Shekhar P Profile picture
जे मनात तेच ओठावर आणि जे ओठावर ते बोलणारच तुम्हाला आवडो की न आवडो मी असा आहे असाच राहील 🙏.
Apr 24 12 tweets 3 min read
बाजार 🙏.
ग्रामीण भागात ना आठवड्यात एक दिवस बाजाराचा असतो .मग तो कोणताही असो .कुठे गुरुवार ,कुठे शुक्रवार ,कुठे काय त कुठे काय .तुम्ही ग्रामीण भागात राहिले नसाल तर तुम्हाला बाजार दिवस म्हणजे किती महत्वाचा असतो ते समजणार नाही.आज ही बाजाराचे दिवस असतात.सहसा चार पाच हजारचे छोटे Image गाव असेल तर बाजार गावच्या वेशी बाहेर भरतो.मी जवळजवळ असे 30/35 गावचे बाजार अटेंड केले आहेत.मी आधीपासूनच जल जमीन जंगल पायी पायी तुडवणारा हौशी माणूस.बाजार म्हणजे आवडीचं ठिकाण. खासकरून एखादी सण असेल जसे दसरा ,आखाजी ,पोळा तर मग बाजाराची शान काही वेगळीच असते.चला माझ्यासोबत बाजाराला
Dec 11, 2023 10 tweets 3 min read
असंस्कृत 👽.
मी रेल्वे मधून खूप प्रवास केलाय .लांबचा प्रवास किंवा पर राज्यात जातांना तुम्हाला रेल्वे शिवाय इतर पर्याय कमी असतात. अगदी जबाबदारी ने लिहितोय प्रवासी कोणीही असू देत .हिंदू मुस्लिम ख्रिचन ,जनरल डबा असो की AC ,मध्यमवर्गीय असो की सधन ,शिक्षित अशिक्षित .सगळ्यांना जोडणारा Image एक धागा आहे - असंस्कृत पणा .एक एक नमुने असतात .हे पहा तुम्ही अनुभवला आहे का यांचा त्रास ? शोचालयात जाऊन सिगरेट पिणारे.वॉटर बॅग मध्ये पेग भरुन पिणारे .रात्री मध्यरात्री मोठ्याने बोलणारे .पहाटे लवकर उतरायचे असेल तर एक तास आधी उठून लाईट लावून इतरांना जागी करणारे .मोठ्या आवाजात
Jul 15, 2023 6 tweets 2 min read
आधी भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
80 ला पोहोचलेला कधीकाळी पडद्यावर चा रुबाबदार देखणा नट .आयुष्याच्या अखेरी भाड्याच्या घरात ,एकांतात एकाकी गेला ते समाजाला तीन दिवसांनी समजले .त्याच्या कौटुंबिक समस्यांचा उहापोह इथे करायचा नाहीय. वडलांना तीन दिवसात मुलां कडून फोन केला गेला असता तर ?? किंवा प्रत्येक फेमिलिचे व्हाट्सएप ग्रुप असतात त्यावर तीन दिवस वडिलांनी गुड मॉर्निंग केले नसेल की मुलांन सोबत व्हाट्सएप वर पण बोलणे होत नसेल असेच दिसतंय.मी एकटाच राहीन भलेही भाड्याच्या घरात राहील असा हट्ट पण वडलांनी कदाचित केला असेल.जे काही वरकरणी दिसते आहे ते इतकेच की
Jun 4, 2023 9 tweets 2 min read
रेल्वे अपघात .
मी रेल्वे ने भारत भर खूप खूप फिरलोय ,म्हणून थोडे शेयर करतोय.काल चा अपघात हा विषय थोडा बाजू राहू द्या. आज ही रेल्वे प्रवास हा सगळयात स्वस्त आणि सुरक्षित आहे हे मी निक्षून सांगतोय.कनिष्ठ मध्यम वर्गीय किंवा उच्च मध्यम वर्गीय जिथे ऐयरपोर्ट नाही त्यांना रेल्वे शिवाय पर्याय नाही.एक उदाहरण सांगतो .नागपूर पुणे लक्झरी 1800 रुपये , रेल्वे AC थ्री टायर 1255 रुपये .भुसावळ हरिद्वार AC थ्री टायर 1700 च्या आसपास .जर डोके वापरून नीट प्लॅनिंग करून प्रवास केला तर 850 रूपयेत भुसावळ पुणे AC 3 टायर फिरू शकतात .लक्झरी मध्ये तरुण तडफदार उमेदवार आरामात
Jun 3, 2023 9 tweets 3 min read
जागतीक सायकल दिवस 💖.
