हर्षद Profile picture
मराठी 🚩 वाचन 📖 #कविताप्रेमी🎶 #हर्षरंग✍🏼 शब्दांना कागदावरती खूप मोठ्याने बोलावं वाटतं, दोन रेषांमधील जागेच बंधन पाळावच लागतं - हर्षरंग ✍🏼
Jun 26, 2022 4 tweets 1 min read
काय झाडी काय डोंगार काय हाटील
काय गावकरी काय सरपंच काय पाटील

काय समाज काय उमेदवार काय पक्ष
काय आमदार काय खासदार काय लक्ष

काय नेता काय जनता काय विश्वास
काय खरं काय खोटं काय आभास

काय श्रीमंत काय मध्यमवर्ग काय गरीब
काय सुदैव काय दुर्दैव काय नशीब काय मतदार काय कॅांन्टीट्यूएंसी काय सत्ता
काय फायस्टार काय थ्री स्टार काय गुत्ता

काय भाषणं काय घोषणा काय नारे
काय मौसम काय वादळ काय वारे

काय विचार काय बांधिलकी काय तत्वं
काय पक्षनेता काय कार्यकर्ता काय स्वत्वं
Mar 14, 2021 13 tweets 4 min read
*सुरेश भटांचे* शेर.
सगळी _'अ''__ पासून _'ज्ञ'_ पर्यंत अक्षरे आहेत.

(अ)
*अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा*
*गजरा कसा फुलांचा विसरुन रात्र गेली?*
...सुरेश भट.
*
(आ)
*आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी*
*हलकेच कूस माझी बदलून रात्र गेली*
...सुरेश भट.
* (इ)
*इतकेच मला जातांना सरणावर कळले होते*
*मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते*
....सुरेश भट.
*
(ई)
*'ईश्वरी इच्छा'च होती कालचा दंगा*
*माणसांनी माणसांना मारले कोठे?*
...सुरेश भट
*
(उ)
*उरले उरात काही आवाज चांदण्याचे..*
*आकाश तारकांचे उचलून रात्र गेली*
सुरेश भट.
*