Annasaheb Chavare | अण्णासाहेब चवरे Profile picture
Marathi Content Writer. नागरिकरण, शहर व्यवस्थापन, राजकारण, समाज, संस्कृती, संवादशास्त्र विषयांवर स्फुट लिखाण. सल्ला: इथली मतं वैयक्तिक. फारशी मनावर घेऊ नये.
Apr 24, 2023 8 tweets 5 min read
पुस्तकं काय करतात?
पुस्तकं माणसाचे निरुपद्रवी मित्र. कधीच कोणाला टाळत नाहीत. स्वत:हून इतरांकडे जात नाहीत. मानवी मैत्रीत अंतर येणे शक्य आहे. पुस्तकं अंतर देत नाही. पुस्तकं निषेध करत नाहीत. मतभेदांवर वाद करत नाहीत. जे सांगायचं आहे ते सांगतात. नामानिराळी राहतात. 1/1
#WorldBookDay Image पुस्तकं काय करतात?
पुस्तकं आपली मतं इतरांवर लादत नाहीत. पुस्तकं प्रश्न निर्माण करतात. पुस्तकं उत्तरं देतात. पुस्तकं प्रश्न-उत्तराचा पाठशिवणीचा खेळ खेळतात. पुस्तकं महासत्ता तयार करतात. महासत्तेला सुरुंगही लावतात. पुस्तकं आव्हान देतात.आव्हानं स्वीकारतात. (1/2) #जागतिक_पुस्तक_दिन Image