Bhakti Bisure Profile picture
॥आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने॥ Journalist by Profession, Connoisseur at Heart! Agree to Disagree. Bookworm. Foodie. iPhone Girl. Hot Chocolate Addict. HATE DMs.
Sep 30, 2022 5 tweets 2 min read
१३ वर्ष वयाचा माझा मावसभाऊ गेले तीन आठवडे हॅास्पिटलला आहे. मी दोन दिवस प्रवासात होते. जाण्यापूर्वी त्याला भेटून आले होते. आज संध्याकाळी परत त्याला भेटायला जायचं होतं. पाऊस, झाडं पडणं, पाणी साचणं, ट्रॅफिकच्या रांगा अशा परिस्थितीत जायला मिळेल का शंका होती.

१/५ पण पाऊस उघडला तसे बाहेर पडलो. वारजे ते कर्वे रोडवर गरवारे कॅालेजपर्यंत एक तासापेक्षा जास्त वेळ अडकलो. या गतीने लक्ष्मी रोडवर हॅास्पिटलला पोहोचायला आणखी किमान एक तास लागला असता. म्हणून कर्वे रोडवर जागा मिळाली तिथे कार पार्क केली आणि पुढे चालत जाऊन त्याला भेटून आलो.

२/५
Sep 24, 2022 7 tweets 2 min read
नदाल आणि फेडररला हुंदके अनावर झालेला एक व्हिडिओ बघूनच आजचा दिवस सुरु झाला…

पुरुष असेल तर त्यानं रडायचं नाही… डोळ्यातलं पाणी पुरुषांना शोभत नाही… पुरुषानं नेहमी कणखर आणि खंबीरच असायला हवं असे काही तरी बावळट समज आपण आपल्याकडे करुन घेतले आहेत.
१/७ मुल (मुलगा) जेमतेम बोलायला चालायला लागला की ‘रडतोस काय मुलींसारखा?!’ हेच त्याला ऐकवलं जातं. त्यातून मग रडणं म्हणजे बावळटपणा, रडणं म्हणजे मुलींसारखं आणि रडणं म्हणजे वीकनेस हे ठसवणं जमुन जातं आपल्याला!

२/७
Aug 20, 2022 15 tweets 3 min read
डॅाक्टर

डॅाक्टरांना जाऊन काल २० ॲागस्टला ९ वर्ष झाली. सॅारी, डॅाक्टरांची हत्या होऊन ९ वर्ष झाली, डॅाक्टर अजून गेलेले नाहीत. त्यांच्या विचारांच्या रुपात ते भक्कम आणि ठाम उभे आहेत. तेव्हा मी एबीपी माझा या वृत्तवाहिनीत पुणे प्रतिनिधी म्हणून काम करत होते.

१/१५ सकाळी ८ च्या बुलेटिनला लाईव्ह द्यायचं म्हणून मी पावणेसातच्या दरम्यान घरातुन निघणार तेवढ्यात ॲाफिसचा फोन आला - संजय दत्तला आज पॅरोल मिळणार आहे. ८ च्या बुलेटिनला त्याही बातमीवर लाईव्ह होईल. त्या पॅरोलबद्दल २/३ ओळीत माहिती लिहुन ॲाफिसला कळवली आणि निघाले.

२/१५