मी पाचवीत बाकी बहीण भाऊ मोठे.घरात एकच लेडीज सायकल ती पण सेकंड हॅन्ड होती.सायकल मार्ट वर संध्याकाळी जाऊन नाव सांगून एक कमी उंची ची सायकल 15 पैसे तास या भावाने आम्ही घेऊन यायचो.आधी हाफ पायडल मारत मारत फुल्ल पायडल शिकलो.लेडीज नंतर जेन्ट्स म्हणजे दांडे वाली Image सायकल शिकलो.मग दहावीत एक जुनी सायकल विकत घेतली., त्याकाळी हेर्क्युलस / एटलास / रेलीसन / BSA एटलास ही बारीक टायर ट्यूब ची सायकल बाजारात मिळत असे.भाड्याची सायकल रात्रभर हवी असेल तर 1 रुपया नाईट.सायकल मार्ट वरून सायकल घेण्यात मजा यायची .त्यांच्या एकसारख्या नवीन सायकली रांगेत
May 3, 2023 14 tweets 5 min read
माझी उनाड भटकंती 🏇
नोकरी सुरू केली थोडा पैसा आला .कुठ फिरणार ? मला एक रूट सापडला.मला सोमवारी औरंगाबाद हजर व्हायचे असेल तर मी प्लॅनिंग करून एकटाच निघायचो. 90/91 मध्ये मी चाळीसगाव वरून रविवारी पहाटे राजदूत काढून निघायचो.गर्द झाडीचा कन्नड घाट.त्या काळी कन्नड घाट दिव्य होते.मी Image हा घाट थंडी ,उन्हाळा पावसाळा पहाटे ,दुपारी ,रात्री फिरलो आहे.पावसाळ्यात या घाटात फिरण्यासारखी मजा नाही .घाट चढून जुनोने गाव येते उजव्या बाजूने गेले की एक पुरातन लेणी आहेत त्यांचे नाव पितळखोरे .मी पहिल्यांदा गेलो तेव्हा एकटाच होतो आणि पितळखोरे थोडे खाली उतरून बघावे लागते.एकांत , Image
May 2, 2023 6 tweets 3 min read
डोंगर म्हातारा झालाय 💐🙏.
अनेक वादळ अंगावर घेऊन ऊन वारा पावसात तो उभा आहे.डोंगराआड आडोशाला असणारी लोक आज सैरभैर झालीत.वटवृक्ष म्हटले की त्याच्या मुळाशी असणाऱ्या छोट्या वृक्षांना नेहमी वाटते मी पण कधी होईल मोठा ? आणि मग मुसळधार पावसाला सुरवात झाली की वटवृक्ष आपसूकच त्या पालवी Image फुटलेल्या रोपांना आपल्या विशाल फांद्या खाली घेतो .आज राष्ट्रवादी चे तसेच झालंय .कोणी रडतय ,कोणी शांत झालंय ,कोणी संभ्रमित झालय. मला वाटते कार्यकर्ते आणि नेत्यांनी आता नवीन नेतृत्वाखाली वाटचाल करायची वेळ आली आहे .अगदी स्पष्ट पणे सांगतो आहे तुमचे जर शरद पवार या माणसावर प्रेम
May 1, 2023 10 tweets 3 min read
मी मराठी 😋💖.
