Dr. Sanjay Rakibe Profile picture
LIVE LIFE KING SIZE मस्त जगायचे, धुंदीत रहायचं फक्त हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, आज जगून घ्या, उद्या कोणी पाहिला आहे. मृत्यूनंतर अवयवदान/देहदान - श्रेष्ठदान समुपदेशक..
May 27, 2023 14 tweets 4 min read
स्वतंत्र भारताचे वास्तव...
पण हे थांबायला हवे.

अमेरिकेत देव नाही, मठ नाही,
पण पाऊस मात्र वेळेवर व भरपूर आहे. गेल्या २०० वर्षात दुष्काळ नाही.
कुठले होम हवन नाही,
कसली वारी नाही,
कसले अभिषेक नाही,
अनुष्ठानं नाही,
हरिनाम सप्ताह नाही,
पारायणे नाहीत.
१/१४ अमेरिकेत लोकसंख्या नियंत्रणात आहे.
अन्नधान्य विपूल आहे.
सुखसोयी भरपूर आहेत. कशाचीच कमतरता नाही.
माणशी २८७६ वृक्ष आहेत.
भारतात फक्त माणशी २८ झाडे आहे.
आपल्याकडे वृक्षवल्ली आम्हां सोयरे म्हणतो.
पण एकही भारतीय झाड लावत नाही, जपत नाही. अमेरिकेत घरासमोर हिरवळ नाही असं घर नाही...
२/१४
Apr 17, 2023 6 tweets 3 min read
#उष्माघात म्हणजे शरीराचे तापमान जास्त वेळ १००-१०१ फॅरेनाईट किंवा त्याहून अधिक स्थिर राहणे. सामान्य पणे दुपारी शरीराचे तापमान ९७.५ ते ९८ फॅ. असते. #उष्माघातामध्ये हे तापमान १०१ फॅ. पेक्षा जास्त होणे व हे जीवघेणे ठरते. उष्ण कोरडी त्वचा हे उष्माघाताचे लगेच ओळखून येणारे लक्षण.

१/६ #उष्माघाताची लक्षणे खालील प्रमाणे
*हृदयाची धडधड वाढणे
*दिर्घ श्वास घ्यावा लागणे, व श्वासाची गती वाढणे
*रक्तदाब (Blood pressure) वाढणे किंवा कमी होणे
*घाम येणे थांबणे
*चिडचिड होणे, बेशुद्धी (ग्लानी) किंवा भ्रम वाढणे
*चंचलता येणे किंवा कमी होणे
*डोकेदुखी
*मळमळ (ऊलट्या)
२/६