Read, Learn and X'cel' | Learning Everyday, Focusing and helping on career and Skill development
| 1% Daily Improvement | RT≠Endorsement |
DM FOR COLLAB
Jan 9 • 10 tweets • 3 min read
फेब्रुवारी 2024 मध्ये टॉरेस ज्वेलर्स या आलिशान ज्वेलरी ब्रँडने मुंबईत आपले विविध ठिकाणी शोरूम्स सुरू केली, जसे की दादर, ग्रँट रोड, कल्याण, मीरा रोड आणि सानपाडा (नवी मुंबई)
गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी
त्यांनी मोइसानाइट स्टोन्सवर अत्यंत जास्त परताव्याची हमी दिली. आठवड्याला 11% पर्यंत परतावा, वार्षिक 520% परतावा आणि आकर्षक भेटवस्तू जसे लक्झरी गाड्या, फ्लॅट्स यांचे प्रलोभन दिले गेले.
यांनी लोकांना कसं फसवल समजून घ्या आणि भविष्यात ही चूक तुमच्याकडून होणार नाही याची काळजी घ्या.
Dec 18, 2024 • 14 tweets • 4 min read
आपण कधी विचार केला आहे का, काही लोक सहजपणे त्यांची स्वप्ने सत्यात उतरवतात, तर काही जण अदृश्य अडथळ्यांशी झगडत राहतात?
याचे उत्तर त्यांच्या जिद्दीत नाही, तर त्यांच्या अवचेतन मनाच्या सामर्थ्यात आहे. हे शांत मन आपल्या विचारांचे, भावनांचे आणि कृतींचे 95% भाग नियंत्रित करते.
🧵
पण हे अवचेतन मन आहे तरी काय?
अवचेतन मन सुपीक जमिनीसारखे आहे, जिथे विश्वास, भावना आणि अनुभवांची बीजे रुजतात. जसे निकोला टेस्ला म्हणाले, "जर तुम्हाला विश्वाचे रहस्य समजून घ्यायचे असेल, तर उर्जेच्या, कंपनांच्या आणि वारंवारतेच्या दृष्टीने विचार करा." तसेच, आपले अवचेतन मन आपल्या..
Dec 10, 2024 • 9 tweets • 2 min read
वय वाढतंय त्यात हे सेल्फ लर्निंग - स्वयांविकास शक्य आहे का?
लहानपणापासूनच सर्वकाही चांगल्या पद्धतीने करण्याचं आपण शिकलो – चांगल्या गुणांसाठी मेहनत केली, परीक्षांमध्ये अव्वल राहिलो. परंतु, या सगळ्या शैक्षणिक दडपणामुळे आपण स्वतःच्या सुधारणेचं आणि वैयक्तिक विकासाचं राहूनच गेलं.
🧵
स्वतःला सुधारण्याकडे दुर्लक्ष का होतं?
आपण अनेकदा आपले दोष झाकून ठेवतो, त्यांना सामोरं जाण्याचं टाळतो किंवा अनभिज्ञ राहणंच सोयीस्कर मानतो. पण सत्य हे आहे की, आपण स्वतःपासून पळून जाऊ शकत नाही. जितक्या लांब पळालं, तितकं खोल आपल्यासाठी संकट निर्माण होतं.
Dec 9, 2024 • 10 tweets • 2 min read
काय आहे फार्मर आयडी?
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक नवी सुविधा!
शेतकरी आता घरबसल्या आपले फार्मर आयडी (Farmer ID) ऑनलाइन तयार करू शकतात.
केंद्र सरकारच्या ॲग्रीस्टॅक (Agristack) योजनेअंतर्गत ही प्रक्रिया सुलभ झाली आहे.
🧵
1️⃣ शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय?
हे डिजिटल स्वरूपाचे ओळखपत्र असून, त्यात खालील माहिती असते:
-आधार कार्डशी जोडलेली माहिती
-शेतीचा तपशील:
जमिनीचा सर्व्हे नंबर
प्लॉट नंबर
पीक पद्धती व जमीन क्षेत्र
-सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त तपशील
Dec 2, 2024 • 7 tweets • 2 min read
ग्रॅच्युइटी म्हणजे काय?
आज आपण 'ग्रॅच्युइटी' या महत्त्वपूर्ण आर्थिक संकल्पनेबद्दल सखोल माहिती घेणार आहोत. ग्रॅच्युइटी म्हणजे एक प्रकारचा पुरस्कार किंवा बोनस, जो दीर्घकाळ एका कंपनीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना दिला जातो. ग्रॅच्युइटी कायदा आणि Calculation समजून घेऊया.
