Apurv JyotiChandra Kurudgikar Profile picture
Independent-Writer | Yuva Panther | Jobs | Journalisms | Stocks | Shayar | Read and Write Threads | Living in the dream of equality |
Apr 5, 2021 13 tweets 4 min read
Thread,
Dr. Babasaheb Ambedkar's massage to OBC's.
Dr. Ambedkar said, "This principle will apply not only to Marathas but all Backward Castes. If they do not wish to be under the thumb of others they should concentrate on two things, one is politics and the other is education.” “One thing I like to impress on you is that the community can live in peace only when it has enough moral but indirect pressure over the rulers. Even if a community is numerically weak, it can keep its pressure over the rulers and create its dominance as is seen by the example of
Apr 4, 2021 17 tweets 4 min read
Thread,
In December last year, the BBC released rare footage of a 1953 interview it conducted with B.R. Ambedkar. The interviewer began with a simple yet profound question: “Dr Ambedkar do you think democracy is going to work in India?” Ambedkar, without skipping a beat, replied “No.”
Later on in the interview, he elaborated ‘‘Democracy will not work for the simple reason, we have got a social structure which is totally incompatible with parliamentary democracy'
During the Constitution-making process, Ambedkar,
Apr 3, 2021 11 tweets 3 min read
Thread,
Creator of Damodar Valley, Hirakund, The Sone River Valley project, Dr. Babasaheb Ambedkar who started and Plan outlined, on the lines of the Tennessee Valley project, the Damodar Valley project. Not only Damodar Valley Project but also Hirakud project, The Sone Image River valley project were outlined by him. In 1945, under the chairmanship of Dr. Babasaheb Ambedkar, then Member of Labor, it was decided to invest in the potential benefits of controlling the Mahanadi for multi purpose use. But almost were hiding and wrongly been attributed
Dec 13, 2020 4 tweets 2 min read
या डोळ्यांनी रसिकांना जिंकल होत, चक्र चित्रपटातील भूमिका आज आहे काळजात घर करून शाबूत आहे, वडिलांनी लावलेला सिनेमा चेहरा आजवर स्मरणात आहे, 'जांभुळ पिकल्या झाडाखाली' गाण्यातला तो सावळा चेहरा आजगत स्मरणात आहे, आपल्याला जसं ग्यात होत आपल्याला जी व्यक्ती आवडते ती व्यक्ती केव्हाचेच हे जग सोडून गेली आहे हे समजल्यावर मला जे वाटले ते त्यानंतर तसं अनुभव कधीच नाही आला आणि आयुष्य किती छोटं आहे याची जाणीव होते, स्मिता पाटील यांच्या आज स्मृती दिवस !! ❤️
Dec 13, 2020 24 tweets 4 min read
वडिलांबद्दल मला काय वाटते ? - थ्रेड

माझे सारे लहानपण माझ्या आईच्या सहवासातच गेले. वडिलांचा व आमचा फारसा संबंध येत नसे. डाॅक्टरसाहेबांना आम्ही घरी सारेजण साहेब या नावानेच ओळखतो. त्यांच्याशी फारशी सलगी करण्याचे धाडस आम्हांला कधीच झाले नाही. आम्हांला त्यांचा भारी धाक वाटतो. तो खरोखरी का वाटावा हे आम्हांला काही समजत नाही; पण तो वाटतो खरा! ते चेहऱ्यावरुन उग्र व गंभीर दिसत असले तरी ते अत्यंत मायाळू आहेत, याचा आम्हांला नेहमीच अनुभव येतो. एखादा जिन्नस मागितला की तो आम्हांला केव्हाही मिळतो. पण आम्हांलाच तो मागावा कसा अशी उगाच मनातल्या मनात भीती वाटते. आमची
Dec 12, 2020 10 tweets 2 min read
थ्रेड,
गॉडफादर सिनेमा सुरू होतो, सिनेमाच्या सुरुवातीला अगदी पाच मिनिटातच मरलोन ब्रांडो आपल्या नजरेचा, मनाचा ठाव घेतो. काहीसा म्हातारा झालेला, निवृत्तीकडे झुकलेला तरी आपल्या साम्राज्यावर एकहाती वर्चस्व ठेवलेला. लोक भेटतायेत. कुणी गिफ्ट देतंय, कुणी गाऱ्हाणं मांडतंय, कुणी फेवर मागतंय. आलेला प्रत्येकजण भरल्या हातानेच परत जातोय. आणि, मग तो अजरामर संवाद
I will make him an offer that he cant refuse.
अफाट आत्मविश्वास दर्शवणारं ते वाक्य. दुनिया स्वतःच्या मर्जीनं नाचवण्याची धमक, जिद्द आणि जबर महत्त्वाकांक्षा ब्रांडोच्या डोळ्यांतून त्या डायलॉग डिलीवरी वेळी
Dec 12, 2020 12 tweets 3 min read
थ्रेड,
कहा जाता है कि पीपल या बरगद के नीचे फिर कोई दूसरा पेड़ नहीं पनपता। यह कहावत उन लोगों ने बनाई है जिनके अनुसार किसी बड़े महापुरुष के घर कोई दूसरा महापुरुष पैदा नहीं होता। औरों के बारे में तो नहीं मालूम मगर, भैयासाहेब यशवंतराव आंबेडकर के बारे में यह कहावत झूठी लगती है। इस बात से इनकार नहीं किया जा सकता कि पुत्र यशवंतराव ही नहीं, पत्नी रमाबाई और घर-परिवार पर ध्यान देने की फुर्सत बाबा साहब के पास नहीं थी. उनके सतत सम्पर्क में रहने वाले, चाहे सोहनलाल शास्त्री हो या फिर नानक चंद रत्तु ;
Dec 10, 2020 8 tweets 2 min read
थ्रेड,
अमेरिकेतील निग्रो लोकांची गुलामगिरी नष्ट केली पाहिजे अशी भूमिका घेणारे जे काही अमेरिकन गोरे होते त्यात विल्यम लाईड गॅरिसन हा प्रमुख होता. त्यांनी आपली चळवळ बंद करावी म्हणून त्याला लाखो डाॅलर्स देण्याची लाच देऊ केली होती. पण ती त्याने स्वीकारली नव्हती. म्हणून त्याचा छापखाना जाळला. त्याच्या पायाला दोर बांधून भर बाजारपेठेत कुत्र्याप्रमाणे फरफटीत नेले व खून करण्याची धमकी दिली.
परंतु गॅरिसन घाबरला नाही व स्वीकृत कार्यही त्यांनी सोडले नाही. गुलामगिरी नष्ट झालीच पाहिजे. याबद्दलचा प्रचार करण्यासाठी त्याने लिबरेटर नावाचे मुखपत्र काढले. आपले विरोधक व टीकाकार
Dec 9, 2020 5 tweets 1 min read
आंबेडकर - गांधी..

