Computer Engineer | Youth | Politics | Founder : Rajmudra Foundation | Working with @Ncpspeaks
May 24, 2020 • 13 tweets • 6 min read
भारत आत्मनिर्भर होण्यासाठी मागच्या सत्तर वर्षात उभ्या राहिलेल्या संस्था...
• स्टील ऑथाॅरिटी ऑफ इंडिया १९५४ ला पोलाद निर्मिती मध्ये भारत आत्मनिर्भर होण्यासाठी स्थापन झाल.
• आय.आय.टी ची स्थापना १९५६ मध्ये भारताला अभियांत्रिकी शिक्षणामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी झाली. 1/12
• AIIMS ( एम्स ) ची स्थापना १९५६ मध्ये वैद्यकशास्त्र आणि आरोग्याच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यासाठी झाली.
• ONGC ( ऑईल & नॅचरल गॅस कमिशन ) ची स्थापना १९५६ मध्ये भारताला नैसर्गिक वायू आणि इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यासाठी झाली. 2/12