🧵
ग्रॅच्युइटी म्हणजे त्या कर्मचाऱ्यांना दिला जाणारा आर्थिक लाभ, जे कंपनीत किंवा संस्थेत दीर्घकाळ कार्यरत असतात. भारतात, जर एखादा कर्मचारी एका कंपनीत 5 वर्षांपेक्षा जास्त काळ काम करत असेल, तर त्यास ग्रॅच्युइटी मिळण्याचा अधिकार असतो
Nov 29, 2024 • 7 tweets • 2 min read
भारताची न्यायव्यवस्था ही एक जटील आणि बहुआयामी संरचना आहे यात शंका नाही. पण तुम्हाला माहिती आहे का कोणती न्यायालये कोणत्या श्रेणीमध्ये येतात आणि त्यांच्या भूमिका काय? समजून घेऊया.
🧵
न्यायालये मुख्यत: तीन गटात वर्गीकृत आहेत.
1. सिव्हील न्यायालये: ही न्यायालये मालमत्ता, करार आणि इतर सिव्हील बाबींशी संबंधित वाद हाताळतात.
2. सत्र न्यायालये: ही न्यायालये चोरी आणि लुटमार यासारख्या फौजदारी केसींच्या चाचणीसाठी जबाबदार असतात.
Nov 28, 2024 • 7 tweets • 2 min read
महिंद्रा XEV 9e EV सध्या चर्चेत आहे या गाडीबद्दल थोडंसं, ही गाडी इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये एक मजबूत स्पर्धक नक्कीच बनेल.
🧵
मुख्य फिचर्स 1. परफॉर्मन्स:
- बॅटरी: 79 kWh लिथियम-आयन बॅटरी
- रेंज: एकाच चार्जवर 682 किमी पर्यंत
- पॉवर आउटपुट: 362 bhp (कमाल)
- टॉर्क: 380 Nm
- एक्सलेरेशन: 0-100 किमी/तास साधारण 5.6 सेकंदात
Nov 25, 2024 • 8 tweets • 3 min read
सध्या जोरदार चर्चेत असलेला विषय म्हणजे या निवडणुकांमध्ये EVM हॅक झाले आणि निकाल बदलण्यात आला, पण खरोखर EVM हॅक होऊ शकतात का? थ्रेड नीट वाचा.
🧵
EVMs सुरक्षेच्या दृष्टीने डिझाइन केलेले आहेत, परंतु त्यातल्या काही धोक्यांपासून ते पूर्णपणे मुक्त नाहीत. याबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे आणि संदर्भ आहेत काही रिपोर्ट्स देखील याबद्दल आधिदेखील निघाल्या आहेत त्या कोणत्या? त्यांनी नेमक काय सांगितलं?
Nov 15, 2024 • 8 tweets • 2 min read
आज ध्रुव राठीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर एक व्हिडिओ बघितला, राजकारणाचा भाग सोडला तर महाराष्ट्रातील समस्या आणि महत्वाचे मुद्दे ज्यावर खरोखरच बोललं गेलं पाहिजे हे या व्हिडिओ मध्ये मांडण्यात आले आहे त्याबद्दल थोडक्यात.
🧵
१. शेतकऱ्यांना सक्षम करणे:
- शेतकऱ्यांना आधुनिक आणि टिकाऊ शेती पद्धती शिकवणे.
- बियाणे बँका आणि स्थानिक बाजारपेठा स्थापन करणे.
- पावसाळ्यात पाणी साठवून ठेवण्याच्या पद्धती प्रोत्साहित करणे.
- शेतकरी सहकारी संस्था स्थापन करण्यास मदत करणे.
Nov 13, 2024 • 8 tweets • 4 min read
एवढी वर्ष गुगल मॅप्स वापरताय पण हे ४ छुपे फायदे तुम्हाला माहित आहेत का?
🧵
१. बऱ्याच वेळा आपण गाडी पार्किंग मध्ये लावतो आणि नंतर विसरूनच जातो की गाडी नक्की लावली कुठे? पण गुगल मॅप्स मध्ये तुम्ही तुमचं पार्किंग लोकेशन लोक करू शकता.
- सर्वात आधी आपलं लोकेशन बघा, तिथे क्लिक करा.
- नंतर Save My Parking वर क्लिक करा.
- गाडी लावलेली वेळ आणि जागा लोक होईल.
Nov 5, 2024 • 10 tweets • 4 min read
तुम्ही फ्लिपकार्ट वरून मोबाईल मागवला आणि बॉक्स मध्ये मोबाईल ऐवजी साबण निघाला तर? रडत बसणार की तक्रार करणार? पण तक्रार करायची कुठे? कोर्टात जायचं की पोलिसांत?
पूर्ण थ्रेड नीट वाचा तुम्ही तक्रार घरी बसून करू शकता कुठेही न जाता, आता कोर्टच तुमच्या घरी येईल.
