Abhijit Ankalkote Profile picture
State Secretary - Youth Congress | Engineer | Business Consultant | All RTs ≠ Endorsement
Jun 19, 2021 10 tweets 5 min read
'संजय आवटे' लिखित...
राहुल गांधी यांच्यावर उत्तम थ्रेड... जरूर वाचा...!

वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी सख्ख्या काकाचा मृत्यू तुम्ही पाहाता. लाडक्या आजीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसतो, तेव्हा तुम्ही उण्यापु-या चौदा वर्षांचे असता. (1/n) एकविसाव्या वर्षी वडिलांच्या शरीराच्या झालेल्या चिंधड्या तुम्हाला दिसतात.

तरीही, तुम्ही विचलित तर होत नाहीच.
उलट, वडिलांच्या मारेक-यांना माफ करता!

आई-वडिलांचा प्रेमविवाह. आई मूळची वेगळ्या देशाची. म्हणून, असभ्य, अश्लील भाषेत तिच्यावर रोज टीका केली जाते.

(2/n)