धर्म - मानवता ,जात -भारतीय ,ओळख -मी मराठी . शिक्षण -एम .ए. बी .एड .छंद -वाचन ,आवड--सूचेल ते लिहिणे ,आदर्श --मदर टेरेसा .स्वप्न-सामाजिक विषमता मिटवण्याचे.
Jan 3, 2021 • 25 tweets • 6 min read
#स्त्री_स्वातंत्र्याच्या_शिल्पकार #खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार #सावित्रीमाई
1818मध्ये पेशवाई संपुष्टात आली. भारतात इंग्रजी राजवट होती. इंग्रज आपल्या सोयीसाठी का होइना सुविधा निर्माण करत होते. आपल्या मुला-बाळांना शिकण्यासाठी त्यांनी मिशनरी शाळा सुरू केल्या होत्या.
तशाच सर्वासाठी काही सरकारी शाळा सूरू केल्या होत्या परंतु त्या चालल्या नाहीत कारण त्यावेळी शिक्षण घेणं ही एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती त्यामुळे समाजातील इतर घटकांना स्त्रिया व शूद्रांना शिक्षण बंदी होती. कारण सनातन्यांच्या मते स्त्रीया व शूद्रांनी शिक्षण घेणे म्हणजे हा