Archana More Profile picture
Journalist| Visionary| Executive Director at The Scoope | Former Bureau chief of Pune Times Mirror. Retweets are not endorsements.
May 24, 2021 7 tweets 1 min read
शिवाजी महाराजांशी तुलना करण्यास सर्व बाजूंनी साजेल असा मानव सापडणे कठीण आहे....

ग्रीसचा सिकंदर बादशहा इतिहासात मोठा पराक्रमी गणला जातो, परंतु सिकंदरास सर्व जग जिंकण्याची हाव होती. जिंकलेल्या प्रदेशाची सुधारणा करून राज्य व्यवस्था ठरवण्यात त्याने लक्षच घातले नाही. शिवाजी महाराज सिकंदरासारखे जगज्जेतृत्वासाठी किंवा दिगंत कीर्तीसाठी हपापलेले नव्हते. शिवाय सिकंदराच्या बापाने अगोदरच मोठे राज्य कमावून ठेवले होते, तशी गोष्ट शिवाजीमहाराजांची नव्हती. तसेच शहर काबीज केल्यावर तेथच्या लोकांची नाहक कत्तल करणे,
May 23, 2021 17 tweets 2 min read
One more thread.. must read ❤️
लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या पुस्तकात असणारे काही वादग्रस्त मुद्दे पुढीलप्रमाणे :
१) छत्रपती संभाजी महाराजांनी आपला वारसाहक्क मिळवण्यासाठी महाराणी सोयराबाई यांच्यासह शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील अनमोल प्रतिभावान मंत्र्यांना ठार केले. २) छत्रपती संभाजी महाराज अत्यंत धाडसी असले तरी त्यांच्यात वडिलांकडे असणाऱ्या संयम आणि मुत्सद्दीपणाची कमतरता होती. ३) इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांशी जुळणारे कोणी व्यक्तिमत्त्व असेल तर बाजीराव पेशवे आहेत.छत्रपती घराण्याच्या इतिहासाविषयी त्यांचा जास्त अभ्यास नसल्याचे दिसते.
May 22, 2021 6 tweets 2 min read
गिरीश कुबेर यांचे महाराष्ट्राविषयीचे नवीन पुस्तक हे इतिहासाची मोडतोड करणारे आहे. ज्या पद्धतीने ब्राम्हणी इतिहासकारांनी संभाजी महाराजांना बदनाम करण्याचे प्रयत्न केला आहे.तीच री कुबेरानी ओढली आहे. संभाजी महाराजांनी सत्तेसाठी महाराणी सोयराबाई यांना मारले हे तर सनक आणणारे आहे. यापुढे थोरले बाजीराव यांची तुलना शिवाजी महाराजांशी केली आहे. पुढे कहर म्हणजे बाजीराव यांनी दिल्लीला आव्हान देणारा पहिला योद्धा होता म्हणून लिहिलं आहे. हे सांगताना दिल्लीत महादजी शिंदे यांनी दिल्लीत केलेल्या अफाट कामगिरीचा उल्लेख त्यांनी जाणीवपूर्वक टाळला आहे.