आंबेडकरी लोकांमध्ये महात्मा गांधी बद्दल जो राग आहे तो केवळ पुणे करारामुळे आहे, बा आंबेडकरांची मागणी होती स्वतंत्र मतदार संघाची, त्या मागणीचा विरोध म्हणून गांधींनी अन्नत्याग करून त्यांच्यावर दबाव आणला. खरंतर एम के गांधी समंजस व्यक्तिमत्व होतं. आंबेडकरांच्या आणि गांधी यांचे संबंध त्यांच्या पत्रव्यवहारातून स्पष्ट होते एकमेकाच्या विरोधात मुळीच नव्हते त्यांचे स्वप्न भारताची प्रगती आणि समाज कसा सुधारावा याच्यावर त्यांचा सहमत प्रत्येक वेळी असायचं. एम के गांधी नक्कीच राष्ट्राला पुढे नेणारे एक विचारधारा होती, काही विचारांवर आंबेडकरांचे
Dec 9, 2020 12 tweets 3 min read
१८-१९ जुलै, १९४२, नागपूर येथील प्रसंग - थ्रेड

भाषण आटोपल्यानंतर संध्याकाळी, बाबासाहेब काही कार्यकर्त्यांसह लाला जयनारायण यांनी आयोजित केलेल्या स्वागतपार्टीत जाण्यासाठी निघाले. आम्ही समता सैनिक दलाचे स्वयंसेवक त्यांना रस्ता मोकळा करून देत होतो. बाबासाहेब मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ आले. तितक्यात, फाटलेल्या-विटलेल्या जुनेऱ्यातील तीन चार वृध्द स्त्रिया त्यांना अचानक आडव्या झाल्या.
"आमचे आंबेडकरबाबा कुठं हायती जी?" एकीने किलकिल्या डोळ्यांनी पाहात बाबासाहेबांनाच विचारले. मी त्यांच्या बाजूलाच उभा होतो. त्या स्त्रियांचा प्रश्न आणि अवस्था पाहून बाबासाहेब क्षणभर
Dec 8, 2020 11 tweets 2 min read
थ्रेड - देशातील पहिला शेतकऱ्यांचा विराट मोर्चा काढणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शेतकऱ्यांचे कैवारी होते. त्यांची ओळख केवळ दलितांचे कैवारी, राज्यघटनेचे शिल्पकार म्हणूनच सांगितली जाते. परंतु त्यांचे ग्रामीण समाज आणि शेतीबाबतचे विचार आजही राज्यकर्ते, नियोजकार Image आणि शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहेत. दुर्दैवाने अनेकांना बाबासाहेब शेतकऱ्यांचे कैवारी देखील होते, हे अजूनही ठाऊक नाही. त्यांच्या विचारांच्या उपेक्षेतून शासनकर्त्यांची उदासीनताच प्रकर्षाने दिसते. डॉ. बाबासाहेब यांच्या शेतीविषयक सूचनांची अंमलबजावणी केली, तर शेती व ग्रामीण
Dec 7, 2020 10 tweets 2 min read
कविता - डॉ. आंबेडकर १९९५ | नामदेव ढसाळ

काळ्या करगोट्याच्या धाग्यात
ओवलेली तुझी प्रतिमा
माझ्याही मुलाने स्वतःच्या
गळ्यात बांधून घेतलीय
गड्या आता मला कशाचीच चिंता नाहीहे

