लहानपणी मोठे होणं एक स्वप्न असत,
लहानपण एक आठवण झालेली असते..
आनंद कशात असतो हे आज कळलय,
लहानपण काय होतं ते आज उमगलय,
शाळेचे ते दिवस परत नाही येणार..
#बालमित्र
Mar 7, 2019 • 8 tweets • 4 min read
"एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात खाल्लेली नाही. जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्यांच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटत नाही."
"कॅलिडोस्को पाहिलेला नाही. सर्कसमधला जोकर आपलं मन रिझवू शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही राहिलेला नाही. कापसाच्या म्हातारीने उडता उडता आपला बाळपणीचा काळ सुखाचा स्वत:बरोबर कधी नेला ते आपल्याचा कळलंच नाही. आता त्या ट्रिप्स नाहीत."