मतांनी जिंकले.
मग तिथल्या निवडणूक अधिकाऱ्याने ५६२ वैध मतांची पून्हा तपासणी करून निकाल फिरवला.
सर्वोच्च न्यायालयात हा झोल सिद्ध झाला.
बीजे पार्टीचा जिवराज, जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा 😂
*महाराष्ट्रात मेडिकल असोसिएशन निवडणुकीत बीजे पार्टी पॅनल पराभूत झाले.
१२ वर्षात देशाला काय मिळाले ?
* देशाला वर्षभर जळणारे राज्य मिळाले. पण जगभर भटकणारे तिथे फिरकत नाहीत ना मीडिया तिथलं सत्य मांडत... जिथे पोलिसांची शस्त्रागारे लुटली गेली, स्त्रियांच्या नग्न धिंड काढल्या.
* स्त्रियांना अत्याचार मिळाले. स्त्रियांवरील अत्याचाराच्या आकड्यांमध्ये
प्रचंड वाढ झाली आहे. बलात्काराचे प्रमाण वाढले. अनेक बलात्कारी आणि अत्याचारी तर पार्टीत भरले आहेत.
* भारतात दररोज ३० शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागतेय. शेतकऱ्यांचे कर्ज २०१४ च्या तुलनेत ६०% वाढले आहे. आणि या कालावधीत काही निवडक उद्योगपतींचे १० लाख कोटींचे कर्ज माफ किंवा राईट
ऑफ केले आहे.
* भारतात रोज, ४३ बेरोजगार, २८ विद्यार्थी, ५३ व्यावसायिक, ३१ शेतकरी, ६६ स्त्रिया आत्महत्या करतायत,
* ६३ स्त्रिया घरात जाळल्या जातात,
* रोज ९६ बलात्कार होतात,
* रोज ११ दलितांचे अपहरण होते
* देशातील ७१% लोकांना पोषण आहार मिळत नाही,
* जगातील एकूण कुपोषित मुलांपैकी
रक्कम राउंड ऑफ केली आहे. डॉलर्स मध्ये आहे.
२०१२/१३: ३९ बिलियन , १३/१४: ३७ बिलियन, १४/१५: ४८ बिलियन, १७/१८ : ६० बिलियन, २०/२१ (कोविड) :४४ बिलियन, २२/२३: ८२ बिलियन, २४/२५ : १०० बिलियन, २५/२६ : ११२ बिलियन.
हा चढता ग्राफ बघून आनंदी होण्याचे कारण नाही.
हे आकडे आहेत भारताच्या चीन सोबत असलेल्या ट्रेड डेफिसिट चे. म्हणजे चीनकडून होणारी आयात - चीन ला होणारी निर्यात = ट्रेड डेफिसिट. याला चीन ला लाल दाखवणे म्हणायचं का ?
११२ बिलियन डॉलर्स चा ट्रेड डेफिसिट हा आकडा किती प्रचंड आहे हे समजण्यासाठी.... भारताचा संरक्षणावर होत असलेला एकूण
खर्च आहे ७५ बिलियन डॉलर्स.
आणि हे सर्व कधी ?
तर मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत वगैरेच्या जाहिरातबाजीवर झालेला खर्च आपल्या डोळ्यासमोर असताना. या उलट
* गेल्या अनेक दशकांत आर्थिक वाढ होऊनही भारतात मजबूत जागतिक मध्यमवर्ग तयार झालेला नाही. चीनने जसा मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्ग
भाजपाने भारतावर विजय मिळवला नाही. प्रादेशिक पक्षांनी तो त्यांच्या ताटात वाढून दिला आहे.
२०२१ मध्ये तृणमूल काँग्रेस (TMC) म्हणाली, "काँग्रेस आता अप्रासंगिक झाली आहे", आज भाजपा बंगाल जिंकत आहे.
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने (SP) म्हटले की "काँग्रेस हे एक ओझे आहे",
तिथे भाजपाने सलग दोनदा सत्ता मिळवली.
आम आदमी पार्टी (AAP) म्हणाली, "आम्ही पर्याय आहोत", पण ते दिल्ली टिकवू शकले नाहीत, पंजाबची सत्ता, कथानक सांभाळू शकले नाहीत आणि भाजपा जेव्हा खऱ्या अर्थाने मैदानात उतरली, तेव्हा 'आप' पत्त्यासारखी कोसळली.
डाव्यांनी (Left) म्हटले "काँग्रेस संपली आहे", पण केरळने डाव्यांना गाडून काँग्रेसच्या हातात सत्ता सोपवली.
द्रमुकने (DMK) तामिळनाडू एखाद्या कौटुंबिक व्यवसायासारखा चालवला आणि एका नवीन पक्षाने त्यांची तरुण मतपेढी एका रात्रीत खेचून नेली.
गडकरी बोलले ..... पुन्हा एकदा.
स्वतः बातमी शोधून वाचा. गडकरी म्हणाले, "भारताने भविष्यात इंधनात १००% इथेनॉल मिश्रण/ इथेनॉल ब्लेंडींग (E100)चे लक्ष्य ठेवावे, ज्यामुळे कच्च्या तेलावरील आयात अवलंबित्व कमी होईल आणि ऊर्जा स्वावलंबन वाढेल"
काय ती घोषणा. २ तासात बेंगलोर,
अर्ध्या तासात पुणे आणि ३ सेकंदात एअरपोर्ट वगैरे घोषणा सुद्धा शुल्लक वाटतील अशी घोषणा.
ब्लेंडिंग किंवा मिश्रण चा अर्थ असतो .... दोन पदार्थ मिसळणे.
आणि १००% चा अर्थ असतो पूर्णच्या पूर्ण एकच पदार्थ 😂
तुम्ही असं म्हणू शकत का ....'दुधात १००% पाणी आहे आणि दूध ब्लेंड केलेले आहे"
१००% पाणी म्हणजे फक्त पाणी.
तसंच १००% इथेनॉल म्हणजे फक्त इथेनॉल. पेट्रोल नाहीच.
हे झालं सामान्यज्ञान किंवा कॉमनसेन्स.
आता गडकरींच्या इथेनॉल क्षमता वाढवण्याच्या घोषणेकडे बघू. त्यासाठी इथेनॉल निर्माण करणाऱ्या आणि अल्पावधीतच प्रचंड व्हॅल्युएशन वाढलेल्या व