आज महाराष्ट्र दिन आहे मग मराठी पदार्थांची आठवण तर करूनच दिली पाहिजे .मी पूर्वी पोस्ट केले आहेत म्हणून आज फक्त फोटो .माझे टॉप 10 मराठी आवडते पदार्थ 😋
1 - भरली वांगी 😋💖 Image 2 -उक्कड पेंडी ,😋💖 Image
May 1, 2023 4 tweets 1 min read
महाराष्ट्र दिन
कोणाला शुभेच्छा देऊ ? महाराष्ट्रा चा बिहार करणाऱ्या राजकारण्याना की त्यांची तळी उचळणाऱ्या समर्थकांना .मतलबा करता शाहू महाराज.महात्मा फुले ,डॉक्टर बाबासाहेब ,छत्रपती शिवाजी महाराज यांचा नामघोष करणारे छछोर राजकारण्यांना ? अतिशय हलक्या मनोवृत्ती च्या आणि कधीही सामाजिक विषयावर तोंड न उघडणाऱ्या कलावंतांना ? हिंदुत्ववादी आणि हिंदुत्वसाठी पक्ष सोडणाऱ्या हिणकस लोकांना ? गांधी सावरकर वाद काढून सलोखा बिघडवणाऱ्या कणाहीन विचारवंतांना ? समाज माध्यमावर मनसोक्त उधळणाऱ्या राजकारणातील ताई ,वहिनींना ? क्रीडाक्षेत्रातल्या ऱ्हासा बद्दल एक ही शब्द
Apr 30, 2023 9 tweets 3 min read
रेल्वे टाइम टेबल 🚂🚃🚃
जेव्हा मोबाईल नव्हते तेव्हा मी आणि माझ्या सारखे रेल्वे ने नेहमी प्रवास करणारे प्रवासी जून जुलै महिन्यात रेल्वे बुक स्टोअर्स वर एक जाड जुड टाईम टेबल विकत घ्यायचो .ते इंग्रजी हिंदी मध्ये मिळायचे.आजकाल मिळतात की नाही माहीत नाही .तुम्ही ज्या भूभागात राहातात Image त्या निगडित टाइम टेबल विकत घ्यावे लागे सोबत संपूर्ण इंडियन रेल्वे चे पण घेऊ शकतात. पट्टीचे प्रवासी सोडले तर वर्ष भरात एक दोन वेळेस प्रवास करणाऱ्या च्या डोक्यात हे शब्द घुसणार नाहीत जसे - प.रे .पश्चिम रेल्वे / उ रे -उत्तर रेल्वे/ म उ रे - मध्य उत्तर रेल्वे /प म रे पश्चिम मध्य Image
Apr 27, 2023 12 tweets 3 min read
हॉस्पिटल 🙏.
आज ही हॉस्पिटलमध्ये बसलो आहे .तसे आई वडीलांनी बरीच हॉस्पिटल फिरायला लावली आहेत.हिंदुजा ,रुबी ,कमलनयन बजाज मला सवय झालीय .मी एकटा तासनतास रेल्वे ,हॉस्पिटल ,जत्रा , किंवा गार्डन मध्ये बसू शकतो .मला लोकांचे समूहाचे स्वभाव वागणे बोलणे चालणे यांचे निरीक्षण Image करायला आवडते.पूर्वी हॉस्पिटल मध्ये फारशा सोई नसत .आजकाल बाहेर पार्किंग ,रिसेप्शन ,AC वेटिंग रूम ,ATM , केफेटेरिया,डीलक्स रूम ,सेमी रूम त्यात एक जण झोपायला परवानगी ,पेशंट ला सकाळी चहा पासून सूप दोन वेळा जागेवर जेवण .स्वछता आणि टापटीप यात अव्वल .काऊंटर वर पैसे भरा ,तिथे
Apr 26, 2023 7 tweets 2 min read
शब्दकोडी 😔🙏
आमच्या वेळी समाजमाध्यम नव्हती मग शब्दकोडी सोडवायचे व्यसन लागलेले .कुठे कोणाकडे पेपर दिसला की घे ,उघड मधले पान आणि बॉल पेन घेऊन कर सुरुवात .त्याकाळी रसरंग ,लोकप्रभा ,जत्रा मध्ये कोडे यायचे त्यावर बक्षीस पण मिळत .मी अधाशा सारखे कोडे सोडवायचो आणि लगेच एन्व्हलप मध्ये Image टाकून पोस्टात जाऊन टाकून यायचो .बऱ्याच वेळी पुढच्या अंकात विजेत्यांची नावे त्यात माझे नाव यायचे .तुमचे वाचन असेल आणि सवय असेल तर तुम्ही शब्दकोडी पटापट सोडवू शकतात .त्याचा एक साचा असतो .आडवे - मनातले ओळखणारा - मनकवडा - डावखोरा - रातकीडा - डावा - वाटप - परावलंबी - आणि कोडे सुटत
Apr 21, 2023 5 tweets 1 min read
मराठा 🔥
मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका फेटाळली .मराठा समाजाचे सगळ्यात जास्त नुकसान केलंय ते मराठा राजकारण्यांनी .ग्रामपंचायत ,,नगरपालिका ,महानगरपालिका ,जिल्हा परिषद ,साखरसम्राट ,शिक्षण सम्राट ,यांच्या निवडणुकीत अंगावर गुलाल उधळवून DJ वर नाचणाऱ्या मराठा समाजातील मुलांनो , छोटे मोठे व्यवसाय सुरू करा ,अगदी पत्र्याची शेड बांधून सुरवात करा,शासनाचे कर्ज कुठून मिळेल ते बघा, व्यवसाय करायला लाजू नका .मी 96 कुळी मराठा आणि वडापाव टाकू का ? असा विचार करू नका.मी ओला कार चालवू का ? समाज काय म्हणेल ? असे डोक्यात ठेऊ नका.सरकारी नोकऱ्या नाही याचे भान ठेवा.