🧵
जेव्हा असा काही प्रकार होतो तेव्हा सर्वप्रथम घाबरु नका, ऑनलाईन जी वस्तू मगवताय ती उघडताना व्हिडिओ बनवा त्याची कागदपत्र नीट ठेवा, कारण जेव्हा तुम्ही तक्रार नोंदवाल तेव्हा हे दस्तावेज खूप महत्वाचे आहेत,आता प्रोसेस समजून घेऊया
सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या वेबसाईट वर जावे लागेल.
Nov 3, 2024 • 15 tweets • 5 min read
जनहितार्थ जारी: व्हेज वाल्यांनी पुढे वाचू नये
मासे खरेदी संबंधित काही महत्वाच्या टिप्स
🧵
कोणत्याही प्रकारचे मासे घेताना घट्ट बघून घ्यावेत, मासे बोटाने दाबल्यास खड्डा पडला तर तर ते शिळे, खराब समजावेत.
• पापलेट : 🐟
रंगाने सफेद व चमकदार दिसणारी पापलेट ताजी असतात.
पापलेट घेताना त्यांच्या डोळ्याखालील भाग दाबून पाहावा. सफेद पाणी आल्यास ती ताजी असतात, लाल पाणी आल्यास
Oct 24, 2024 • 11 tweets • 4 min read
ऑनलाइन फसवणूक भारतात मोठा धोका बनला आहे. 2024 च्या पहिल्या 4 महिन्यात 7,40,000 Cybercrime complaints नोंदवल्या गेल्या आहेत आणि सुमारे ₹1800 कोटींचा गंडा झाला घातला गेला, यातून वाचायचं कसं? ऑनलाईन फसवणूक होते कशी समजून घ्या आणि शेअर नक्की करा.
🧵
आजकाल "Digital Arrest" फसवणूक खूप कॉमन झाली आहे. यामध्ये फसवणूक करणारे पोलिस बनून कॉल करतात आणि तुमच्या मुलाने गुन्हा केला, तुमच्या पार्सल मध्ये Illegal ड्रग्स मिळाले आणि काही ना काही सांगून तुम्हाला "digital arrest" करतात आणि त्यांना मोठी रक्कम मागतात.
Oct 23, 2024 • 10 tweets • 2 min read
आनंदी जगायचं असेल तर ' लोक काय म्हणतील? ' हा विचार करणं सोडलं पाहिजे. पण करायचं कसं? या ८ पद्धती तुम्हाला यामध्ये नक्कीच मदत करतील.
१. अनेक लोक सामाजिक अपेक्षांमुळे अडकलेले असतात आणि इतरांच्या मान्यतेसाठी सतत प्रयत्न करतात. हे आपल्याला आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यापासून थांबवते आणि खरे जीवन जगायला अडथळा आणते.
दुसऱ्यांचे विचार कशाला महत्त्व द्यायचे नाही, म्हणजे निर्दय किंवा बेफिकीर होणे नाही.
#SelfLove
Oct 18, 2024 • 9 tweets • 2 min read
तुम्हाला माहिती आहे की रोज काही मिनिटे वाचन केल्याने तुमचे मन प्रसन्न होते, तुमची बुद्धि तेज होते आणि मुख्य म्हणजे तणाव कमी होतो
हो, वाचनाचे खूप फायदे आहेत जे लक्षात घेतले जात नाहीत! आज वाचनाचे ७ महत्वाचे फायदे समजून घेऊया...
🧵
१. वाचन करणे तुमच्या बुद्धीला म्हणजेच मेंदूला उत्तेजित करते. संशोधनानुसार, मानसिकदृष्ट्या सक्रिय राहणे, म्हणजे वाचन, कोडी सोडवणे किंवा खेळ खेळणे, अल्झायमर किंवा डिमेंशिया सारख्या आजारांना मंदावू शकते. तुमच्या मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी निरंतर व्यायाम करण्याची गरज आहे!
Oct 16, 2024 • 9 tweets • 2 min read
Mind Mapping म्हणजे काय?
हे एक तंत्र आहे, तुमची स्मरणशक्ती सुधारण्याचे, एकाग्रता वाढविण्याचे, संवाद कौशल्य सुधारण्याचे आणि वेळेचे उत्तम व्यवस्थापन करण्याचे, पण हे वापरायचे कसे, चला समजून घेऊया...
🧵
Mind mapping एक visual thinking tool आहे, ज्याद्वारे आपण माहिती, कल्पना आणि विषय यांना एकत्रित आणि व्यवस्थित पद्धतीने सादर करू शकतो. हे एक चित्र आहे, ज्यामध्ये मुख्य विचाराच्या सभोवती विविध विचार आणि माहिती दर्शवली जाते. जी तुमचे गुंतागुंतीचे विचार सहज कागदावर आणते.