कडिकाळाची आव्हानं स्वीकारून
कित्येक शतकांचा काळोख ओलांडून
तू घेऊन आलास आम्हाला सुरक्षित स्थळापर्यंत आज आमचं जे काही आहे
ते सर्व तुझंच आहे
हे जगणं आणि मरणं
हे शब्द आणि ही जीभ
हे सुख आणि दुःख
हे स्वप्न आणि वास्तव
ही भूक आणि तहान
सर्व पुण्याई तुझीच आहे
तू बसला आहेस अंत:करणात अंकुरून
दंभदर्पलोभमत्सराच्या
कामक्रोधाच्या सर्व हीनवृत्ती गेल्या आहेत लोपून
Dec 6, 2020 6 tweets 2 min read
थ्रेड - न्यायमूर्ती भालचंद्र बळवंतराव वराळे यांनी सांगितलेली एक आठवण..

एके दिवशी, पापांनी (ब.ह.वराळे) नवीन बंगल्यात (औरंगाबादला) राहण्यास आल्यानिमित्त बाबासाहेब, माईसाहेब आणि प्राचार्य चिटणीस यांना रात्रीच्या जेवणासाठी बोलावले. मधुमेहाचा_त्रास असल्यामुळे डाॅक्टरांनी बाबासाहेबांना गोड पदार्थ खाण्यास वर्ज्य केले होते. आईने आम्हा सर्वांना छान गोडाधोडाचा स्वयंपाक केला. परंतु बाबासाहेबांसाठी मात्र मेथीची भाजी आणि ज्वारीची भाकरी असा साधा स्वयंपाक केला होता. सर्वांची जेवणे झाली. जरा वेळ गप्पा झाल्यानंतर बाबासाहेब, माईसाहेब आणि प्राचार्य चिटणीस परत
Dec 6, 2020 27 tweets 5 min read
प्रिय बाबासाहेब,
आपले अनंत उपकार व्यक्त करायला शब्द फुटत नाहीत कारण जे शब्द ओठावर येतील त्या शब्दांवर पण आपले उपकार आहेत.कारण हजारो वर्षांपासून मूके झालेली ,सर्व अधिकारापासून वंचित राहिलेली माणूस असून जनावरापेक्षा कठीण जीवन जगत असलेल्या तमाम शोषित पीडित गरीब असलेल्या समाजाला आपण गुलामगिरीच्या गटारांमधून बाहेर काढून आपल्या मौलिक विचारांनी आणि कृतीने स्वच्छ करून धनसंपन्न केलं. आपण आपलं अख्ख आयुष्य कष्टपद जगलात स्वतःच्या जीवाची आरोग्याची पर्वा न करता आपल्या महापरिनिर्वाण पर्यंत अखंड संपूर्ण देशासाठी समाजासाठी झटत होतात. प्रतिकुल परिस्थितीमध्ये आपण अतिउच्च
Dec 6, 2020 12 tweets 3 min read
मी (ब.ह.वराळे) ४ डिसेंबरला औरंगाबादला पोहचलो. ५ तारखेला मध्यंतरी एक दिवस गेला. ६ तारखेचा दिवसही उजाडला होता. नेहमीसारखाच तो दिवस वाटत होता. सकाळचे साडे-अकरा बारा वाजले होते. मी जेवायला बसलो होतो. इतक्यात काॅलेजहून निरोप आला. दिल्लीहून फोनने बातमी कळविण्यात आली होती. ५ तारखेच्या रात्रीच बाबासाहेबांची ज्योत मालवली होती. मृत्यूची ही कल्पनाच करता येत नव्हती. त्यांचा मृत्यू अगदी आकस्मिक होता. या वेळेला माझ्या मनाची काय स्थिती झाली हे शब्दात सांगता येणार नाही. आजपर्यंत ज्या सूर्याच्या प्रकाशात मी माझा जीवनक्रम आक्रमित होतो. ज्या सूर्याच्या प्रभावाने मला
Dec 5, 2020 8 tweets 2 min read
थ्रेड,
डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचे शव दर्शनाकरीता ठेवल्यानंतर आदरांजलीपर प्र.के. अत्रे यांनी भाषण केले ."अत्रे जेव्हा भाषणास उभे राहिले त्यावेळी लाखो लोकांच्या हृदयाचा बांध फुटला व ते मोठमोठ्याने हुंदके देऊ लागले. तिथे उपस्थित असलेले पोलिस अधिकारीही आपला शोकावेग..
#महापरिनिर्वाण आवरू शकले नाहीत . आचार्य अत्रे म्हणाले."मराठी पत्रकार व लेखक यांच्या वतीने भारतातील एका महान विभूतीला मी आदरांजली अर्पण करण्यास उभा आहे .या महान नेत्याच्या मृत्यूने मृत्यूला मृत्यूचीच कीव वाटू लागली आहे .मरणानेच आज आपले हसू करून घेतले आहे .मृत्यूला काय दुसरी माणसे दिसली नाहीत ?