Feb 27, 2023 7 tweets 2 min read
माझी माय माऊली मराठी 💖.
अ ब क ड प फ ब भ न य र ल व श या पासून सुरू केलेला प्रवास आज ही चालू आहे .मी मराठी ,हिंदी ,इंग्रजी ,वाचू बोलू लिहू शकतो .संस्कृत नीट वाचू शकतो . गुजराथी बऱ्यापैकी वाचता येते आणीअगदी नीट नेटकी समजते.पुस्तक वाचायचे म्हटले की मग वाचण्याचा वेग या प्रकारे असतो मराठी -हिंदी - इंग्रजी .जाडजूड मृत्युंजय एक दीड दिवसात पीठ पाडून हाता वेगळे केलंय पण 'आपत्काल से आप्तकाल तक " चे दोन जाडजूड खंड वाचायला चार दिवस लागलेत. मनातले काही विचार व्यक्त करताना वादविवाद करतांना मातृभाषेत जीभ सुसाट चालते पण तेच हिंदी किंवा इंग्रजीत व्यक्त होतांना अडखळतो.
Feb 27, 2023 4 tweets 1 min read
कसबा चिंचवड 🔥🔥
कसबा / चिंचवड चा निकाल म्हणजे सर्वांन करता लिटमस टेस्ट आहे .भविष्यात एकत्र कुटुंब म्हणून संसार करायचा की वेगळे राहायचे यावर निर्णय घेता येईल .भाजप पण हे ठरवेल की शिंदे गट चहा मधली माशी म्हणून फेकायचा की हातच्या ला एक म्हणून ठेवायचा .या निवडणुकीत एक नवीन प्रयोग भाजप नेतृत्वाने करून बघितला आहे आणि तिच्यात जर यश आले तर पुढे ही हा खेळ ते करून बघतील तो म्हणजे ब्राम्हणेतर उमेदवार देऊन निकाला वर किती फरक पडतो ? ब्राम्हण उमेदवार नसेल तरी ब्रम्हणांची पारंपरिक मते भाजप ला असतातच पण सोबत बहुजन समाजाच्या मतांची मोळी बांधली जाते का हे पण
Feb 19, 2023 11 tweets 2 min read
मध्यस्थ 👽🙉😡.
प्रत्येक समाजात लग्न जमवणारे मध्यस्थ असतात .आज प्रत्येक समाजाचे व्हाट्सअप वर वधु वर ग्रुप असतात .तरी मध्यस्थ हा आयटम लागतोच.काहींच्या अंगात शब्दशः मध्यस्थी करण्याचा किडा असतो .पूर्वी मुली नोकऱ्या कमी करत आणि गृहिणी जास्त होत्या त्यामुळे घरकामात स्वयंपाकात शिवणकाम किंवा चार चौघात पदर खोचून काम करणारी मुलगी पहिली की मध्यस्थी तिला आरामात खपवून टाकत .आज ग्रामीण भाग ते मोठी शहरे येथील मुली 100 % शिकत आहेत नोकऱ्या करत आहेत ,त्यामुळे झाले काय की आता मध्यस्थ घरी आले की मुलींचे बाप त्याची बोळवण करतात .त्याकाळी मध्यस्थी
Feb 15, 2023 10 tweets 3 min read
घरोघरीचे आधारवड ❤️.