Sep 4, 2024 • 9 tweets • 2 min read
यशाची व्याख्या काय ?
उत्तम पगार आणि उच्च पद = यश/आनंद का?
चला आज थोडंसं याब्बदल बोलूया, थ्रेड लक्षपूर्वक वाचा म्हणजे आपणच आपल्या यशाची व्याख्या ठरवू शकाल...
🧵
#मराठी #म
आपण सहसा पगार आणि पदावरून यश मोजतो. पण तेच का सगळं असतं?
💼 पगार = यश?
लहानपणापासूनच आपणाला शिकवलं जातं की मोठा पगार म्हणजे मोठं यश. पण हा पगार कशाच्या बदल्यात मिळतो? अनेकदा उच्च पगारासाठी आपण आपल्या तब्येत, नातेसंबंध आणि मन:शांती गमावतो. #SalaryIsntEverything
Aug 31, 2024 • 7 tweets • 2 min read
🧵 मित्रांनो, काही लोक आपल्याला हलके समजतात. त्यामागचं कारण आपल्या वागण्यामध्ये लपलेलं असतं. आज आपण अशा 11 गोष्टींबद्दल बोलणार आहोत, ज्यामुळे लोक आपल्याला मान देत नाहीत.
थ्रेड नक्की शेअर करा.
#मराठी #म
1⃣ गबाळं राहणं बंद करा!
पहिलं इम्प्रेशन महत्त्वाचं असतं. स्वच्छ, टापटीप दिसलं की लोक आपल्याला गंभीरपणे घेतात.
2⃣ घाबरू नका!
जर काही वाईट करत नसाल, तर कशाचीच भीती नको. आत्मविश्वास ठेवा, लोक तुमचा सन्मान करतील.
Aug 26, 2024 • 12 tweets • 2 min read
बर्नआउट म्हणजे?
एक असा टप्पा जिथे आपल्याला वाटत की बस यापुढे मला काम करता येणार नाही.
मग हे का होत? टाळणे शक्य आहे का?
हो हे शक्य आहे.. आज आपण अश्या ११ पद्धती जाणून घेऊ ज्या विज्ञानावर आधारित आहे आणि तुम्हाला ऊर्जा व्यवस्थापन करून चांगले काम करण्यास मदत करेल. #BurnoutPrevention
🔑 उद्देश/अर्थ:
काही काम आपण करत असतो पण आपण हे का करतोय हेच आपल्याला स्पष्ट नसतं, तुमचा उद्देश किंवा जीवनाचे अर्थ स्पष्ट असावा. हाच उद्देश तुम्हाला कठीण परिस्थितीतही प्रगती करायला मदत करतो. यामुळेच तुमचं लक्ष केंद्रीत राहतं आणि तुमचा आत्मविश्वास वाढतो.
#FindYourWhy
Aug 20, 2024 • 12 tweets • 2 min read
करियर मध्ये - व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर ही टॉप १० सॉफ्ट स्किल्स तुम्हाला नक्कीच महत्वाची आहेत.
पूर्ण थ्रेड नक्की वाचा आणि शेअर करायला विसरू नका.
🧵
१. प्रभावी ऐकणे (Effective Listening)
🎧 वक्त्याचं पूर्ण लक्ष देऊन ऐका.
💬 स्पष्ट आणि सोपी प्रतिक्रिया द्या.
🤝 उघडपणे विचार शेअर करायला प्रोत्साहित करा.
चांगलं ऐकणं, विश्वास निर्माण करतं आणि टीममधील संबंध मजबूत बनवत.
#ListeningSkill
Aug 19, 2024 • 6 tweets • 2 min read
Atomic Habits या पुस्तकात James Clear यांनी अत्यंत प्रभावी असा 2-मिनिट नियम समजावून सांगितला आहे.
हा छोटा पण प्रभावी नियम तुमच्या सवयी सुधारण्यास आणि उत्पादकता वाढवण्यास मदत करू शकतो त्यामुळे पूर्ण थ्रेड नक्की वाचा आणि शेअर करायला विसरू नका.
#ProductivityHacks
⏰ 2-मिनिट नियमाचा साधा अर्थ असा आहे: जर एखादी गोष्ट 2 मिनिटांत पूर्ण होऊ शकते, तर ती लगेच करा. ईमेलला उत्तर देणे, कागदपत्र फाइल करणे किंवा डेस्क आवरणे अशा लहान गोष्टींनी कामे साचत नाहीत त्यामुळे छोट्या छोट्या कामांचा प्रेशर कमी होतो आणि योग्य कामात पूर्ण लक्ष राहतो
#QuickWins