नवीन पिढी IT त करियर करतेय जोडीदार पण IT त असते /असतो .आधी भाड्याने तर नंतर 2 BHK बुकिंग करून पुणे ,मुंबई सेटल होतात. पूर्वी प्लेग ची साथ यायची आणि लाखभर लोकांना लागण व्हायची तसे मागच्या दशकात महाराष्ट्रातील मुलीं मध्ये साथ पसरलीय "नवरा पुणे चा च हवा " आज संपूर्ण महाराष्ट्रा मधून हजारो तरी पोर पोरी पुणेकर झाले आहेत.आई वडील गावी आणि ही जोडगोळी पुणेत असतात. नव्याचे नऊ दिवस झालेत की आई बाबा पुणे निघा म्हणून प्रेमाचा फतवा निघतो.एकदाचे गावाकडचे आई बाबा दुपारी पोचतात .पेन्शनर आबा ला म्हातारी ने आधीच सांगितले असते 7/8 दिवसात परत निघू
Feb 14, 2023 10 tweets 2 min read
अरेंज मॅरेज
सहा पैकी चार तुटायला आली आहेत चार कोर्टात आहेत.एकाचा निकाल लागला 7 लाख दिलेत तंटा मोडला. दुसरा मुलीचा बाप म्हणतो एक रुपया नको फक्त डायव्होर्स घे बस.तिसरे आई वडील म्हणतात वेगळे राहायचे असेल तर वेगळे राहा मी घर घ्यायला मदत करतो तुम्ही सुखी राहा ,पण सून माहेरी गेली.एक ना धड भाराभार चिंध्या .आपल्या मुली ला जो न्याय लावतो तो सुनेला नाही लावायचा .वॉशिंग मशीन मधले कपडे वाळत नाही टाकले की सून बेवळणी पण मुली ला वेळ नसतो ऑफिस ला वेळ होतो तिला 👌.जावया ने आपल्या पोरीला मदत करायला हवी कारण ती नोकरी करते आणि सून नोकरी करते तर आपल्या मुलाने थोडे काम
Feb 1, 2023 9 tweets 2 min read
निंबा आणि लोणचे पोळी 💖
पाचवी पासून माझा मित्र तेव्हाही निंबा आज ही निम्ब्या म्हणतो मैत्री कोणाशी कशी कुठे जमेल ते सांगता येत नाही कोणी पहिल्या भेटीत मित्र बनतो, कोणाशी पटत नाही.सहावीत निम्ब्या त्याच्या घरी घेऊन गेला गरीब वस्ती खाली एक खोली वर एक पत्र्याची खोली. अतिशय कमी सामान .त्याचे वडील एक बाकड्यावर बसलेले आत एक स्टोव्ह पाच सहा भांडी ,एक वळकटी ,तारेवर पांढरा शर्ट खाकी चड्डी .आणि वर पत्र्याच्या खोलीत एक बकरी बांधलेली आणि टोपली खाली कोंबडी .निंबा आई कुठे गेली ? गेली देवाघरी एक दोन वर्षे झालीत .😩.बाबा काय करता रे ? हमाल आहे 🤔 लहान वय जात
Jan 21, 2023 7 tweets 2 min read
स्कुल बस - ते - नॅनो 😎
व्हाट्सएप आले आणि मग मित्रांचा ग्रुप बनवण्याची लाट आली .2014 आधी असलेला आमचा 26 शालेय मित्रांचा ग्रुप आता 4 वर येऊन ठेपलाय .असे तुमच्या सोबत ही घडतंय का ? जात पात / मोदी / गांधी / गोडसे / लव्ह जिहाद / धार्मिक द्वेष / भगवा रंग / सेना ,भाजप ,भांडणे ,/ राणे फडणीस ,ठाकरे ,पवार ,यांचे कलगीतुरे / कंगना / उर्फी / आणि इतर ललना / मराठे × सवर्ण × ब्राम्हण × हा जातीद्वेष /हे कधी होते आपल्या मैत्री मध्ये 😱😱.तुमची मानसिकता खराब करणारे हे विषय घेऊन दिवसभर गरळ ओकणारे हे तेच मित्र आहेत का ? ज्यांच्या डब्यातील अर्धी पोळी आपण तोडून खाल्ली आहे ?
Jan 19, 2023 4 tweets 1 min read
गौतमी पाटील 🌹.
मूळ गाव धुळे तालुका शिंदखेडा ,वडील पिण्याच्या नादी लागून तिला ती एक वर्षाची असताना सोडून गेले .वडिलांन चे गाव तालुका चोपडा जिल्हा जळगाव .आठवी ला असतानाच यी पुणे येऊन सेटल झालीय.खान्देश सोडून कोणी मोठे झाले तर त्यांना मी खान्देशी आहे हे सांगायला लाज वाटते ,त्यांना अहिराणी बोलायला लाज वाटते ,मी खान्देशी आहे हे न सांगता मी पुणेची मी कोल्हापूर ची असा काहीही खोटे न बोलता मी मूळ धुळे ,शिंदखेडा ची आहे असे ठणकावून सांगणाऱ्या गौतमी चे अभिनंदन 🌹मी असे कमीत कमी 40/50 सेलिब्रेटी सांगू शकतो की ते खान्देश सोडल्यावर या मातीचे ऋण विसरतात .विसरले आहेत.